निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा, मस्त माहिती.>>>>>>>>>>>>..तो लोकसत्तामधला लेख आहे. Happy

ज्या फळांपासून अमारुला करतात ती फळे मी काल खाल्ली...

काल आभाळात चंद्राच्या पाच सहा कोरी बघितल्या का ?

>> हे वाचून भोवंड आली. मग अमारूला बद्दल वाचल्यावर लक्षात आलं. Lol

ते प्यायल्यावर सूर्य दिसेल की नाही ते बघायलाच पाहिजे.

मला आधी कळलच नै दिनेशदांनी असं का लिहिलय ते! Lol
आता ट्युब पेटली.

हो गं शोभे! काशीतली गंगा किती संथ होती!! तसं तिकडे एवढ्या मोठ्या नद्या धरणं बांधुन अडवलेल्या नाहीत हे एक बरय. (गंगेवर ते एक 'तेहरी' की काय असं एकच धरण आहे ना? )

धरणं बांधुन अडवलेल्या नाहीत हे एक बरय. >> एका पुढे एक धरणे बांधल्यास पूराचा धोका खूप कमी होतो - अगदी भल्यामोठ्या नदीच्या बाबतीतही. पण धरणांचे तितकेच दुष्परीणाम पण आहेत. त्यामुळे धरणे - विशेषतः आजच्या सारखी अवाढव्य - हे सोल्यूशन होऊ शकत नाही.

वर्षु,
वेल्कम बैक ! चांगली बातमी !


मला आधी कळलच नै दिनेशदांनी असं का लिहिलय ते! हाहा
आता ट्युब पेटली.

Lol
आता डोक्यात प्रकाश पडला...

शोभा,
शशांकजी शिघ्रकवी तर आहेतच..पण ते कोडी सोडवणारे निष्णात देखील आहेत,वरील शाब्दिक कोड्याचा अर्थ त्यांना लगेच समजला

वर्षूतै, मायदेशी स्वागत!
दिनेशदा, मी पाच सहा चंद्रकोरींचा फोटू कधी येतोय म्हणून वाट बघत होते Lol

ज्या पद्धतीने फुले आहेत त्यावरुन मला तरी हा कॅशियाचा प्रकार वाटत आहे. - कॅशिया हा वृक्ष आहे.

आईस्क्रीम क्रीपरची फुले थोडी वेगळ्या प्रकारे फांदीवर फुलतात - आईस्क्रीम क्रीपरची वेल असते.

फुलांव्यतिरिक्त याची पाने वगैरेचा फोटो असता तर लगेच फरक कळला असता.

सहेली : या फुलाचे नाव कोणी सांगू शकेल? आम्ही आईस्क्रीमची फुले म्हणतो. >>>> माहीत नाही. लहानपणी एका बंगल्याच्या कंपाउंड भिंतीवर अशा फुलांचे घोस बघितले होते. याच्या फुलांच्या आकारावरून त्याला वेलदोड्याची फुले म्हणायचो. .... बालपणीचा काळ सुखाचा.

एकूणच झाडा-वेलींची, पक्षांची नावे त्यांच्या दिसण्यावरूनसुद्धा असतात.
एकच झाड पण पाने पाहून त्याचे इंग्रजी नाव fish tail palm tree तर त्याच्या लोंबण्यार्‍या ओंब्या पाहून मराठीत नाव शंकराच्या जटा...(बहुतेक). झाडावर लोंबण्यार्‍या ओंब्या नसतील तर शंकराच्या जटा असे नाव का पडले असा प्रश्न पडावा.

ज्या पद्धतीने फुले आहेत त्यावरुन मला तरी हा कॅशियाचा प्रकार वाटत आहे.>> नाही, हा वेलच आहे. दुसरा फोटो टाकू का?

सहेली, अँटीगोनन लेप्टोपस - antigonon leptopus या नावाने गूगलवर सर्च करा. हीच फुलं दिसतील. कॅशियाच्या फुलांची ठेवण अशी नसते. शिवाय त्याचे (कॅशियाच्या फुलांचे) पुंकेसर व्यवस्थित बाहेर आलेले असतात. या आईसक्रीम कीपरच्या फुलांचे असे दिसत नाहीत.
आणि मधुरा - मधु मकरंद जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे, स्थानिक नाव काहीही असू शकतं. त्यामुळेच बोटॅनिकल नावाने सर्च केला की उत्तर मिळतं. Happy

मागच्या वर्षी स्पायडर फ्लॉवरचं एक झाड मिळवून लावलं होतं. त्याच्या बिया पडून इतकं सुंदर रोप तयार झालंय पावसानंतर:

ज्या पद्धतीने फुले आहेत त्यावरुन मला तरी हा कॅशियाचा प्रकार वाटत आहे.>> नाही, हा वेलच आहे. दुसरा फोटो टाकू का? >>>>> जरुर टाका, पानाचा फोटो असेल तर तो पण द्या. संपूर्ण वेलीचा असेल तर तोही द्या.

