निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वर उल्लेख केलेले पुस्तक.. एकदम अनोखे आहे.
पानापानावर उत्तम विचार आहेत..

सध्या मानवाने निसर्गात ढवळाढवळ करून आपल्याला हवे तसे जीव ( त्यात प्राणी व वनस्पति दोन्ही आल्या ) निर्माण केले आहेत...
निसर्गात जेव्हा असे संस्कार घडतात आणि काळाच्या कसोटीवर टिकतात.. तेव्हा फक्त त्या जीवाचा विचार केलेला असतो आणि मानव जे बदल घडवतो ते केवळ आपल्या फायद्यासाठी...

मानव नसेल तर कुत्रा, कोंबड्या, गायी, गहू, बटाटे, गुलाब यापैकी काहीही तग धरू शकणार नाही.

आपल्याकडे शेतीत कापसाची झाडे लावतात ती एक वर्षेच जगतात ना ? मी इथे रस्त्याच्या कडेने कापसाची झाडे बघतो त्यांची एकदा बहर मग पानगळ आणि पुन्हा बहर अशी सायकल पण पूर्ण झाली.

मी कापसाचे शेत बघितले नाही आणि कोकणात कापुस नसल्याने त्याबद्दल माहितीही नाहीय. पण माझ्या कॉलनीत एक कापसाचे झुडुप होते. उंची साधारण दोन अडिज फुट होती. झाड तण म्हणुन वाढलेले, कोणीही लावले नव्हते. ते झाड साधारण तिन चार वर्षे टिकुन होते. आता आहे का ते माहीत नाही. मी आज पाहिन तिथे जाऊन. पानांवरुन ओळखता येईल मला.

दिनेश, तुमच्या वरच्या माहितीवरुन असे वाटतेय की मुळ् फुल बारीक असतानाही झाडांने मुद्दाम गुलाबी रंगाचे काहीतरी स्वतःवर विकसीत केलेय, ज्यामुळे किटक येतील. पण ही व्यवस्था त्या झाडात आधीपासुनच असेल हेही शक्य आहे ना...

तुम्ही कुठल्या पुस्तकाबद्दल लिहिलेय. मी वर वाचले असणार पण आता विसरले, आणि पाने उलटत बसायला इथे ऑफिसात वेळ नाहीट. जेवढा वेळ आहे तेवढा कमेंटी टाकण्यात जातो Happy

मानुषी मस्त फोटो. ते पेंटींगच वाटतेय. Happy
शशांकजी मस्त माहिती. आणि दिनेशदानी इंग्रजीत लिहिलेलं, तुम्ही मराठीत लिहीलय हे आधी सांगायच ना? Proud

Shobha tune mere man ki bat chin li. Mi pan aadhi kasth karun te vachl.

kapsach jhad 5-6 varshapasun aage majhyakade. Dineshda shetisathi tyachi dar varshi lagvad karat asnar.

Mi pan aadhi kasth karun te vachl. >>>> मी मात्र हे विनाकष्ट वाचले .... Happy Wink

शशांकजी मस्त माहिती. आणि दिनेशदानी इंग्रजीत लिहिलेलं, तुम्ही मराठीत लिहीलय हे आधी सांगायच ना?>>>> आधी कसे लिहिणार ??? Happy Wink

तुम्ही लोक्स कुठलेही पान उघडले की स्क्रोल करत जा - वाचण्याआधीच .... मगच वाचायचे ... परीक्षांचे पेपर्सपण असेच सोडवले का ??? Happy ;)...... जो पहिला प्रश्न आला समोर की घेतला सोडवायला - मग तो चार-पाच मिनिटात येवो किंवा अर्धा तास लागो पार !!!!!..... Happy Wink
आता तरी नीट लक्षात ठेवा - की लिहायच्या आधी पेपर पूर्ण पहायचा असतो (तो ही निर्विकारपणे - विदाऊट टेन्शन...) - मग जे प्रश्न "नो टेन्शनवाले" ते नीट बघून भरभर सोडवायचे - मग बाकी न येणारे प्रश्न - काही तरी अट्ट्या लाऊन / छापा-काटा करत करत सोडवायचे .... (असल्या ट्रीक्सशिवाय का पास होता येते ??) Happy Wink

जागू -तुझ्या मुली तर अजून खूप लहान आहेत - त्यांना असे छान वळण (?) लाव - म्हणजे बघ कशा तय्यार होतील पेपर्स लिहायला ते ..... Happy Wink (नाहीतर सरळ माझ्याकडे शिकवणीला पाठव बरं...)

