बागकाम (अमेरिका) सीझन २०१३

Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50

अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.

गेल्यावर्षीचा (२०१२ चा)धागा

अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती

अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती

भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/

तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा

http://sproutrobot.com/

वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमा, मस्त आहे साईट.

मी पालक लावला त्यातला निम्माच रुजला. रॅडिश आणि चार्ड ची प्रगती चांगली आहे. कांद्याचे सेटस न लावता बी लावले होते. ते अगदी कूर्मगतीने वाढत आहे. मात्र भाजीसाठी आणलेल्या पातीच्या कांद्यांचा खालचा १/४ इंचाचा भाग कापून लावाला, त्यांची वाढ जोमाने होतेय,

शूम्पी, कांपोस्टींगच्या टीप्स बद्द्ल धन्यवाद. गेले काही वर्ष मी अगदी गावठी पद्धतीनी बनवते कंपोस्ट. ५ गॅलनच्या झाडांचे रिकामे डबे घेऊन त्यात एक लेयर वेस्ट मटीरियलचाआणि एक मातीचा असं टाकून मधून मधून ते हलवते. त्यात शिजलेलं काहीही व नॉन्व्हेजचं वेस्ट टाकत नाही. माझ्याकडे ससे आणि खारी यांचा उपद्रव भारी आहे.. तू दिलेली लिंक सवडीनी बघेन. धन्स!

५ गॅलनच्या झाडांचे रिकामे डबे घेऊन >> ही आयड्या भारी आहे.
मला मोठी कंपोस्ट पाइल करायची नाहीये. भाज्या / फळं याचं जे काही वेस्टेज असतं तेव्हढंच करायचंय. पण ते छोटे कंपोस्टर $२००-३०० ला असतात गार्डन सेंटर मधे. तेव्हढे पैसे घालवणे पण बरोबर वाटत नाही.
माझ्याकडे काही पेंट बकेट्स आहेत अन काही ५ गॅलनच्या कुंड्या. आता लगेच सुरु करते हा प्रयोग.

मायाळू, दोडके, दुधी अन अंबाडी यांच्या बिया दोन राउंड मधे लावल्या होत्या पण एकही रोप नाहीये अजून Sad

आमच्याकडे झाडं बाहेर ठेवली तर कढीपत्ता आणि मिरचीची पानं पांढरी पडली एका रात्रीत. वार्‍याने असं होतं असं कळलं. Sad
आता त्या दोघांना आत आणून ठेवलंय पुन्हा. मोगरे सगळ्या व्हरायट्या बाहेरच आहेत - त्या भिंतीजवळ असल्यामुळे विंड डॅमेज झालं नसावं.
कण्हेर मोठ्या कुंडीत रीपॉट करायला हवी आहे आणि चाफा अजून बोले ना!

अनंत टिकला नाही. तुळस सॅन्डीने मारली. मला कोणीतरी (कृष्ण)तुळस द्या आता वसंताच्या वेळी.

पानं पांढरी पडली एका रात्रीत.>>> थंडीमुळंपण होतं. विशेषतः कडीपत्ता थंडीला फार सेंसेटीव्ह असतो म्हणतात. मी त्यामुळे रात्रीचं तापमान ५० च्या पुढं गेलं की कडीपत्ता बाहेर काढते.

Gardenweb.com इथल्या फोरम्सवर कडीपत्त्याबद्दल भरपूर माहिती आहे. http://forums.gardenweb.com/forums/load/flgard/msg031632041187.html

मेधा, मी एकदा एप्रिल शेवटला दुधीच्या बिया लावल्या होत्या. रूजवून यायला साधारण २-३ आठवडे गेले होते असं आठवतंय.

मला कॉम्पोस्ट चं ओब्सेशन झालं आहे Uhoh
काल स्वप्न पडलं की कॉम्पोस्ट पाइलमुळे उंदीर आले असं.. घाबरुन उठले आणी तासभर झोप नाही मग. चेष्टा नाही खरोखर असं झालं.

