निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(पण नेटवरून असे फोटो टाकणे - जरी साभार असे लिहिले तरी - हे कॉपीराईट्सचा भंग करते की नाही माहीत नाही. >>>>>> गजानन, तुम्ही म्हणता ते योग्य आहे अ‍ॅडमीनला विचारले पाहिजे याबाबत ....

Spathiphyllum wallisii हे एक घरोघरी दिसणारे इनडोअर प्लांट .... ते पांढरे टोपडे काय मस्त दिसते ना !!

Spathiphyllum-wallisii.jpg

ध्न्यवाद शशांक जी,मी कब्लिडींग हार्ट बद्दलच विचारत होते. कुंती ची फुले या पुर्वी बघीतलेली, पण
नाव माहिती नव्ह्ते.

दिनेश दा, कोकिळे ची लिंक खुपच मस्त आहे पण धक्का दायक आहे. किती दुष्ट असते नाही कोकिळा.
बाकी लि़ंकस उदया बघेन. छान, मस्त दिवस गेला आज तुमच्या मुळे.

पण नेटवरून असे फोटो टाकणे

ज्यानी त्यांच्या साईटवर स्पष्ट लिहिलेय की बाबांने माझे फोटो कॉपी करु नका त्यांची गोष्टी वेगळी, पण जे फोटो गूगल इमेजसर्चवरुन घेतलेत किंवा अशा साईटवरुन ज्यांनी फोटो कॉपीबद्दल काहीच लिहिलेले नाहीय ते लोक नंतर येऊन कॉपीराईटभंग झाला म्हणु शकतात का यावर कोणीतरी प्रकाश पाडा.....

शशांक जी, हे Spathiphyllum wallisii माझ्या आई कडे पार्कींग मधे आहे, याची कंद लावतात.
हे इन डोर आहे हे माहिती नव्हते तसेच नाव पण आजच कळले. फुलं खुपच गोड अहेत, अगदी
एखादे पेन्टींग बघतोय अस वाटतय. धन्यवाद.

हाय लोक्स!!

आज दै. लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत एक छान बातमी वाचायला मिळाली. खरंतर ती बातमी नसून एक छोटा लेखच आहे. "राणीबाग १५० वर्षे" या आगामी पुस्तकाच्या (मराठी आवृत्ती) प्रस्तावनेतला संपादित अंश आज वाचायला मिळाला. मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त श्री. द. म. सुखथनकर यांनी ही प्रस्तावना लिहिली असून, शुभदा निखारगे आणि हुतोक्षी रुस्तमफ्रम यांनी या मूळ इंग्लीश पुस्तकाचं संपादन केलं आहे.

या प्रस्तावनेत लिहिलं आहे - ' हे उद्यान तब्बल २८६ प्रजातींच्या ३,२१३ वृक्षांचे आणि ८५३ वनस्पती जातींचे आश्रयस्थान आहे. याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे वास्तव्य या उद्यानात आहे.'

अजून बरंच विस्तृत वर्णन या लेखात वाचायला मिळालं आणि या ऐतिहासिक बागेचा सार्थ अभिमान वाटला. पण त्याच बरोबर, या बागेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भपकेबाज प्राणीसंग्रहालयामधे रूपांतर करण्याचा जो घाट घातला गेला होता आणि जो अनेक जागृत लोकांमुळे हाणून पाडला गेला; त्यांना परत जागृत रहाण्याचा महत्वाचा संदेशही यात दिला गेलाय. कारण या प्रकरणाशी संबंधीत अनेक संधीसाधू व स्वार्थी मंडळी अजूनही अनेक पळवाटा आणि क्लृप्त्या वापरून हे प्रकरण त्यांच्या बाजूने वळवू शकतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

रच्याकने, या शुभदा निखारगे म्हणजे जिप्सीने मागे एका भागात राणीबागेतल्या वृक्षांची एक फोटोंची लिंक दिली होती त्याच असाव्यात का?

मामी मी मधीपासुन तुला तोंडलीचा वेल घ्यायला बोलावतेय. आणि जर सोनेरी सोनटक्का असेल तर मला नक्की दे.
थकले मी शोधुन शोधुन.

शशांकजी तुमची फारच सुंदर बाग आहे. तुमची बाग पाहण्याचा माझा योग हुकला. कदाचीत जानेवारीत रोटरी कॉन्फरन्सला आले तर जमवेन.

