निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता याची भाजी गोडच लागणार >>>>>>>>>>>मला एक म्हण आठवली. "कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले, तरी ते कडू ते कडूच. " भाजी गोड लागली का सांग ग. Happy

मोनालीला वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा. Happy

शांकली आणी अनिल आज सकाळी फोन झाल्यावर कळले की ती गांडुळे नव्हती, तुम्ही म्हणता तोच साप असेल बहुतेक. कारण त्यांच्या परिचितांनी तुमच्यासारखेच सांगीतले.

कार्ली ग्राईपवॉटरची बाळे वाटतायत. अजून बहरु दे निसर्ग बाफ. मनातला तणाव इथे या बाफावर येऊन दूर होतो.:स्मित:

काय गोंड्स कारली आहेत !
बी, आमच्या फ्लॅट्सना दोन बाल्कनीज आहेत. एक सिटींग रूमला अटॅच्ड आहे आणि एक किचनला.
किचनच्या बालकनीतच कपडे वगैरे वाळत घालायचे असा नियम आहे. त्यामूळे या बाल्कनीत केवळ झाडे वगैरेच लावता येतात.

हि पण मला जंगलातच दिसली. घोसाळीच असतील ना ? ( नाही खाल्ली मी अजून Happy )

हि अशीच गवताची फुले. प्रत्यक्ष आकार आपल्या पोह्यापेक्षाही लहान पण फोटोत त्यातली कलाकुसर छानच दिसतेय.

मला माहिती होतच घासफूस खाणार्‍यांना माझी "ग्राइपवॉटर बाळं" नक्की आवडतील.
वर्षू तुझी ती बडिशेप आणि आमचूरवाली कारली करणारे उद्या. मला ती प्रचंड आवडते.
दिनेशदा............गवतफुला रे गवतफुला............!!

मोनाली, वाढदिवसाच्या उशिराने खूप सार्‍या शुभेच्छा!
दा, गवताची फूले खूप्च गोड आहेत. मानुषी मज्जा आहे हा, आधी घरची घोसाळी आता कारली.
वर्षू दी , मागच्या वेळेस तू आलेलीस तेव्हा भेटू शकलो नव्हते मी तूला, पण आता तू कायमची आलीस ईकडे की नक्की भेटूयात.
शांकली , मी मागे टाकलेल्या फुलांचा वेल नव्हता ग, चांगले झाड होते त्याचे. आणि खूप मधमाश्या, भुंगे होते ह्या फुलांवर आणि खूप सुवासिक होती ही फुल.आत्ता टाकतेय तो फोटो बघ म्हणजे नीट कळेल.
आता मला सांगा हि कशाची फुले???

Copy of DSCN0423.JPGCopy of DSCN0434.JPG

मानुषी, बाळ कारली मस्त!! (अग्दी गोड (!!) दिस्ताहे हं!!!)

दा, पोह्याचं गवत! काय कलाकुसर असते ना गवतफुलांत! आणि ती घोसाळीच असावीत.

उजु, मग कदाचित तो तुपा नावाचा वृक्ष असेल. कुठे बघितलास तू हा? गूगल्वर Canthium dicoccum नावाने सर्च कर आणि बघ बरं हाच आहे का तो?

Canthium dicoccum species मधे तू दिलेल्या फोटोतल्या सारखी फुलं दिसताहेत. पण तू चेक कर.

कुड्यातला एक प्रकार असतो. रायकुडा किंवा काटकुडा म्हणतात त्याला. त्याचीही फुलं बर्‍यापैकी अशीच दिसतात. त्याचं बोटॅनिकल नाव आहे Ixora pavetta ह्या पण नावाने तू सर्च करुन बघ.

दिनेशदा
घोसाळीच असतील ना ? >>>>>>घोसाळीच आहे.
मानुषी
.. पहले दोडकी..आता कार्ली... आम्ही नाय जा!!!!!!!!!! >>>> खरय

अजून, मानूषीकडचे पडवळ, दुधी, काकड्या यायच्या आहेत !
उजू, वेगळेच झाड आहे हे. फुले तर रातराणीसारखी वाटताहेत. पण अर्थातच रातराणी नाही. शांकलीने नावे दिली आहेत, ती शोधून कन्फर्म करता येईल. फोटोतही मधमाशी दिसतेय. म्हणजे झाड आपल्याकडचेच असणार.

रविवारी मी आमच्या कॉलनी लगत करवंदाची जाळी शोधली. सध्या फुलांवर आहे. पण फुलांचे आणि जाळीचेही रुप आपल्याकडच्यापेक्षा थोडे वेगळे आहे.

आणखी एक मजा झाली. मी फिरायला जातो त्यावेळी रस्त्यावर कुणीच नसते. पण एक भारतीय
वाटणारा छोटा मुलगा त्या जाळीजवळ होता. ( भारतीय असावा, हा माझा अंदाज ) त्याला बघून मी माझा वेग वाढवला, तर त्याला बहुतेक वाटले, हा माणूस आपल्याला दम देणार ( रस्ता सोडून जंगलात शिरला म्हणून. ) तर तो छोट्या, सश्यासारखा टणाटण उड्या मारत घरी पळाला !

तुम्ही कशाला रागवाल त्याला?
उलट रस्ते सोडून जंगलात गेला म्हणून कौतुकच कराल त्याचं !

हो अवनी, त्याला कळायला हवं ना ते. उलट मला सोबती हवाच आहे.
या जंगलात फार साप आहेत, असे स्थानिक लोक सांगत असतात. पण मला अजून नाहि दिसलेला.

साधना, किती दिवस आहेस अंबोलीला ?

Copy of DSCN0372.JPG

साधना, मज्जा आहे तुझी. इतक्या झिम्माड पावसात आंबोलीला चाललीयेस Happy
शांकली मी टाकलेल्या फुलांच झाड तू म्हणतेस त्या तूपा वृक्षाचच असाव. कारण गुगलवर सर्च केला की Canthium dicoccum species च्या फोटोंमध्ये त्या झाडाची फळ आहेत तशीच फळ मी ह्या झाडाला पण पाहिली होती. मी टाकलेल्या फोटोत पण दिसतय बघ तस फळ.बाकी फुल आणि पान, त्यांची रचना ह्यात खूप साधर्म्य आहे.
ते झाड मी महाबळेश्वरला पाहिल होत.

आता मला ह्याच नाव गाव सांगा.ही फुल पण मी महाबळेश्वरलाच पाहिली. रायकुड्याची फुल बरीच अशीच दिसतात, पण त्याची पान अशी नसतात. ह्या फुलांना सुगंध नव्हता.

Copy of DSCN0368.JPGCopy of DSCN0367.JPG

आणि हा पानांचा फोटो.

Copy of DSCN0369.JPG

Pages