निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
शांकली, बिट्टिच एक झाड आमच्या
शांकली,
बिट्टिच एक झाड आमच्या बिल्डिंग मध्ये आहे आणि मुलांना सहज पोहोचता येइल अस...मुल फुल जमा करुन खेळतात देखिल...एवढ झाड तोडुन टाकायला जिवावर येतय्..फुलांचा पण धोका असतो का?
बिट्टिच एक झाड आमच्या
बिट्टिच एक झाड आमच्या बिल्डिंग मध्ये आहे आणि मुलांना सहज पोहोचता येइल अस...मुल फुल जमा करुन खेळतात देखिल...एवढ झाड तोडुन टाकायला जिवावर येतय्..फुलांचा पण धोका असतो का? >>>>>>>
वैशाली - ही विकिपीडियावरील माहिती पहा - Thevetia peruviana म्हणजेच यलो ओलिएंडर म्हणजेच बिट्टी
Thevetia peruviana contains a milky sap containing a compound called thevetin that is used as a heart stimulant but in its natural form is extremely poisonous, as are all parts of the plants, especially the seeds. Extract from Thevetia peruviana is reported to possess antifertility and/or spermicidal activity. (http://en.wikipedia.org/wiki/Thevetia_peruviana )
ते झाड उगाचच कोणा अजाण मुलाच्या जिवावर बेतण्यापेक्षा तोडणेच चांगले - असे वैयक्तिक मत.
Oxalidaceae (Wood sorrel
Oxalidaceae (Wood sorrel family) या कुळातील अजून एक कॉमन पिवळे फूल -
Oxalis stricta म्हणजेच Yellow Wood Sorrel
या शेंगेचा हा क्लोज अप आहे - प्रत्यक्षात ही एक इंचापेक्षाही लहानच असते.....
Oxalidaceae (Wood sorrel
Oxalidaceae (Wood sorrel family) या कुळातील एक वेगळेच गुलबट/ पर्पल फूल (जे आमच्या बागेत खूप कुंड्यांमधे वाढले आहे).....
Oxalis triangularis म्हणजेच Purple Shamrock
शशांक, तुम्ही Wood sorrel
शशांक,
तुम्ही Wood sorrel family मधील पहिली ३ प्र.चि.टाकली आहेत त्यातील ३ नं.चे तण आमच्या कडील कुंड्यांमधे वाढले होते. एकदम तलम पोताची पाने असल्यामुळे स्वतंत्र कुंडीपण बहाल केली होती.पण पसारा बराच
झाल्यावर उपटून टाकली.तरीही एका कुंडीत परत दिसत आहेत.
Oxalis triangularis पोटो मस्तच!
शशांक, त्या फुलपाखरी झाडंची
शशांक, त्या फुलपाखरी झाडंची फुले पण खुप छान आहेत.
( आणि अपलोड करायला कुठली साईट वापरली आहे. मला पिकासावरून आता अपलोड करता येत नाही. )
ज्यानी त्यांच्या साईटवर
ज्यानी त्यांच्या साईटवर स्पष्ट लिहिलेय की बाबांने माझे फोटो कॉपी करु नका त्यांची गोष्टी वेगळी, पण जे फोटो गूगल इमेजसर्चवरुन घेतलेत किंवा अशा साईटवरुन ज्यांनी फोटो कॉपीबद्दल काहीच लिहिलेले नाहीय ते लोक नंतर येऊन कॉपीराईटभंग झाला म्हणु शकतात का यावर कोणीतरी प्रकाश पाडा ?? >>
जर एक्स्प्लिसिट परवानगी दिली नसेल तर असे फोटो कॉपी क.रु नयेत . विकिसारख्या पब्लिक डोमेनमधल्या पानाची लिंंक द्यावी. एखादे पर्सनल ब्लॉग / साइटवरचे पान असेल तर त्यांना विचारुन लिंक देणे श्रेयस्कर . कॉमन नेटिकेट्स आधी पाळावेत. मायबोली गोत्यात येणे न - येणे ही पुढची बाब
माझा नवरा नुकताच कोकणात
माझा नवरा नुकताच कोकणात आमच्या घरी, फणसे,(ता. देवगड) जाऊन आला. मी तिथले काही फोटो इथे देते. मी पहिल्यांदाच फोटो अपलोड करतेय, काही चुकले तर जरूर सांगावे. फोटो मोबाईलवरून घेतले आहेत.
रामेश्वर मंदिर
देवळात जाण्यासाठी घाटी चढायला लागते तो रस्ता
आमच्या बागेतल्या मिरच्या
माड-पोफळीच्या बागेतील माडाचे झाड
हापूसच्या कलमांची बाग
आंब्याचा मोहोर
आमचे घर
आमच्या गावचा शांत-निवांत, पांढऱ्या वाळूचा समुद्र-किनारा
अन्जू, दुसरा फोटो मस्तच!
अन्जू,
दुसरा फोटो मस्तच!
धन्यवाद देवकी, फोटो अपलोड
धन्यवाद देवकी, फोटो अपलोड करायला नवऱ्याने मदत केली, मला एकटीला जमले नसते.
