निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदारनाथमधे लष्कर जीवाची बाजी लाऊन काम करतेय, सलाम त्यांना. इथे काही लोक मात्र अडल्या-नडल्या यात्रेकरूना लुटायचे काम करतायत, काहीजण बँकेतील पैसे लुटून चालले होते, सैनिकतपासणीत पकडले गेले, खरच आपल्या समोर मृत्यू इतका जवळून पाहिलेला असताना काही माणसे अशी कशी वागू शकतात, आपले जीवन असेच क्षणभंगुर आहे, आपण अशा परिस्थितीत लोकांना मदत करावी, लुटू नये, हे का समजत नाही? देवा सर्वाना सुखरूप ठेव. आता रौद्र रूप घेऊ नकोस अशी प्रार्थना निसर्गाला.

आणि परत असे अपघात घडू नयेत, दुर्दैवाने घडल्यास मृत्यू टळावेत, असे उपाय योजण्याची बुद्धी सर्व संबधिताना मिळो.

नाव ही लिहून ठेवले आहे पण घरी.....>>>>>> मग टाक ना ते नाव घरी बघून. >>>>>>>>>>>>>>>>. घरी आल्यावर आत्ता टाकते आहे.... HOODED GRASSHOPPER बाकी जाणकार सांगतीलच.

अजुन तिथली परिस्थिती अटोक्यात आलेली नाही. धुक्यामुळे काही भागात हेलिकॉप्टर्स पोहोचुही शकत नाही आहेत. देव करो आणि सगळे सुखरुप आपाआपल्या घरी पोहोचो.

सुप्र निगकर्स.........
पाऊस पाऊस आणि पाऊसच! व्वा!
तर कालची घटना. मैत्रिणीच्या नवर्‍याची नी(गुढगा.......मुद्दाम लिहिते...)रिप्लेसमेन्टची सर्जरी पुण्यात झाली. तिला आमच्याकडे असणारा वॉकर हवा होता. ती काल पुण्याहून तिच्या नवरोबांसह निघाली आणि मला फोन केला संध्या. ७ वाजता. आम्ही उशिरा निघालोय. वाटेत पाऊस आहे. रात्री १० पर्यंत तुझ्याकडून वॉकर घेऊन तशीच पुढे घरी जाईन.
मग मीच तिला म्हटलं की मी जेवणाचा डबा तयार ठेवते तोही घेऊन जा.
ती म्हणाली मी पोळ्या पुण्यातच घेतल्यात. तू फक्त भाजी दे. पण वातूळ नको.
आता बाहेर धोधो चालू. संध्या. ७ वाजून गेलेले. फ्रिजात वांगी फ्लॉवर.(वातूळ?)
मग म्हटलं पावसात स्कूटीवर भाजीला जाण्यापेक्षा आपल्या बागेत(प्राउड बाहुली) जाऊ.(अर्थातच थोडी भिजलेच!)
मग बागेत गेले मस्तपैकी ३ दोडके ताजेताजे कोवळे वेलावरचे तोडून आणले त्याची डाळ आणि घरचेच मुगाचे वाळवलेले सांडगे घालून भरपूर कोथिंबीर घालून भाजी केली. शिरांची तीळ घालून कुरकुरीत चटणी केली. डबा तयार ठेवला आणि १० च्या सुमारास मैत्रिणीच्या स्वाधीन केला.
अगदी लाडक्या मुलाचं कौतुक करावं तसं मी दोडक्यांचं कौतुक करतीये नाही! Proud
पण दिनेशदा म्हणाले होते त्याप्रमाणे आता बागेत काकड्या/दुसर्‍या भाज्या येईपर्यंत हे दोडके/कारली पुराण चालूच रहाणार!

मग बागेत गेले मस्तपैकी ३ दोडके ताजेताजे कोवळे वेलावरचे तोडून आणले त्याची डाळ आणि घरचेच मुगाचे वाळवलेले सांडगे घालून भरपूर कोथिंबीर घालून भाजी केली. शिरांची तीळ घालून कुरकुरीत चटणी केली. डबा तयार ठेवला आणि १० च्या सुमारास मैत्रिणीच्या स्वाधीन केला. >>>>> वा मानुषी, a friend in need is a friend indeed. - हे शब्द सार्थ केलेस. मनापासून कौतुक वाटले.

मानुषी,
मला ना एकदम भापो होतय..
मी पण झाडावर आलेल्या एका टोमॅटोच इतक कौतुक केल होतं. पण शेवटी आपली पहिली बाळ ती..पोरांच कौततुक आपण नाही करणार तर कोण?

बर अजुन एक गम्मत. माझ्या सो कॉल्ड ब्रम्हकमळाला कळी आलीय....काय छान वाटतय.. आता फुलण्याची वाट बघते आहे..

माझ्या सासुबाई पुजेची ;-).
दिनेशदा..त्याच खर नाव काय?

पावसात स्कूटीवर भाजीला जाण्यापेक्षा आपल्या बागेत(प्राउड बाहुली) जाऊ. >:D
घरची ताजी ताजी भाजी ! मस्तच ! दोडकी माझीही फार लाड्की. शिरांची चटणी तर आहाहा !!

शशांकली(कळ्ळं ना....दोघांचं एकच नाव) कौतुक त्या दोडक्यांचं(हे जरा अतीच होतंय का?)... माझं काय? :इश्श्यः
गौरी "सवत माझी लाडकी"च्या चालीवर?
वैशाली ब्रह्मकमळाच्या कळीचे फुलेपर्यंतच्या स्टेजेसचे फोटो टाक ना!
रावी आणि दिनेशदा..........अगदी अगदी.

फोडणीला तेल तापत ठेवावे आणि अंगणातला कढीपत्ता तोडायला जावे..>>>

मी हे करते..फक्त अंगणात जाण्याऐवजी खिडकीत जाते Wink

शोभा, आसुपालाची फळे ?

वैशाली, अंगोलात आल्यापासून कढीपत्ता नाही. केनयात / नायजेरियात मीच लावली होती झाडे.

म्हणून तर मी, किचन जवळ हर्ब्ज लावण्याचा आग्रह धरतो. माझ्या डिशेसच्या फोटोत असतात ते पुदीना / बेसिल असेच अगदी आयत्यावेळी तोडलेले असतात. त्यांच्या स्वादाची कशाशी तुलनाच होऊ शकत नाही.

फोडणीला तेल तापत ठेवावे आणि अंगणातला कढीपत्ता तोडायला जावे..>>>

मी हे करते..फक्त अंगणात जाण्याऐवजी खिडकीत जाते अगदी बरोबर! फक्त मिरची
का रुसलीय माहित नाही. आताही पाहतेय तर पांढर्‍या फुलांनी झाड डवरलय! पण पुढे प्रगती नाही !
निगकर्स.... पुदीन्याची काडी मातीत लावल्यावर तिला पालवी फुटलीय.हे तुमच्यामुळे माहित झाले. धन्यवाद!

Vaishali its called epiphyllum.

Manushi.... Great...

shobha... Kiti kathin kodi ghaltes

Kalya dhagaanni aabhal bharale
hirvya rangane dhartila natavale
musaldhar pausat ek phul phulale
maze ghar chaukoni zaale Happy

New footprints of a baby boy got added to my family yest.

ऐ मोनाली....... हार्दिक अभिनंदन... खूप्प आनंदाची बातमी गं....

बाळाचं नांव काय ठेवलंयस??????

Pages