निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुदुपार!!!

झाडा फुलाच्या प्रदर्शनाला भेट देणार्‍या सर्व निसर्ग प्रेमींचे कौतुक!!

kobi 1.jpg

गौरी, एकदा अभ्यासक्रमाला सुरवात केली तर झाडेच सोबत करतील.... मला तर राणीच्या बागेतली झाडे इथवर सोबत करताहेत.

मधु, घरचा कोबी का ?

हा निसर्गाच्या गप्पांचा धागा आहे कृपया मेरवान केक वगैरे वगैरे खाण्याच्या गप्पा मारून जे इच्छा असुनही गेले नव्हते त्यांना अशा गप्पा मारून जळवू नये. हाहा>>>>>>>>>>..जाग्गु, Lol

मधु, घरचा कोबी का ? >>>> नाही दा, हा ऑफिसमधलाच. आमचे माळी आणि गार्डनिंग डिपार्ट्मेंट फारच हौशी आहे. दुधी, कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो, मद्रास का़कडी अशी झाडे मुद्दाम लावून नवी-मुंबईच्या प्रदर्शनात पाठवली होती. आमच्या झाडांना नेहमीच बक्षीसे मिळतात.

राणी बागेच्या प्रदर्शनात भाग घेतला होता की नाही हे तपासायचे आहे.

मधु मी पाहिलेय नमु प्रदर्शन आणि त्यात भाज्या वगैरे मस्तच होत्या. टोपल्यांमध्येही भाज्या लावलेल्या आणि चांगल्या गुटगुटीत पोसलेल्या.

तुझे ऑफिस कुठे आहे? तुझ्या माळ्यांना विचार ना त्यांनी हे कसे वाढवले? नाहीतर मला पत्ता दे, मी येऊन पिडते त्यांना. Happy

माझा आजवरचा अनुभव सांगतो की माती + गांडूळखत वापरुन वरच्या फोटोतल्यासारखे रिझल्टस मिळू शकतात. मी खुप वर्षांपुर्वी हे केलेले. तेव्हा रिझल्ट्स चांगले आलेले. आता परत सगळे सुरवात करतेय. करण्यापुर्वी चांगले मार्गदर्शन मिळालेले बरे Happy

माझ्याकडे डार्क जांभळा आणि मध्ये पिवळा असा सुंदर डेलिया होता. त्याच्या पाकळ्या मखमली होत्या अगदी, भरगच्च भरलेल्या पाकळ्या आणि मध्ये पिवळा...... खुपच छान दिसायचा. आणि खुप फुले यायची. कंद तयार झालेले की नाही आठवत नाही. दहा वर्षे होऊन गेली या गोष्टीला. जागु तु मला वारंवार त्याची आठवण करुन देतेयस आणि दु:ख देतेयस.....

दहा वर्षांवरुन आठवले. मी गांडूळे वापरुन गार्डनिंग करण्यालाही दहा वर्षांपेक्षा जास्त वेळ होऊन गेला म्हणजे... घर रिनोवेट करायला काढले, तेव्हा सगळ्या कुंड्या शेजा-याच्या बागेत पाठवल्या. तिथे त्यांची वाट लागली. त्यानंतर काही केलेच नाही. Sad Sad

मधु, कित्ती छान. खुपदा आपण नुसती शोभेची झाडे लावून जागा अडवतो. तिथे अशी उपयोगी झाडे लावायला हवीत. आणि उपयोगी झाडे सुद्धा शोभा आणतातच. ( आपली शोभा नाही. )

https://www.google.com/search?q=soursop+fruit&tbm=isch&tbo=u&source=univ...

या लिंकवरचे फोटो बघून मला सांगा या फळाचे झाड बघितले आहे का ? मुंबईच्या बाजारात तरी हे फळ बघितल्याचे आठवत नाही. गोव्याला याची झाडे आहेत. तिथे त्याला काटेफणस म्हणतात. पण तिथेही बाजारात ते फळ क्वचितच असते.
कोकणात आहे म्हणजे जागूकडे असेल असे वाटले होते पण तिच्याकडेही बघितले नाही मी.

