भटक्यांचा सह्य मेळावा...

Submitted by सेनापती... on 28 June, 2013 - 05:23
ठिकाण/पत्ता: 
केळद, मढे घाट.

सह्य मेळावा संपन्न झालेला आहे.
*******************************************

नमस्कार मंडळी,

मुंबई, नाशिक आणि पुणेकर भटक्यांचा सह्य मेळावा शनिवार १३-जुलै-२०१३ रोजी मढे घाटात आयोजीत करण्यात आलेला आहे. सगळ्या भटक्यांनी शनिवारी रात्री नसरापूर - वेल्हे मार्गे केळदला जमायचे आहे. रात्रीचा मुक्काम केळदच्या शाळेत करायचा आहे.

दुसर्‍या दिवशी रविवारी १४-जुलै-२०१३ला केळद - मढे घाट - कर्णवाडी मार्गे शिवथर घळ गाठायची. दुपारचे जेवण करुन मुंबईकर महाड मार्गे परतणार आहेत. तर नाशिक आणि पुणेकर वरंधा मार्गे परतणार आहेत.

भटकंती कट्ट्यावरील १३ मावळ्यांनी या ट्रेकसाठी नावनोंदणी केलेली आहे. या सह्य मेळाव्याच्या निमित्ताने मायबोली वरिल सर्व भटक्यांचा एकत्रीत ट्रेक करण्याचा मानस आहे. तरी ज्या भटक्यांना या ट्रेकला येण्याची इच्छा आहे त्यांनी इथे प्रतिसाद मधे तसे नमूद करावे. जेणे करुन आयोजक तुम्हाला संपर्क करुन सविस्तर माहिती देऊ शकतील.

धन्यवाद...

तारीख/वेळ: 
शुक्रवार, July 12, 2013 - 15:01 to रविवार, July 14, 2013 - 14:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेम, तु आला नाहीस तर मी नाशिकला येउन धडकेन. मग मला किमान ४ ठिकाणी नेउन आणावे लागेल तुला. अंजनेरी, ब्रह्मगिरी, अंकाई-टंकाई आणि जवळचा गोरखगड.

अजून ३ जण कोण आहेत? >> सेनापती, आनंदयात्री, गिरीविहार, सुन्या आंबोलकर (महाराष्ट्रात असेल तर), सह्याद्रीमित्र (ओंकार ओक)

माबोकर मी येत आहे...

तुमच्या सारख्या दर्दी भटक्याकडे बघुन, तुमचे लेख वाचुन तर मी ट्रेकिंग सुरु केले.

आता साक्षात तुम्हाला भेटण्याची संधी मी कसा दवडेन.

पवन.. तू यायलाच हवे.. Happy
ए जिप्स्या.. मायबोलीकर मित्र आहेत असे म्हण नाहीतर प्रत्येकजण आपापले मित्र घेउन येतील... Wink त्या संदेश नि जीवेश ला नाव नोंदवायला सांग.. तीन तीन फोटुग्राफर म्हणजे कॅम हँड फ्री राहून उडया मारायला मोकळा !! Proud

मी पन येनार आहे. मला पन लिस्ट मधे अ‍ॅड करा. happy.gif

आणि ह्या योग्या वर भरोसा ठेउ नका. हा मानुस ऐन टायमाला धोका देतोDolo.gif

ह्या रविवारी मला म्हणाला पनवेल ये आपण मानिकगड ला जाउ.. मी पुण्याहुन पनवेल ला गेलो आणि फोन केला तर म्हन्तो कॅन्सल झाले.... angry.gifuhoh.gifsad.gif

कुठला योगेश...यो रॉक्स का जिप्स्या
जिप्स्या असेल तर सोडून दे बिचार्याला...आजकाल त्याला काही लक्षात राहत नाही... Happy

जिप्स्या नाही रे तो बिचारा वेगळ्याच धुंदित आहे.. अरे तो यो रोक्स.. जो तलवारिने मुंडक वैगेरे उड्वायच्या बाता करतोय..

थांब त्याची जिरवूया चांगली....उड्या मारायला सांगायचे आणि फोटोच काढायचा नाही....
हाकानाका Happy

काल पासुन पावसाने संततधार धरली आहे. अगदी परफेक्ट माहोल जमून आलाय... त्या क्षणासाठी मन आतुर झालयं...

Madhe Ghat.JPG

कोण कोण काय काय खादाडी आणणार आहेत?

Pages