निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी,
माझ्याकडे कुंडीत तोंडल्याचा वेल आहे. सध्या त्याचे खुप हाल होत आहेत अस मला वाटत. द्त्तक द्यावासा पण वाटतो. पण्...जीव होत नाही. कुंडीतली माती बदलुन बघणार आहे.

खरच द्यायची मनाची तयारी झाली तर नक्की तुम्हाला कळवेन

ओक्के नक्की. Happy पण तू कुठे राहतेस?

मी माझ्याकडचा सोनटक्का ( पांढरा की सोनेरी आठ्वत नाही आणि फुलं आलीच नाहीत), पांढरी लिली आणि अनंत देऊ इच्छिते. कोणाला हवे असल्यास घेऊन जाणे.

mumbai

मामी, रॉकेट लीव्ह्ची बहुतेक फक्त पानेच विकायला येतात बाजारात. नाहीतर हर्ब्ज वर्गातल्या बहुतेक वनस्पतिंच्या काड्या खोचल्या तरी चालतात.

मी वर उल्लेख केलाय त्या वाईल्ड अरेबिया च्या पहिल्या भागात मी नेहमी ज्याची आठ्वण काढतो त्या ओमानी फलाज, ( पाट ) खजूर यांचे सुंदर चित्रण आहे.

आपल्याकडच्या गाण्यात कोकिळेचा उल्लेख नेहमी गाण्याच्या संदर्भातच आलाय.
१) कोकिळ कुहू कुहू बोले, तू माझा तुझी मी झाले ( लता )
२) कोकिळा गा, भूलोकीच्या गंधर्वा तू, अमृत संगीत गा (आशा )
३) दे कंठ कोकिळे मला ( आशा )
४) चार होत्या पक्षिणी त्या ( फैयाज )

पण कुठल्याच गाण्यात मला कोकिळेच्या लबाडीचा उल्लेख आढळला नाही. नाही म्हणायला लताच्याच, ये नीर कहासे बरसे है, ये बदरी कहासे आयी है या गाण्यात, कोयल भूल गयी जो घर वो, लौटके फिर कब आयी है, अशी ओळ आहे.

आपल्याकडे कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडे घालते हे आपल्याला माहीत आहेच. ती इतर पक्ष्यांनाही असे वापरून घेते. श्रीकांत इंगळहाळीकरांच्या आसमंत २, मधे छान वर्णन आहे.

पण बीबीसीची ब्रिटनमधल्या कोकिळांवर जी डॉक्यूमेंटरी आहे, तित तिच्या क्रूरपणाचा कळस दाखवलाय.
तो पक्षी आपल्या कोकिळेपेक्षा थोड्या वेगळ्या म्हणजेच करड्या रंगाचा असतो ( आफ्रिकेतून तिथे जातो )
त्याचा आवाजही थोडा वेगळा म्हणजे कक-कू ( साऊंड ऑफ म्यूझिक मधल्या गुड नाईट गाण्यात आहे तसा )
असतो, मादीचा चित्कार मात्र आपल्याकडे असतो तसाच.

तर हि कोकिळा चक्क टेहेळणी करते आणि तिच्या गुलाम पक्ष्यांची अंडी खाते आणि आपली त्या घरट्यात
घालते. त्या अंड्याच्या बाह्य रुपाची पण ती हुबेहूब कॉपी करते. ( वेगळ्या रंगाचे अंडे ते पक्षी स्वीकारत नाहीत. )

त्या अंड्यातून पिल्लू बाहेर आले कि ते घरट्यातील बाकीची अंडीच नव्हे तर असतील ती पिल्लेही घरट्याबाहेर ढकलून देते. थोड्याच काळात ते पिल्लू त्या पक्ष्यांपेक्षा मोठ्या आकाराचे होते तरीही ते बिचारे
त्याला भरवतच राहतात.

कोकिळेच्या पूर्वजांना घरटे बांधता येत नव्हते. पण त्यांची अशी चलाखी आणखी किती काळ चालेल ? कधीतरी दुसरे पक्षीही शहाणे होणारच ना ?

यू ट्यूबवर आहे ही, अवश्य बघा.

मनुष्य सोडून इतरांना विचार करायची क्षमता नाहीत असे विज्ञान म्हणते मग हे असे कसे की काही पक्षी कृर असतात आणि उरलेले मतीमंद??

