निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदिती,
तूमच्या परीसरात अवाकाडोची झाडे छान वाढतील. जवळजवळ वर्षभर हिरवीगार राहतील, शिवाय फळे मिळतील.

बिमली, करमळ ( खायचा ), मोठा करमळ पण चांगली वाढतील.
शक्यतो नुसती शोभेची आणि विदेशी झाडे लावू नका. तसेच सर्व झाडे एकाचवेळी बहरतील अशीही नकोत.

दिल्ली सावर, कांचन पण चांगली आहेत.

ह्र्ब गार्डन मधे अडूळसा, कोरफड, पिंपळी, ब्रम्ही, पुदीना असू देत. कढीपत्त पण असू दे. आणि कडुनिंब देखील.

आदिती,
लालबाग मधे मी आणि अश्विनीमामी १६ ऑगस्टला गेलो होतो. नुकताच वार्षिक पुष्पोत्सव पार पडला होता.
तिथे रोपे मिळतील असे वाटतेय.

मुंबईत पण २६ जुलै ला ढगफुटीच झाली होती ना ? त्या आधी कोकणातही एकदा झाली होती, असे लोक सांगतात. ( तिथे त्याला जगबुडी म्हणाले होते. )

जागूच्या फोटोत जास्वंद आहे ती? मला तर एकेरी गुलाबच वाटला होता ! आत्ता आदितीची प्रतिक्रिया वाचली तेंव्हा नीट बघितलं पुन्हा.

हे बघा अमारुला, याची झाडे नामिबीया मधे जास्त आहेत. अ‍ॅनिमल्स आर ब्यूटीफूल पीपल या चित्रपटात
जंगलातील जवळजवळ सर्व प्राणी आणि पक्षी देखील या फळांचा आस्वाद घेताना दाखवलेत. ( मग त्यांचे काय
होते ते होतेच म्हणा ! )

फळांच्या बाबतीत आफ्रिकेची आठवण कुणी काढत नाही, पण या खंडात उत्तम चवीची अनेक फळे पिकतात.
युगांडासारखे काही देश तर ऑर्गॅनिक फार्मिंगची चळवळ यशस्वीरित्या चालवत आहेत.

या आहेत झिंबाब्वे मधल्या स्ट्रॉबेरीज.. ( क्रीममधे बुडवून खात होतो. ते क्रीम एका स्ट्रॉबेरीला लागलेय. )

दिनेशदा, मी पान नं २७ वर एका फ़ळाचा फ़ोटो डकवलाय आणि कोणतं फ़ळ असं विचारलय. तुम्ही पाहिल पण नाही. आणि ते फ़ळ कोणतं आणि त्याचे उपयोग काय हे सांगितल पण नाही. Uhoh

जून महिना म्हणजे शाळेचा महिना. नवी पुस्तके, नवे दप्तर, नवा रेनकोट.. याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतला असणार. मला नाही वाटत आपल्यापैकी कुणी स्कूलबस / काकांची रिक्षा या चक्रातून गेलो असू.

नि.ग. चा " शाळेच्या वाटेवरचा निसर्ग" असा एक विशेषांक काढू या का ? सगळ्यांनी आपल्या आठवणी ( शक्यतो शाळेच्या नावासकट आणि वर्ष सांगून ) लिहायच्या.

किमान आमच्या कॉलनीतल्या शाळेच्या वाटेच्या फोटोवरून नक्कीच लिहावेसे वाटेल..

शोभा, आतून कसे होते ते फळ ? बाह्यरुपावरुन नीट कळत नाही. असे एक लिंबासारखे फळ आमचे शेजारी आणत असत. ते कूर्ग मधले होते. ते फळ भाजून कुस्करुन त्याची कढी करत. कड्वट आंबट कढी असे ती.

शोभा, आतून कसे होते ते फळ ?>>>>>>>>>>>माहीत नाही. अजून तसंच ठेवलय. आज बघेन, आज बघेन, म्हणते पण जमतच नाही. विसरायलाच होतं. Uhoh

दिनेशदा धन्यवाद.
मलापण परदेशी आणि फक्त शोभेची झाडं लावायची नाही आहेत. म्हणून्च इथे विचारले.
लालबाग चांगले आहे. फक्त तिथे योग्य माहीती देणारे भेटले पाहीजे.

वर सदाफुली मस्त फुलली आहे. माझ्याकडे सध्या एक वेगळीच शेड आहे सदाफुलीची.
सदाफुली म्हणजेच पेरिविंकल का? पेरिविन्कल सर्च देऊन सदाफुली दिसतेय. पण तशी निळी शेड बघितली नाही आहे

दिनेशदा, किमान आमच्या कॉलनीतल्या शाळेच्या वाटेच्या फोटोवरून नक्कीच लिहावेसे वाटेल..>>>>> फारच सुंदर बहर आहे, सदाफुलीच आहे ना ही?
सदानकदा (नेहमी) फुलते ती सदाफुली. सध्या मुंबई मंत्रालय परिसरातील रस्ता डिव्हायडरवर मधे मधे सदाफुली लावली आहे. नेहमीच फुलणारे हे झाड तसे शोभिवंत देखील आहे म्हणून मंत्रालय परिसरातील रस्ता छान दिसतो.

