Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50
अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती
अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती
भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/
तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा
वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्यात पण रोपांना नाही म्हणत
आमच्यात पण रोपांना नाही म्हणत नाहीत - कॄष्ण तुळस, अननोन तुळस सगळे चालतील.
हिरवा अन लाल माठ, टॉमेटो- भेंडी - वांगी रोपं बाहेर लावली काल.
मायाळू, आंबाडी बिया वाफ्यातच पेरल्या आहेत. पाहू काय होतं ते.
मागच्या वर्षी एक १५ फुटांचं रेड मेपल झाड मैत्रिणीकडून आणून लावलं होतं . ते मस्त टिकलंय अन जोमाने वाढतंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेपलबद्दल मलाही काही प्रश्न
मेपलबद्दल मलाही काही प्रश्न आहेत...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुलगी आहे तीच्यासाठी सेफ ऑप्शन शोधतोय.
आम्ही आताच नवीन घर घेतलं, सॅन रेमॉन, कॅलीफोर्नियाला. आमच्या बॅकयार्ड आणि फ्रंटयार्डमधे एक्-एक अशी दोन मेपल्स आहेत. एक अगदी जांभळ्या रंगाचं आहे आणि एक अगदी फ्रेश पिवळट हिरव्या रंगाचं आहे. १५-२० वर्षे वयोमान असावं. ही दोन्ही झाडं थोडी रस्त्यात येतात म्हणून प्रून कराय्ची आहेत तर काही टीप्स द्याल कां प्लीज.
आधी आम्ही काढून टाकणार होतो पण ती दोन्ही झाडं बर्यापैकी महाग आहेत आणि फॉलमधे रंग पण छान होतो म्हणे.
दुसरं म्हणजे आधीच्या मालकाने बरिच झाडं घराच्या भिंतीपाशीच लावलीयेत. ती ही काढायचीयेत. त्यासाठी म्हणे ८००-१५०० खर्च आहे. कुणाला याबद्दल माहीती असेल तर प्लीज द्या.
काही झाडं-झुडपं आहेत ती मला ओळखता आली नाहीत पण त्यामुळे फार गिचडी-खिचडी झालीये. ती काढताना फार वाईट वाटतंय पण काढावीच लागतील.
बॅकयार्ड मधे कोई फीश पाँड आहे, तो कसा स्वच्छ कराय्चा त्याबद्दल ही ग्यान प्रदान करावे ही विनंती
आणि त्या पाँडला झाकण्यासाठी काही जाळीसारखा ऑप्शन असतो कं? कुणी वापर्लाय कां?
मला २ वर्षाची उठाठेवी
पामच्या झाडामुळे घराचं काही नुकसान होउ शकतं का? कारण त्या कम्युनिटीमध्ये प्रत्येक घरटी २-३ पाम असावेत असा दंडक आहे आणि एक पाम अगदी भिंतीजवळच लावलंय आधीच्या मालकाने.
धन्यवाद
मनी
लम्ब वीकान्ताचा मुहुर्त
लम्ब वीकान्ताचा मुहुर्त साधून अनन्ता आणि जास्वन्द जमिनीत लावले.
आमच्या इथे खड्डे खोदून मुरूम काढणे मरणाचे काम आहे, त्यात उनही वाढलेय.
कडिप्त्ता ऑनलाइन कुठून मागवता येईल?
शोनू मला अम्बाडीच्या बिया हव्यात.
मनी, क्रेग्ज लिस्ट किंवा
मनी,
क्रेग्ज लिस्ट किंवा फ्रीसायकल वर यू डिग इट अॅण्ड टेक इट फॉर फ्री अशा पोस्टी टाकू शकता, झाडाच्या फोटोसकट टाकल्यात तर ज्यांना इंटरेस्ट आहे ते ओळखून खणून नेतील.
मोठा मेपल असेल तर ( जपानी नव्हे ) बारक्या फांद्या - एक ते दीड इंच जाडीच्या सहज कापू शकता.
त्यापेक्षा जाड फांद्या कापायच्या असतील तर झाड्याच्या शेपचा अन स्टॅअबिलिटीचा विचार करुन कापाव्या लागतील.
ज्ञाती, पत्ता कळव .
एक मेपल जपानी मेपल
एक मेपल जपानी मेपल आहे.
फ्रीसायकल चा ऑप्शन छान आहे.. बाकीच्या झाडांसाठी टाकते.
मनी दोन महिने कळ काढू शकणार
मनी दोन महिने कळ काढू शकणार असशील आणि वाढलेला जपानी मेपल देणार असशील तर मी घेऊन जायला तयार आहे
संपर्कातून केलेली ईमेल पण बघ.
हा आमचा चिनी गुलाब-
हा आमचा चिनी गुलाब-
Last spring Grinch had bought
Last spring Grinch had bought 4 strawberry plants because my daughter saw them at the store and insisted on buying them. We planted them in the middle of the veggie patch and ignored them for the most part. This year the strawberries have taken over a two feet wide and 8 feet long strip of the patch. Todya the kids harvested two pints and about two more pints will be ready next week.
We will have to have share some baby plants with folks soon, other wise the veggie patch will be come strawberry patch in a year or two![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोक्स विल बी हॅपी टु हॅव देम.
फोक्स विल बी हॅपी टु हॅव देम.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सकाळी साधारण २-३ तासच उन
सकाळी साधारण २-३ तासच उन असलेल्या जागेत लावण्यासाठी फुलझाड सुचवा. वार्षिक असल्यास उत्तम.
सिंडी, इंपेशन्स लाव.
सिंडी, इंपेशन्स लाव.
स्वाती२, मला आवडतात ही फुलं
स्वाती२, मला आवडतात ही फुलं पण मी हँगिंग मध्ये लावली आहेत तीच.
