बागकाम (अमेरिका) सीझन २०१३

Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50

अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.

गेल्यावर्षीचा (२०१२ चा)धागा

अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती

अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती

भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/

तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा

http://sproutrobot.com/

वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनश्री, सुंदर बाग आणि सही लँडस्केपिंग आहे. इथे घमेलंभर भेळ आणि पुस्तक घेऊन अख्खी दुपार हिरवळीवर लोळावं!

सगळेजण या इकडे पोर्टलॅन्डला. तसेही फार माबोकर नाहीयेत इथे. एक जोरदार गटग करून टाकू.
मेनु - घमेलंभर भेळ, चहा आणि पुस्तकं. Happy
जाताना रोपं घेऊन जा.

हो मला गॉसिप्स पुरवता येणार नाही. तेव्हढं तुम्ही सगळ्या आणा बरोबर. Wink

धनश्री खूप छान आहे बाग तुझी.
बाय द वे, मी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पोर्ट्लंड्मधे असणार आहे.

धनश्री, छान आहे तुझी बाग. आम्ही पण दोघांनी मिळुन आमचा पॅटिओ १० वर्षापुर्वी केला. खुप मेहनतीचे काम आहे, पण तितकेच समाधानही मिळते.

टोमॅटो मस्त दिसतायत.
आमचे टोमॅटो अजुन हिरवे आहेत. यावर्षी पहिल्यांदाच घरच्या भेंडीची भाजी. Happy

टॉमॅटो भारी दिसताहेत.

ही आमच्या इंतजारची बाळी Happy चाफ्याच्या साधारण वीतभर फांद्या शोनूने फिली फ्लावर शो मध्ये घेतल्या होत्या माझ्यासाठी. चार वर्षांत पहिल्यांदाच कळ्या आल्यात. सुरूवातीला एक गुच्छ भरून कळ्या आल्या होत्या. बहुतेक सगळ्या गळून गेल्या. ही एकच अजून तरी आहे. फुलाचा रंग लाल असावा असा अंदाज आहे.

chaafa.JPG

नात्या, वॉव मस्तच आहेत टोनेटो. आमचे अजुन हिरवेच आहेत. एका झाडाला साधारण किती आहेत?

चाफा मस्तच सीमा.

ग्रेप टोमॅटो चं पीक अजूनही येत आहे. आताचे टोमॅटो मात्र पहिल्यापेक्षा आकाराने लहान आहेत.आमच्या काकडीने फायनली राम म्हटलं Uhoh

आमचे टोमेटो लाल व्हायला लागले कालपासून. Yay!!!

साधारण मे च्या शेवटच्या आठवड्यात रोप लावले होते. जवळ-जवळ आता ३.५-४ फूट एवढे उंच झालेय. 'रोमा टोमेटोज'. गेल्या महिन्यापासून जवळ्-जवळ ४०-५० टोमेटोज लगडले आहेत.

मे महिन्यात सीड्स ऑफ इंडिया मधून मागवलेले निशिगंधाचे कंद लावले होते. जुलैच्या २-३ तारखे पर्यंत मातीच दिसत होती कुंडीत. मागच्या आठवड्यात ४-५ दिवस बाहेरगावी होते, परत आल्यावर सुद्धा पाऊस व्यवस्थित होता त्यामुळे लगेच पाणी द्यायला लागलं नाही. गेल्या रविवारी पाणी देताना पाहिलं तर ६-७ इंच उंच झाली आहेत रोपं.

निदान एवढी तरी प्रगती आहे म्हणून खुश. त्याच वेळेस लावलेली हळद मात्र अजून भूमिगत आहे Sad

माझीही हळद अजिबातच दाद देत नाही. आणि लसणीच्या पाती चिमण्यांनी खाल्ल्या! हे नवीनच पाहिलं यंदा. चिमण्या सात्त्विक आहार घ्यायला लागल्या एकूण. Proud

गेल्या वर्षी माझीही हळद बराच काळ भूमीगत होती. यावर्षी टॉपसॉइल आणि मिरॅकल ग्रोचे पॉटिंग मिक्स १:३ प्रमाणात घेऊन कुंडी तयार केली. १०-१२ दिवसात हळदीच्या तीनही मुळ्यांना छान कोंब आले.

Pages