ज्या पिल्लाचे डोळे पण उघडलेले नाहीत, ते पिल्लू दुसर्‍या पिल्लाला घरट्याबाहेर ढकलते आणि तेसुद्धा त्या
दायी पक्षिणीच्या देखत... नवल वाटते बघताना ते.

आपल्याकडे असा अभ्यास झाला आहे का ? वाचले नाही मी.

चितमपल्लीने लिहिल्याप्रमाणे कावळीणीला मोजता येत नाही, याचा कोकिळा फायदा घेते. म्हणजे आपण ३ अंडी घातली होती का चार ते तिच्या लक्षात रहात नाही. पण कावळ्याच्या आणि कोकिळेचा आकार साधारण सारखाच असल्याने, इतर पिल्लांबरोबरच ते पिल्लूही वाढत असावे.

लिंक देतो.

http://www.youtube.com/watch?v=3FEX1XtNbwo

माझे अत्यंत आवडते सर अटेंबरो यांचे निवेदन आहे.
त्याखाली एकाने कमेंट लिहिली आहे कि जर ते निवेदन करणार असतील तर मी भिंतीना लावलेला रंग वाळत
असताना सुद्धा बघायला तयार आहे... मी सुद्धा

http://www.youtube.com/watch?v=xZUUtQ1L8KA

हातासरशी, अर्थ फ्लाईट ही फिल्म पण बघा. पक्षी आणि मानव यांची मैत्री हा विषय आहे.
पण खरं सांगतो आपल्याला डोळे आहेत याचा आनंद व्हावा, इतके सुंदर चित्रीकरण आहे हे.

साधना, यावेळेसे भेटलो तर तुला या सगळ्या फिल्म्स कॉपी करुन देईन. घरचा कॉम्पूटर चालू झाला का ?

शांकली कुठे आहे ? खुप दिवस झाले काही पोस्ट नाही.

शांकली कुठे आहे ? खुप दिवस झाले काही पोस्ट नाही. >>>> कालच मी व अंजू तुम्ही वर दिलेली ती अर्थ फ्लाईट ही फिल्म पहात होतो - फारच अप्रतिम आहे ती ....
ते पाहताना असे वाटले की या जगात ही अशी अभ्यासू, पक्षीप्रेमी मंडळी काय काय करतात .... सारेच अतिशय कौतुकास्पद ....

पण - एक विचार असाही मनात आला की यांच्याकडे बरीच सुबत्ता (सर्वच बाबतीत), स्थैर्य वगैरे असल्याने हे इतके करायला वेळ, पैसा मिळत असेल का ??
इथे भारतात हे करण्याची जिद्द असणारी मंडळी असतील पण त्यांना इतके आर्थिक बळ, माणूस बळ मिळेल का ?
मध्यंतरी तो बिबळ्यावरील "आजोबा" फिल्म काढणार्‍यांवर एक लेख वाचला होता - असे एखादेच कोणीतरी काही करत असेल - बाकी काय ????

अर्थात ती परदेशातील मंडळी ते जे पक्षी किंवा प्राण्यांवर प्रेम करतात त्याबाबत खूपच कौतुक आहे त्यांचे व त्याबद्दल आदरही आहेच मनात .....

आपल्याकडील अशा मंडळींचे कार्य जगासमोर यायला हवे त्याचबरोबर आपल्याकडे सामान्य माणसाच्या मनात या प्राणी-पक्षी जीवनाविषयी प्रेम निर्माण व्हायला हवे ........... (सध्या प्राणी-पक्ष्यांचे फोटो काढणारे उदंड आहेत पण त्याकरता काम करणारे फारच थोडे, जवळजवळ नाहीतच ---- हे चित्र बदलायला हवे...)
यंदाच्या एका दिवाळी अंकात (बहुधा सकाळ असेल ) डॉ अनिल अवचटांनी श्री. किरण पुरंदरे यांच्यावर फार सुंदर लेख लिहिलाय - सर्वांनी तो जरुर वाचा - जमले तर मी स्कॅन करुन इथे द्यायचा प्रयत्न करेन (अर्थात ते प्रताधिकार वगैरेमुळे आपले अ‍ॅडमीन अडचणीत येणार नसतील तरच....)

