Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07
महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिप्तिची ती भाईगिरी खुप
दिप्तिची ती भाईगिरी खुप खटकतेय, समहाऊ तिच्या लुक ला ते शोभत नाहिये, त्यामूळे विनोद करायचा प्रयत्न हास्यास्पद ठरतोय,
आता सेपेरेशन पर्यत मालिका अपेक्षित वळण घेणार, खरतर इतके अनुभवी कलाकार आणी काही उत्तम नवोदित मिळौन चान्गली नविन चान्गली मालिका बनवता आली असती..
त्या सुहास जोशीची डाटर इन लॉ
त्या सुहास जोशीची डाटर इन लॉ अशी डोक्यावर परीणाम झाल्यासारखी का वागते? एकदम मवाल्यासारखी?
आजच्या पिढीतली मुलगी म्हणजे ती सरसकट अशी मवालीच असणार का?
एभाप्रः वं वर्ड म्हणजे काय?
वंदना गुप्ते.
वंदना गुप्ते.
बस्के
बस्के
त्या सुहास जोशीची डाटर इन लॉ
त्या सुहास जोशीची डाटर इन लॉ अशी डोक्यावर परीणाम झाल्यासारखी का वागते? एकदम मवाल्यासारखी?
आजच्या पिढीतली मुलगी म्हणजे ती सरसकट अशी मवालीच असणार का?
<<< पण ती भाईगीरी का करते आहे? त्यांच अभीजीतला वेड लागल्याच नाटक संपल ना? की अजुन काही कारण होत?
अधुन मधुन पाहतो... पण
अधुन मधुन पाहतो... पण मांजरेकरांनी मेहनत घेतलेली दिसत नाही. कोणालातरि प्रमोट करायला (दिग्दर्शन/ निर्मिती) सुरु केलिय का?
हा घरघुती भांडणांचा मालमसाला
हा घरघुती भांडणांचा मालमसाला टाकुन उंच माझा झोका सारख्या ऐतिहासिक सामाजिक मालिकेची वाट लावली आहे तिथे ह्या मसालेदार मालिकेबद्दल मांजरेकरसाहेबांकडुन अजुन काय अपेक्षा करणार.
प्रसंग - वैभव शुद्धीवर आला
प्रसंग - वैभव शुद्धीवर आला असा फोन येतो
अभिनय - काय वैभवला मुलगा झाला!!!
काल अर्धाच वेळ बघितली. बोअर
काल अर्धाच वेळ बघितली. बोअर झाले. बंद करून आउटलुक वाचायला घेतला. खरे तर वट्पौर्णिमेचा सीझन होता. साबा उपास करायला सांगतात, सून नकार देते मग अपघात होतो. मssssssग काय तो
सासुसुनेचा वाद होतो. एक संधी गेली हातातून. रिमाचे कॅरेक्टर सायको वाट्टॅ. विहिणीशी आजकाल इतके कर्ट वागते का कोणी. ती तशीच क्यूट आहे.
टायमिन्ग तर काय फालतू आहे. सासरे कॉफी करायला जातात तेव्हा चोंबड्या तिथे असतो मग सान्यांकडे जाऊन मोठा संवाद म्हणून परत ह्या घरी येतो तर कॉफी होतच असते. रिअली? बधीर दिग्दर्शक वाट्तो.
त्या गोरी घारीचे दात पाहिले का? फणी आहेत. अॅनिमल प्लॅनेट वर ह्याच स्लॉट मध्ये मार्वलस मार्वेन नावाचा मस्त कार्यक्रम आहे. तोच बघणार आता.
त्या सुहास जोशीची डाटर इन लॉ
त्या सुहास जोशीची डाटर इन लॉ चित्पावन नाही म्हणत होती ती , >>> पण मग अभिजित तिला भेटायला तरी कसा गेला?
प्रसंग - वैभव शुद्धीवर आला असा फोन येतो
अभिनय - काय वैभवला मुलगा झाला!!!
आगवू :- तुझं (म्हणजे
आगवू :-
तुझं (म्हणजे मालिकेच) अन माझं (प्रेक्षकांचं) जमेना असं होवू नये म्हणजे मिळवली.
रीमाबाई आज चक्क बेडवर ताम्हण
रीमाबाई आज चक्क बेडवर ताम्हण ठेउन अभिषेक करत होत्या >>>>>> हे मलाही नाही पटलं............
(No subject)
मनवाच्या चेहर्यावरून तिच्या
मनवाच्या चेहर्यावरून तिच्या मनात काय आहे ते अज्जिबात कळत नाही. पक्की आतल्या गाठीची आहे.>>>>>+++++१
मुलगा हॉस्पीटलमध्ये असताना रिमा लागुला थांबु न देता मनवा तिच्या आईला थांबु देते....too much
मनवा चांगली वागते, असे कोणी तरी या बाफ मध्ये म्हटले आहे. पण ती फक्त तिचा आणि तिच्या नवर्याचा विचार करते. सासु सासर्यांना विश्वासात घेऊन कोणतीहि क्रुती तिने आजवर केली नाही. लग्न लावतानाचे तिचे नखरे लग्नानंतरही तसेच जरा ज्यादाच दाखवले आहेत. रिमा लागुचे अगदी पटते. मनवा दिसण्याच्या बाबतीत चांगली असली तरी संस्कार जराही नाहीत. घरात एव्हढे जण असताना फक्त वैभवशी भांडण झाले म्हणुन तिने फोनही उचलला नाही. आणि नंतर वैभवने फोन उचलला नाही तर 'असे का?' असे विचारत सुटली.
