युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिरून / किसून / बत्त्याने.

सेंद्रिय किंवा रसायनविरहित गूळ पावडर स्वरुपात विकत मिळतो, तो आणलात तर गूळ चिरायचा प्रश्न येणार नाही.

सुरी नाहीतरी विळीने चिरा.. हात चिकट होतात.. ते नंतर आधाश्यासारखे चाटून साफ करायचे... Happy

फोप्रोची वाट लावायची असल्यास स्वतःच्या रिस्क वर वापरून बघू शकता...

माझ्या नणदेने यावेळेस दिवाळीत केलेले शंकरपाळे प्रचंड कडक झाले आहेत.:अरेरे: साबा व साबुंच्या कवळ्या तुटतील, पण शंपा नाही असे झालेत. मोहन कमी झाले ते आधीच सांगतेय. पण याला काही उपाय आहे का?( चहात बुडवुन खायला सांगु नका, कारण घरात चहावाले सदस्य कमी आहेत)

चहा प्रेमी नसतील तर दुध प्रेमी असतील ना ? मग झालं तर..

बत्त्याने तोडा फोडा (फोडा आणि राज्य करा हेच इथेपण चालते Proud ) आणि चुरा करा. खारे / गोडे चूर्ण ब्रेड क्रम्ब्ज्स म्हणून त्या त्या चवीच्या पदार्थांत वापरा.

फुप्रो चा शेवटचा वापर करतानाच गुळ त्यावर बारीक करा. सध्या हिम्स ला नेऊन द्या. तो चिळीवर बारीक करुन देईल Wink

धन्यवाद मिलींदा. गंमत म्हणजे हे जरा आतुन भुसभुशीत आणी वरुन नारळासारखे टणक कवचाचे झालेत्.:फिदी: ठीक आहे प्रयोग करायला हरकत नाही. गोडच शंपा केलेत.

सस्मित, चिंच्या उभ्या चिरून त्यातले चिंचोके व दोरे काढून मिक्सरवर भरड वाटा. त्यात मीठ व हिरवी मिरची घालून परत एकदा वाटा. हा ठेचा बाटलीत भरून ठेवा ( अजिबात पाण्याचा हात लागता कामा नये. ) हा ठेचा वर्षभरही टिकेल. खायला घेताना त्यात गुळ घाला व वरून हिंग, जिर्‍याची फोडणी द्या.

या चिंचा भाजून्ही खाता येतात.

मुगाची डाळ + कच्च्या चिंचा असे वरण करता येईल ,
कच्या पण गाभुळलेल्या चिंचा असतील तर कोळंबी + चिंच असं कालवण करता येईल इथे एक रेसिपी आहे
http://amma-cheppindi.blogspot.com/2006/11/chintakayalu-pachireyalu.html

पुलिहोरामधे नॉर्मली चिंचेचा कोळ वापरतात पण कच्च्या चिंचा घालून पुलिहोरा पण मस लागतो

इथे एक रेसिपी आहे
http://cooking4allseasons.blogspot.com/2010/02/chintakaya-pulihora-fresh...

तेलुगु मधे चिंतकाया म्हणतात कच्च्या चिंचेला , बर्‍याच पदार्थात आवडीने वापरली जाते. "chintakaya" असे गूगल केल्यास चिकार प्रकार सापडतील .

बत्त्याने तोडा फोडा हे 'बत्त्याने तोंड फोडा' असेच वाटले आधी. Happy

गुळ नक्की कितीवेळ माहित नाही पण २०-३० सेकंद microwave मधे गरम करा मग नरम होतो व मग फोडा, बारीक करायला सोपे जाते.

सस्मित, चिंचेच लोणच करता येत. पण मला कृती नाही माहित. तुमच्या आजूबाजूला कोणी तेलगू असेल तर त्यांना विचारा.

सस्मित, कच्च्या हिरव्या चिंचा मी एकदा मिठाच्या पाण्यात नुसत्या घालून ठेवल्या होत्या, जसे आपण मिठाच्या पाण्यातले आवळे करतो तसे मी कधी-कधी चिंचा, पिटुकल्या कैऱ्या, मिठाच्या पाण्यात ठेवते, आमच्याकडे आवडतात त्यामुळे थोड्या मुरल्या की पटापट संपतात.

सस्मित, हिरव्या चिंचांचं लोणचं करतात. अप्रतिम होतं. माझ्याकडे सध्या (मिळालेलं) लोणचं आणि कृती दोन्ही आहे. हवी असेल तर जरा वेळानं देते.

मसुराच्या डाळीचे काय काय पदार्थ़ करता येतिल? वरण आवडल नाहि कुणाला अजिबात...

खिचडी आणि साउथ इंडियन पद्धतीचा मसाला घालून रसम. ते वरणासारखं नाही लागत.

दह्याच्या किंवा इतर मॅरीनेशन मध्ये ठेवलेले चिकन किती दिवस फ्रिज मध्ये ठेवता येते? किंवा ठेवणे योग्य आहे ?

सुरी नाहीतरी विळीने चिरा.. हात चिकट होतात.. ते नंतर आधाश्यासारखे चाटून साफ करायचे>>>

हात किन्वा सुरी एकवेळ ठिक आहे ... पण .. विळी ????

मसुराच्या डाळीचं साधं वरण नाही चांगलं लागत. सांबार, चिंच-गुळाची आमटी, डाळ-वांगं, शेवग्याच्या शेंगांची आमटी, पंच फोरनची फोडणी दिलेली आमटी असे प्रकार चांगले लागतात.

हीही... अगं इडल्या चवीला चांगल्या झाल्यात, लुसलुशीत, पोरस वगैरे.... पण खूपपपपपपपप हलक्या झाल्यात... तर मला वाटलं इतक्या हलक्या पण बरोबर नाहीत की काय म्हणून विचारलं...

इडलीपात्रातून नीट निघाल्या ना एकसंध? मग मस्तच झाल्या आहेत असे समज आणि एक मस्त शाब्बासकी दे स्वतःलाच.

हो हो... उठून चालू लागल्या...
मला बहुधा नीट सांगता नाही येतय... म्हणजे हातात ठेवली तर शून्य वजन आहे...

उडत्या तबकड्या म्हणून ब्रँडिंग कर. मदुराईच्या इडल्या अश्या लुसलुशीत व अप्रतिम हलक्या म्हणून प्रसिद्ध आहेत. खाणार्‍यांना आवडल्या ना?

Pages