बागकाम (अमेरिका) सीझन २०१३

Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50

अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.

गेल्यावर्षीचा (२०१२ चा)धागा

अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती

अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती

भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/

तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा

http://sproutrobot.com/

वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुम्पी, ग्रेप टोमॅटो सुरेख आहेत.
लोला, अशा शोभेच्या मिरच्या कधी पाहिल्या नाहीत, रंग छान आहे.
मुळ्याच्या शेंगा/डिंगर्‍या गुबगुबीत आहेत खरं.
मागच्या वर्षी दुधीचा वेल जमीनीवरच प्रचंड फोफावलेला, त्या जंगलात एक दुधी दिसलाच नाही. मग थंडी पडल्यावर पान वाळल्यावर त्यात भलाथोरला जवळपास ३ फुटी महाकाय दुधी सापडलेला Happy

मदत करा मदत करा! नर्सरीतून टोमॅटोचे रोप आणले, त्याला खुप टोमॅटो आलेत पण ते सगळे हिरवेच रहात आहेत. हे लाल टोमॅटोचे झाड आहे का हिरव्या. झाड वाकलय आता इतके टोमॅटो वाढलेत पण लाल होतील या आशेने काढले नाहीयेत. Happy
photo.JPG

मी हिरवे टोमॅटो मिळावेत म्हणून झाड लावते. Happy
झाडाला आधार दे. पिकतील झाडावरच. vine ripe पाहिजे असतील तर. नाहीतर तोडल्यावरही पिकतील.

धन्यवाद लोला!! Happy हिरवे राहिले तरी ठीक आहे पण ते लाल होतील की नाही बघायचे होते. आधार दिला आहे आता मध्ये काठी लावून. काही दिवस ठेवुन बघतो झाडावरच.

नात्या, मी मागल्या वर्षी एका शेतावरून भाजी चा रतीब लावला होता - तिथल्या बाईंनी मला यावरील insider उपाय असा सांगितला तो असा -
जसं ऊन वाढतं, तसं आपण झाडांना पाणी जास्त घालतो - तसं टोमेटो ला नाही करायचं. उलट जुलै - ऑगस्ट मधे टोमेटो चं पाणी जरा कमी करायचं - मग ते टोमेटो पिकायला आणि लाल व्हायला प्रोत्साहन मिळतं म्हणे.

हा उपाय समजल्या नंतर मला टोमेटो लावायला सवड झाली नाहीये अजून - पण उपाय वापरलास आणि यशस्वी झाला तर कळव Happy

मी २ आठवड्यांपूर्वी लावलीत, मोजुन - २ टोमेटो, १ थाई मीरची, २ काकडी, गवती चहा आणी बेझील बस्. एक कोरफड ही लावली आहे कुंडीत पण ती घरात ठेवावी की बाहेर ह्या बद्दल डबल माईड आहे. सध्या बाहेरच आहे.

आत्ताच कापुन आणली आहे Happy
basil.jpg

शुगोल, इथे हवा सध्या खुप गरम आहे पण पाऊसही बराच होतोय.

इन्डिगो, पहिल्यांदाच झाले लावल्याने अतिउत्साहात पाण्याचा बराच मारा चालू आहे. एक - दोन दिवस टोमॅटोला पाणी बंद करुन बघतो. Happy

टिप्ससाठी धन्यवाद!

तुम्ही लोक खत कुठलं घालता ? मी मल्टिपर्पज प्लँट फुड आणलं आहे. खत घातल्यावर अजून वरून पाणी घालता का ? खत पाण्यात मिसळूनच घालते पण खत घातल्यावर जरा वेळाने आणखी कपभर पाणी पण घालते (हे उगीच आपलं).

खतः

अंगणात लावलेल्या फुलझाडांना स्कॉट किंवा मिरॅकल ग्रो कंपनीचे शेक अ‍ॅण्ड फीड टाइप ग्रॅन्यूल्स घालते.
गुलाबांच्या मुळापाशी आळी केली आहेत. त्यात पण हे ग्रॅन्युल्स व शिवाय कॉफी ग्राइंडस अन केळीच्या सालांचे तुकडे घालते.

भाज्या लावल्या आहेत तिथे दोन वर्षातून एकदा कॉम्पोस्ट + टॉप सॉईल असं घालते. पण वेगळं खत असं घालत नाही. यावर्षी टॉमेटोच्या रांगेत अंड्याच्या टरफलांचे तुकडे करून मिसळणे चालू आहे.

बाकी घरात किंवा डेकवर कुंडीत जी झाडं आहेत त्यांना एप्रिलपासून ऑक्टॉबर पर्यंत दरवेळेस पाणी घालताना गॅलनला एक चिमूट मिरॅकल ग्रो मिसळून घालते.

बल्ब्स आहेत त्यांना मार्च मधे अन आठवलं तर ऑक्टोबरमधे थोडं बोन मील.

आमच्या इथली माती फार अ‍ॅसिडिक आहे. अशा मातीत हायड्रेंजियाची फुलं निळी / जांभळी असतात. ती गुलाबी व्हावी म्हणून मार्च , एप्रिल, मे या दिवसात हायड्रेंजियाच्या मुळाशी लाईम शिंपडते.

मेधा, टॉमेटोच्या रांगेत अंड्याच्या टरफलांचे तुकडे करून मिसळणे चालू आहे.<<< हे खत म्हणुन का?? किती बारीक करुन तुकडे मिसळायचेत?

