निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
स्निग्धा माझ अनुमोदन! मंडळी,
स्निग्धा माझ अनुमोदन!
मंडळी, ही फ़ुले सौ. विकु.नी थोपुला वाहिली होती. ती मी श्री. विकु. च्या परवानगीने इथे आणली. आता याचे नाव सांगा.
Carnation flowers g.
Carnation flowers g.
>>इथे मा बो वर असे कोणी
>>इथे मा बो वर असे कोणी तज्ज्ञ असेल तर>>>>>शशांक, नुसते तज्ञ माहिती असुन उपयोग नाही. इथे अर्धवट माहिती असणारेही भरपूर आहेत. अशातलाच एकजण मग तुम्हाला "जाब विचारणारा" प्रतिसाद देईल आणि त्याला "मम" म्हणणारे आणि सोकॉल्ड एथिक्स शिकवणारे आपसुक त्याच्या मागोमाग येतील. मग त्या धाग्यावरची "चर्चा" चर्चा न राहता तेथे वादविवाद/वैयक्तिक दोषारोप सुरू होतील. नंतर धागाकर्त्याला (ज्याने कुठलाही हेतु समोर न ठेवता काढलेला धागा, ज्याला धाग्याचा टिआरपी/प्रतिसादांची संख्या यात कसलाही इंटरेस्ट नसलेला) मग "झक मारली आणि धागा काढला" असं वाटायला लागणार.
(सॉरी, अगदीच रहावलं नाही म्हणुन हा प्रतिसाद).
इतरांकडून आलेल्या अशा आशयाच्या पोस्टी आधीसुध्दा वाचल्या पण दुर्लक्ष केलं. जिप्सी, तुमच्या एका धाग्यावर माझ्या प्रतिक्रियेपासून सुरवात होऊन पुढे त्याचं रुपांतर बर्याच मोठ्या चर्चेत आणि शेवटी तिथले फोटो काढण्यात झालं म्हणून मी हा प्रतिसाद पर्सनली घेते आहे. माझा प्रश्न तुम्हाला जाब विचारणारा वाटला याबद्दल खेद आहे. तुमच्या चांगल्या हेतूबद्दल अजीबात शंका नव्हती हे तिथे सांगून झालं आहे. तिथल्या चर्चेबद्दल किंवा तुम्हाला न पटणार्या मतांबद्दल तुम्ही विचार केला की नाही की नुस्तेच वैतागला याच्याशी मला घेणंदेणं नाही, पण 'अर्धवट माहिती असणार्यांमधलाच एक तुम्हाला जाब विचारतो' हे विधान अचूक नाही. मला ज्या बाबतीत काडीचंही ज्ञान नाही तिथे मी अक्कल पाजळायला जात नाही. 'मला कसं सगळ्या विषयातलं ज्ञान आहे' हे दाखवण्याच्या अट्टहासात चुकीची माहितीही देत नाही. तुमचा हा गैरसमज दूर करण्याकरता काही करू शकले तर सांगा. एथिक्स मायबोलीवर शिकवल्या जाऊ शकतं यावर माझा विश्वास नाही. तेव्हा
शशांक पुरंदर्यांसारख्या, विषयाचं ज्ञान असणार्या, ते योग्य शब्दांत मांडू शकणार्या आयडीला मायबोलीवर वेगळा धागा काढून लिहिण्यापासून परावृत्त केलं जाऊ नये ही मनापासून इच्छा!
'आमच्या निसर्गाच्या गप्पांसारख्या सुंदर धाग्यावर "नहेमीच्या" आयडीनं येऊन मिठाचा खडा टाकला' असं काहींना वाटलं तर माझा नाईलाज आहे. कारण सुरवात मी केलेली नाही.
शोभा१२३,जागू...सुंदर फोटो.
शोभा१२३,जागू...सुंदर फोटो.
मी माझ्या प्रतिसादात कुणाचंही
मी माझ्या प्रतिसादात कुणाचंही नाव घेतलेलं नाही, कुणाला जर स्वतःवर ओढवूनच घ्यायचे असेल तर माझा नाईलाज आहे.