शांकली वेलकम बॅक. शांकली विणकाम रात्री कर दिवसा निसर्गाकडे पहा. Lol मी पण आता तेच करणार आहे. (आपल्या टिचरला सांगू नकोस हे मी तुझ्या कानात सांगितलय :हाहा:)

मानुषी काय योगायोग आहे. मी ही आत्ता वॉटरलिलीचे फोटो टाकतच होते म्हणजे आता टाकतेच.

ह्या वॉटरलीली माझ्या कंपाउंडच्या बाजूला लांब पट्यात आहेत. श्रावणीचा शाळेत जाण्याचा हा मार्ग. जाता येता छान दर्शन होते ह्यांचे. ह्याच पाण्यात छोटे छोटे मासे आहेत. ते खाण्यासाठी एक मोठ्ठा बगळा वेगळाचे रोज सकाळी येतो. पण चाहूल लागताच लगेच उडून जातो.

ह्या फोटोत टाचणी आणि चतुर दिसताहेत का?

हं....आहे खरा योगायोग. जागू तुझं जगच वेगळं. मासे, बगळे, चतुर, टाचणी!
मस्त! असा शाळेत येता जाता भेटणारा निसर्ग!
शांकली विणकाम रात्री कर दिवसा निसर्गाकडे पहा. मी पण आता तेच करणार आहे. (आपल्या टिचरला सांगू नकोस हे मी तुझ्या कानात सांगितलय )>>>>>>>>> आँ? लब्बाड!
शशांक हे टोपडं प्लान्ट माझ्याकडेही होतं. नंतर मेलं.

जागू, तोंडलीचा वेल ठेव माझ्याकरता नक्की. तू आधी हाका मारल्या असशील तर मी ऐकल्यानाहीत बहुतेक. Happy

सोनटक्का कोणता आहे ते आठवत नाही. आता एक फेरी मारीन तुझ्याकडे नाहीतर तू ये माझ्याकडे.

माझ्याकडच्या लाल, पिवळ्या कर्दळी आणि अनंतही काढायचे आहेत. अनंत पांढराच आहे याची कृपया नोंद घ्यावी. Wink

शांकली, परत आल्याबद्दल छान वाटले !
शशांक या क्लासमधल्या फुलांचे प्रदर्शन दरवर्षी साधारण १२ ते १४ एप्रिलला शिलाँगला भरते. ( तारीख आणि शहर यांच्यात गल्लत झालेली असू शकते पण पूर्वाचलात भरते एवढे नक्की Happy )

जागू, राधेची पण तिच शाळा. मी तिला पहिल्यांदा शाळेत नेले होते !

त्या कक्कूच्या माहितीपटात अटेंबरोंनी प्रोग्रॅम्ड असा शब्द वापरलाय. म्हणजे कोकिळेचे जे फॉस्टर पेरेंट्स असतात त्यांना एवढेच माहीत असते कि आपल्या घरट्यात जे पिल्लू आहे त्याला आपण भरवायचे. त्यासाठी ते दिवसातले १६/१६ तास कष्ट घेतात.

समजा मानवाला तसे प्रोग्रॅम करता आले तर ( फार लांब कशाला, माऊलीचे पसायदान हाच एक उत्तम प्रोग्रॅम आहे ) कित्ती छान ना ! म्हणजे राग, लोभ, असूया या भावनाच नकोत. पण प्रॉब्लेम असा होईल कि जवळजवळ ९० टक्के साहित्याची निर्मितीच होऊ शकणार नाही.

नर्सरीतून शेवंतीची रोपं आणली आहेत.
रोपांवर मुक्या कळ्या खूप आहेत.
या सीझनला तर शेवंती छान फुलेल.
पण हीच रोपं पुढच्या वर्षी फुलं देतील का?
रातराणीचा सुगंध जसा लांबवर येतो.मोगर्‍याचाही येतो तसा दूरवर सुवास देणारी अजून फुलं सुचवा बरं !

सूर्य आता अधिकच दक्षिणेला कलू लागला. सूर्यास्त होईलच काही वेळात ! सगळी बाग सोनसळी रंगात उजळून निघालीय ! निसर्गाचा अप्रतिम अविष्कार !

अवनी, एकदा फुले येऊन गेली कि शेवंतीची छाटणी करुन फक्त रोपे ठेवायची.