वा अन्जू, कसले मस्त आहे तुमचे
वा अन्जू, कसले मस्त आहे तुमचे घर, बागा, समुद्रकिनारा..... अप्रतिम ..... (या फणसे गावाला नक्की जायचे कसे - ते कळू शकेल का ?)
रच्याकने, एवढ्या लवकर मोहोर लागला पण आंब्याला ????
वा !! देवगड चे फोटो मस्तच
वा !!
देवगड चे फोटो मस्तच
शशांक माझ्या घरी कुंड्यांमधुन हे तण माजले आहे, पण त्याची फुले छानच दिसतात
Oxalidaceae (Wood sorrel
Oxalidaceae (Wood sorrel family) या कुळातील एक वेगळेच नाजुक गुलबट/ पर्पल फूल ....
Oxalis debilis var. corymbosa म्हणजेच Large-Flowered Pink Sorrel, lilac oxalis, pink wood sorrel
Oxalidaceae (Wood sorrel
Oxalidaceae (Wood sorrel family) या कुळातील अजून एक गुलबट/ पर्पल फूल ....
Oxalis purpurea म्हणजेच Purple Wood Sorrel, Oxalis
Oxalidaceae (Wood sorrel
Oxalidaceae (Wood sorrel family) या कुळातील अजून एक गुलबट/ पर्पल फूल ....
Oxalis latifolia म्हणजेच Wood Sorrel, Broadleaf woodsorrel, Mexican oxalis
मझ्या कडे टेरेसवर मी बाग केली
मझ्या कडे टेरेसवर मी बाग केली होती वडिलांनी सुद्धा त्यात बरीच भर घातली १५-२० कुंड्या आणि दुध वहातुकी साठी वापरतात ते ८-१० ट्रे असा मोठा पसारा झाला. दोन वर्षे व्यवस्थित देखभाल होती पण जुन पासून काही अडचणींमुळे त्याकडे पुर्ण दुर्लक्ष झाले, कुंड्यांमधे , ट्रे मधे रानटी झाडे, तण माजले गुलाबाची झाडे काळी पडून दिसेनाशी झाली होती.
दिवाळीच्या वेळेस लहान बाळाला त्याच्या आजोळी सोडल्यावर असाच टेरेस वर रेंगाळत होतो, एकदम मुंग्या चावल्या, काही कुंड्यांमधे त्यांची वारूळे तयार झाली होती. तडक बाजारात गेलो एक हिट चा स्प्रे, आणि लक्ष्मण रेशा खडू आणला त्या खडूची पावडर करुन वारुळ असलेल्या कुंडी भोवताली पसरली आणि कुंडी जागेवरच हलवली. मुंग्यांचा नायनाट करायला २-३ दिवस लागले मग एक एक कुंडी साफ केली गुलाबाची रोपे काळवंडली होती पाने किडली होती ती काढुन टाकली, निघालेल्या कचर्यावर दोन दिवस आंघोळीचे पाणि गरम केले. गुलाबाच्या आजुन तग धरुन राहिलेल्या रोपांची छाटणी केली, कुंडितली माती उकरुन मोकळी केली आणि प्रत्तेक कुंडित शेणखत घातले.
रोज सकाळी पहायचो नुसत्याच काड्या शिल्लक दिसत होत्या ८-१० दिवस गेल्यावर हळू हळू पालवी फुटली. १४ रोपे पुन्हा फुटली आहेत. त्यातल्या काही रोपांवर प्रत्तेकी ३ ते ८ कळ्या सुध्दा आल्या आहेत.
आता ट्रे साफ करायचे बाकी आहेत मग त्यात पालक , मेथी , कोथिंबिर, टॅमेटो लावणार.
Oxalidaceae (Wood sorrel
Oxalidaceae (Wood sorrel family) या कुळातील अजून एक गुलबट/ पर्पल फूल ....<<<
शशांक हे पण माझ्या कुंड्यांअधे उगवले होते, उपटल्यावर मुळाला बदामाच्या आकाराचे कंद त्याला असतात असे दिसले
रोज सकाळी पहायचो नुसत्याच
रोज सकाळी पहायचो नुसत्याच काड्या शिल्लक दिसत होत्या ८-१० दिवस गेल्यावर हळू हळू पालवी फुटली. १४ रोपे पुन्हा फुटली आहेत. त्यातल्या काही रोपांवर प्रत्तेकी ३ ते ८ कळ्या सुध्दा आल्या आहेत. >>>> वा, पुन्हा गुलाब फुलले तर ....... ग्रेट .....
तुझी मेहनत व निसर्गाची किमया - दोन्हीमुळे हे घडून आले .......
शशांक हे पण माझ्या
शशांक हे पण माझ्या कुंड्यांअधे उगवले होते, उपटल्यावर मुळाला बदामाच्या आकाराचे कंद त्याला असतात असे दिसले >>>>> मी या ऑक्झॅलिस संबंधी सुरुवातीलाच लिहिलेय की हे एक तण (वीड) आहे म्हणून .....
