निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
अरे हो सॉरी शशांक झाड नाही,
अरे हो सॉरी शशांक झाड नाही, तण आहे आणि मस्त पसरलं आहे.
शशांक जी+ शांकली, ऊंबरा बद्दल
शशांक जी+ शांकली, ऊंबरा बद्दल छान माहिती...
आमच्या घरी कुंडीत इटुकली पिटुकली टोमाटो लागली आहेत.. त्यातली दोन बर्यापैकी मोठी
झालीत,एक जरा तांबुस होतोय.. बाकीची फरच छोटी आहेत.. सई आणि सुखद दोघे आतुरतेनी
वाट बघतायेत! कधी पिकतायत, हा तुझा, तो माझा, सगळ ठरवुन पण झाल बरका!
रोज सकाळी, सुखद ला कडेवर घेउन आधी टोमाटो च दाखवावे लागतात..
परवा तर गम्मतच झाली, तो म्हणाला, आई, आपल्या झाडाला अंडी लागलीत...
माझ बोट धरुन बालकनीत घेउन गेला, बघते तर काय.. मोगर्याला टपोर्या कळ्या लागल्या
होत्या....
सामी, त्या तणाची पान कीती गोड
सामी, त्या तणाची पान कीती गोड आहेत!
शशांकजी, उंबराबद्दल मस्त
शशांकजी, उंबराबद्दल मस्त माहिती.
सायली ,
सई आणि सुखद दोघे आतुरतेनी
वाट बघतायेत! कधी पिकतायत, हा तुझा, तो माझा, सगळ ठरवुन पण झाल बरका!
रोज सकाळी, सुखद ला कडेवर घेउन आधी टोमाटो च दाखवावे लागतात..
परवा तर गम्मतच झाली, तो म्हणाला, आई, आपल्या झाडाला अंडी लागलीत...
माझ बोट धरुन बालकनीत घेउन गेला, बघते तर काय.. मोगर्याला टपोर्या कळ्या लागल्या
होत्या....>>> खूप आवडलं
हा तुझा, तो माझा, सगळ ठरवुन
हा तुझा, तो माझा, सगळ ठरवुन पण झाल बरका!
आई, आपल्या झाडाला अंडी लागलीत...>>>>>
धन्यवाद हेमा + जिप्सी.....
धन्यवाद हेमा + जिप्सी.....
आई, आपल्या झाडाला अंडी
आई, आपल्या झाडाला अंडी लागलीत... >>>> मुलं कसा आणि काय विचार करतील सांगता येत नाही - सगळ्या गंमती-जमतीच .... त्यांच्या बोलण्याची मजाच वेगळी ..
मागे एकदा - मुलगी छोटी असताना तिने पाहिले - रस्त्यावरुन एक बाई पाटीभर गोवर्या घेऊन जात होती - तर ही कन्यका म्हणते कशी - ई ई... ती बाई बघ - "शेणाच्या भाकर्या" घेऊन चाललीये......
Oxalis corniculata हे आहे
Oxalis corniculata हे आहे माझ्याकडे तण म्हणुन याला लहानग्या शेंगा येतात, पिवळी फुले लागतात. नेटावर याचे मस्त रंगातले फोटो आहेत.
ऐशु लहान अस्ताना एकदा तिला
ऐशु लहान अस्ताना एकदा तिला संघ्याकाळी घरी घेऊन येत होते. पोर्णिमेचा पुर्णचंद्र नुकताच उगवला होता. ऐशु लगेच म्हणाली, आई चंद्र बघ चपातीसारखा दिसतोय. मला कुठेतरी भाकरीचा चंद्र वाचलेले आठवले. म्हटले जे भाकरी खातात त्यांना चंद्रात भाकरी दिसतेय, चपाती खाणा-यांना चपाती, डोशेवाल्यांना डोसेही दिसत अस्तील.
ती बाई बघ - "शेणाच्या
ती बाई बघ - "शेणाच्या भाकर्या" घेऊन चाललीये...... स्मित
खरच शशांक जी, लाहान मुलं अगदी निरागस असतात...
अरेवा, लहान मुलं किती
अरेवा, लहान मुलं किती निरागसपणे रिलेट करतातना त्यांना माहिती असलेल्या गोष्टींशी, त्यात त्यांची विचारशक्तीपण किती गोडपणे दिसून येते.
साधना + अंजु , स्मित...
साधना + अंजु , स्मित...
साधना + अंजु , स्मित...
साधना + अंजु , स्मित...
पांढर्या-गुलाबी पेन्सिलचं
पांढर्या-गुलाबी पेन्सिलचं शार्पनरने टोक काढल्यावरच भाग जसा दिसेल तसंच दिसतंय ना?>>>>>.मला पण ते तसच वाटलं.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/45755?page=13 - निरनिराळ्या ऑक्झॅलिस संबंधी माहिती व फोटो ...
शशांक जी सगळी च छान, पण
शशांक जी सगळी च छान, पण Purple Shamrock, जास्त आवडला....
कोण ते काल म्हणाल होत
कोण ते काल म्हणाल होत जिप्स्याला कमी छळा म्हणून आता स्वतःच छळून घेण्याची इच्छा आहे त्याला निसर्ग तरी काय करणार ?>>>>>>> जागू, बघ ना कुणी काढला होता का विषय?
मस्त किस्से लहान मुलांचे.
मस्त किस्से लहान मुलांचे.
निरनिराळ्या ऑक्झॅलिस संबंधी
निरनिराळ्या ऑक्झॅलिस संबंधी माहिती व फोटो ... >>>>त्यातील पिवळ्या रंगाची फुले आणि पाने मला पूर्वी भुईमुगाच्या शेंगासारखी वाटायची. भुईमुगाच्या शेंगेची पाने आणि फुले साधारण अशीच असतात न?