कुंती, प्राजक्त, हिरवा चाफा ( कुठलाही चाफा ) यांचे गंधही दूरवर जातात. शिवाय आटोपशीर झाडे आहेत हि.

नमस्कार निगकर्स Happy

रच्याकने, या शुभदा निखारगे म्हणजे जिप्सीने मागे एका भागात राणीबागेतल्या वृक्षांची एक फोटोंची लिंक दिली होती त्याच असाव्यात का?>>>>>हो शांकली त्याच Happy मागे एकदा त्यांच्यासोबतच कुलाब्याच्या बागेत नेचर वॉक केला होता. Happy

१-२ महिन्यांपूर्वी इकडे मी आमच्या काँप्लेक्स च्या आवारात कुठची झाडं लावता येतील म्हणून सल्ला विचारला होता.
नंतर नेट वरुन वेगवेगळी झाडं शोधुन काढली होती व खालील लिस्ट तयार केली.
त्यातली काही मिळाली तर काही नाही. काही मिळालीत पण अजून हातात आली नाहीत. ह्या व्यतिरिक्त गेल्या २ महीन्यात १५० च्या वर फळ, फुलं, हर्ब्स, झुडपं इ. लावली गेली आहेत.

निसर्ग गप्पांचा मला खुपच उपयोग झाला. इकडच्या सर्वांना धन्यवाद.

कधीतरी इथे असल्येल्या सर्व प्रकारच्या झाडांची लिस्ट टाकेन. खालच्या लिस्ट मध्ये आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये नसलेलीच झाडं आहेत. ह्याखेरीज, स्पॅथोडीया, कदंब, वेगवेगळ्या लेगोस्तॉमीया वर्गातली झाडं, ताम्हण, महागनी, गुलाबी टॅबुबिया,बुचाची इथे बरीच आहेत

अवनी सुगंधी झुडपांमध्ये "हनी सकल" चा पण सुंदर गंध येतो.

Botanical name Common name
1 Cassia Fistula Linn-Indian Labernum(Amaltash)
2 Saraca asoca Indica-Ashoka (Sita-Ashoka)
3 Mimusops elengi -Indian Medaller(Bakul) Bullet wood tree
4 Erythrina Indica -Indian Coral Tree (Mandar /pangara)
5 Bauhinia purpurea-Mountain Ebony/Purple orchid tree
6 Thespesia populnea-Portia tree(ranBhendi?)
7 Butea monosperma Kuntze-Flame of the forest(palas)
8 Tabubia arjencia-Yellow Tabubia
9 Thevatia-Bitti
10 Couroupita guianensis-Kailaspati
11 Adenanthera pavonina-ratangunj
12 Aegle marmelos-bael-
13 cashew
14 Cassia javanica- Pink flowers but cassia fistula
15 Colvillea racemosa-Colville’s Glory orangeyellow flower
like bottle brush leaves like gulmohar (Hukuchina mara)
16 Pongamia glabra-pongam tree(karanj)
17 Bombax malabaricum-Red Silk Cotton
18 Callistemon lanceolatus-Bottle Brush
19 Castanospermum australe-BlackBean or Moreton BayChestnut
20 Fageceae Quercus
21 Memecylon lawsonii-Melastomataceae
22 Persea americana-Avocado
23 Barringtonia acutangula- tivar (red "gajara")
24 Hedichium coronarium-sontakka
25 Dalbergia Latifolia-sisaoo ??
26 Petrea Volubillis-Purple wreath.
26 Sapindus detergens-soapnut, ritha

जागू, दिनेशदा... Happy

जिप्सी.. धन्यवाद. Happy

मधे सा. सकाळच्या ५ ऑक्टोबरच्या अंकात 'एक झाड ३२ हजार वर्षांपूर्वीचे' हा लेख वाचनात आला. खरंतर हा पूर्ण लेखच इथे द्यायचा मोह होत आहे. पण गूगलवर विकीपिडियावर या वनस्पती/ झुडपाबद्दल माहिती असल्याने तो लेख इथे नाही देत. त्या वनस्पतीचं नाव आहे सिलेने स्टेनोफायला (silene stenophylla)
माहिती वाचल्यावर आश्चर्याने तोंडात बोट गेलं तर नवल नाही! शिवाय एक छोटीशी २३ सेकंदांची व्हिडियो क्लिप पण बघायला मिळेल. जमल्यास जरूर, वर दिलेल्या नावाने गुगलून बघा. फार सुंदर फुलं आहेत या वनस्पतीची. ही ती लिंक...http://en.wikipedia.org/wiki/Silene_stenophylla