शशांक पुरंदर्यांसारख्या, विषयाचं ज्ञान असणार्या, ते योग्य शब्दांत मांडू शकणार्या आयडीला मायबोलीवर वेगळा धागा काढून लिहिण्यापासून परावृत्त केलं जाऊ नये >>>>मनापासुन एकच विनंती करतो (अर्थात ऐकाव असा आग्रह नाही) प्लीज प्लीज प्रतिसाद नीट वाचत चला. मी कुठेही शशांक यांना इथे लिहु नका (किंवा लिहिण्यापासुन परावृत्त करत नाही) असं सांगितलेलं नाही. तो अधिकार मला नाही. काय लिहावं, काय लिहु नये (कुणाचं ऐकावं/ऐकु नये) इतपत समजण्याइतके शशांक नक्कीच Matured आहेत.
(सॉरी शशांक)
रच्याकने, साधना/जागु तो घेवड्याच्या वेल नाही आहे हे नक्की. बहुतेक जंगली वेल असावा. त्याची पाने अगदी तिवरांसारखीच दिसत आहे.
शोभा काय मस्त फुले
शोभा काय मस्त फुले आहेत...वॉव.
शोभा काय मस्त फुले
शोभा काय मस्त फुले आहेत...>>>>पांढर्या-गुलाबी पेन्सिलचं शार्पनरने टोक काढल्यावरच भाग जसा दिसेल तसंच दिसतंय ना?
>>मी माझ्या प्रतिसादात
>>मी माझ्या प्रतिसादात कुणाचंही नाव घेतलेलं नाही, कुणाला जर स्वतःवर ओढवूनच घ्यायचे असेल तर माझा नाईलाज आहे.
बरं! "तुम्ही पालकांची परवानगी घेतली होती का" असा 'जाब' तुम्हाला अनेक आयड्यांनी विचारला होता?
>>प्रतिसाद नीट वाचत चला. मी कुठेही शशांक यांना इथे लिहु नका (किंवा लिहिण्यापासुन परावृत्त करत नाही) असं सांगितलेलं नाही. तो अधिकार मला नाही.
नीट वाचूनच उत्तर देते आहे. प्रतिसाद शशांक यांना लिहिण्याला प्रोत्साहित करणारा नक्कीच नाही. 'परावृत्त'ऐवजी 'नाउमेद' वापरायला हवा होता.
शशांक, जेनेटिक्स बद्दल वेगळा
शशांक, जेनेटिक्स बद्दल वेगळा धागा काढशील का? जास्त चांगली चर्चा होईल आणि शोधण्यासाठी सोपं पडेल. अर्थात तुझी इच्छा असेल तरच
>>>>>> शशांक विचार करच.
जागू ...या घेवड्याची दूध/ साय घालून भाजी मस्त होते. त्यात शेंगा अश्या वेलावरच्या फोडणीत.....! वॉव!
पांढर्या-गुलाबी पेन्सिलचं
पांढर्या-गुलाबी पेन्सिलचं शार्पनरने टोक काढल्यावरच भाग जसा दिसेल तसंच दिसतंय ना?
मी तर त्यांना 'शार्पनरची फुलंच' म्हणते...
जेनेटिक्स बद्दल सांगायचे तर याच सेमिस्टर ला मी जेनेटिकली मोडीफाईड धान्यांवर प्रकल्प केला होता. खूप नवी माहिती मिळालेली त्यातून, त्याचे दुष्परिणाम, कुठे उगवले जातात, काय प्रक्रिया आस्ते आणि बरच काही समजलेलं.. आता परीक्षा झाली कि लिहेन इथे रोज रोज नवी माहिती मिळत असतेच. लिहायचा खूप मोह होतो पण हाई कमांडचं लक्ष असतं आता सगळीकडे म्हणे (आईसाठी लिहिले आहे )
पण हाई कमांडचं लक्ष असतं आता
पण हाई कमांडचं लक्ष असतं आता सगळीकडे म्हणे >>>>>>>> आँ .....जरबेरा......? आहे बरं लक्ष आई(हाई) कमांड्चं!
असो....पण तू लिही बरं वेळ मिळेल तसं.