त्यातील पिवळ्या रंगाची फुले
त्यातील पिवळ्या रंगाची फुले आणि पाने मला पूर्वी भुईमुगाच्या शेंगासारखी वाटायची. भुईमुगाच्या शेंगेची पाने आणि फुले साधारण अशीच असतात न?>>>>>>>>.हो. टाकळा पण असाच दिसतो ना?
हो. टाकळा पण असाच दिसतो
हो. टाकळा पण असाच दिसतो ना?>>>>येस्स, टाकळा पण असाच दिसतो.
सामी, त्या तणाची पान कीती गोड
सामी, त्या तणाची पान कीती गोड आहेत!..............त्या गोडव्यावरच भुलून पूर्ण एक कुंडी ह्या तणाला दिली होती. खूप मऊ, तलम पोपटी पाने सुंदर दिसायची.हळूहळू बाकीच्या कुंड्यातही पसरल्यावर उपटून काढलं.अजूनही इतर कुंड्यात एखाददुसरं तण असतंच.साधनाने म्हटल्याप्रमाणे बारीक पिवळी फुले ,शेंगा लागतात.
टाकळा पण असाच दिसतो..........हो! पण पानांच्या पोतामधे,रंगामधे बरेच अंतर आहे.
Taklyachi pane mothi astat.
Taklyachi pane mothi astat. Majhya ranbhajichya bhajit aahe bagha.
टाकळ्याच्या बिया वाळवून
टाकळ्याच्या बिया वाळवून त्याची पूड करतात व त्याची "कॉफि" करुन पितात. औषधी असते ती.
पुर्वी कॉफी सहजासहजी मिळायची नाही. त्या काळापासून अशी कॉफी वापरात आहे.
मी मागे उल्लेख केला होता,
मी मागे उल्लेख केला होता, कदाचित माझ्या लेखातही असेल.
आदीवासी समाजात लग्न ठरवताना सासरच्या घराजवळ उंबराचे झाड आहे का ते आवर्जून बघतात. सासरच्यांनी
जेवू घातलं नाही तर उंबराची फळे खाऊन तहान आणि भूक दोन्ही भागवता येते.
ट्रेकर्सनेही लक्षात ठेवण्यासारखे आहे हे. या झाडाला पवित्र ठरवून उंबराखालून जाताना फळ खाल्;याशिवाय राहू नये असा दंडकच होता. ( वरचा उल्लेख राणी बंग यांच्या गोईण पुस्तकातला आहे. )
काय मंडळी टाकळ्याच्या गोल
काय मंडळी टाकळ्याच्या गोल पानांची तुलना ऑक्ष्कॉलिझच्या हृदयाकृती पानांशी करता.. हृदय आहे की नाही तुम्हाला.. हा घ्या फोटो.. स्ध्या फुले नाहीयेत. आली की त्यांचाही फोटो टाकते. इतके सुंदर तण दुसरे कुठले नसेल.
आज आमच्याकडे सक्काळी सक्कळी बुल बुल, क्कोकीळ (चक्क एका झाडावर तिन तिन), भरपुर दयाळ, वेडे राघु, आणि चक्क एक हळद्या यांनी आमचे डोके पिकवले आरडाओरडा करुन. कावळे टिकायला देत नाहीयेत कोकिळांना.
खंड्याची कमी होती. झाला
खंड्याची कमी होती. झाला अवतिर्ण अखेर...
http://kuttansnature.weebly.c
http://kuttansnature.weebly.com/
हे बघा तोवर.
साधना - आता सहज ही
साधना - आता सहज ही (http://kuttansnature.weebly.com/) तू दिलेली लिंक ओपन केली तर सुरुवातीलाच चक्क प्रेईंग मँटिस (प्रार्थना किटक) दिसला ... आणि मला आठवले १९७७-७८ मधले काही दिवस -
माझ्या एका मित्राने अॅग्रिकल्चर कॉलेजला अॅडमिशन घेतली होती आणि त्यांना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे १०० किटक पकडून आणायला सांगितले होते - मग काय तो मित्र आणि मी मोकळे रान मिळाल्यासारखे भटकत होतो -
एकदा असाच त्याच्याकडे गेलो असता त्याने पकडलेला हा जिवंत प्रेईंग मँटिस दाखवला - आम्ही दोघेही अतिशय कुतुहलाने त्याला निरखित होतो - तेवढ्यात असे झाले की त्या मित्राने पकडलेले एक नेहेमी दिसणारे पण चांगले मोठेसे टपोरे झुरळ जरा जखमी झाल्याने त्या प्रेईंग मँटिस शेजारी वळवळत उताणे पडले होते - त्या मॅंटिसने ते झुरळ पाहिले मात्र - क्षणार्धात त्याने त्याच्या करवतीसारख्या हातात त्याला गच्च पकडले आणि करकर आवाज करीत पुढील काही मिनिटातच त्याचा पूर्ण फडशा पाडला - आम्ही दोघे अवाक होऊन ते सारे पहात होतो - तेव्हा कळले हा प्रेईंग मँटिस काय चीज आहे ते ...
कोणाला त्या प्रेईंग मँटिसविषयी अजून काही माहिती हवी असेल तर मी लिहिलेली ही लिंक पहा - http://www.maayboli.com/node/24610
माझ्या बागेत अनेक वर्षे एक
माझ्या बागेत अनेक वर्षे एक प्रेयिंग मॅंटिस आहे, पण तो हिर्वा आहे. ह्या फोटोत रंगिबेरंगी आहे.
Pages