पण - एक विचार असाही मनात आला की यांच्याकडे बरीच सुबत्ता (सर्वच बाबतीत), स्थैर्य वगैरे असल्याने हे इतके करायला वेळ, पैसा मिळत असेल का ??
इथे भारतात हे करण्याची जिद्द असणारी मंडळी असतील पण त्यांना इतके आर्थिक बळ, माणूस बळ मिळेल का ?
मध्यंतरी तो बिबळ्यावरील "आजोबा" फिल्म काढणार्‍यांवर एक लेख वाचला होता - असे एखादेच कोणीतरी काही करत असेल - बाकी काय ???? शशांक ............+१००
डॉ अनिल अवचटांनी श्री. किरण पुरंदरे यांच्यावर फार सुंदर लेख लिहिलाय - >>>>>>>>>
या वाघोबावाल्या बाई आहेत त्यांच्यावरही सुंदर लेख कोणत्या तरी दिवाळे अंकात वाचला. हॅट्स ऑफ टू हर. नाव विसरले बाईंचं( अगदी मुलगेल्याश्या, बॉय कटवाल्या)

http://www.aisiakshare.com/node/1882 इथे त्याबद्दलचा सुरेख लेख आहे आणि त्या "आजोबा" चा १२० कि मी चा प्रवासही छान वर्णन केलाय

हा त्या आजोबाने केलेला प्रवास....

phpir1Zi7PM.jpg

‘आजोबा’ फिल्मचा डायरेक्टर सुजय डहाके यांच्याबरोबर झालेल्या एका मुलाखतीतून...

सुजय - ‘आजोबा’ ही फिल्म माझ्यासाठी ‘शाळा’ पेक्षा जास्त Ambitious फिल्म आहे. एक फिल्ममेकर म्हणून मला स्वातंत्र्य आहे की मी एखाद्या विषयावर सडेतोड भाष्य करू शकतो. हे ‘शाळा’त करता आलं नाही. कारण प्रेक्षकांना तो फक्त एक अनुभव द्यायचा होता. मला खूप आधीपासून Environment Conservation या विषयावरती बोलायचं होतं. ‘शाळा’ बनवताना भरपूर अशा घटना ऎकल्या की गावात बिबट्या आलाय, त्याला लोकांनी जिवाने मारले. पण ही त्यांना मारण्याची वृत्ती कुठून आली? जितका जगण्याचा हक्क आपल्याला आहे तितकाच त्यांनाही आहेच! त्यांनी आपल्या जागेवर अतिक्रमण केलेलं नसून आपण त्यांच्या जागेत घुसलोय. हे सर्व या सिनेमातून दाखवणार आहे. पण शेवटी काहीही सांगायला हिरो लागतो. ती लिंक मला ‘आजोबा’ मध्ये मिळाली. २००९ मध्ये जुन्नरला एक बिबट्या विहीरीत पडला आणि त्याला एका wildlife biologist ने कॉलर केलं. म्हणजे त्याच्या शरीरावर चिप लावून त्याला जंगलात सोडून दिलं. तो जिथे जाईल हे सर्व तिला कळत होतं. तो बिबट्या १२० किलो मीटरचा पल्ला गाठून २९ दिवसात बोरीवलीच्या संजीव गांधी नॅशनल पार्क मध्ये गेला. या प्रवासा दरम्यान त्याने अनेक Man Made Barriers पार केले. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने ७० मीटरची खाडी पार केली. जे बिबट्या कधीच करत नाही. कारण बिबट्याला पाणी बिलकुल आवडत नाही. एवढं सगळं त्याने का केलं, तो कसा गेला हे सर्व मुद्दे मी या कथेतून मांडतोय. प्रेक्षकांना साधारण मे २०१३ मध्ये ही फिल्म बघायला मिळेल.

या त्या विद्या आथ्रेय (हे बहुधा अत्रेय असावे असा माझा अंदाज... Happy ) ज्यांनी त्या बिबळ्याला ती चिप लाऊन त्याचा संपूर्ण प्रवास शोधण्याचे संशोधन कार्य केलेले आहे ...

vidyaa.jpg

दिनेश, हो चालु झाला काँप्युटर, नक्कीच द्या कॉपी करुन..

पण - एक विचार असाही मनात आला की यांच्याकडे बरीच सुबत्ता (सर्वच बाबतीत), स्थैर्य वगैरे असल्याने हे इतके करायला वेळ, पैसा मिळत असेल का ??

