निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा कसे पकडता येतील मांजरांना उंदीर. ते घरात कसेही घुसुन पौष्टीक पौष्टीक खाउन धष्ट्पुष्ट होतात. बिचार्‍या मांजरांना तेवढी चपळता नाही. Lol

दोन दिवस उपाशी ठेवलं तर बरोबर पकडतील.
माझ्या लेकिची मांजर अश्याच चिमण्या मारून खाते आणि कलेवरं मांडून ठेवते. ( ती आणि मी बाहेर गेलो होतो आणि तिचे कॅटफूड शेजारच्या लबाड कोंबड्याने खाल्ले. मग या सोनू-द-सेकंड बाईने असा पराक्रम केला होता.
सोनू-द-सेकंड हे खास लेकिने ठेवलेले नाव. कारण पहिली सोनू कुणाचा तरी हात धरून ( इति. लेक ) पळून गेली. )

कलेवरं मांडून ठेवते. << असेच एकदा मांजरीने चिमणि पकडून आणली आणि पिल्लांना खेळवण्यासाठी त्यांच्या पुढ्यात टाकली, पिल्लु काय आणले हे पहाण्यासाठी जवळ जाता क्षणीच चिमणि भुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र उडाली त्या नंतर मांजरीने काढलेला गळा आजुनही डोळ्यासमोर येतो

स_सा, पाळीव प्राण्यांचे एक असते. ते शिकार आपल्या मालकापुढे आणून टाकतात. परतफेडीची त्यांची पद्धत आहे ती !

००

हे पोस्ट मी ऑफिसमधून लिहिणे हा विरोधाभास आहे पण यू ट्यूबवर मेक मी अ जर्मन, नावाची फिल्म आहे. अवश्य बघा. शिस्त काय असते, सामाजिक जाणीवा कशा असतात, कमी वेळ काम करूनही जास्त उत्पादन कसे करता येते.. हे तर शिकता येतेच . ( तिथे ड्यूटीवर असताना पर्सनल फोन वापरायचा नाही असा संकेत आहे, फेसबुक वगैरे दूरच )

इथे लिहितोय ते त्यांच्या शाळेच्या पद्धतीसाठी. शाळा म्हणजे पाठांतर / घोकंपट्टी याला फाटा देऊन चक्क जंगलात मुलांना घेऊन जायचे आणि त्यांना हवे ते करु द्यायचे. तो भाग बघाच.

जागू, एवढ्यातच शेवंती फुलायला लागली ? हि शेवंती आमच्याकडे जानेवारीत फुलत असे.

०००

मुंबईत बरीच वर्षे राहिलेले लोक सांगू शकतील. मुंबईत पुर्वी मुक्त पोपट दिसायचेच नाहीत. सध्या तर आमच्या
कॉलनीतही प्रचंड कलकलाट चाललेला असतो. ( डॉ सलीम अली, पोपटानाही पेस्ट मानत असत. )
पण आपल्याकडे साधारण पुर्ण हिरवे आणि लाल डोक्याचेच जास्त दिसतात. मी सिंगापूरच्या झू मधे तब्बल
११० प्रकारचे पोपट बघितले होते. आपल्याकडे क्वचित लव्हबर्ड्स पण मुक्त उडताना दिसतात. घरात पाळले
तर त्यांचाही प्रचंड कलकलाट असतो.

यू ट्यूबवर ऑस्ट्रेलियातील पोपटांबद्दल एक मस्त क्लीप बघितली. त्यापैकी एक तर तब्बल ९० वर्षे जगतो.
अर्थातच तो फारच डोकेबाज आहे. पण इतर अनेक प्रकारचे पोपट तिथे आहेत.

कधी काळी ऑस्ट्रेलियात रेन फॉरेस्ट होते ( सध्या बहुतांशी वाळवंट आहे ) पण त्या काळात विकसित
झालेले पोपट, या बदललेल्या परीस्थितीशी त्यांनी जुळवून तर घेतले आहेच पण ते आक्रमकही झाले आहेत.
विजेच्या ताराच नव्हे तर रस्त्यावरच्या डांबरातली खडी पण ते उचकटून ठेवतात.

शेतकर्‍यांचे तर ते एक नंबरचे शत्रु झालेले आहेत. शेतातील कणसे तर खातातच पण ताडपत्रीने झाललेले धान्यही ताडपत्री फाडून खातात.

जमल्यास बघा नाहीतर माझ्याकडून कॉपी घ्या.

आता त्याची आवृत्तीच निघत नसणार.
मी साधनाला दिल्या या फिल्म्स तर तिच्याकडून तुझ्यापर्यंत येतीलच.

आज मी एक गंमत पाहीली. राधाला वाढदिवसाला एक अंडी घालणार बदक मिळाल होत. त्याच अंड खेळताना आमच्या बेडरुमच्या खिडकीवर राहील होत. आज सकाळी पाहते तर त्या अंड्यावर पाढरट ओले होते. साधारण पक्षाच्या शिट सारखे. मला आधी कळतच नव्हते की आम्ही इथे असताना पक्षी कसे अंड घालेल. बराच वेळ मी निरखुन पाहीले तेंव्हा ते अंड खेळण्यातल हे मला समजल. पक्षीही असाच फसला की काय? किंवा खिडकीवर बसून त्याचे शिट त्या अंड्यावर पडले असेल.