सुप्रभात. नर्सरीतुन आणलेली
सुप्रभात.
नर्सरीतुन आणलेली नविन बाळे. (६ बाळे आणलीत ५ शेवंती १ गुलाब)
शशांअजी तुम्ही टाकलेली बरीच फुले आमच्याइथे फुलत असतात.
स-सा अभिनंदन रोपांना नविन अंकुर आल्याबद्दल. हे अंकुर फुटल्यावर काय आनंद होतो ह्याचा अनुभव मी कित्येकदा घेते. लहानप्णी तर मला हे वेडच होते. रोपांच्या फांद्या दुसरीकडून आणायच्या आणि आपल्या घरी लावायच्या मग त्याला कधी नविण कोंब(अंकुर) येतो ह्याची वाट पहायची. टाचणीच्या वरच्या टोकाएवढा अंकुरही माझ्या नजरेत येई आणि मला आनंद होत असे. अंकुर आला म्हणजे आता फांदी जगणार ह्या क्ल्पनेने आनंदी आनंद होई.
अन्जू फार छान वाटल फोटो पाहुन.
माझ्या घरचा अलकोल. तशी काही
माझ्या घरचा अलकोल. तशी काही फार आवडती भाजी आहे असे नाही, पण आपल्या हाताने वाढवण्यात किती आनंद असतो, ते अनुभवल्याशिवाय कळणार नाही !
ती पिवळ्या फुलांची शेंग आम्ही
ती पिवळ्या फुलांची शेंग आम्ही लहानपणी भातुकली खेळताना भेंडीची भाजी म्हणून वापरायचो
आणि हे काय आहे ओळखा बघू !
आणि हे काय आहे ओळखा बघू !
भोपळा सुप?
भोपळा सुप?
दिनेशदा - आंब्याचा रस आहे का
दिनेशदा - आंब्याचा रस आहे का हा ?
अंगोलातल्या कैर्यांचे पन्हे.
अंगोलातल्या कैर्यांचे पन्हे. अर्धवट पिकलेल्या कैर्या घेतल्या होत्या त्यामूळे असा मस्त रंग आलाय.
आणि ते माझ्या संगमरवरी टेबलावर ठेवलंय !
दिनेशदा पन्हे मस्त, अलकोलपण
दिनेशदा पन्हे मस्त, अलकोलपण छान, अलकोललाच नवलकोल म्हणतात ना?
शशांकजी, स_सा, जागू धन्यवाद.
शशांकजी आमच्या गावाला जायला देवगडहून फणसे-पडवणे या गाडीने जायला लागते, बसने साधारण अर्धा तास लागतो. जरुर जा, माझे मोठे दिर तेथे असतात ते तुमचे स्वागतच करतील. प्रसिध्द गायक सुधीर फडके आमच्या गावचे, त्यांच्या घराचा चौथरा आहे अजुनही आणि श्रीधर फडके जातात अधुनमधुन गावाला. आता आंब्याचा मोहोर यायला सुरुवात होते आणि मध्ये काही निसर्गाच्या अडचणी (अवकाळी पाऊस, थंडी कमी पड्णे, ढगाळ वातावरण,वादळी वारे), तसेच काही रोग(खार पडणे) असे झाले नाही तर आंबे लवकर बाजारात येतात नाहीतर मोहोर गळूनपण जातो.
दिनेशदा पन्ह आणि टेबल दोन्ही
दिनेशदा पन्ह आणि टेबल दोन्ही छान.
ही आमच्या इथली गावठी कुत्र्यांची तिसरी पिठी. दोन मातांनी ५-६ दिवसांच्या अंतरावर बाजूबाजूला पिल्ले घातलेली. वेळीच फोटो नाही काढले. पिल्ले आता बाहेर येउ लागली आहेत. आमच्या वाडीत आता माणसांपेक्षा कुत्र्यांची संख्या जास्त होत चालली आहे.
ह्यांची पण आम्हाला काळजी घ्यावी लागते. जेवण थोडे राखुन ठेवावे लागते माता आणि पिल्ले उपाशी राहू नये म्हणून. पुतण्या तर त्यांना डिलिव्हरी नंतर चिकन वगैरे पण घालायचा कॅल्शियम साठी. हल्ली पिल्लांना जुन्या चादरी पण अंथरून ठेवतो रात्री.
जागू, कुत्र्याची स्थिती आता
जागू,
कुत्र्याची स्थिती आता अशी आहे कि तो मानवाच्या सोबतीशिवाय जगूच शकत नाही. नैसर्गिकरित्या अन्न मिळवायची क्षमताच त्याने गमावलीय. मांजरीचे पण तसेच होत आहे. आजकालच्या मांजरीना उंदिर पकडताच येत नाही.
अन्जू, आता आमचा कोकणाशी संबंधच उरला नाही, पण कुठल्याश्या गावी ( कदाचित तिवरे ) शिंद्यांचा चौथरा पण आहे म्हणे.
दिनेशदा कोकणाशी संबध उरला
दिनेशदा कोकणाशी संबध उरला नसेल तर आमच्या गावाला या.
Pages