Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50
अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती
अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती
भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/
तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा
वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोडके कोल्हापुरच्या बीयांचे
दोडके कोल्हापुरच्या बीयांचे आहेत. कडु लागणार नाहीत. हा.
आणि एकदा हे दोडके लागायला लागले कि १५० पर्यंत सुद्धा लागतात. माझ्याकडे लागलेत तेवढे एका वर्षी. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~D
शुम्पी, कित्ती तक्रारी करतेस गं. इतके दिवस भाज्या लागत नव्हत्या म्हणुन कुर्कुर. आत्ता लागल्यात तरी कुरकुर. गप्प खा.
सॉरी सीमा. तक्रार करायचा हेतू
सॉरी सीमा. तक्रार करायचा हेतू नव्हता पण मी तसं करतेय असं वाटतय हे खरं.
मी चटणी, भाजी आणि भरीत करणार. आधिक माहितीसाठी माझी विपू बघा.
आणि मला ते आवडणार!
शुम्पी, काय मस्त दिसतायत
शुम्पी, काय मस्त दिसतायत दोडकी!
मस्त दोड्की. मी लावणार
मस्त दोड्की. मी लावणार पुढच्यावर्षी. दोड्की आणि कारली
कुंडीतल्या वेलाची कारली मोठी
कुंडीतल्या वेलाची कारली मोठी झाली. आज काढली.
![kundi.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u26225/kundi.jpg)
पिके-
पहिला लाल टोमॅटो
पहिला लाल टोमॅटो
मला कुणीतरी या सफेद
मला कुणीतरी या सफेद कारल्याच्या बिया द्या गं नक्की किंवा कुठून ऑर्डर केल्या ते सांगा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या बागेतली(!?) फुलं!
माझ्या बागेतली(!?) फुलं! यांचे फोटो टाकताना मला 'तीन केस उरलेत? तीन पेडांची वेणी. दोन उरलेत? दुपेडी. एकच? मग मोकळे सोडा' जोक आठवतोय. का ते माहिती नाही.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गंधधुंद...
मी बाई अबोली...
लाडिक कॅप्शन्सचा पेशन्स संपला.
अगम्य फुलांचं झाड..
मस्त मोगरा. ड्राइव्ह वे मधले
मस्त मोगरा. ड्राइव्ह वे मधले ते गुलबट दगड फार आवडले
फुले नाही वेचलीस तरी कळियांसी
फुले नाही वेचलीस तरी कळियांसी बहरू आलाय ही एकदम नाइन्साफी हय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आदित्यने दिलेल्या मोगर्याला ऑगस्टात असाच बहर होता. आता डॉर्मण्ट झालाय तो . ( मोगरा )
तुळशीच्या बिया इतस्ततः पडून २५-३० तरी पिल्लू रोपं उगवलीत मोगरा, रातराणी अन अळुच्या कुंड्यांमधून
छान .. मृ, तुझी अबोली अंधारात
छान ..
मृ, तुझी अबोली अंधारात फुलते का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहेत फुलझाडं! आमचाही
मस्त आहेत फुलझाडं!
आमचाही मदनबाण डॉर्मन्ट झाला.
मला अबोलीच्या बिया हव्या आहेत मृण. पुढच्या स्प्रिंगमधे चालतील.
शूम्पे, हवेत का? बरेच पेवर्स
शूम्पे, हवेत का? बरेच पेवर्स पडलेत.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सशल, अबोलीचा फोटो पहाटे सहाला काढलाय. तेव्हा अंधारात(पण) फुलत असावी.
अबोलीच्या बियांचे गुच्छ कापून ठेवलेत. हवे असल्यास कळवा.
सॉरी, स्वातीचं पोस्ट आत्ता
सॉरी, स्वातीचं पोस्ट आत्ता बघितलं. नक्की पाठवते.
अबोलीचा फोटो पहाटे सहाला
अबोलीचा फोटो पहाटे सहाला काढलाय>> आता म्हणू का मी सकाळी सहाला नीट डोळे उघडवत नाहीत तर फुलांचा फोटो काढणे किंवा भ. मे. कसकाय करता बुवा लोक?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मसाले पाठवणं एकवेळ ठीके पण पेव्हर्स नको.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मृ मलापण. लालूने डीसी गटागला
मृ मलापण.
लालूने डीसी गटागला रातराणीच्या झाडाची छोटीशी फांदी दिली होती. ती चक्क लागली आणि तिला तुरा पण आलाय.
केवढ्या कळ्या आल्यात
केवढ्या कळ्या आल्यात मोगर्याला खरंच!
