निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी, मस्त वर्णन.
पण काय आहे ना आपण चार दिवसाचे पाहुणे म्हणून जातो म्हणून आपल्याला कवतिक. तिथे राहणार्‍यांना त्यातले प्रॉब्लेमच दिसत असणार.

दिल्लीतला माणूस मुंबईला आला कि कितना बडा सागर ! असे म्हणतो ना तसे.

केनयात जागोजाग गुलाब बघून माझी नजर त्यातल्या आनंदाला मुकत होती. इथे अंगोलात तोच मी, मॉलमधल्या फ्लॉवरशॉपमधली गुलाबाची फुले भान हरपून बघत बसतो.

स्पार्टाकस यांची माऊंट एव्हरेस्ट वरची मालिका वाचून, मला यू ट्यूबवरची हि क्लीप आठवली

http://www.youtube.com/watch?v=KnE6S_Mb-mY

बर्फाशिवायच्या एव्हरेस्टचे दर्शन ( असे फोटो क्वचितच दिसतात ) त्यातले थर. समुद्रातून तो निर्माण झाल्याचे अ‍ॅनिमेशन... सर्वच सुंदर आहे.

मागे काय स्ट्र्रोबेरी चे झाड आहे काय? >>
स्ट्रॉबेरीची झाडे अगदी बुटकी फूट दीड फूट उंचीची असतात. मी पण पहिल्यांदा एका मैत्रिणीने कॉप्फीच्या पेपरकप मधून छोटी रोपं दिलेली तेंव्हा चक्रावले होते - की एवढ्या छोट्या रोपांपासून मोठ वृक्ष होऊन फळे मिळेपर्यंत किती वर्षे जातील या विचाराने !

मेधा Happy Happy

खरंतर रोप म्हणायला हवं त्याला, झाड म्हणता येणार नाही..

दिनेश, तसे तुमचे आफ्रिका अगदी रंगीबेरंगी आहे, तिथल्या घोरपडीही रंगित, इथल्या घोरपडी मातकट आहेत Happy

नाही जांभळाचे झाड आहे ते.

मी पाहिलेले शेकरू मांजरा पेक्षा मोठे होते.

मानुषि अग कसल सुंदर वर्णन केलस. फिदा तुझ्या वर्णनावर.

पुण्याच्या हवेत कुंडीत स्ट्रॉबेरी व्हायला हवी. शोभाला सांगितले पाहिजे. ( रोपे महाबळेश्वरला मिळतील Happy )

मानुषी, काय मस्त वर्णन केलस ग! चित्र अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं. >>> +१०००...

मानुषी - तिकडे लेकीकडे का लेकाकडे ??? अग्दी एन्जॉय करतीएस की हिवाळा .... फोटुबिटु टाक की ...

हो साधना, इथे सर्वच रंगीबेरंगी असते. निसर्ग तर आहेच पण या लोकांचे कपडे, घराचे / फर्निचरचे रंग पण असेच असतात. आणि त्यांच्या काळ्या रंगावर हे रंगीत कपडे खुलूनही दिसतात.

त्यामानाने युरपमधे लोकांना ग्रे / पेस्टल रंगच कपड्यांमधे आवडतात असे मी बघितले.

शशां़़क आहेस कठे??
़कधीचे टाकलेत. फोटो तिकडे........गुलमोहरात. निगप्रेमींच्या प्रतिसादाची वाट बघत.
३ भागात.
लेकीकडे आह. सध्या.
फक्त माझं नेहेमीचं नेट बुक न्सल्याने......या. आय पॅड. वर टायपिंगचे वांधेच आहेत.

दिनेशदा....... आत्ता मला इथे दीसीत जाणावलेली. गोष्ट.......
इथल्या हिवा ळ्यात लोक फक्त काळेच कपडॅ वापरताना दिसतात.
अगदी मेट्रोसारख्या गर्दीच्या ठिकाणी तर अगदी का ळ्या कपड्यातल्या लोकांच्या. झुंडी पाहिल्या की जाण्वते.
फार फार तर ग्रे, खाकी. आणी सगळं अगदी प्लेन. प्रिन्टेड. कपडा घालायला कायद्याने बंदी आहे ़ की काय अस. वाट्ण्याइतपत प्रिन्टॅड. गायब.
बाकी

आपण तिथे तसले कपडे घातले तर कुठून कुठून येतात अश्या नजरेने बघत बसतात. त्यांचे मूळ असलेल्या ब्रिटनमधल्या हवामानाचा हा सार्वत्रिक इफेक्ट असावा का ?

आमच्याकडे तर लग्नातले नवर्‍याचे सूट देखील मरून, जांभळे, हिरवे अश्या रंगातले असतात. आणि त्यांना ते शोभतातही.
ब्रिटीशांच्या प्रभावाखाली असलेल्या केनया, साऊथ आफ्रिकेत अजून सूट, बूट, टायचे प्रस्थ आहे. आमच्याकडे तर आम्ही सदासर्वदा जीन्स, टीशर्ट मधे असतो.

