बागकाम (अमेरिका) सीझन २०१३

Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50

अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.

गेल्यावर्षीचा (२०१२ चा)धागा

अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती

अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती

भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/

तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा

http://sproutrobot.com/

वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे खत कधी टाकायचं? आमच्याकडे सद्ध्या ११०डि. फॅ. तपमान आहे व ते अजून दोन महिने असंच राहिल. ह्या तापमानात खत व. सहन होईल का झाडाला?

हे खत कधी टाकायचं? आमच्याकडे सद्ध्या ११०डि. फॅ. तपमान आहे व ते अजून दोन महिने असंच राहिल >>> Ditto @ तपमान. १३-१३-१३ हे खत मी आधून मधून १-२ चमचे टाकते. बर्‍यापेकी mild आहे. झाडाला काही इजा होत नाही. मी ऐकल होत march-oct figs ना रोज पाणि घालायचे. पावसाने तर खूपच फरक पडतो.

नात्या,
<<
मदत करा मदत करा! नर्सरीतून टोमॅटोचे रोप आणले, त्याला खुप टोमॅटो आलेत पण ते सगळे हिरवेच रहात आहेत. हे लाल टोमॅटोचे झाड आहे का हिरव्या. झाड वाकलय आता इतके टोमॅटो वाढलेत पण लाल होतील या आशेने काढले नाहीयेत.
>>
वुई आर इन द सेम बोट!
...वेटिंग! Happy

मी कॅलिफोर्नियात आहे. मला इथे एप्रिकॉट किंवा अंजिराचं झाड लावायचंय किंवा कुठलंही फळाचं पण त्याची उंची ६-९ फुटपेक्षा जास्त नसावी आणि घेर पण खुप नसावा असं कुठलं झाड लावता येईल?

अरे वा श्वेता, मस्त दिसताहेत झाडं. मला आता महीना झाला टोमेटो आणी काकडी लाउन, पण आत्ता पर्यन्त २/३ टोमेटो आले आहेत फक्त आणी ७/८ फुलं. काकडीची मोठीमोठी पानं आहेत. झाडं छान हिरवीगार दिसताहेत आणी मोठीही झाली आहेत. पण सीझन मिस्स केला का मी?

मनी ,

अप्रीकॉत, पीच, प्लम, नेक्तारीन, फिग, डाळिंब, संत्री, सफरचंद ही झाड़े नरसरी मधे मिळतील़. Dwarf जातीची झाड़े लावावीत़. वाढ ६-९ फुटा परयंत मर्यादित रहाते.

आंबा, पेरू हि लावता येतील परंतु हिवाळ्याच्या फ़्रोस्ट मध्ये दगावण्याची शक्यता जास्त असते.

माझ्याकडे पीच, फिग, डाळिंब, लिंबू हि झाडे उन्हाळ्यात अगदी लद्लदतात. आंबा आणि पेरू मात्र हिवाळ्यात जाता जाता राहतात त्यामुळे खूप काही वाढ होत नाही. असो, शुभेछा!

- एक कलिफ़ोर्निअन

स्वाती, संत्रं किंवा लिंबू तर लावणारच आहे पण अजुन एखादं फळाचं झाड असावं म्हणून म्हटलं Happy
अमि, तुझे खुप खुप धन्यवाद. मी एप्रीकॉट आणेन. तुझ्याकडे ते चांगले होतात. नॉर्थ कॅलिफोर्नियात म्हणे चांगले होत नाहीत. आणून तर बघ्ते ड्वार्फ जातिचं मिळालं तर बरंच होइल. पण झाडं जातात तेव्हा मला फार फार दु:ख होतं Sad

नात्या वा वा! पेशन्सच्या पोटी फळे लाल गोमटी.
काकडीची फुलं मस्त.

या मिरच्या झाडावर रंग बदलत आहेत.
mirch.jpg

साध्या मिरच्या
mirch2.jpg

लपलेली झुकिनी फारच मोठी झाली.
zuc.jpg

केलेली रोपं मोठी व्हायला लागली म्हणून तात्पुरती एका कुंडीत एकत्र लावली तिथंच आता गर्दी झाली आहे. बेसिल, लाईम बेसिल आणि कारल्याचा वेल Proud त्याला बाहेर काढू काय..
mirch3.jpg

लोला, दोन्ही बेसिल एकत्र राहिले तरी चालेल पण कारल्याच्या वेलाला नक्की बाहेर काढ.
भाज्या सगळ्या मस्तच आल्या आहेत.