मी उगाचच पुन्हापुन्हा बघते आहे फोटो!
रूनी, तुलापण. शूम्पे, माझे
रूनी, तुलापण.
शूम्पे, माझे डोळे ठक्कं उघडे होते. नैसर्गिक प्रकाश नव्हता!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण तू अबोलीचाच फोटो इतक्या
पण तू अबोलीचाच फोटो इतक्या पहाटे का काढलास?
(ह्या सर्व फुलझाडांसाठी मातीत हात घालावे लागतात का? खूप रिसर्च करावा लागतो का चांगलं पालन पोषण करण्यासाठी? कुंडीत स्नेल्स् , स्लग्ज् असले ही कुणी कुणी वस्तीला राहतात का?)
यू आर मिसिंग द पॉइंट
यू आर मिसिंग द पॉइंट मृ.
तुझ्या सकाळच्या पोस्टीवरुन म्हटलं मी ते. तुला टक्क डोळे उघडे ठेउअन ६ ला फोटो काढवतो तसा भ. मे ही काहीजणींना जमत असणारच की अशा अर्थाने होतं गं ते.
मोगरा खरच जबरी फुअलला आहे.
अबोली पाहून आठवलं की आईला दोनपैकी एकीचं नाव तरी अबोली ठेवायचं होतं. वाचवलं बाबांनी व्हिटो वापरुन!
>>पण तू अबोलीचाच फोटो इतक्या
>>पण तू अबोलीचाच फोटो इतक्या पहाटे का काढलास?
बाकीचेही काढले असते. पण तोवर पॅसेंजरांनी घाई केली.
अय्या शूम्पे, एक क्लिक vs भ. मे?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मृणकडची झाडं एकदम हेल्दी
मृणकडची झाडं एकदम हेल्दी दिसतात.
आमच्या कडिपत्त्याने मान टाकली शेवटी![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
>> ह्या सर्व फुलझाडांसाठी
>> ह्या सर्व फुलझाडांसाठी मातीत हात घालावे लागतात का? खूप रिसर्च करावा लागतो का चांगलं पालन पोषण करण्यासाठी? कुंडीत स्नेल्स् , स्लग्ज् असले ही कुणी कुणी वस्तीला राहतात का?
हो.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सिंडे, आमच्याकडचं एखादं बाळ इन्डिपेन्डन्ट होतं का बघते.
पिवळ्या फुलांचं झाड कसलं आहे
पिवळ्या फुलांचं झाड कसलं आहे माहिती आहे का? ब्लँकेटं पांघरली तरी हिवाळ्यात पूर्णं करपतं. साधारण फेब्रूवारीपासून खोडातून फांद्या फुटतात आणि एप्रिल-मेपर्यंत ८-१० फूट उंच होऊन फुलं लागतात.
कॅरोलायना जॅस्मिन तर नव्हे?
कॅरोलायना जॅस्मिन तर नव्हे?
बाई, थँक्यु थँक्यु
बाई, थँक्यु थँक्यु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>> ह्या सर्व फुलझाडांसाठी
>>>> ह्या सर्व फुलझाडांसाठी मातीत हात घालावे लागतात का? खूप रिसर्च करावा लागतो का चांगलं पालन पोषण करण्यासाठी? कुंडीत स्नेल्स् , स्लग्ज् असले ही कुणी कुणी वस्तीला राहतात का?
इतकी मेहेनत असती तर मी ही २-४ रोपंपण लावली नस्ती.
नाही.
इकडे स्नेल्स, स्लग्ज नाहीत. पण खूप सरडे आहेत. (निळावंतीवर बसलाय त्या प्रकारचे.) झाडांमधे रोज हात घालून बसत नाही. त्यामुळे त्यांना बसू देतो.
शूम्पे, कॅरोलायना जॅस्मिन
शूम्पे, कॅरोलायना जॅस्मिन नाही. कारण हा वेल नाही, झाड आहे. आणि अजीबात सुगंध नाही.
अबोलीच्या बिया मलापण हव्यात.
अबोलीच्या बिया मलापण हव्यात.
झाडांमधे काहीही वस्तीला येत असलं तरी ग्लव्ह्ज घालून मॅनिक्यूअर अजिबात बिघडू न देता बागकाम करता येतं सशल
कढीपत्ता पुढच्या स्प्रिंगपर्यत आमच्याकडेही मिळू शकेल कदाचित. बरीच छोटी पिल्लं आहेत सध्यातरी.
माझ्याकडे पर्पल आणि पांढरे
माझ्याकडे पर्पल आणि पांढरे आयरिस चे खुप खुप कंद आहेत. कुणाला हवे आहेत कां?
Pages