निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांकली, हाच तो पुलाजवळचा ना ?
शशांक, या सगळ्या माठ वर्गातल्या भाज्या असल्या तरी लाल माठाच्या बिया काळ्या अगदी बारीक असतात तर राजगिर्‍याच्या मोठ्या. राजगिर्‍यातही लाल आणि हिरवा असे दोन प्रकार आहेत.
राजगिर्‍याचे झाड शोभिवंतही असते.

होय सायली, झाड खूप मोठं आहे. मंद वास असतो याला; पण हे झाड जिथे आहे ना तिथून आपली नदी कम नाला Sad वहात असल्याने मी नाकावर रुमाल धरला होता.

दा, हा च तो पुला जवळचा ! अखेर मला ह्या फुलांचं दर्शन मिळालं. नेमकी वेळ गाठायला पाहिजे, ती ह्या वेळी योगायोगाने गाठली गेली इतकंच ! Happy

लग्न झाल्यावर लोकं इतकी बदलतात? की फोन पण उचलत नाहीत.

फोन करताना आधी वेळ बघा, चुकीच्या वेळेस फोन करु नका.. तुमचे लग्न नव्वेकोरे होते तेव्हाचे दिवस आधी आठवा आणि नंतरच नंबर लावा Wink

साधना...........:हहगलो: .............अशक्य आहेस!!

साधना, तिथले पण फोटो नाही टाकलेन, म्हणजे मिळवली Happy

शांकली, तुमच्या घराजवळच्या टेकडीवर चंदनाची झाडे आहेत का ? ती पण वसंताच्या जरा आधीच फुलतात.
कोकिळा त्याची फळे खाते. म्हणजे तोपर्यंत त्याला फळे पण धरलेली असतात. मुंबईला कमला नेहरू उद्यानात एक झाड आहे आणि कोल्हापूरला महावीर उद्यानात.
पण पुणे / नगर भागात ती बरीच आहेत.

अरे का 'त्या' बिचार्‍याच्या मागे लागताय सारे! Wink

दा, आमच्या घराजवळच्या टेकडीवरच काय, पण एकूणच पुण्यात चंदनाची झाडं प्रचंड संख्येनं आहेत. अगदी श्री. महाजन सरांच्या भाषेत बोलायचं तर ' चंदनं हि वने वने!' इतकी विपुल प्रमाणात आहेत. फक्त दुर्दैवानं त्यांच्याकडे तस्करांचीच नजर जाते आणि बाळवृक्ष तोडले जातात.:अरेरे: त्यामुळे ५०-६० वर्षांची झाडं बघायचं भाग्य अजून तरी लाभलं नाही.

दिनेशजी,

पुण्यात गेले अठवडाभर अतिशय खराब हवामान आहे. उन तर पडतच नाहीये

बटन गुलाबाच्या दोन झाडांना भरपुर कळ्या दिसु लागल्या आहेत पण त्या बरोबर त्यावर काळ्या रंगाचे किडे त्यावर येउन चिकटू लागले आहेत, एक फुल किडकेच उमलले.

काय उपाय करू

वर्षू, जानेवारीत.
तूझ्या घरी यायला प्रॉब्लेमच नाही, एअरपोर्टच्या वाटेवरच तर आहे.

स_सा, हे ढगाळ वातावरणच आपल्याकडच्या आंब्याच्या मोहोराला मारक ठरते. त्या वातावरणातच ते किडे
वाढतात. सध्या तरी सर्व किडकी पाने व फांद्या काढून टाकायला हव्या. म्हणजे नवीन वाढ निरोगी होईल.

दिनेशदा करेक्ट, ढगाळ वातावरण असेल तर आंब्याच्या मोहोराची वाट लागते, हे बहुतेक दरवर्षी होते आणि आमच्या आंब्याचे पिक कमी येते.

धन्यवाद मित्रांनो,
टेरेसवर आज सकाळी गुलाबाच्या झाडांची परत हजेरी घेतली, तब्बल २३ रोपे सापडली कधी आणली ते लक्षातच येत नाहीये, पण आता निट फुटवे आले आहेत,

दिनेशजी तुम्हाला म्हणालो ते हे किडे गुलाबावर दिसु लागले आहेत, त्या फांद्या मी तोडल्या

स_सा, हे किडे मुंग्या पाळतात. मुंग्यांचा पण बंदोबस्त करावा लागेल.
जागू / शोभा.. मस्त फोटो.

यू ट्यूबवर एव्होल्यूशन ऑफ स्पीड नावाचा माहितीपट आहे. त्यात एक मजेशीर गोष्ट दाखवलीय.
जगातला सर्वात जबरदस्त ठोसा एक चार इंच कोलंबी मारते. तिचा ठोसा एवढा जबरदस्त असतो कि त्याने शंख तर फुटतातच पण खेकड्याचे तर सर्व पायच निखळून पडतात.

मी मागच्या आठवड्यात मेथीचे दाणे टाकलेले
जे आता छोट्या रोपा वाढ्लेले आहेत
काल सहज म्हणुन एक तोडुन क्खल्ले तर अतिश य कडु होते कश्या मुअळे मला वाटले मेथी ची पाने असतील तशीच चव असेल

यू ट्यूबवर एव्होल्यूशन ऑफ स्पीड नावाचा माहितीपट आहे. त्यात एक मजेशीर गोष्ट दाखवलीय. >>> दिनेशदा, तुम्ही आता अ‍ॅटनबरो साहेबांचे वारस शोभता - ते अकाउंट्स वगैरे सोडा -ते करायला अनेकजण आहेत - पण अशा वेगवेगळ्या प्राण्यांच्या, पाना-फुलांच्या अभ्यासासाठी फारच कमी माणसे आहेत - त्यांना सामील व्हा -ते तुम्हाला उत्तम जमेल, नव्हे ते तुमचे पॅशनच आहे ...... आम्हीही कधी जमेल तसे तुमची गाठ-भेट घेऊन शेखी मिरवू - सुप्रसिद्ध प्राणी, वनस्पती वगैरे शास्त्रज्ञ दिनेशदांबरोबर घालवलेला क्षयज्ञ जंगलातील एक दिवस ..... Happy

जागू , मस्तच ! मी पण आता मिरची लावून बघतेच. >>>> जरुर लावा मिरचीचे रोप.... आमच्याकडेही गेले कित्येक दिवस (बहुतेक १-२ महिनेही असेल) एक रोप आहे - त्याला अशा अनेक मिरच्या लागल्यात - स्वयंपाकाच्या वेळेस कोणीतरी जाऊन २-४ मिरच्या तोडून आणतं - त्या मिरच्यांचा बहर चालूच असतो.....

Pages