भटक्यांचा सह्य मेळावा...

Submitted by सेनापती... on 28 June, 2013 - 05:23
ठिकाण/पत्ता: 
केळद, मढे घाट.

सह्य मेळावा संपन्न झालेला आहे.
*******************************************

नमस्कार मंडळी,

मुंबई, नाशिक आणि पुणेकर भटक्यांचा सह्य मेळावा शनिवार १३-जुलै-२०१३ रोजी मढे घाटात आयोजीत करण्यात आलेला आहे. सगळ्या भटक्यांनी शनिवारी रात्री नसरापूर - वेल्हे मार्गे केळदला जमायचे आहे. रात्रीचा मुक्काम केळदच्या शाळेत करायचा आहे.

दुसर्‍या दिवशी रविवारी १४-जुलै-२०१३ला केळद - मढे घाट - कर्णवाडी मार्गे शिवथर घळ गाठायची. दुपारचे जेवण करुन मुंबईकर महाड मार्गे परतणार आहेत. तर नाशिक आणि पुणेकर वरंधा मार्गे परतणार आहेत.

भटकंती कट्ट्यावरील १३ मावळ्यांनी या ट्रेकसाठी नावनोंदणी केलेली आहे. या सह्य मेळाव्याच्या निमित्ताने मायबोली वरिल सर्व भटक्यांचा एकत्रीत ट्रेक करण्याचा मानस आहे. तरी ज्या भटक्यांना या ट्रेकला येण्याची इच्छा आहे त्यांनी इथे प्रतिसाद मधे तसे नमूद करावे. जेणे करुन आयोजक तुम्हाला संपर्क करुन सविस्तर माहिती देऊ शकतील.

धन्यवाद...

तारीख/वेळ: 
शुक्रवार, July 12, 2013 - 15:01 to रविवार, July 14, 2013 - 14:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भटकंती कट्ट्यावरील १३ मावळ्यांनी या ट्रेकसाठी नावनोंदणी केलेली आहे >> त्यातून एकाने जरी टांग दिली तर त्याचे मुंडके सेनापतीकडून तलवारीने उडवण्यात येणार आहे !!! Proud

तीन चा नं तिसरा ( नावनोंदणीत ) बर का Happy
जरा पुर्ण प्लान येऊदे , मुंबईतुन शनिवारी दुपारी निघुन कस यायच हेही कळुदे आम्हा पामरांना.

तु नक्की ये म्हणजे झाल ....:फिदी:

खाण्यापिण्यात अजिबात कंजुषी नकोय हां .....
रतनगड च्या पायथ्याशी जेवलेल पिठल भाकरी आठवली ...

कसं याच उत्तर काळानुरुप कळेलच. पण काय हे यो ने वर स्पष्ट केले आहे त्यात तु उगाच शंका उपस्थीत करु नकोस. Wink

Pages