मला नाही वाटत असे, सुबत्ता स्थेर्य आपण सोडुन इतर अख्ख्या जगात आहे असे थोडेच आहे? फरक आहे तो कोणी काहीही काम केले तरी ते स्विकारणा-या तिथल्या समाजात आणि 'धोपटमार्ग सोडू नकोस' हा सल्ला देणा-या आपल्या समाजात. आपल्याकडे जराही वेगळा मार्ग स्विकारला तरी त्या मुलाच्या आईबाबांकडे 'हे लोक वेडे आहेत, मुलाची करीयर बरबाद करणारेत' ह्याच दृष्टीने पाहिले जाते. वर उल्लेखलेल्या भारतीय लोकांचे इंटरव्यु वाचले की लक्षात येते आपला समाज धोपटमार्ग न सोडण्याबद्दल किती आग्रही आहे आणि असे काही वेगळे करु पाहणा-या लोकांना प्रत्येक पातळीवर कसा त्रास होतो ते.

ह्या महिन्याच्या नॅजॉ मध्ये टॉर्नेडोला फॉलो करणारा आणि शेवटी त्यातच अंत झालेल्या टिम समरस वर लेख आहे. एवढे धोकादायक काम करणा-या माणसाकडे कुठे कसली सुबत्ता होती? उलट स्थेर्य सोडुन तो ह्या भानगडीत उतरला होता आणि हे काम करता करता कोणी कधीही मरु शकते याची त्याला पुर्ण जाणिव होती. तरीही तो स्वतःची पॅशन सोडायला तयार नव्हता.

आपल्याकडे साधने व संपत्ती कमी असेल. संशोधकांची पण वानवा आहे का ? म. वा. धोंड, राजवाडे, दुर्गा भागवत यांनी संशोधनासाठी किती कष्ट उपसले ?
आपल्याकडे वानवा आहे ती गुणग्राहकतेची. असे लेखन हे कायम अडगळीत राहते. त्या पुस्तकांच्या आवृत्याच निघत नाहीत कारण त्यांना ग्राहक नसतो.

एका क्रिकेटच्या मॅचच्यावेळी कोका कोलाच्या किती जाहिराती दाखवल्या जातात ? तेवढ्या पैश्यात एखादा सुंदर माहितीपट नक्कीच निघू शकतो. पण प्रश्न आहे बघणार कोण ?

दोन शेपटीचं मांजर पाहिलं..

cat.jpg

मायबोलीवर आलं तर त्याला दोन आय डी द्यावे लागतील.. Proud

दोन शेपटीचं मांजर पाहिलं..

cat.jpg

मायबोलीवर आलं तर त्याला दोन आय डी द्यावे लागतील.. Proud

Sayali Paturkar | 22 November, 2013 - 11:32
शशांक जी,
खुपच सुंदर फुलं आहेत, सुवासिक आहेत का? >>>>> मागील पानावर मी दोन प्रकारची फुले दिली होती -

१] कामिनी / कुंती - पांढरी फुले - खूप सुवासिक फुले - पूर्ण आसमंतात हा सुवास भरुन रहातो ....

२]ब्लिडींग हार्ट - यांना अजिबात वास नाहीये

सध्या आमच्या बागेत हा निळा चित्रकही फुललाय ... अजिबात सुवास नसलेले देखणे फुल पण तोडायला गेले की त्याच्या देठातून फार चिकटसर स्त्राव बाहेर येतो ....

Common name: Plumbago, Cape Leadwort • Hindi: Nila chitrak नीला चित्रक • Manipuri: Telhidak (Manipuri)
Botanical name: Plumbago auriculata Family: Plumbaginaceae (plumbago family)
Synonyms: Plumbago capensis (माहिती व फोटो http://flowersofindia.net/ यावरुन साभार...)

Nila Chitrak.jpg

शशांक, मस्त फोटो. Happy

(पण नेटवरून असे फोटो टाकणे - जरी साभार असे लिहिले तरी - हे कॉपीराईट्सचा भंग करते की नाही माहीत नाही. त्यातून आपल्या या बाफांची सगळी पानं अर्काइव्ह होतात. मागेपुढे कोणी हरकत घेतली तर मायबोली/कर अडचणीत येऊ नयेत, असे वाटले, म्हणून हे लिहिले.)

Pages