निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
. . . . . . .
.
.
.
.
.
.
.
.
.
आमचं र्हाउ द्या ओ ...... ते
आमचं र्हाउ द्या ओ ...... ते जिप्सीभौ सद्या कोनाचा हुकूम मानत्यात त्यांच तेच जाने !!!!!!!!!!!!!!!!!!!
तुमास्नी म्हायित न्हाई लग्न नव्वकोरं अस्ताना कोनाचा हुकुम चालतो ते?? आता आठवत नसेल तर शांकलीला इचारा की.. तिला लई वाईट वाटत आसल, ते जुने दिस आटवुन, जवा तिचा हुकुम चालत होता......
रच्याकने, इतंबी रांगोळी घालायची फैसन आली का????
वरचे सर्व फोटो छानच.
वरचे सर्व फोटो छानच.
इतंबी रांगोळी घालायची फैसन
इतंबी रांगोळी घालायची फैसन आली का????>>>>> ती रांगोळी नाहीये ... डोळ्यातील टिपं आहेत .... डोण्ट कन्सिडर मी सो इमोशनल.... बट स्टिल फाइंड समथिंग मिसिंग ......
आणि हो - अजून सगळीकडे राणीचेच राज्य आहे ..... राजा नुस्ता नावाला....... पायजे तर तिकडं विंग्लंडला पन पघा...
..
साधना शोभे मस्त आहे
साधना
शोभे मस्त आहे फोटो!!!!!!
जागु, ते लाल कॄ क खूपच गोड दिसतं.. आणच तो वेल , जांभळा लहानपणी खूप पाहिल्याने सुंदर असून आता लाल चंच कौतुक होतं
वॉव, प्राचीकडे ताजी कलौंजी...
वॉव, प्राचीकडे ताजी कलौंजी... सुपर्ब!!
जागू खरंच लाल कृष्ण कमळ
जागू खरंच लाल कृष्ण कमळ पहिल्यांदा बघतीये! मस्त.
मानुषी, तिथल्या नर्सरीत मिळू
मानुषी, तिथल्या नर्सरीत मिळू शकेल. येताना लाल आणि जांभळी दोन्ही प्रकारच्या कृष्णकमळाचे वेल आणता येतील. भारतात मी लाल बघितला होता. जांभळा नाही. पांढरा + गुलाबी असाही प्रकार असतो.
त्या लाल कृष्णकमळाची आठवण आहे. आम्ही जूने मायबोलीकर सिंहगडावर गेलो होतो. उतरल्यावर जिथून एस टी सुटते तिथल्या एका चहाच्या टपरीवर बरीच लाल फुले आलेला वेल होता. आम्ही सगळ्यांनी फुले तोडली. ( भरपूर होती. ) सईच्या घरी त्यावेळी नवीनच आलेले फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री काढून त्याचा संदर्भ शोधला.
मग ती म्हणाली, नक्कीच परदेशी असणार. यात नाही म्हणजे आपल्याकडचे नसणारच.
http://www.passionflow.co.uk/
http://www.passionflow.co.uk/passiflora-hybrids.htm
या पानावरचे फोटो बघा.
ं पाहिले वरचे काही फोटो. कृ.
ं पाहिले वरचे काही फोटो. कृ. कमलांचे असंख्य अगणित अप्रतीम नमुने.



माहेरी कृ. कमल आणी पॅ. फ्रूट दोन्ही वेल होते.
काल संध्या. सनसेट टिपण्याचा प्रयत्न ....
मानु एंजॉय इन बर्फाच्या
मानु एंजॉय इन बर्फाच्या राज्यात...
मी इकडे विचारलेलं.. बट नो उत्तर यट..
स्वितझर्लॅण्ड ला ट्युलिप चा मौसम कधी असतो??
http://news.xinhuanet.com/eng
http://news.xinhuanet.com/english/photo/2012-04/29/c_131559167.htm
वर्षू ....वरच्या लिन्केत दाखवल्याप्रमाणे एप्रिल ट्युलिप्चा सीझन असावा.
शशांक साधना दिनेश शांकली.....
.?.?.?
मानुषीताई अगेन फोटो मस्तच.
मानुषीताई अगेन फोटो मस्तच.
खुप छान छान फोटो आहेत. किती
खुप छान छान फोटो आहेत. किती नवीन फुलांची ओळख होतेय मला.
मी मुलीला फुलांची ओळख करण्यासाठी इथले फोटो घेतले तर चालतील का? कि स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल?
गुगल वर सर्च करत होते तर बहुतेक फुलांसाठी मायबोलीचीच लिंक दिसते.