हाताच्या ओंजळीएवढा आकार असतो आणि चव फणस + सिताफळ अशी असते. किंचीत आंबट असते. याचा
रस टिनमधे मुंबई-पुणे हायवेवरच्या फुड कोर्ट मधे बघितला होता. नुसते फळ खाल्ले तर त्यात खुप रेषा ( चोथा )
असतो. पण पोटभरीचे फळ आहे. नायजेरियाच्या भाषेत त्याला चपचप ( जेवणजेवण ) असा शब्द आहे. आणि ते खरेच आहे. अर्धे फळ सुद्धा एका वेळी खाणे शक्य होत नाही.

आता आठवायचे कारण बालिमधे या फळाचा जॅम खाल्ला होता. तिथे त्याला श्रीकाया असे नाव आहे. मुंबईच्या हवेत हे झाड व्हायला हवे.

या फळाचा कॅन्सरवरील उपचारात उपयोग होतो असे पण वाचले. झाड शोभिवंत असते. हिरवीगार छोटी पाने असतात. फळांच्या मानाने पाने छोटी वाटतात. फळेही तशी कमीच लागतात.

साधना, तूझ्या बाल्कनीत उन येत असेल तर अवश्य भाज्या लाव. भायखळ्याहून खते आणि बिया आण. माझ्याकडच्या भाज्या मस्त पोसतात त्याने. चेंबूरला, डायमंड गार्डन ते भाजी मार्केट या सायन ट्रॉम्बे रोडवर पण एक दुकान आहे. तूझी आवडती लाल माठाची लावच.

नाही रावी. तो नीट कुजवायला योग्य ते बॅक्टेरिया किंवा गांडूळ हवेत. मातीत खड्डा खणून त्यात टाकला तरी चालेल. घरी तसा ठेवला तर वास येतो. पण घरीही खत करायला जाळीदार पिंजरे मिळतात. मागे आरतीने लिहिले होते यावर.

हाँ दिनेश हे सॉर सॉप इंडोनेशिया बरेचदा ट्राय केलं..

रा बा त भरलेल्या प्रदर्शनातील भाज्याही सुरेख गुटगुटीत होत्या..

जिप्स्या तुझ्या फोटोंची वाट पाहताहेत सर्व...

हो मी पाहिले ते जाळीदार पिंजरे, खूप होते विकायला रा बागेत ... घरच्याघरी गांडूळखेत बनवायला

जिप्स्या तुझ्या फोटोंची वाट पाहताहेत सर्व...>>>>>आता मला सांगा इतके सगळे चांगले फोटो वर्षूदीने टाकल्यावर मी काढलेल्या फोटोंची गरज आहे का?

>आता मला सांगा इतके सगळे चांगले फोटो वर्षूदीने टाकल्यावर मी काढलेल्या फोटोंची गरज आहे का?>>>>>>>>>>>>आळशी झालायस. Proud

जिप्स्या किती भाव खाशील रे.... जाडा होणारेस तू आता पटकन..

तुझे इस्पेशल अँगल वाले, जिप्सी टच चे फोटो हवेच नि ग वर

आता मी एक ही टाकणार नाहीये....

जाडा होणारेस तू आता पटकन..>>>>>>>>>>वर्षे, त्याने पटकन स्वत:कडे पाहिले असेल Lol

जिप्स्या किती भाव खाशील रे.... जाडा होणारेस तू आता पटकन..
तुझे इस्पेशल अँगल वाले, जिप्सी टच चे फोटो हवेच नि ग वर >>>>> येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स .... टाक रे फोटु लवकर ....

आता मी एक ही टाकणार नाहीये.... >>>> नहीईईईईई - तू पण टाक वर्षूदी - तू टाकलेले फोटोही भारीचेत .....

चला मग, पटापट फेसबुकवर माझा Flowers_2014 (फिर छिडी बात फुलों कि...) अल्बम बघुन या.>>>> एऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ........ टाक रे लवकर इथे ....... मी थोपुचे थोबाडही पहात नाही ..... Happy Wink

Pages