Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50
अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती
अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती
भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/
तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा
वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगं पण त्याला पिकलेलं कारलं
अगं पण त्याला पिकलेलं कारलं लागेल ना??
कल्पना नाही. मी मिळेल त्या
कल्पना नाही. मी मिळेल त्या भाज्यांच्या बिया वाळवते..प्रयोग करुन पहायचे.
इथे जवळ एक भाज्या, फळं , फुलं
इथे जवळ एक भाज्या, फळं , फुलं अन झाडं विकणारं दुकान आहे. भारतीय , मेक्सिकन भाज्या, फळे स्वस्त मिळतात. फुलं अन झाडं पण बर्यापैकी स्वस्त असतात.
तिथून एका वर्षी ५ डॉलर्सना तीन अशा लिलीज असलेल्या कुंड्या आणल्या होत्या. एकेका कुंडीमधे ५-६ रोपं होती. बहर होता तोवर घरात ठेवली झाडं अन फुलं सुकल्यावर ती रोपं पुढच्या दारापाशी लावली होती.
दरवर्षी या दिवसात मस्त फुलतात ती रोपं.
हळदी कुंकु घ्यायला या
![IMG_1340.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u123/IMG_1340.JPG)
गेल्यावर्षी लावलेलं रोप हिवाळ्यात पूर्ण गोठून गेलं होतं पण मार्च पासून परत पालवी यायला लागली.
![IMG_1342.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u123/IMG_1342.JPG)
मेमधे एकदा एक दीड जुडी भरेल एवढा चुका मिळाला, आज जवळपास तीन जुड्या
डेकच्या पायर्यांपाशी एक छोटा
डेकच्या पायर्यांपाशी एक छोटा कोपरा आहे , दोन बाजूंनी घराची भिंत आहे, मोठ्या मेपलची सावली असते दुपारी १-२ वाजे पर्यंत. तिथे फुलझाडं काही तगली नसती म्हणून पुदिना, पार्सली असं काही बाही लावते. हळूहळू त्या कोपर्यां हर्ब गार्ड्न झालंय. हे तिथलं प्रोड्यूस.
अनियन चाइव्ह्स, टॅरॅगॉन, मरवा , दोन प्रकारचे सेज, रोझमेरी, ओरेगानो, फ्लॅट पार्सली, पुदिना, मधे दोन प्रकारचे थाईम आहेत. हे सर्व बारीक चिरून रुम टेम्प ला आलेल्या लोण्यात मिसळून परत ते लोणी फ्रीझ करणार. मस्त होम मेड हर्ब बटर!
क्रीमचीझ मधे घालून पण मस्त लागतात.
तरी लॅव्हेंडर, लॉरेल लीव्ह्स, गवती चहा, लसणीची पात, साधं अन थाय बेझिल यात नाहीत.
लै भारी थाय बेसिल मला
लै भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थाय बेसिल मला मिळालंच नाही. जुई मिळाली यंदा.
या वीकेंडला येतेस का इकडे
या वीकेंडला येतेस का इकडे सिंडे ? मी देईन थाय बेसिल. इतर पण बिया, कंद, कटिंग वगैरे मिळेल
आले असते पण कंपुने मला अजून
आले असते पण कंपुने मला अजून गराजचा कोड पाठवलेला नाही
जोक्स अपार्ट, पुढल्या वर्षी नाही मिळाला तर येइन. यंदा उत्साहात खूप फुलझाड लावलीत आणि आता त्यांची निगराणी राखणं म्हणजे मोठच काम झालं आहे.
गवती चहा कसा लावायचा?
गवती चहा कसा लावायचा?
तुम्ही अमेरीकेत आहात ना? इथे
तुम्ही अमेरीकेत आहात ना? इथे लेमन ग्रास म्हणून हर्ब सेक्शन मध्ये जे मिळते, तोच गवती चहा. कुठल्याही मोठ्या कुंडीत लावा. भराभर वाढतो.
ओके.. लावून बघते. ते जाड
ओके.. लावून बघते. ते जाड दांडे असतात तेच लावायचे ना? पण ते सुकलेले असतात ना?