हा प्रश्न इथे बाद असेल बहुधा पण कुठे विचारावं कळलं नाही म्हणून इथेच टाकतेय.

माझ्या घराच्या भिंतींना लागूनच खुप झुडपं आहेत त्यामुळे की काय पण घरात खुप काळ्या मुंग्या येतात. अगदी केळ्यालाही लागतात. त्यावर जालिम उपाय काय असावा??
पर्समधल्या चीजच्या आवरणालाही लागल्या आणि ही अश्शी लांब रांग लागलेली अगदी वरच्या मजल्यापर्यंत...
या मुंग्या ४०९ मारलं की मरतात पण ठोस उपाय आहे कां काही? कुणी पेस्ट कंट्रोल केलंय आणि त्याने हा प्रॉब्लेम गेलाय कां?

मनी, तुम्ही बे एरियात असताना? मी पुर्वी वर्षांपुर्वी फर्स्ट फ्लोअर च्या अपार्ट्मेन्ट मध्ये होते आणि उन्हाळ्यात हमखास मुंग्या यायच्या .. तर कदाचित हा फक्त उन्हाळ्यापुरताच प्रॉब्लेम असू शकेल ..

हो सशल, मी बे एरियातच आहे.
पुर्वी माझ्या प्रेसिडीओ नावाच्या अपार्ट्मेंटमध्ये फार यायच्या पण त्या एवढ्या नसायच्या.
या जरा जास्तच आहेत आणि त्या अगदी घरातच असाव्यात असं वाटतंय पण वाट बघते समर संपायची. Sad

आम्ही अजिबात भाज्याप्रेमी नाही. त्यांची काळजी घेणं (आणि मग त्या भाज्या खाणे) जमत नाही बहुतेक. Wink
पण मागच्या आठवड्यात फुलझाडे लावली. ही विटांची भिंत बांधून फुलांचा वाफा लावला.

सगळं बांधकाम, डिझाईन नवर्‍याने केलंय. मी दगडं उचलायला मदत केली. मुलीने फुलं निवडायला आणि रोपं लावायला मदत केली. Happy
हे आमचं अंगण.

हा वेल मागल्या वर्षी लावला होता आता छान फुललाय. मोगरा नाहीये पण कोणत्यातरी जास्मिन प्रकारचाच आहे.

हा क्लोज अप.

यातली कर्दळ पुढच्या वर्षीपर्यन्त मस्त फोफावेल. बाकीची फुले अशीच रंग बघून, साधारण उंची वगैरेचा अंदाज घेऊन निवडली आहेत.

वा, मस्त दिसते आहे बाग!
तो पोएट्स जॅस्मिन दिसतो आहे. म्हणजे आपल्या जाईसारखा प्रकार.

हो जाईसारखी छोटी फुले आहेत आणि अगदी मंद वास आहे. दोन नं च्या फोटोत अगदी डाव्या बाजूला सफरचंदाचे झाड आहे. मागच्या वर्षी सगळी मिळून २०-२५ फळे आली. एक एक सफरचंद चांगलं अर्ध्या-पाऊण पाउण्डचं होतं. आणि १००% ऑरर्गॅनिक. यावर्षी अजून फुलं पण नाही आली. कदाचित ऑगस्ट मधे येतील.
त्याच्या शेजारी अजून एक जास्मिन प्रकार आहे. वेल अजुन लहान आहे पण रातराणीसारखा घमघमता वास आहे त्याला. फुलला की फोटो टाकेन इथे.

काय सुरेख बाग आणि अंगण आहे. ते फ्लावरबेड्स बनवणं फारच अंगमेहनतीचं काम आहे.
कर्दळ खूप वाढेल आणी एकाची अनेक झाडं होतील काही वर्षात.

ते फ्लावरबेड्स बनवणं फारच अंगमेहनतीचं काम आहे.>>>

हो खरंय शूम्पी. त्या विटा होम डिपोतल्या माणसाने गाडीत भरल्या पण गाडीतून अंगणात आणणे या मधे हजारो पाउण्ड्स उचलले आहेत. एका दिवसात. महिन्याभराचा व्यायाम झाला. Wink व्यायामाच्या बीबी वर लिहलं पाहिजे.

कर्दळ खूप वाढेल आणी एकाची अनेक झाडं होतील काही वर्षात.>> याचा विचार चालू आहे. कदाचित ही जागा चुकली. नाहीतर जरा मोकळ्या जागी पुन्हा काढून लावावी.

प्रतिसादाबद्दल अनेक आभार. Happy

Pages