निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
मधूच्या फोटोत वांगं आहे
मधूच्या फोटोत वांगं आहे ...ओह... मला काकडी वाटली >>>>> वर्षू--- ती काकडीच आहे, नि ग च्या भाग १६च्या शेवटी मधुने जो फोटो टाकलाय ती वांगी आहेत ....
बाकी, या भागाच्या सुरुवातीला तू टाकलेले कोलाज अप्रतिमच आहे गं ....
मागे मी फक्त पाण्यात
मागे मी फक्त पाण्यात वाढवलेल्या झाडांबद्दल एक फिल्म बघितली होती. मातीचा वापर नाहीत. काचेतल्या भांड्यात आधाराने झाड उभे करायचे. झाडाला आवश्यक ती सर्व द्रव्ये त्या पाण्यातूनच द्यायची. खुप भाज्या अश्या वाढवल्या होत्या. कदाचित ती इस्रायल मधली शेती असणार. ते पाणी बहुतेक वाहते ठेवले होते.>>>>> हे आश्चर्यच आहे की ... कारण इस्रायलमधे अग्दी कमी पाण्यावर पिके घ्यायचा प्रयत्न करत असतात नेहेमीच....
आणि दुसरे असे की सतत पाण्यात राहून मुळे कुजत कशी नाहीत ही माझी बाळबोध किंवा अज्ञ शंका ....
मधूच्या फोटोत वांगं आहे
मधूच्या फोटोत वांगं आहे ...ओह... मला काकडी वाटली इश्श !>>>>>...वर्षू?????????????????

अग सकाळपासून सांगेन सांगेन म्हणतेय आणि परत विसरतेय. ते कोलाज काम मस्त झालय हां!
मला कोण शिकवेल कोलाज काम??????????????

