मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - उलट सुलट" ११ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 29 August, 2013 - 12:19

गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!

नेमकं करायचय काय?

१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -
एखादं उदाहरण घेऊयात - समजा कोणी मिरचीचा फोटो टाकला तर पुढचा त्याला झब्बू म्हणून जिलेबीचा फोटो टाकू शकतो (तिखट-गोड) कोणी जिलेबीला झब्बू म्हणून सरळसोट रस्ता टाकू शकतं (सरळ-वेटोळं) कोणी रस्ता काळा म्हणून बगळ्याचा फोटो टाकू शकतं.... अॅण्ड सो ऑन.....

नियम -
१. सलग एकाच टाईपचा झब्बू नको. म्हणजे तिखटला गोड झब्बू दिल्यावर गोड ला परत तिखट (भले पदार्थ काहीही असो) झब्बू देऊ शकत नाही.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो धनश्री.

सशलच्या चाफ्याला "साधंवरण भात"रंग म्हणून कोल्हापुरी चिकन्करी-भात टाकणार होते.

थोडक्यात काय, नवे फोटो अपलोड न करता मायबोली डिरेक्टरीत आहेत ते कुठल्या लॉजिकनं टाकता येतील हे बघायचं. Proud

इथे मला आकाशातले पक्षी विरूध्द खुर्चीवर बसलेले बक्षी असा झब्बु द्यावासा वाटतोय...... Biggrin

विमानाचे स्टंट्स करताना/बघताना जीव खालीवर विरुध्द आम्ही निवांत..... Proud

majalaachhaaymaaze-japata-na-bhaan-aale.JPG

पाणी विरूद्ध डोंगर.. ! (आम्ही लहानपणी डोंगर का पाणी खेळायचो.. त्यावरून चालवून घ्या :P)

bal rock.jpg

Pages