मधुनी मंत्रालयाची आठवण काढली त्यावरुन आदितीला कदंबाचे झाड सुचवावेसे वाटले. मुंबईत तरी हे झाड खुप छान वाढते. पण मूळचे ते यमुनेच्या परीसरातले. त्यामुळे तिथेही वाढायला हवे.
भारदस्त वृक्ष असतो हा !

मला या कोड्यासाठी जागूची आणि शांकलीची मदत लागेल.

माझ्या रोजच्या रस्त्याच्या कडेच्या जंगलात जरा आतवर मला हे झाड दिसत असे. यायला जरा उशीर झाला तर अंधारात हे झाड चक्क सोनेरी दिसे. पुर्वी बहरात होते त्यावेळी चक्क चंदेरी दिसे.
रविवारी जंगलात शिरून शोध घेतलाच.

देखणा आकार तर होताच पण या सोनेरी चंदेरी रंगाचे कोडेही सुटले.
निळसर पांढर्‍या फुलोर्‍यामूळे हे झाड चंदेरी भासत असे, तर सुकलेल्या मोहोरामूळे सोनेरी.

मोहोराचा जवळून फोटो.

महाजनांच्या पुस्तकातला फणशीचा फोटो नीट आठवत नाही, पण पाने अशीच असावीत असे वाटतेय.
आपल्याकडे फणशी एवढा फुलतो का ? आणि फुलोरा सुकल्यावरही झाडावर तसाच राहतो का ?

नमस्कार निगकर्स. Happy हा नाजुक सौंदर्याने नटलेला बाफ बर्‍याचदा रोमातुन वाचत असतेच. इथे असा प्रश्न विचारावा की नाही या संभ्रमात होते, पण विचारतेच.:स्मित:

माझ्या मैत्रिणीचे घर तळमजल्यालाच आहे. पावसाळ्यात नियमीत गोम, पैसा, गांडुळ इत्यादी सरपटणारे प्राणी स्वच्छंद विहरत असतातच, मधुन मधुन क्वचित सापभाऊ दर्शन देतात. पण आताच्या तुफान पावसाने घरात गांडूळे ( बाथरुममध्ये जास्त येतात) तर सकाळी तिला २ पिल्लांचे दर्शन बाथरुमध्ये झाले, म्हणून तिने त्यांच्यावर बादलीभर पाणी टाकले. पण ती बोटभर आकाराची पिल्ले अगदी सळसळत पाईपमधुन बाहेर गेली, नव्हे तिने त्यांना घालवलेच.

पण तिचे प्रश्न असे आहेत की १) गांडुळ ( पिल्ले असली तरी ) वेटोळे घालुन बसतात का?

२) गांडुळ जोरात वळवळु शकते का?

३) तिने जरा निरखुन पाहिले तेव्हा त्या एका पिल्लाचे थोडे चपटे तोंड तिला दिसले होते, गांडुळे तर लांबट तोंडाची ( तोंड असते की नाही देव जाणे ) असतात ना?

प्लीज कुणाला या विषयी माहीत असेल तर सांगा, कारण बागेत बाहेर जवळपास तिला सापाचा संशय येतोय.

अनिल यांना कदाचीत जास्त माहीत असेल कारण त्यांची शेती आहे ना? बाकीच्यांना माहीत असेल तर त्यांनी पण उत्तर द्यावे प्लीज्.:स्मित:

निगवर स्वागत टुनटुन!!

गांडुळ वळवळत नाही. तो आपला सरळमार्गी जीव आहे. Happy
सरपटत सरळ जातो आणि मागेदेखील येतो.
ती पिल्ले गांडळाची निश्चितच नाहीत.

ती पिल्ले गांडळाची निश्चितच नाहीत.>>>>मलापण हेच वाटतंय. पण सापाची पिल्लंसुद्धा गांडुळासारखी दिसावीत इतकी बारीक असतात का?

हो असतात जिप्सी तेवढी बारीक पिल्लं. आमच्याही बाथरुममधे गोमची,गांडुळाची, सापाची पिल्लं येतात. सापाची पिल्ल चमकदार असतात आणि पुढे तोंड चपटं असतं, पाणी टाकल्याबरोबर खुप वळवळतात.
गांडुळं दोन्ही टोकाकडुन चालु शकतात.

सापाची पिल्लंसुद्धा गांडुळासारखी दिसावीत इतकी बारीक असतात का?
>> हो

एक म्हण आहे "सापाची पिल्ले जरी गांडुळासारखी दिसली तरी मोठी होऊन सापच होतात."

लगेच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद गमभन, जिप्सी आणी आर्या.:स्मित:

मैत्रिणीलाही सापाचीच शंका आली होती. तिची लहान मुले बागेत सतत खेळत असतात, त्यामुळे ती काळजीत आहे. बघु या. साप महाशय अजून तरी प्रत्यक्ष दिसलेले नाहीत, पण काळजी घ्यावीच लागेल.