खरंच, सध्या इकडे कोणी फिरकतंच नाहीये !!! काय झालंय सार्‍यांना ???????????????>>>>>>>>>.माझा संगणक आजारी असल्यामुळे मी १५ दिवस इथे येऊ शकले नाही. Sad
आजच बरा झालाय. आता आधी सगळे वाचते. मग लिहीते. Happy

आमच्याकडे कोकीळ जागे झालेत. सध्या एखादी अर्धवट लकेर घेऊन गळा अजुन फुटला का नाही त्याची चाचपणी चाललीय...<<<<<<<<<<< +१

पक्षी नाही फसणार असा. घरट्याबाहेरच्या अंड्याकडे नाही बघणार तो. पण अंडे खाणारा एखादा प्राणी असेल तर कदाचित वास घेऊन खात्री करून बघेल.

तरीच शोभा..

तसा अनिलही येत नाही इथे आता !

अंड्याची गंमत काल कळली. काल मी परागना आणि श्रावणीला इथे वर्णन केले ते वर्णन केले. दोघेही हसले आणि काय घडले ते सांतितले. श्रावणीने काहीतरी जुन्या क्रिम्स वगैरे खेळायला घेउन त्याच मिश्रण करून ते खिडकीबाहेर फेकताना त्या अंड्यावर पडल होत. Lol

गंम्मतच !

जागू,
तुला सरसोंका साग करायचा होता ना. चमचाभर मोहोरी अंगणाच्या कडेला फेक. सहज उगवते ती.
महिनाभरात भाजी तयार होईल.

ती अशीही उगवलेली दिसते कधी कधी.
पण आता खास रेसिपीसाठी पेरेन. किती मोठी झाल्यावर काढायची ती?

फुलांचा तुरा फुटायला लागला कि काढायची. एखादे जोमदार रोप तसेच ठेव. एक दोन फोडणीएवढ्या मोहर्‍या मिळतील. या पालेभाजीत इतर पालेभाजीची भर घालावी लागतेच. त्यामूळे कुठल्याही पालेभाजीत हि पाने घालू शकतेस.

हुश्श!!!!!!!!!!!! आत्ता वाचल्या सर्व मिसलेल्या पोस्टी..........

मन बाग - बाग हो गया!!!!!!!!!!!!

मामी बाल्कनीतला परिवार इतका मोठ्ठा झालाय??? वॉव...

नुसती केली तर जरा उग्र चवीची होते ती.
आपण आणलेल्या पालेभाज्या मूळासकट असल्या तर त्यातले जोमदार देठ पेरायचे. त्याला फुटवे फुटतात.
मी भायखळ्याहून लाल माठाच्या बिया आणल्या होत्या, त्याची छान वाढ झाली इथे.
आपल्या घरातला राजगिरा पण पेरला तर सहज उगवतो. त्याच्या पानाची पण भाजी छान होते.
समजा एका वेळच्या भाजीएवढी पाने नाही जमली तर कुठल्याही कडधान्याच्या भाजीत मिसळायची. चव छान येते.

मी निसर्गाच्या गप्पा अगदी पहिल्या भागापासून वाचते आहे, खूप आवडतं नवनविन गोष्टी पाहायला. आज पहिल्यांदाच प्रतिसाद देते आहे. मी हल्लीच यू ट्यूबवर "Amazing Plants" ही फिल्म पाहिली. खूप आवडली. लिन्क देतेय - तुम्हा सर्वांना पण तेवढीच आवडेल असे वाटते. http://www.youtube.com/watch?v=vNWByUk22sI

अमी

वर्षूताई, शोभा वेलकम बॅक.

मी सध्या किरण पुरंदरे यांचे पक्षी आपले सख्खे शेजारी हे पुस्तक वाचायला घेतले आहे.

आपण जो राजगिरा खातो तेच बी असतं. सहज उगवते. भाल्यासारखी मोठी, जाड देठाची पाने येतात.
आपल्याकडे कमी दिसते पण हि भाजी पूर्व आफ्रिकेत भरपूर खातात. स्वाहिली भाषेत न्येरेरे असे नाव आहे. ते नुसतीच उकडून /, मीठ घालून खातात. तशीही चवदार लागते.

पुण्यात एकमेव असलेला 'वाळुंज' (Salix tetrasperma) सध्या फुलला आहे. कर्वे रोड वरून पूना हॉस्पिटलकडे येताना पूल जिथे सुरू होतो तिथेच उजव्या हाताला झाडांची बरीच दाटी आहे. त्या दाटीतच हा 'एक अकेला' उभा आहे आणि सध्या फुलावर आहे. याचा बहर जेमतेम ४-५ दिवस टिकणारा! आणि माझं भाग्य असं की या वेळी हा फुललेला मला बघता आला. मागे नि ग च्याच एका भागात याचे काही फोटो मी टाकले होते. आता त्याच्या फुलोर्‍याचे फोटो देतेय.....

IMG_4651.JPGIMG_4652.JPG

Pages