मीपुणेकर, छान भाज्या. माझ्याकडच्या मुळ्याला पण ढ्ब्बू डिंगर्‍या आल्यात.
शुम्पी, मोगर्‍याची फुलं खासच!
मी सीड्स ऑफ इंडीयात ऑर्डर केलेले मोगरा, कढीपत्ता, अबोली आणि तोंडल्याचा वेल या विकेंडला आले. टोमॅटोला फुलं आलेत. पार्सली आणि ग्रीन ओनियन मस्त वाढतायत.

स्वाती२, रोपं साधारण किती वाढलेली आहेत ? कढीपत्ता ऑर्डर करावा असं मला पण वाटतं आहे. अबोलीच्या बिया आल्यात का ?

मेधा, धन्यवाद. मी कुंडीत लावलेल्या झाडांसाठी विचारत होते. मिरॅकल ग्रो मी पण आणलंय. दोन आठवड्यांतूक एकदा घालते.

सिंडी, अबोलीचे रोप आले छोटे- साधारण ३ इंच उंच. तोंडल्याचेही तेवढेच उंच. मोगरा आणि कढीपत्ता साधारण ७-८ इंच उंच आहेत. छान पॅक केले होते सगळे. त्यांनी पाठवले तेव्हा ट्रॅकिंग नं. इमेल केला होता. त्यामुळे पार्सल दिवसभर बाहेर उन्हात राहिले वगैरे प्रकार झाले नाहीत. त्यांच्याकडच्या दुधी, वांगी आणि मिरचीच्या बिया पण चांगल्या निघाल्या. सगळ्या रुजल्या. दुधीच्या उरलेल्या बिया कम्युनिटी गार्डनमधे लावल्या. मी पुढील वर्षी त्यांच्याकडेच ऑर्डर देणार आहे.

आमच्या काकडीचे अजूनही काही खरे दिसत नाही.

नात्या, तोच प्रश्न मी याच धाग्यावर काही पाने अगोदर विचारला होता. त्यावर मला शूम्पीला सगळ्याची घाइच फार असं (योग्यच) उत्तर मिळालं. इंतजार का फल लाल टोमॅटो होता है!
दमानं घ्या. Happy

तो सीमाने दिलेल्या बीयांतून उगवलेला मिस्ट्री वेल चांगलाच वाडह्त आहे भराभर, कसला आहे ते काय कळेना अजून.

काकडीचे खरे कसे दिसेल ? खिरे दिसतील फार्फार तर Proud

इंतजार का फल लाल टोमॅटो होता है! >>> Biggrin

आमच्याकडे इंतजाराला मोगर्‍याच्या कळ्या लागल्यात Proud

माझ्याकडे ४ वर्षे इंतजार केल्यानंतर , झाडाला मोजून ४ अंजीर लागले आहेत. आता ते पिकेपर्यंत आणखी इंतजार आणि खारी व पक्ष्यांच्या तडाख्यातून ते वाचणार का याची चिंता.

शूम्पी, तो वेल स्क्वॅश कॅटेगरीतल्याच कशाचा तरी वाटतोय.

तो वेल स्क्वॅश कॅटेगरीतल्याच कशाचा तरी वाटतोय.>> व्हय व्हय. सीमाने दुधी/कार्ली/दोडका यांच्याबीया दिल्या होत्या. त्यातलाच एक आहे.

आमच्याइथे टेक्सासमध्ये अंजीराची झाडं मस्त वाढतात असं ऐकून आहे पण अंजीर आवडत नाहीत म्हणून लावायच्या फंदात पडले नाही.

आमच्या इथल्या इंतजाराने निशिगंधाचे कंद खाल्ले Sad
हळदीचे पण कंद खाल्लेत एकदा पण सीड्सॉफिंड्या पेक्षा इंग्रो मधे हळद थोडी स्वस्त म्हणून परत इंतजार चालू आहे ...

मी हळद गाडली होती तिचं काहीच झालं नाहीये. लसणीची पात येते आहे. ल्हान्याने सहज टाकलेल्या बटाट्यातून ऑल्रेडी दोन बटाटे काढून खाऊन झाले. Happy

एका मैत्रीणीने कडीपत्याचे अगदी पिल्लु रोप दिले एका छोट्या कुंडीत. त्या कुंडीत अजुन ४-५ बिया पण होत्या कडीपत्याच्या. आता त्या सगळ्या बिया रुजलेल्या दिसताय. एवढ्याश्या जागेत आता एकूण ५ रोपे झाली आहेत. इतक्या लहान रोपांना वेगळे करायला अजुन रोपे मोठी होण्याची वाट बघावी का नाहीतर दोन रोपे ठेवुन बाकिची काढून टाकू का म्हणजे नीट वाढ होईल. फार वाट बघुन मिळालाय हा कडीपत्ता..

बियांची रोपं असतील तर आत्ताच काढून वेगवेगळे लावा. पाण्याचा निचरा होणारी कुंडी, चांगली माती असेल याची काळजी घ्या :).

माझ्याकडे ४ वर्षे इंतजार केल्यानंतर , झाडाला मोजून ४ अंजीर लागले आहेत. आता ते पिकेपर्यंत आणखी इंतजार आणि खारी व पक्ष्यांच्या तडाख्यातून ते वाचणार का याची चिंता.>>>> Happy

गेल्या वर्षी माझी ही परिस्थिती, या वर्षी मी १३-१३-१३ हे खत टाकलेतर बरीच अंजीर लागलीत.

Pages