अँटीगोनन लेप्टोपस च्या फुलांची रचना -

Antigonon_leptopus-Yucatán-flowers.jpg

व हा कॅशिया --
cassia.JPG

फुले फांदीवर कशा पद्धतीने आली आहेत ते नीट पहा म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल.

सहेलीने फोटो टाकलाय त्या वेलाला आम्ही (उगाचच) नागवेल म्हणयचो लहानपणी. घराच्या छतावर प्रचंड पसरलेला हा वेल ट्रिम करण्याचा उद्योग मी एकदा केला होता. कापलेल्या वाळक्या फांद्या आणि पानं सगळी छतावरून ओढून काढून टाकल्यावर त्या दिवशी चांगलाच ताप भरला होता मला!

हां, अँटीगोनन लेप्टोपसच आहे ते फूल. फोटो नंतर टाकते शोधून.
धन्यवाद पुरंदरे शशांक, शांकली, madhu-makarand आणि सर्व जण. अजून खूप कसकसली फुले आणि फळे आहेत विचारायची. टाकते एकेक. चालेल ना?
फारच मस्त आहे हा धागा. आवडीच्या विषयाचा.

घरात वेळ मिळत नाही काय?? ऑनलाईन वाद???????(दिवे घ्या)>>>>>>>>>>>अगदी, साधने, असचं काहीसं माझ्या मनात आलं होतं. Proud

अर्रे जिप्सी - तू हे ऐकू/वाचू नकोस रे (आत्तातरी) - तुम्हा दोघे आता हवेत उडताय - तेव्हा ते एन्जॉय करा - ...

....हे एव्हरग्रीन संवाद सुरु होतात एक -दोन वर्षांनी तेव्हा मग ते एन्जॉय कसे करायचे ते मी शिकवीनच किंव तू जास्त स्मार्ट असलास तर आपले आपण शिकशीलच .... नाहीतर भटकंतीचा छंद आहेच तुला - तोही उपयोगी पडेल मग ..
....दिवे वगैरे काही नाही, कॅमेराच घे Wink Happy

सुप्रभात.

पहा जिप्स्या खुष झाला कारण चिडवाचिडवीत शशांक कुटूंबही आता शेअरींगला आहे त्याला शिवाय हल्ली त्याच काय एव्हरग्रिनच चालू आहे Lol

आकाशातून पडलेलं पाणी समुद्राला मिळतंच, तशी कुठलीही चिडवाचिडवी शेवटी जिप्सीपर्यंत पोहोचतेच! Lol

जागू किती सुंदर शेड आणि काँबिनेशन आहे जास्वंदीचे.

निगकर मला जरा मदत पहीजे. आमच्या अपार्ट्मेंट काँप्लेक्स मध्ये झाडं लावायची आहेत. सध्या कडुलिंब,जॅकरांदा, सोनचाफा, गुलमोहोर, बुच, अफ्रिकन ट्युलीप,बदाम ह्यांची बरीच झाडे आहेत.पिंपळ आणि वडाची पण जुनी झाडं आहेत. त्याची नवीन लावायला नको. मला जरा वेग्वेगळी झाडं लावायची आहेत जी सहज आणि लवकर वाढतील.आताच बुचाची ३ झाडं वार्‍याने पडली. वारा खुप आहे. मी बँगलोरला असते.
माझी सध्याची लिस्ट. बहवा, बकुळ, अशोक (सीताअशोक ??) , करंज, आंबा, जांभूळ, फणस अशी आहे. आणखीन काय लावता येईल.

एक हर्ब गार्डन पण विकसीत करायचे आहे. तुळस, शतवरी, मरवा, पाती चहा अजून काय लाऊ?

वेलींमध्ये कृष्ण्कमळ, आईस्क्रीम वेल, रानटी जाई ....??

शक्य असल्यास इंग्रजी नावं पण द्या मग इकडची लोकल नावे शोधून मी झाडं मिळवीन. इकडच्या लालबाग-बॉटॅनीकल गार्डन मध्ये पण जाणार आहे पण तिथे कितपत मदत मिळेत ते सांगता येत नाही.

धन्यवाद Happy

एका कोणत्यातरी शायर ने म्हटल्याप्रमाणेच जिप्स्या ची बात चाललीये आजकाल.. Happy
,; खत्म होगी तुम्ही पे बात
चाहे बात कहींकी हो'

Pages

Back to top