वर्षू कोलाज एकदम मस्त...
वर्षू कोलाज एकदम मस्त... घड्यातुन फुले ओसंडुन वाहताहेत अगदी...
अभिनंदन नवीन भागासाठी. वरचे
अभिनंदन नवीन भागासाठी. वरचे सर्व फोटो मस्तच. बाळगाजरे आणि काकडी क्युट.
शशांक..................... हो
शशांक..................... हो रे लग्गेच मागल्या भागात जाऊन पाहिली होती मधु ची वांगी.. पण इकडे एडिट करायला विसरले...
शोभे कोलाज करायला ना?? सोप्पय अग्दी .. ( मान झटकून भाव खाणारी बाहुली..
................ तू मला हसलीस ना म्हणून ......
)
मलाच काकडी वांग्यासारखी का बरं वाटली म्हणून
झालंय..
शोभा, शशांक्,साधना... थांकु
शोभा, शशांक्,साधना... थांकु थांकु गा...
शोभे विपु बघ..
शशांक, ते पाणी बहुतेक वाहतं
शशांक,
ते पाणी बहुतेक वाहतं ठेवलं होते. पुर्वी दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रम ( शालेय चित्रवाणी ) असायचे त्यात बघितले होते बहुतेक. टिश्यू कल्चर पण त्यातच बघितले होते.
इस्रायल चेच असणार. तिथली संत्री मी रोज खातो. मस्त चवदार असतात.
वर्षू, जुहूला तूझ्या घराजवळ डोनट चे एक दुकान आहे तिथे मी मोर बघितले होते. तूला सांगायचे राहिलेच.
वर्षू, जुहूला तूझ्या घराजवळ
वर्षू, जुहूला तूझ्या घराजवळ डोनट चे एक दुकान आहे तिथे मी मोर बघितले होते. तूला सांगायचे राहिलेच>>>
इ स वी सन कधी?
दिनेश्,करेर बद्दल इतकी डीटेल
दिनेश्,करेर बद्दल इतकी डीटेल माहिती दिलीस.. सो नाईस!!!!
ओह.. रिअली?? त्या मॅड ओवर डोनट्स जवळ??????? मोर??? ओ वॉव...
संध्याकाळी कधी तिकडेही जाऊ वॉक ला.. मग कदाचित दिसेल..
बहुतेक पाळलेले आहेत ते मोर.
बहुतेक पाळलेले आहेत ते मोर.
अरे वा! अभिनंदन! वर्षू कोलाज
अरे वा! अभिनंदन! वर्षू कोलाज मस्त! आणि सगळी माहिती.
बादवे वर्षू तुम्हारे प्रश्नको सोळावे भागमे हमने उत्तर दिया हय...तुमने देख्या क्या?
यस्स्स्स मानु... देख्या वो
यस्स्स्स मानु... देख्या वो उत्तर.... थांकु गा !!!बघू या मार्च ते जुलै मधे काय काय कसे कसे प्लॅन्स बनतात...
मधे चायना, हाँगकाँग, पनामा हायेच.... त्यात युरोप किंवा युरोपातलं काय काय बसवायचं त्याच प्लानिंग करावं लागेल..
हा भाग माझ्या सा ज्ञा ( ?? ) पासून सुरु झालाय..
आता मला भेटतांना एकेक हर्ब/ भाजी/ फुलझाड लावलेली कुंडी , छोटी शी सही , मला भेट म्हणून दिली पाहिजे ..
माझ्या बोटांना हिरवी करायला मदत हवीये डेस्परेटली!!!!!!
वर्षूचे सुंदर कोलाज अाणि
वर्षूचे सुंदर कोलाज अाणि जागूची प्रस्तावना अगदी एक दुसर्याला पूरक आहेत.
नि गच्या नवीन भागानिमित्त अभिनंदन!
पाण्यात भाज्या उगवायाच्या
पाण्यात भाज्या उगवायाच्या असतील तर 'गीक गार्डनर' ला भेट देणे अत्यावाशक. http://geekgardener.in/
हो बरोबर सोनुली, असेच
हो बरोबर सोनुली, असेच काहीतरी. त्यामूळे झाडे उगवायला माती चांगली नाही, हि सबबच चालणार नाही.
वर्षू, स्विसला जूलै मधे जा. छान सिझन असतो आणि आपला कुलु आहे तिथे आता.
त्यामूळे झाडे उगवायला माती
त्यामूळे झाडे उगवायला माती चांगली नाही, हि सबबच चालणार नाही.>>>>
मधु वांगी, काकडी छोट्या कुंड्यांमध्ये मस्त तयार होत आहेत.
वाव जाउन आलात तुम्ही सगळे प्रदर्शनाला ...मस्तच... मी विचारणारच होते काय तारीख आहे.
जागु लिंक मध्ये प्रदर्शनाची तारीख कुठे दिसेल?
आता मला भेटतांना एकेक हर्ब/
आता मला भेटतांना एकेक हर्ब/ भाजी/ फुलझाड लावलेली कुंडी , छोटी शी सही , मला भेट म्हणून दिली पाहिजे ..
अप्रिल मध्ये भेटतोय आपण परत. तेव्हा माझ्याकडुन नक्कीच मिळेल;.
वांगी, दुधी, काकडी, कोबी....
वांगी, दुधी, काकडी, कोबी.... या कुंड्यांमधे वाढलेल्या भाज्या... माझ्या ऑफिस मधल्या,,,,,, आमच्या माळ्यांची जादू... मी फक्त ईथे टाकल्या.
फोटो साईझ लहान करताना : मी फोटो paint मधे ओपन करून resize करते. मला हा एकच मार्ग माहीत आहे.
ओके दिनेश.. नोटेड!!! साधना...
ओके दिनेश.. नोटेड!!!
साधना... आह्हा... एप्रिल ची आत्ताच पासून वाट पाहतेय... सो हॅपी...
मधू, किती छान वातावरण असेल तुझ्या ऑफिस च्या परिसरात.. लक्की!!!
सोनुली.. सुपर्ब आहे लिंक, इथे
सोनुली.. सुपर्ब आहे लिंक, इथे दिल्याबद्दल धन्स!!
कॉक्स्कोंब चे इतके कलर्स कधीच नव्हते पाहिले.. अमेझिंग आहेत!!!
आज सकाळी साधारण ८.३० ला
आज सकाळी साधारण ८.३० ला आमच्या पाठच्या बाजूच्या पडवीच्या पत्र्यावर पावसासारखा टप्टप आवाज येत होता. बाहेर जाऊन बघितले तर १०-१५ खाटीकांनी दरोडेखोर घुसतात त्याप्रमाणे आंब्याच्या झाडावर दरोडा घातला होता. बारीक लागलेल्या कैर्या, मोहोर टपाटप खाली पडत होता. आमच्या आवाजाने पण ते पक्षी जात नव्हते. फोटो पण अपुर्ण प्रकाशाने निट नाही आले.
अरे देवा.. जागू आधीच
अरे देवा.. जागू आधीच पावसाने वाट लावलीय आता खाटकानी..
पण खाटकांना का इंटरेस्ट कैर्यांमध्ये? त्यांना आता त्यांचे भक्ष्य कैरीच्या चटणीत मॅरिनेट करायचे की काय?
ओह जागु.. खाटिक पक्षी म्हंजे
ओह जागु..
खाटिक पक्षी म्हंजे Grey Shrike का?
काय?? खाटिक हे पक्ष्यांचं
काय?? खाटिक हे पक्ष्यांचं नाव? कसे असतात?
आज मी पण एक नवल बघितले.
आज मी पण एक नवल बघितले. आमच्या बिल्डींगच्या परीसरात एक कोंबडी फिरत असते. माणसांना अजिबात घाबरत नाही. आज तिने एक छोटा उंदीर पकडला. चारपाचदा चोचीने टोचला आणि अख्खा गिळून टाकला.
एकतर ती उंदीर खाते हे नवल आणि तिची चोच एवढी मोठी उघडते हे दुसरे नवल !
जागू, त्यांनी बहुतेक एखादे
जागू, त्यांनी बहुतेक एखादे भक्ष्य पकडले असावे किंवा त्यांना त्रास देणार्या एखाद्या कावळ्यावर हल्ला केला असावा.
हायला.. खतरनाक्कचे ही
हायला.. खतरनाक्कचे ही कोंबडी...
आफ्रिकेचा परिणाम दुसरं काय...
एक आमचे दिनेश काही अजून शिकत नाहीत
Still cannot right in
Still cannot right in Marathi.

Miss you all...........
ओह...खरंच कोंब्डी आफ्रिकन
ओह...खरंच कोंब्डी आफ्रिकन दिसते!
Pages