लिहायचा खूप मोह होतो पण हाई
लिहायचा खूप मोह होतो पण हाई कमांडचं लक्ष असतं आता सगळीकडे म्हणे (आईसाठी लिहिले आहे फिदीफिदी )
हो का? मी मायबोली अॅडिक्ट झाले म्हणुन दिवसभर मला बोलायची आणि आता स्वतः चिकटलेली अस्ते. मी जरा चालायला खाली गेले तर मॅडम चिकटल्या इथे येऊन.
मायबोली हे अतिशय वाईट व्यसन आहे हो मंडळी.. आपल्या निष्पाप पोराबाळांना दुर ठेवा या व्यसनापासुन.... घरात मायबोलीचा म ही उच्चारु नका.. एकदा का लॉगिन केले तुमच्या मुलांनी इथे की ती गेलीच सम्जा हातातुन तुमच्या....
शोभ १२३, जागू , मस्त फोटो मन
शोभ १२३, जागू , मस्त फोटो मन प्रसन्नं झाल.
सामी, कच्ची उंबरे अर्धी कापून
सामी,
कच्ची उंबरे अर्धी कापून मग ठेचायची. तेलावर हिंग मोहरीची फोडणी करून त्यावर कांदा व जास्त लसूण परतायचा मग त्यावर ठेचलेली उंबरे परतून पाणी घालून शिजवायची.. ही कृती श्रीनिवास गडकरी यांनी संकलित केलेली आहे.
जिस्प्या, सायनच्या किल्ल्यावर पूर्वी एक पडका वाडा होता.. आता तो पडत पडत गेला. तिथे खर्या अशोकाची आणि कांचनाची मस्त झाडे आहेत. त्याच्या समोरच्या डोंगरावर एक गढी पण आहे. पण तिथे कुणी जात असेल असे वाटत नाही. सायनला गेलात तर गुरुकृपामधे जायचेच असा नियम आहे, माहिती आहे ना ?
जागू, रानभाज्यात पेंढारी हे नाव कधी ऐकले आहेस ? त्या वरच्या पुस्तकात आहे.
त्यांनी भोपूड ( भोरपूड, भुईफोड ) या भाजीबद्दलही लिहिलेय. माझी आई पण या भाजीची आठवण काढते.
पहिला वीजांसकट पाऊस पडला कि शेतात हे आपोआप येतात. अंड्यासारखे दिसतात पण मश्रुम नव्हेत, त्यांना देठ नसतो आणि ते उमलतही नाहीत. मी कधी बघितली नाही कि खाल्लीही नाही.
तिवराला तोंडल्यासारखी फळे
तिवराला तोंडल्यासारखी फळे येतात पण त्यावर धारा असतात. फुलांपेक्षा फळे कमी असतात. ( तू बहुतेक पुन्हा आसमंत मधला लेख वाचलेला दिसतोस. ) सायनला मानव सेवा संघाजवळही झाड होते. अजून असावे.
साधना, कुठे बाहेर जायचे ठरत
साधना, कुठे बाहेर जायचे ठरत असेल तर माझ्या घरी फोन कर. ( नंबर तोच. केदारला केलास तरी चालेल.) नलिनी घरी आहे. ती पण येईल.
घरात मायबोलीचा म ही उच्चारु
घरात मायबोलीचा म ही उच्चारु नका.. एकदा का लॉगिन केले तुमच्या मुलांनी इथे की ती गेलीच सम्जा हातातुन तुमच्या....>>>>>म्हणुन मी माझ्या बायकोला माबोबद्दल जास्त काही सांगत नाही आहे. :फिदी:.
आमचे मित्रवर्य श्री विक्रम
आमचे मित्रवर्य श्री विक्रम येंदे याच्या (ग्रीन अंब्रेला) निसर्गकार्याची हि माहिती:
पृथ्वीचे आरोग्य राखण्याचे कार्य
" विक्रम येंदे यांच्या ’ग्रीन अम्ब्रेला संस्थेने’ आजवर पाच हजारांहून अधिक वृक्षांचे यशस्वी पुनर्रोपण केले आहे. त्याचप्रकारे या संस्थेचा भर आयुर्वेर्दिक वृक्ष लावण्यात जास्त असतो, ज्याचा मनुष्यजातीलाच मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे.
‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ असणार्या विक्रम यांना झाडे लावण्याची आवड आधीपासूनच होती. आपली आई वटपौर्णिमेला वडाच्या फांदीचे पूजन का करते, असा प्रश्न विक्रम यांना पडला. या प्रश्नाचे उत्तर शोधताना त्यांना समजले की, आपल्या भागात वडाच्या झाडांची संख्या फार कमी आहे. त्यातच जी वटवृक्ष कशीबशी तग धरुन उभी आहेत, त्यांच्याही फांद्या वटपौर्णिमेला सारेजण तोडत आहेत. आणि जर असेच सुरु राहिले तर वटपौर्णिमेला झाडाचे पूजन कसे करणार? ही बाब मात्र केवळ वडाच्या बाबतीत मर्यादित नसून इतरही झाडांची अशीच बिकट अवस्था आहे. म्हणून विक्रम यांनी वृक्षलागवड आणि पुनर्रोपणाची सुरुवात केली."
अधिक माहिती इथे वाचा: http://mumbaitarunbharat.in/?p=4309
वडः
http://www.thinkmaharashtra.com/node/1871
याचं खरंच खुप कौतुक वाटतं. माबोवर विक्रमची मुलाखत (लेख स्वरूपात) प्रसिद्ध करण्यासाठी शूटही केलं होतं पण माझ्याकडुन ती क्लिप डिलीट झाली.
निगकरांपैकी कुणालाही "नक्षत्र उद्यान" पाहायची इच्छा असेल तर सांगा आपण भेट देऊया. (विक्रमने कळवा येथे "नक्षत्र उद्यान" वसवलं आहे.)
जिप्सि, नक्षत्र उद्यान भेटी
जिप्सि, नक्षत्र उद्यान भेटी साठी मी तयार आहे रे.
सध्याच शरदिनी डहाणुकरांच नक्षत्र गान वाचलय. तेव्हापासूनच मनानी घेतलेल की अश्या उद्यानाला भेट द्यायलाच हवीये.आणि विक्रम येंदेंची परत मुलाखत घेऊन ईथे टाकू शकशील का? वाचायला आवडेल. साईट उद्या वाचून काढेलच.
मानुषी, साय-दुध घालून घेवड्याच्या भाजीची रेसिपी सांगा ना.
दा, ऊंबर बाजूच्या कंपाऊंड मध्येच आहे आणि सध्या ऊंबर धरलीयेत, भा़जी करावी का ह्या विचारात टाकलत तुम्ही मला.
पुण्यात पण गारा पडल्या ?
पुण्यात पण गारा पडल्या ?
जिप्स्या, साधना लहान
जिप्स्या, साधना लहान मुलांबद्दल बोलते आहे !
उजु, उंबर तशीशी औषधीच असतात. नेहमी खावीत. वरच्या रेसिपीत चवीप्रमाणे मीठ मसाला हे लिहायचे राहिलेच.
वडाची झाडे संपण्याबाबत तसाच
वडाची झाडे संपण्याबाबत तसाच एक किस्सा...
आशा बगे यांनी एका पुस्तकात लिहिलेला.. पण खरा.
दोन लहान मुली रोज शाळेतून घरी येताना वाटेत एक स्मशाण लागते. अधून मधून प्रेतं बघतात त्या.
तर त्यापैकी एक म्हणते अगं रोज अशी माणसं मरायला लागली तर आपलं गावच संपून जाईल ना.
त्यावर दुसरी ( हिचे बाबा डॉक्टर ) म्हणते, अगं असं गाव कधी संपत नाही, माझे बाबा रोज एका नव्या बाळाला या गावात आणतात.
म्हणुन मी माझ्या बायकोला
म्हणुन मी माझ्या बायकोला माबोबद्दल जास्त काही सांगत नाही आहे. फिदीफिदी.
जिप्स्या, साधना लहान मुलांबद्दल बोलते आहे !
कोण ते काल म्हणाल होत जिप्स्याला कमी छळा म्हणून आता स्वतःच छळून घेण्याची इच्छा आहे त्याला निसर्ग तरी काय करणार ?
शोभा, काय सुरेख फुलं
शोभा, काय सुरेख फुलं आहेत!.....