करड्या/काळ्या रंगाचे कपडे उब धरुन ठेवतात हे लक्षात आल्यावर तसे कपडे घालुन स्वतःला गरम ठेवणे आदिम काळी सोप्पे गेले असणार आणि मग तशीच सवय पडत गेली. म्हणुन आजही थंड प्रदेशातले लोक काळे/करडे कपडे घालत असतील. आपणही संक्रातीला मुद्दाम काळी साडी निवडतो ना Happy

आपल्याइथल्या किंवा आफ्रिकेसारख्या गरम हवेत काळे कपडे घातले तर जास्त गरम होणार, म्हणुन ते टाळण्याकडेच लोकांचा कल गेला असणार.

काळी जिन्स घालुन जर कार्/रिक्षामध्ये बसले तर ज्या मांडीवर उन पडते तिथे चटके बसायला लागतात असा अनुभव आहे Happy रंगित कपड्यांमध्ये असे चटके बसत नाहीत.

साधना, आमची आफ्रिका गरम नाही काही !

नैरोबी, जोहान्सबर्ग, अदीस अबाबा, हरारे, ट्यूनिस तर थंड हवेची ठिकाणे आहेत. उंचावर असल्याने या विमानतळावरून विमानांना उडताना जास्त इंधन जाळावे लागते. अदीस अबाबाचे तपमान १७ अंश से च्या आसपासच असते नेहमी. नैरोबीत घरात एसी काय पंखा पण नसतो.

अर्थात तीन कोपर्‍यातली ३ मोठी वाळवंटे आहेत हे खरेय पण तिथले लोकही रंगीत कपडेच घालतात.

आता ना एकदा निवांतपणे नैरोबीवर लेखमालिका करायची आहे मला.

आपल्याकडे ज्या स्ट्रॉबेरीज मिळतात त्यांचे झाड अगदीच छोटे असते. त्यांची फळे जमिनीवर लोळतात. ती खराब होऊ नयेत म्हणून त्याखाली वाळलेले गवत ठेवावे लागे ( म्हणून त्या स्ट्रॉ - बेरीज )
पण तशीच फळे लागणारे एक चिनी झाड पण असते. इथे बघा

http://www.youtube.com/watch?v=XMdUnBNW8Rk

.

मानु... मज्जा कर....

बार्न अँड नोबल मधे दीस च्या दीस घालवू शकतेस........ जब मिल बैठेंगे कॉफी , सोफा, पुस्तकं .. Wink

मानु... मज्जा कर....

बार्न अँड नोबल मधे दीस च्या दीस घालवू शकतेस........ जब मिल बैठेंगे कॉफी , सोफा, पुस्तकं ..
येस्स्स वर्षू.......!!!,!

सुप्रभात निगकर्स Happy

दोन आठवड्यापूर्वी गावी गेलो होतो. आमच्या गावातील या डाळिंबाच्या बागा. ताजी ताजी झाडावरची डाळिंबे तोडुन आणली आणि फस्त केली. Happy

वर्षूदी, मानुषीताई Proud

वर्षूदी, काल फोन करत होतो, उचलला नाहीस. Sad :भोकाड पसरणारा बाहुला:

बाकीचे कुठे गायब झालेत?

बाकीचे कुठे गायब झालेत? >>>>> वा, जिप्सी !!!! हे तू विचारतोएस ?????????????????
लै भारी दोस्ता...............................
बरोबरे म्हणा ----- सध्या तरी, तुझ्या दृष्टीने सगळेच गायब आहेत म्हणा ...... त्याला तू तरी काय करणार आणि बाकीचेही काय करणार ........ Happy Wink

बाकीचे कुठे गायब झालेत? >>>>> वा, जिप्सी !!!! हे तू विचारतोएस ?????????????????>>>>>>>>>.बघा आज आठवण झाली त्याला सर्वांची. Proud

बरोबरे म्हणा ----- सध्या तरी, तुझ्या दृष्टीने सगळेच गायब आहेत म्हणा ...... त्याला तू तरी काय करणार आणि बाकीचेही काय करणार .......>>>>>>>>>. + १

आता बघ, रुसण्याचे नाटक करून परत गायब होईल हा. आता तो इकडे उगवला की तो 'जिप्सीदिन' Happy

जिप्स्या वेलकम बॅक. पण हे सारख सारख करायला लावू नको. आता नेहमी ये. Lol

पुण्यातली फुले.

ओए, मी आहे इथेच Happy
कालच्या पूर्ण दिवसात फक्त वर्षूदी आणि मानुषीताईंचाच प्रतिसाद दिसला म्हणुन विचारले कि, कुठे गायबले सगळे. Happy

फक्त प्रतिसाद देत नाही पण सगळ्या गप्पा पूर्ण वाचतोय. Happy

Pages