केशर, मी काढलेले असतील तर
केशर, मी काढलेले असतील तर खुशाल घ्या. मराठी नाव लिहून सर्च केलेत तर बरेच जुने फोटो आणि लेख सापडतील.
गुगल वर सर्च करत होते तर
गुगल वर सर्च करत होते तर बहुतेक फुलांसाठी मायबोलीचीच लिंक दिसते.>>>>>>> क्या बात है !!
नि ग झिंदाबाद !!!
सर्व फोटो टाकणार्यांचे आणि गप्पांमधे सामील होणार्या निसर्गप्रेमींचे हार्दिक अभिनंदन .......
दिनेशदा, जिप्सी, जागू, मानुषी, वर्षु, साधना, इ. इ.चे विशेष अभिनंदन ...... (कोणी राहिले असल्यास राग मानू नये - त्यांचेही अभिनंदन.....)
त्यामुळे ----- हा रुसवा सोड जिप्सी, पुरे हा बहाणा - टाक ना फोटोंना .....फुलांचे फोटु त्वरित टाकावे -खास लोकाग्रहास्तव .....
नमस्कार! तुम्हा सर्वांच्या
नमस्कार! तुम्हा सर्वांच्या गप्पा नियमित वाचते. सभासद मात्र नवीनच झाले आहे.
जिप्सीच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करते..
गरम (ऊशःण हे कसे लिहितात?) हवामानात टुलिप वाढ्वण्य़ासाठी टुलिपचे कंद एका कागदी पिशवीत साधारण ३ ते ४ महिने फ़्रीजमध्ये (फ़्रीज़रमध्ये नव्हे) ठेवतात. ही पिशवी फ़ळांपासून मात्र दूर ठेवावी. नाहीतर फळांतून निर्माण होणार्या वायूमुळे कंद खराब होऊ शकतात.
नंतर हे कंद जमिनीत जिथे पूर्ण सावली असेल किंवा थोडाच वेळ ऊन असेल तिथे ६ ते ८ इंच खोल खड्डा करुन प्रत्येक खड्डयात एक असे साधारण ५ इंच अंतरावर लावायचे. पसरट कुंडीसुद्धा वापरता येइल. माती ओलसर राहील इतपतच पाणी घालयचे. कोंब फुटून महिनाभरात रोपे तयार होतील. आंतरजालावर शोध घेतल्यास अधिक माहिती मिळेल
मी अजुन ट्युलिपच्या देशा
मी अजुन ट्युलिपच्या देशा गेलेय कुठे???
ट्युलिप्स साधारण वसंत ऋतुत येतात . म्हणजे थंड प्रदेशात एप्रिल्-मे चा काळ असेल.
चंद्रा, माहीती छाने. इथे ट्युलिप्स लावायचे म्हणजे भारीच खटपट आहे....
जिप्स्या, तुझ्याकडे आले की मला सांग, मी येते पाहायला 
इथे ट्युलिप्स लावायचे म्हणजे
इथे ट्युलिप्स लावायचे म्हणजे भारीच खटपट आहे... >>>>> खूप वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी होती - पुणे शहरात कोणी एका नि प्रेमीने एका कुंडीत ट्युलिप्स लावले होते - त्याला फुलेही आली होती - त्याचा फोटो त्यावेळेस फ्रंट पेजवर छापून आला होता ...... त्यात सगळे डिटेल्सही होते - कसे ते कंद लावले, कशी जोपासना केली वगैरे - आता ते काहीच आठवत नाहीये मला .... पण कोणी एकाने हा सगळा खटाटोप केला होता हे मात्र अगदी खरे ......
सुदुपार!!!!
सुदुपार!!!!
मानुषी, फोटो मस्तच. चंद्रा,
मानुषी, फोटो मस्तच.
चंद्रा, स्वागत! माहिती छानच!
उष्ण : uShNa
मधु, वांगी काय छान आलेत.धन्यवाद इथे फोटो दाखवल्याबद्दल. खूप वर्षांनी अशी झाडावरची /रोपावरची वांगी बघीतली.
साधना, शशांक , शोभा
साधना, शशांक , शोभा प्रतिसादासाठी आभार
नवीन धागा फार धावतो आहे म्हणून इथेच लििहले़़़़़
मधु वांगी कुंडीतसुद्धा किती छान आली आहेत. मला कधी बरे जमणार हे?!
दिनेशदा धन्यवाद. मराठी नाव
दिनेशदा धन्यवाद. मराठी नाव लिहूनच फोटो शोधत होते.
मस्त दिसत आहेत वांगी.
Pages