अदिती, १५० रोपं लावून तुम्ही एक विक्रमच केला आहे की!! तुमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. Happy आणि निवडलेले बरेचसे वृक्ष हे 'आपले' आहेत, 'देशी' आहेत. त्या बद्दल परत एकदा हार्दिक अभिनंदन!! फक्त त्यातल्या बिट्टीच्या रोपापासून मात्र जरा जपून रहा हं; कारण ते खूप विषारी आहे. शक्यतो लहान मुलांच्या आसपास ते येणार नाही अशा बेतानं लावा.

मानुषी आणि जागू, कसले सुंदर फोटो आहेत कमळांचे!!

अग शांकली, १५० रोपांमध्ये छोटी छोटी नेहमीची बागेतली रोपं पण आहेत गं. बाकी मोठी झाडं लावताना मुद्दाम भारतीय झाडंच शोधून लावायचा प्रयत्न करतेय. बिट्टी लिस्टमध्ये टाकले होते कुंपणाच्या जवळ लावायला, पण मी नाही आणले कारण इथे आधीच लावलेले आहे. ती जागा मुलाना सहज जाण्यासारखी नाही आहे.

झाडं लावायचा प्रोजेक्ट झाल्यावर, मुलांना सर्व झाडांची ओळखही करुन देणार आहे.
कुठची झाडं हाताळण्याजोगी नाही, कुठची झाडं आहेत त्याची जरा तोंडओळख तरी झाली पाहीजे.

ह्या व्यतिरिक्त गेल्या २ महीन्यात १५० च्या वर फळ, फुलं, हर्ब्स, झुडपं इ. लावली गेली आहेत. >>>>> व्वा, क्या बात है ..... अगदी विक्रमादिती आहात की .... मनापासून अभिनंदन .....

कुठची झाडं हाताळण्याजोगी नाही, कुठची झाडं आहेत त्याची जरा तोंडओळख तरी झाली पाहीजे. >>>> तोंडओळख नको, नजरओळख करुन द्या Happy Wink .....

रावी, -
शशांक , चित्रकलाच फर्गेट मी नॉट पण म्हणतात का? >>> नाही, खाली चित्रकाच्या वेगवेगळ्या जाती दिल्यात -
१] Plumbago zeylanica - चित्रक, २] Asclepias curassavica - Scarlet Milkweed

३] Plumbago indica - लाल चित्रक, ४] Plumbago auriculata - निळा चित्रक

"फर्गेट मी नॉट" - वेगळे आहे - फर्गेट मी नॉट या नावाने गुगलल्यास खूप वेगवेगळी झुडपे मिळतील कारण Boraginaceae Family/ कुळ म्हणजेच forget-me-not family .......

एक सर्रास आढळणारे तण (weed) म्हणून सगळ्यांनी कधी ना कधी हे पाहिले असेलच....

Oxalidaceae (Wood Sorrel Family) या कुळातील - Oxalis corniculata म्हणजेच Creeping Wood Sorrel, Creeping Oxalis - याचे फुल फारच छोटे असते - अगदी ८-१० मि मि रुंदीचे ....

o corniculata.jpgOxalis_corniculata.jpgwfshl-creepingwoodsorrel-07.jpg

Oxalidaceae (Wood Sorrel Family) या कुळातील अजून एक प्रकार -

Oxalis pes-caprae म्हणजेच - Bermuda Buttercup, African wood-sorrel, Bermuda sorrel, Buttercup oxalis, Cape sorrel, English weed, Goat's-foot, Sourgrass, Soursob

220px-Oxalis-pes-caprae0016.jpgOxalis_pes-caprae.jpgOxalis_pes-caprae_msi.jpgphpwFk5BpPM.jpg

Oxalidaceae (Wood Sorrel Family) या कुळातील अजून एक प्रकार -

Oxalis hedysaroides 'Rubra' म्हणजेच Fire Fern

DETA-56.jpgfire-fern-denise-clark.jpgjdv1337310298e.JPGOxalis hedysaroides.jpg

आदिती खरच तुझ मनापासुन अभिनंदन आणि कौतुकही.

शशांकजी फार सुंदर आहेत फुले.

दिनेशदा हो राधाचीही तिच शाळा. Happy

Pages