दिनेश दा, उंबराची भाजी, अरे व्वा! पण एक शंका आहे, उंबर कधी पण तोडले की त्यात कायम
किटकच दिसतात... अर्थात पिकलेल्या उंबरात. तुम्ही कच्च्या उंबराची भाजी सांगताय.
त्यात नसतात काय?
जिप्स्या छान लिंक..
साधना, खरच मायबोली एक व्यसन आहे.. मी सहमत आहे....
जागू पुण्यात पण गारा
जागू
पुण्यात पण गारा पडल्या ?>>>>>हो दिनेशदा. आजच्या वृत्तपत्रात वाचलं. इथे मुंबईत कडक ऊन पडलंय.
उजु, उंबर तशीशी औषधीच असतात.
उजु, उंबर तशीशी औषधीच असतात. नेहमी खावीत.>>>>> सुमारे एक वर्षापूर्वी एका ओळखीच्या डॉ.चा फोन आला की उंबराचे काही विशेष औषधी गुणधर्म माहित आहेत का ? यावर मी विचारले की उंबर एक वैशिष्ट्यपूर्ण फळ आहे हे माहितीये पण नेमका औषधी गुणधर्म कुठला ते सांगता येणार नाही -आणि शेवटी गुगलबाबाची मदत घ्यावी लागेल - जे तुम्हीही करुन पाहिले असेलच...
तेव्हा ते डॉ. म्हणाले - "काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक पाईल्सचा त्रास असलेला पेशण्ट आला - त्याचे एच. बी. इतके खाली गेले होते की त्याला दोन बॅग्ज ब्लड चढवावे लागले - मग एक छोटेसे ऑपरेशन करुन त्याला घरी पाठवले - पण मला माहित होते की हा पाईल्सचा त्रास काही कायमचा बरा होणारा नाहीये, तेव्हा काय होतंय याच्याबाबतीत पाहू या...."
त्यानंतर काही दिवसांनी तो पेशण्ट आपणहून त्या डॉ.ना भेटायला आला व सांगू लागला की माझा पाईल्सचा त्रास कायमचा दूर झालाय - डॉ.ना फार आश्चर्य वाटले - ते विचारु लागले - कसं काय झालं हे -
तेव्हा तो पेशण्ट म्हणाला - कोणी एकाने या पाईल्सच्या त्रासाकरता एक साधे औषध सांगितले -दररोज सकाळी एक कपभर दुधात एक पिकलेले उंबर टाकून ते दूध उकळायचे - ते जेव्हा उकळून अर्धा कप होईल ते दूध औषध म्हणून अनुशापोटी घ्यायचे - सुमारे महिनाभर हा प्रयोग केल्यावर माझा पाईल्सचा त्रास पूर्णपणे थांबला -
डॉ.नी आश्चर्याने त्याची तपासणी केल्यावर तो पेशण्ट जे सांगत होता त्यावर त्यांची पूर्ण खात्री पटली..
दिनेशदा, वा मस्त क्रुती.
दिनेशदा, वा मस्त क्रुती. माझ्या सासुबाई उंबराची फळे बघून याचा काय उपयोग होत असेल असा नेहेमी विचार करतात. त्यांना तुमची भाजीची क्रुती आणि शशांक चा किस्सा सांगते.
हे कोणते झाड आहे?
क्रीपिंग वूड सोरेल/ क्रीपिंग ऑक्झॅलिसह - शशांक
सामी - हा वर जो फोटो आहे ते
सामी - हा वर जो फोटो आहे ते बहुधा - Oxalis corniculata असावे - याला क्रीपिंग वूड सोरेल किंवा क्रीपिंग ऑक्झॅलिसही म्हणतात .... अगदी हेच नसले तरी Oxalis चाच कुठलातरी प्रकार असणार हा ...
हां - अजून एक - हे झाड नसून एक प्रकारचे "तण" आहे (वीड) ....
मस्त माहिती, शशांक.
मस्त माहिती, शशांक.
मारूती चितमपल्ली यांचे
मारूती चितमपल्ली यांचे "चैत्रपालवी" आणि" "पाखरमाया" कुणी वाचलंय का?
Pages