स्वाती, वसंताला येताना आणू का
स्वाती, वसंताला येताना आणू का रोपं तुमच्यासाठी ? आदित्यला ( किंवा अजून कोणाला ) काही हवंय का ?
व्हाइट आयरिसेस आहेत, लिली ऑफ द व्हॅली आहे
लाल माठ, हिरवा माठ, गवारीच्या बिया आहेत
आदित्यला विचारते. बहुधा
आदित्यला विचारते. बहुधा आयरिसेस मागेल तो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिंडी , फुल झाडच पाहिजे अस
सिंडी , फुल झाडच पाहिजे अस नसेल तर coleus , hosta आवडत का बघ. hosta पेरिनियल आहे.
![](https://lh6.googleusercontent.com/-GMCNYsD9b2M/UbCg4Cx9RsI/AAAAAAAAA9Q/TKCcz3VOaq8/s640/IMG_0050.JPG)
हा गेल्यावर्षीचा coleus.
सीमा, आमच्या इकडे coleus
सीमा,
आमच्या इकडे coleus अॅन्युअल आहे. coleus ट्रॉपिकल पेरीनिअल म्हणतात ना? फ्रीझिंग टेम्परेचरला जगणार नाही.
हे बघ.
अंजु , मी होस्ता पेरिनिअल
अंजु , मी होस्ता पेरिनिअल म्हटलय गं. coleus नाही. आमच्या झोन मध्ये पण अॅन्युअलच आहे ते.
बाई, आदित्यला एवढी झाडांची आवड आहे? मला माहित नव्हत. आणखी काय काय लावलय त्याने?
सध्या फुलझाडं (गुलाब, मोगरा,
सध्या फुलझाडं (गुलाब, मोगरा, मदनबाण, रातराणी, जाई, चिनी गुलाब, झेंडू, कण्हेर, चाफा, फोर्सिथिया) आणि हर्ब्ज (तुळस, बेसिल, रोजमेरी, कढीपत्ता, मिरची) आहेत. स्ट्रॉबेरीज आहेत. बटाटा आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गेल्या वर्षी टोमॅटो लावले होते.
बाकी घरात वर्षभर सारख्या बाटलीमेथ्या आणि मोहर्या आणि बडीशोपा आणि दगड आणि माती आणि धोंडे आणि लिटरली हाताला लागेल ते पेरत/उगवत असतो.
त्याच्या वेडाला खतपाणी घालण्यात शोनू आणि सिंडीचा मोठा हातभार आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लसूण लावले की नाहीत अजून ?
लसूण लावले की नाहीत अजून ?
आमची दोनदा चटणी करून झाली. आता पुन्हा पात वाढली आहे.
सीमा, बघते. होम डिपो नाही तर शॉप राइटला भेट देते एकदा. काल घरमालकांनी ढिगाने नवी रोपं आणलीत. त्यामुळे मला दिलेला पॅच वीक एंड पर्यंत शिल्लक असेल की नाही माहिती नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाही नाही, राहिली आहे. लावते
नाही नाही, राहिली आहे. लावते आता.
आमच्या फूटभर उंचीच्या
आमच्या फूटभर उंचीच्या कढीपत्त्याला बाळ झालंय :).
लसूण लावायची मी पण
लसूण लावायची मी पण विसरले.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीत नवजात अंबाडीची रोपं खपली.
http://www.seedsofindia.com/i
http://www.seedsofindia.com/item/Rajnigandha-bulbs--NEW-FOR-2013-246
http://www.willowcreekgardens.com/p-1259-tuberose-single-flower-form-3-c...
http://www.caladiumbulbs4less.com/servlet/the-682/%2810%29-Double-Pearl-...
मी कॅलीफोर्नियात आहे. कारले
मी कॅलीफोर्नियात आहे. कारले लावलेत त्याला फुलं येताहेत पण गळुन जातात. काय करावं? मी गुगलुन पाहीलं पण याबद्द्ल काही माहीती मिळाली नाही.
कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे
कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की आमचे येथे श्री कृपेने छान वाढून झाडावरच लाल झालेल्ल्या पहिल्या ५ ग्रेप टोमॅटो चा आस्वाद घरातील लहान सदस्यांनी घेतला. मला चव मिळाली नाही तरी ते मस्त लागले असणार याची गॅरेंटी आहे. फीडबॅक पण तसाच होता आस्वादकांचा.
श्री माझ्या माझ्या
श्री माझ्या माझ्या मोगर्यावरही कृपा कर थोडी
अनन्ता जमिनीत लावलाय, आता थंडीत कळेल काय ते.
३-४ जास्वन्द जमिनीत लावलेत. पिवळा, लाल, मिक्स असे मस्त कलर आहेत. रोज सकाळी टपोरं फूल बघून एकदम प्रसन्न वाटतं.
शिल्पा,कार्ल्याची फुलं
शिल्पा,कार्ल्याची फुलं सुरुवातीला गळून जातात.काही करू शकत नाही.काही दिवसांनी फळं धरतात.गेल्या वर्षी माझ्याकडे असंच झालं सुरुवातीला,मग मात्र अती कारली आली.त्यामुळे आता फार्मर्स मार्केट मधे गाळा बूक करा :))
शिल्पा कारल्याचं बी कुठुन
शिल्पा कारल्याचं बी कुठुन आणलंस गं. मलपण हवंय. आपण एकाच झोनमध्ये आहोत ना.
ज्ञाती मी पुढच्या वर्षी हाती
ज्ञाती![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी पुढच्या वर्षी हाती घेइन मिशन जास्वंद.
बाजारातुन आणलेल्या कारल्याचं
बाजारातुन आणलेल्या कारल्याचं बी वाळवुन वापरलं.
Pages