तुम्ही लोक्स कुठलेही पान उघडले की स्क्रोल करत जा - वाचण्याआधीच .... मगच वाचायचे ... परीक्षांचे पेपर्सपण असेच सोडवले का ??? ...... जो पहिला प्रश्न आला समोर की घेतला सोडवायला - मग तो चार-पाच मिनिटात येवो किंवा अर्धा तास लागो पार !!!!!.....>>>>>ज्जे बात शशांक. Happy
माझे कष्ट वाचलेत Happy मी आधीच तुमची मराठीतली पोस्ट वाचली होती. Wink

माझे कष्ट वाचलेत स्मित मी आधीच तुमची मराठीतली पोस्ट वाचली होती. डोळा मारा>>>>>>>.हुश्शार हो तु >>>त्याला लगीनानंतर वळण लागलेय बहुतेक ... Happy Wink (हलके घे रे भाऊ...)

दिनेशदा यांची पोस्ट मी त्यांनी टाकल्यावर रात्री वाचायला सुरुवात केली होती, नंतर विचार केला की उद्या सावकाश वाचूया आणि दुसऱ्या दिवशी शशांकजीनी देवनागरीत लिहिली, हुश्श, मग तीच वाचली.

दिनेशदा यांची पोस्ट मी त्यांनी टाकल्यावर रात्री वाचायला सुरुवात केली होती, नंतर विचार केला की उद्या सावकाश वाचूया आणि दुसऱ्या दिवशी शशांकजीनी देवनागरीत लिहिली, हुश्श, मग तीच वाचली.>>>>>>>म्हणजे हे "आज करे सो, कल करे ....... " असं झालं तर. Proud

पॅशन्फ्लॉवर म्हणायला हवे.>>>>पॅशनफ्लॉवर वरून आठवलं. दिनेशदा, पुढच्या वेळेस भारतात येताना पॅशनफ्रुट फ्लेव्हरवाले टिकटॅक आणा. इथे (म्हणजे मुंबईत :-)) शोधले पण सापडले नाही. Happy Happy

टिकटॅक हे माऊथ फ्रेशनर आहे का ?? त्यापेक्षा वेलदोडा/ लवंग/ बडीशेप/ओवा यासारखे देशी माऊथ फ्रेशनर का नाही वापरत ??

त्यापेक्षा वेलदोडा/ लवंग/ बडीशेप/ओवा यासारखे देशी माऊथ फ्रेशनर का नाही वापरत ??
आम्ही असले साखरयुक्त पदार्थ अजिबात खात नाही.>>>>>मी सुद्धा नाही खात. Happy पण ते पॅशन्फ्रुट फ्लेव्हरवालं आवडलेलं. Wink

आणि रोमनाळलेले मराठीही अजिबात वाचत नाही.>>>>होक्का? Happy

हे रे काय शशांक, मला तर वेलदोडा/ लवंग/ बडीशेप/ओवा हे तर आवडतातच पण टिक्टॅक पण भार्रीच आवडतं... Lol

नमस्कार नि. ग. कर्स. होळी आली आणि गेली. आमच्या कडची थंडी केव्हा जाणार देव जाणे.
अजुनही देवनागरी टाईप करता येत नाहिये. दुसरीकडे टाईपुन येथे डकवत आहे.

सध्या सगळीकडे वसंतोत्सव चालू झाला आहे.. मुचकुंद, कॅशिया, शेव्हिंग ब्रश, पाचुंदा, गोविंदी, जॅकरांडा, सुरंगी, तबेबुया... किती किती फुलले आहेत!! रंगपंचमी साजरी होतीये जणू काही! सारसबागेतल्या तामणीला कळ्यांचे रग्गड दांडोरे आलेत! दहा एक दिवसांपूर्वी अजानवृक्ष फुलावर होता... आता बहर गेला. कात्रजच्या घाटात काटेसावर आणि गणेर फुलली आहेत. आणि बहावा हळूहळू फुलू लागलाय. बारतोंडी सुद्धा कळ्यांवर आलीये.....

विणीच्या हंगामामुळे अनेक कलाकार पक्षी पण आपली कला सादर करताहेत. त्यांचे सूर जास्त गोड झालेत आणि सुबक घरटी बांधण्याची लगबग तर काही विचारायला नको!!

नि ग कर्स..... या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपणा सर्वांना येतच आहे.. त्यामुळे आपण खरंच भाग्यवान आहोत. Happy

Pages