भटक्यांचा सह्य मेळावा...

Submitted by सेनापती... on 28 June, 2013 - 05:23
ठिकाण/पत्ता: 
केळद, मढे घाट.

सह्य मेळावा संपन्न झालेला आहे.
*******************************************

नमस्कार मंडळी,

मुंबई, नाशिक आणि पुणेकर भटक्यांचा सह्य मेळावा शनिवार १३-जुलै-२०१३ रोजी मढे घाटात आयोजीत करण्यात आलेला आहे. सगळ्या भटक्यांनी शनिवारी रात्री नसरापूर - वेल्हे मार्गे केळदला जमायचे आहे. रात्रीचा मुक्काम केळदच्या शाळेत करायचा आहे.

दुसर्‍या दिवशी रविवारी १४-जुलै-२०१३ला केळद - मढे घाट - कर्णवाडी मार्गे शिवथर घळ गाठायची. दुपारचे जेवण करुन मुंबईकर महाड मार्गे परतणार आहेत. तर नाशिक आणि पुणेकर वरंधा मार्गे परतणार आहेत.

भटकंती कट्ट्यावरील १३ मावळ्यांनी या ट्रेकसाठी नावनोंदणी केलेली आहे. या सह्य मेळाव्याच्या निमित्ताने मायबोली वरिल सर्व भटक्यांचा एकत्रीत ट्रेक करण्याचा मानस आहे. तरी ज्या भटक्यांना या ट्रेकला येण्याची इच्छा आहे त्यांनी इथे प्रतिसाद मधे तसे नमूद करावे. जेणे करुन आयोजक तुम्हाला संपर्क करुन सविस्तर माहिती देऊ शकतील.

धन्यवाद...

तारीख/वेळ: 
शुक्रवार, July 12, 2013 - 15:01 to रविवार, July 14, 2013 - 14:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ते तर आहेच. Happy बर तुमच्याबरोबर एक-एक ट्रेक करुनच मगच मुंडके उडवायचे असे नक्की केले आहे. Happy

चाफ्या, त्याबद्दल खरच सॉरी. Sad भेट राहून गेली.

ट्रेक भन्नाट झालाय. फुल ऑन धमाल. खास करून गोप्या घाट चढताना आणि नदी पार करताना. Proud

मी मिसलं...

उत्तम लिहिणारे, उत्तम फोटो काढणारे असे सगळे अट्टल भटके या ट्रेकमध्ये एकत्र होते... त्यामुळे तितक्याच
दणदणीत वृत्तांताची वाट पाहतोय... Happy

भटकंतीच्या शुभारंभाला पावसाची रिमझीम
गोप्याच्या जंगलातील वाटेची कोंडी
वेळवण नदीच फुगलेल पात्र
नदी पार लावणारे गावकरी
केळद पर्यंतची अंधारातील वाटचाल
शाळेतील जल्लोष
सकाळची खादाडी
मढे घाटातील चुकामुक
सह्य रांगेवरील धबधब्यांची जत्रा
कर्णवाडीतील निरोपाच्या गळाभेटी
रानवाडी फाट्यावरील भर रस्त्यातील आंघोळ

सह्य मेळाव्यातील सहभागी सगळ्या मावळ्यांची गात्र थकली असतील खरी.. पण मन... छेऽ ते तर तुडुंब भरुन वाहतयं... अविस्मरणीय आठवणींच्या प्रवाहात. Happy

उत्तम लिहिणारे, उत्तम फोटो काढणारे असे सगळे अट्टल भटके या ट्रेकमध्ये एकत्र होते... त्यामुळे तितक्याच
दणदणीत वृत्तांताची वाट पाहतोय.>>> +१

हा टीजर फोटो सहीच आहे... Happy

सह्य मेळाव्यातील सहभागी सगळ्या मावळ्यांची गात्र थकली असतील खरी.. पण मन... छेऽ ते तर तुडुंब भरुन वाहतयं... अविस्मरणीय आठवणींच्या प्रवाहात. >>> इंद्रा +१ Happy

या वेळी स्नेह मेळाव्याला एक छोटा भटक्या(दर्शन वय वर्ष 5) आला होता.(सर्वात कमी वयाचा तो एकमेव ट्रेकर असेल ज्याने मढे घाट आणि उपांड्या घाट ट्रेक पूर्ण केला). आशु असेच मुलाला तयार कर रे...