दिनेश ते Gliricidia असावे असे वाटतेय. पानं पण तशीच दिसतायत.
मुंबैत तरी फेब्रुवारी मार्च मधे बहर असतो. मध्य अमेरिकेत नोवेंबर डिसेंबर मधे फुललेली पाहिली आहेत. तुमच्या इथे वेगळ्या काळात बहर असू शकतो .

गप्पा आणि फोटो छान !
शेवटी अशा गप्पांमधुन, संवादादतुनच तर नवीन लोकांना निसर्गाबद्दल छान माहिती मिळते...

गांडूळांसारखा दिसणारा एक साप असतो आणि काही जातीची गांडुळे आकाराने बरीच मोठी असतात.
त्यामूळे दोन्ही शक्यता आहेत. बाथरूमची जाळी लहान आकाराची केल्यास उत्तम. वापरात नसल्यास त्यावर एखादे जड कव्हर ठेवावे.
पण अगदी साप असला तरी घाबरण्यासारखे काही नाही. शक्य असल्यास खैरे किंवा प्रा. म्हात्रे यांचे साप या नावाचे सचित्र पुस्तक जवळ ठेवावे. सापांची ओळख तर पटतेच पण काय काळजी घ्यावी, तेही समजेल.

गांडूळ दोन्ही बाजूने चालते हे खरेय पण त्यावर मीठ किंवा फिनेल वगैरे पडले तर सापासारखेच वळवळते.

सध्या कडुलिंब,जॅकरांदा, सोनचाफा, गुलमोहोर, बुच, अफ्रिकन ट्युलीप,बदाम ह्यांची बरीच झाडे आहेत.पिंपळ आणि वडाची पण जुनी झाडं आहेत. >>

फळझाडे चालणार असतील तर पेरु, सीताफळ, डाळिंब, कोकम
फुलझाडांमधे प्राजक्त, बकुळ, बहावा, कॅशिया, करंज, सुरंगी, शंखासूर,
वेलींमधे गोकर्ण, सायली, रातराणी , अँटीगोनन, बिग्नोनिया

हर्ब्जमधे तुळस, सब्जा, ओवा, अडुळसा, गवती चहा, आले, हळद, आंबे हळद, ओरेगानो, वेगवेगळ्या प्रकारचे बेसिल, लॅव्हेंडर ( बंगलोरची हवा याला मस्त सूट होईल असा अंदाज आहे )

मेधा, आपल्याकडे गिरीपुष्पाला गुलबट रंगाची फुले येतात. शिवाय माझ्या आठवणीप्रमाणे फुले सुकल्यावर गळतात. शिवाय तूरे जरा लांबट असतात. या झाडावर सुकलेली फुले तशीच आहेत.

मला तर फळे असलेली झाडेच लावायला आवडेल. Happy

मेधा, तुझ्याकडच्या ग्लिरिसिडियाचा फोटो टाकशील? इथल्या ग्लिरिसिडीया उर्फ गिरीपुष्प उर्फ उंदिरमारीची पाने संयुक्त असतात. फोटोतली साधी आहेत.

सापाची पिल्ले गांडूळाएवढीही असतात. मी पाहिलीय, मला गांडूळ वाटलेले पण अनुभवी लोकांनी साप म्हणुन ओळखले Happy

टुनटुन, तो वाळा असावा. या दिवसांत तो हमखास दिसतो. हा छोटा साप अज्जिब्बात विषारी नाही. मी स्वत: अनेकवेळा उचलून बाहेर ठेवलाय. खूप चपळतेने वळवळ करतो, काळ्या रंगाचा, फारतर एक विती एवढा (हे माप माझ्या हाताच्या वितीचे सांगतेय) आणि किंचित चपट्या डोक्याचा असतो.

दा, तुम्ही काढलेला फोटो फॅबॅसी फॅमिलीतल्याच झाडाचा आहे. पण नक्की फणशीच आहे कि आणखी त्यातलीच वेगळी सब स्पिसीज आहे ते मात्र बघावे लागेल.

सदाफुली फार सुंदर दिसतिये. बघा हं कशी मजा असते; एखाद्या झाडाची रस्त्याच्या दुतर्फा ओळीने लागवड केली तर ती एकसुरी वाटते. उदा. काशीद, पेल्टोफोरम इ., पण इथे ती तशी वाटत नाहीये. उलट ती नेत्र सुखद वाटतिये. Happy

या वृत्तीचा संबंध पोर्तुगीज संस्कृतीशी आहे का याची कल्पना नाही, पण झाडे न ओरबाडणे, हे मी गोव्यातही बघितलेय आणि इथेही. या वाटेवरून रोज शेकडो मुलेमुली येजा करतात. खरे वाटतेय ?

००००००००००००००००

उद्या मोनालिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिला हार्दिक शुभेच्छा !

मेधा Thanks a lot.
पेरु,सितफळ, गोकर्ण वैगरे अगदीच विसरुन गेलेले.

इथले लँडस्केप खुप छान केलेले आहे पण शोभेची झाडं जास्त आहेत. काँप्लेक्स च्या मुलांना वेगवेगळ्या झाडांची तोंडओळख तरी असावी अस वाटते.

Pages