नीलमपरी, दोन दिवस एका ग्लास
नीलमपरी,
दोन दिवस एका ग्लास मधे पाण्यात घालून ठेवा . अन मग लावा
धन्यवाद अंजली आणि मेधा. मी
धन्यवाद अंजली आणि मेधा. मी नक्की लावीन आणि इकडे कळवीन.
मेधा, लिली आणि हर्ब मस्त
मेधा, लिली आणि हर्ब मस्त दिसतायत.
मेधा, तो चुका मस्त दिसत
मेधा, तो चुका मस्त दिसत आहे.
ह्या आमच्या बागेतल्या भाज्या, विकांताला छान हवा होती पावसाळी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मीपु, सह्ही! मटार आहे का तो?
मीपु, सह्ही! मटार आहे का तो? आणि हॅलापिनोज?
स्वाती, मटाराच्या २,३ च
स्वाती, मटाराच्या २,३ च शेंगा आहेत मधे, सिझन संपला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मटाराच्या बाजूला, काकडीच्या समोर आहेत त्या मुळ्याच्या शेंगा आहेत.
भारी हां मीपु.
भारी हां मीपु.
सहीच आहे की भाजी मीपु. लांब
सहीच आहे की भाजी मीपु.
आमच्याकडे दुधी अन गिलक्याची रोपं वीतभर असतील अजून ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
लांब ग्रोइंग सीझन असलेल्यांचा णिषेध असो
>> मुळ्याच्या शेंगा ओह,
>> मुळ्याच्या शेंगा
ओह, मुळ्याला शेंगा असतात? ही नवीन माहिती आहे माझ्यासाठी.
हे आमचे दारचे ग्रेप
हे आमचे दारचे ग्रेप टोमॅटो
![grapeTomato harvest.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u29142/grapeTomato%20harvest.jpg)
आणि हा मोगरा
![mogra.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u29142/mogra.jpg)
मीपु, ताज्या, घरच्या भाज्या
मीपु, ताज्या, घरच्या भाज्या बघून मस्तं वाटलं.
स्वाती, त्यालाच डिंगर्या म्हणतात.
शूम्पे, सही! टोमॅटो दोनाचे
शूम्पे, सही! टोमॅटो दोनाचे चार झाले!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ओह ओके. शूम्पी ऐकत नाही.
ओह ओके.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शूम्पी ऐकत नाही.
>> स्वाती, त्यालाच डिंगर्या
>> स्वाती, त्यालाच डिंगर्या म्हणतात.
मुंबईला "डिंगर्या" नावाने ज्या शेंगा खाल्ल्या होत्या त्या अतिशय सडपातळ होत्या ..
मीपु च्या फोटोत आधी मला एडमामे आहे असं वाटलं ..
वरच्या फोटोत आहेत की नाहीत
वरच्या फोटोत आहेत की नाहीत माहिती नाही, फक्त मुळ्याच्या शेंगांना काय म्हणतात ते लिहिलं.
सही फोटो!!!
सही फोटो!!!
मुंबईला "डिंगर्या" नावाने
मुंबईला "डिंगर्या" नावाने ज्या शेंगा खाल्ल्या होत्या त्या अतिशय सडपातळ होत्या >> +१ फक्त मी डिंगर्या पुण्यात आणि सातार्यात खाल्ल्या होत्या असं आठवतं.
मीपुणेकर, मस्त वाटलं भाज्या
मीपुणेकर, मस्त वाटलं भाज्या बघून.
आमच्याकडे लसणाची पात सोडल्यास अजून कशाचा पत्ता नाही. लसूण मात्र विंडो बॉक्समध्ये लावलेत तरी आवरा म्हणावं इतकी पात येतेय.
त्या मुळ्याच्याच शेंगा,
त्या मुळ्याच्याच शेंगा, सागर्या आणि डिंगर्या आहेत. इकडे अश्याच येतात ढब्बुडक्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारतात साधारण लांबड्या आणि बारिक असतात त्या हायब्रीड असतात. माझ्या मामाकडे शेतातल्या मिळाय्च्या
मीपु, मस्त भाजी! मुळ्याच्या
मीपु, मस्त भाजी!
मुळ्याच्या शेंगा बेश्ट. त्या दही-मीठ लावून वाळवून तळायच्या.
या कुंडीतल्या शोभेच्या मिरच्या-
![purp1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u26225/purp1.jpg)
Pages