सह्य मेळाव्यातील सहभागी सगळ्या मावळ्यांची गात्र थकली असतील खरी.. पण मन... छेऽ ते तर तुडुंब भरुन वाहतयं... अविस्मरणीय आठवणींच्या प्रवाहात. >>>>+१
इंद्रा ट्रेलरच इतका जबराट पिक्चर ची ओढ लागली रे ...फोटो सहित वृतांत लवकर येऊ दे

सेनापती
नदी $$$$... ओलांडु $$$$$.... नका $$$$$.....!!! अजुनहि हसु येत आहे...

भटकंतीच्या शुभारंभाला पावसाची रिमझीम
गोप्याच्या जंगलातील वाटेची कोंडी
वेळवण नदीच फुगलेल पात्र
नदी पार लावणारे गावकरी
केळद पर्यंतची अंधारातील वाटचाल
शाळेतील जल्लोष
सकाळची खादाडी
मढे घाटातील चुकामुक
सह्य रांगेवरील धबधब्यांची जत्रा
कर्णवाडीतील निरोपाच्या गळाभेटी
रानवाडी फाट्यावरील भर रस्त्यातील आंघोळ >> खरच अविस्मरणीय आठवण !!

फोटो सहीत सचित्र वृत्तांत कोण लिहिणार आहे? त्याला अशी ताकीद आहे की लवकरात लवकर वृत्तांत लिहुन पूर्ण करावा.. नाहीतर पुढच्या ट्रेकची वेळ आली तरी वृत्तांत अजुन येतोच आहे असं व्हायचं..

सह्य मेळाव्यातील सहभागी सगळ्या मावळ्यांची गात्र थकली असतील खरी.. पण मन... छेऽ ते तर तुडुंब भरुन वाहतयं... अविस्मरणीय आठवणींच्या प्रवाहात.>>>>>> + १००...खरच जबरदस्त...

दर्शनचा उत्साह खरंच सॉलीड होता...जाम दमला होता..घरी गेल्या गेल्या काही न खाता पिता जे झोपला ते डायरेक्ट रात्री दहा वाजता..थोडे बिस्कीट, दुध पिऊन पुन्हा ढाराढूर....
पण कोकण्याचा सल्ला ऐकून त्याला एक अर्धा चमचा कॉम्बिफ्लाम सिरप पाजले आणि त्यामुळे आज सकाळी गडी एकदम चार्ज....मला वाटले होते शाळेला दांडी मारेल...पण नाही...त्याला कधी एकदा त्याच्या फ्रेंडसना त्याची कामगिरी सांगतो असे झाले होते.
सगळा वृत्तांत त्याने त्याने परीने सांगितला आणि आता माझ्या मागे लागलाय पुन्हा कधी जायचे ट्रेकला....
आणि त्याला सगळे काका पण बरोबर हवेत....आणि त्याने काही काकांना भन्नाट नावे दिलीयेत...
लेझी काका, चिंचवाले काका, उंच काका आणि सगळ्यात भारी म्हणजे झ्यूस काका...(हे गिरीविहारसाठी...रियल स्टील त्याचा आवडता पिक्चर आहे आणि त्यात झ्यूस एक धिप्पाड रोबोट असतो..मला त्याने तिथेच हा काका झ्यूस सारखा दिसतोय असे सांगितले होते.) यायला पाहिजेत. Happy

सह्य मेळाव्यातील सहभागी सगळ्या मावळ्यांची गात्र थकली असतील खरी.. पण मन... छेऽ ते तर तुडुंब भरुन वाहतयं... अविस्मरणीय आठवणींच्या प्रवाहात. Happy >> +१०००००

मुंबईकर ट्रेकर्स उशिरापर्यंत केळदमध्ये पोहोचेनात, तसा टेन्शनचाच मामला होता.. पण आता वेळवण नदीचं प्रचि बघता, सॉलिड डेअरिंग केलंत, असं म्हणावं लागेल...

...छोट्या दर्शनची एनर्जी, विनय-सेनापती-गिरी यांच्या कोट्या, मनोजचा सगळ्यांना गरमागरम खाऊ घालायचा उत्साह, ओंकारचा माबोवरच्या सगळ्यांच्या भटकंती किस्यांचा (किस्से चं अनेकवचन) व्यासंग, कोकण्याचे पुराण, माबो ट्रेकर्सचे आधारस्तंभ श्री श्री यो अन् श्री श्री जिप्सी यांच्याशी हस्तांदोलनाची संधी मिळणं, क्रेझी गप्पा (गो***-नदी, लावणी, काष्ठशिल्प, वगैरे वगैरे), खादाडी, शाळेतला पंचतारांकित 'मोकळा-ढाकळा' मुक्काम, घोरण्याची जुगलबंदी, ताडताड पाऊस.. मायबोलीच्या भन्नाट ट्रेकर्सना (अगदी थोडा वेळ का होईना) भेटून लय लय लय भार्री वाटलं.. Happy Happy

गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनी चालली बळें।
धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे।

समर्थांच्या वरील ओळींचा पुरेपुर अर्थ काल मढेघाट ते शिवथरघळ ट्रेकमध्ये अनुभवला. संपूर्ण घाट उतरताना सोबत लाभली ती खळाळणार्‍या झर्‍यांची आणि धडकी भरवणार्‍या धबधब्यांची. बेफान वाहत खोल दरीत स्वतःला झोकुन देणार्‍या त्या धबधब्याचे वरून रौद्रभीषण दर्शन तर खालुन अस्खलित सौंदर्य मनाला मोहवत होते. सोबत मित्रांची आणि साथ मुसळधार पावसाची. बोल्ले तो एका अनवट जागेच्या भटकंतीमुळे आयुष्यातील अजुन एक विकएण्ड सुखद झाला. Happy

रानवाडी फाट्यावरील भर रस्त्यातील आंघोळ >>>> तुमच्या सर्वांसाठी गाड्यांची ने आण करण्याच्या भानगडीत हे मात्र माझं राहीलच..... Happy

नदी पाsssssssर करु नका होsssssss!!!! >>> Happy Happy .. नुसती पार करु नका असा सल्लावजा धमकी नाहीतर "आंब्याच्या" झाडाच्या वयल्या अंगाने इरा ओलांडून माळरानाच्या वयल्या अंगाने शिवत्याच्या बाजूच्या वानेराकडच्या साकवावरून नाहीतर निगडिच्या बंधार्‍यावरून जावा... हेपण तुम्हाला नाही जमले तर नदीच्या बाजू बाजूने सरळ केळद पर्यंत जावा आणी मग पुलावरून नदी ओलांडा आणी हेपण तुम्हाला जमत नसेल तर (अतीशय दयाबुद्धीचे भाव चेहर्‍यावर आणून) हिथच र्‍हावा... Sad Sad

हर हर हर... गोप्या गावातल्या त्या आजींनी केळदला जायला "GPS" ला लाजवील असा तो रुट सांगीतल्यावर आमचे अवसान गळाले नसते तर नवलच पण मायबोलीकर अस्सल भटके हार जातील काय? अनेक ठीकाणहून नदी ओलांडायच्या कल्पना आणी स्वप्न रंगवल्यावर शेवटी अंधार होत चाललेला पाहून आणी नदीच्या पलीकडे पुणेकर मायबोलीकर आणी अलिकडे मुंबईकर मायबोलीकर असला असला भन्नाट सह्यमेळावा व्हायची शक्यता निर्माण झाल्यावर शेवटी नदी ओलांडलीच... Happy

सगळ्यात भारी म्हणजे झ्यूस काका...>>> हे मात्र झकास नाव गिरीला दिलयं दर्शनने... Happy आणी हो दर्शनच्या उत्साहाला आणी स्टॅमीनाला सलाम...

सह्य मेळाव्यातील सहभागी सगळ्या मावळ्यांची गात्र थकली असतील खरी.. पण मन... छेऽ ते तर तुडुंब भरुन वाहतयं... अविस्मरणीय आठवणींच्या प्रवाहात. स्मित >> + १००००००

एक पिल्यान ठरतो काय आणि वीस भटके एकत्र भेटतात काय…. अविस्मरणीय वीकेंड… शाळेतला मुक्काम तर अफलातूनच… काय सुखाची झोप लागली राव !!!!
दर्शनने गटग ख-या अर्थाने गाजवलं… विन्याचं "तुझं ते काष्टशिल्प झालं का रे ?? " आणि दर्शनचं "तुम्ही माझं लाईफ डिस्कस करू नका" "तुम्ही आधी एक काय ते ठरवा आणि नंतर मला सांगा" आणि मढे उतरताना आम्ही चुकल्यावर आशु फोटो काढत असताना "मी रात्री झोपलेलो ते तुम्हाला कळत नाही का…. तुमच्या हसण्याने माझे कान फाटले होते !!!" हे डायलॉग जब्ब्बरदस्तच !!!!!
आणि मुंबईकरांनो पुढच्या वेळी एवढं खायला आणत असाल तर आधीच सांगा रे… जेवण बनवणा-याचे कष्ट तरी वाचले असते !!!
आणि हो योचा अप्सरा डान्स राहिला राव… जाऊदे नेक्स्ट टाइम !!!!

Pages