भाजी निवडताना रिमा लागु तिला समजावु लागली तर तिने काही तरी निमित्त करुन रिमालाच भाजी निवडायला लावली. कमालच!
मला त्या सुत्रधाराला बघुन
मला त्या सुत्रधाराला बघुन कणेकरांचे फिल्लमबाजी आठवते.
मै इस वक्त भोसलेकी हैसियत से नही, डॉक्टर ही हैसियत से खडा हुं. अरे फरक काय पडतो.. तोच ना तू, तूच ना तो..
नात्या
नात्या
रसंग - वैभव शुद्धीवर आला असा
रसंग - वैभव शुद्धीवर आला असा फोन येतो
अभिनय - काय वैभवला मुलगा झाला!!! <<< हाहाहा एकदम बरोबर!!
आगाऊ - सिरिअल नाही पाहात
आगाऊ -
सिरिअल नाही पाहात आहे, पण कमेंट्स नक्की वाचते!
ती सुहास जोशीची घारी सून मिशी
ती सुहास जोशीची घारी सून मिशी लावून वावरते, हे किती अती होतंय आता! का हे विनोदी आहे?
तसंच तिला गुंडगिरी दाखवायला
तसंच तिला गुंडगिरी दाखवायला हिंदीचाच आश्रय घ्यावा लागावा ना? तेही आद्य मराठी गुंडावरचा हिंदी सिनेमा आत्ताच येऊन गेलेला असताना!
सुहास जोशीची सून आणि रमा बाई
सुहास जोशीची सून आणि रमा बाई रानडे मधला आबा का बाबा कोणाचीतरी (तो डॉक्टर झालेला) बायको एकच आहेत का?
सुहास जोशीची सून आणि रमा बाई
सुहास जोशीची सून आणि रमा बाई रानडे मधला आबा का बाबा कोणाचीतरी (तो डॉक्टर झालेला) बायको एकच आहेत का?>>> नाही नताशा. त्या दोघी वेगवेगळ्या आहेत.
टायमिन्ग तर काय फालतू आहे.
टायमिन्ग तर काय फालतू आहे. सासरे कॉफी करायला जातात तेव्हा चोंबड्या तिथे असतो मग सान्यांकडे जाऊन मोठा संवाद म्हणून परत ह्या घरी येतो तर कॉफी होतच असते. रिअली? बधीर दिग्दर्शक वाट्तो. >>> हे तर अगदी लगेच खटकलं होतं.
पहिल्यांदाच कॉफी करत असतील.
पहिल्यांदाच कॉफी करत असतील. कॉफी-साखरेचे डबे, दूध, गॅसचा नॉब, लायटर, इ. शोधायला वेळ लागला असेल. सं: पुरुषांसाठी पाककृती
सगळे लिहीतच आहेत तर माझेही
सगळे लिहीतच आहेत तर माझेही दोन पैसे - अगदी सुरवातीला मनवाबद्दल सांगितल्यावर रीमा गायब होते तिला शोधायला हे दोघे वैभवच्या मावशीला ऑस्ट्रेलियाला फोन लावतात आणि परवा भेळेच्या प्रसंगात मिस्टर लिमये म्हणतात की रीमाला एकुलती एक बहीण आहे जी पिंपरी-चिंचवडला राहते. (हे लक्षात आल्याबद्दल रडावे की हसावे ते कळत नाही.)
वैभवच्या लग्नाला आता बरेच
वैभवच्या लग्नाला आता बरेच दिवस झालेत रीमाची बहीण परत आली असेल :)) सुहास जोशीच्या सुनेचा खरच खुप अती झालं आता
आवाज बंद करून दोघांचे आईवडील
आवाज बंद करून दोघांचे आईवडील बोलताना दाखवले जणू काही ते भांडत आहेत. पण मालीका बघण्याची सवय असलेल्या आमच्या सारख्या हुषार प्रेक्षकांना लगेच समजले की हे सगळे खोटे आहे.
रीमाला एकुलती एक बहीण आहे जी
रीमाला एकुलती एक बहीण आहे जी पिंपरी-चिंचवडला राहते>>
पिंचि ला रहाणीरी वैभवची आत्या. तेव्हा वैभवचे बाबा म्हणतात की मी पुढे होतो तू ये मागून रिक्षाने. अॅमनोराहून पिंचिला रिक्षा ????
त्यांचं अमानोरा पिंचित असेल
त्यांचं अमानोरा पिंचित असेल
मी परवाचा भाग बघितला. त्यात
मी परवाचा भाग बघितला. त्यात ती दोन तास उशीरा घरी येणारी सून सासुला लई भारी सुनावते. आपन तो खुश हो गया!
Pages