आजच त्या कॉम्पोस्ट पाइलचा फोटो काढून जिच्या क्लासला शिकले त्या बाईला इमेल करून विचारते की हे एकदा बघ आणि सांग की मी बरोबर ट्रॅकवर आहे का ते. माझ्याकडे किचन वेस्ट खूप असतं रोज पण त्यामानाने ब्राउन्स कमी असतात. काल जंक मेल श्रेड करून तो गठ्ठा ओतला कॉ. पाइलमध्ये.

बाकी मी गार्डिनिया आणि जॅस्मिन आणले आहेत. रोझमेरी पण कुंडीत लावली आहे. मिरची आहे पण ती थ्राइव्ह होत नाहीये असं वाटतय आणि पिकलिंग क्युकंबरची पण तीच गत. Uhoh

ग्रेप टोमॅटो (केज आणला) आणि पुदीना मात्र चांगले वाढत आहेत.

मी घाई केली मग. ४५च्या वर गेल्यावर काढलं. Sad
दोन्हीही तगलेत, पण जरा धस्स झालं होतं बघून.

एप्रिल २१ ला लावले होते दुधी अन दोडके दुसरी राउंड, पहिली बहुतेक एप्रिल १६-१७ असावी. आता शेवटच्या बिया सरळ अंगणात लावणार या आठवड्यात.

मी कढीपत्ता, मोगरा, जास्वंद नेहमी मेमोरियल डे वीकेंडपासून दिवसा बाहेर रात्री आत असं करते ४-५ दिवस, मग पूर्ण वेळ बाहेर ठेवते .

वसंताला माझ्यासाठी कोणी मोगरा आणेल का प्लीज ?
तुळशीच्या बिया लावायचं विसरले होते. आता लावते लगेच.

हा एक मस्त लेख फेसबूक वरुन सापडलेला
http://blackthumbgardener.com/1-plants-you-grow-from-kitchen-scraps/

कण्हेर आहे, पण फुलं नाही आली. रीपॉट करेन आता वीकेन्डला.
शोनू, मोगर्‍यावर आहे माझं लक्ष. आला की ठेवतेच घेऊन.

हे असं रोज सकाळ संध्याकाळ कुंड्या आतबाहेर करून पाठीची वाट नाही का लागत? जस्वंद तर चांगली मोठी होते तेव्हा कुंडी पण भलीमोठीच असणार. Uhoh

cucumberNTomato.jpg

वर डावीकडे काकडीचं रोप आहे आणि उजवीकडे ग्रेप टोमॅटो. विकत घेतली तेव्हा दोन्ही एकाच साइझची होती, दोन्ही शेजारी शेजारी असल्याने दोघांना सेम उन मिळतं. पाणी पण सारखच देते पण काकडी काही खुष दिसत नाही. काय कारण असावं?

काकडीच्या कुंडीत बघणार्‍याच्या लोवर राईट हॅण्ड कॉर्नरमध्ये काय आहे?

व्हर्जिनियात मदर्स डे झाल्याशिवाय झाड बाहेर काढायचे नाही. काही लावायचेही नाही. घरात आधी रोपं तयार करु शकता. - शेजारी.

@ शूम्पी >>> त्यामानाने ब्राउन्स कमी असतात. काल जंक मेल श्रेड करून तो गठ्ठा ओतला कॉ. पाइलमध्ये>>> हे त्यात घातलं तर ते ऑरगॅनीक कंपोस्ट कसं होईल? त्यासाठी फक्त किचन वेस्टच घालावं असं वाटतं. जंक मेल मधल्या जाहीरातीतल्या रंगातले केमीकल्स झाडांना खत म्हणून बरोबर वाटंत नाही. कागदी पुठ्ठे वगैरे गांडुळ खतासाठी जास्त करुन वापरतात.

नीलमपरी एडिसन, क्वीन्स अशा ठिकाणच्या मोठ्या इंडियन ग्रोसरीमधे मिळतात कधी कधी कडिपत्त्याची रोपं. नाहीतर ओळखीत कोणाकडे झाड असेल तर त्यांच्याकडनं मागून घ्यायचं

बियांबद्दल माहिती नाही

Pages