निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
शोभा ती फुल खरच इतकी गोडूली
शोभा ती फुल खरच इतकी गोडूली होती ना, अस वाटत होत की जणू चांदण्यांचा गुच्छच करून कोणी ठेवलाय आपल्यासमोर.
महाजनांच्या विदेशी वृक्ष
महाजनांच्या विदेशी वृक्ष पुस्तकात आहे या फुलांचे नाव.
आपल्याकडे बेसुमार लागवड झालेले हे काशिद. प्रा. महाजनांनी पण याला बेंगरुळ असा शब्द वापरलाय.
पण फुल तसे अगदी वाईटही नसते. आशाच्याच ओळी आठवल्या, तेरे किये को हम क्या देवे, भले बुरे का नाम ?
उज्वला - ती छोटीशी पांढरी
उज्वला - ती छोटीशी पांढरी फुलं- Sambucus canadensis Family: Caprifoliaceae (Honeysuckle family) ही असावीत बहुतेक.
२-३ दिवसांनी बागेत फेर-फटका
२-३ दिवसांनी बागेत फेर-फटका मारला. कसे अगदी ताजे-तवाने वाटले.
मानुषी तुम्ही लावलेल्या
मानुषी
तुम्ही लावलेल्या कारल्याची ती वेगळी जात असेल! माझ्या आईने लावलेली कारली अशीच छोटी-गुबदुल होती.
चवीलाही अशी कारली कमी कडू असतात.
http://www.flickr.com/photos/
http://www.flickr.com/photos/68446318@N02/9111887387/
कुंडीत वाढलेल्या कारल्याच्या
कुंडीत वाढलेल्या कारल्याच्या वेलीवर ३ कारली आली आहेत.ग्रिलच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत वेल पसरत चालली आहे.
.
चवीलाही अशी कारली कमी कडू
चवीलाही अशी कारली कमी कडू असतात.>>>>>>> अरे वा येळेकर......हे मस्तच!
हो आणि तुमचीही कारली गोडच दिस्ताहेत!
उजू पांढरी पुलं कित्ती
उजू पांढरी पुलं कित्ती नाजुक!
आज संडे मॉर्निंगचा वॉक घ्यायला अरणगावला (टेकडी) मेहेरबाबा समाधीवर गेलो होतो. तिथली फुलं......
१००० व्या पोस्ट बद्दल
१००० व्या पोस्ट बद्दल सर्वांचे अभिनंदन!
आहाहा सुंदर ,नाजुक
आहाहा सुंदर ,नाजुक फुलं...
मानुषी असा पिवळा रंग मला फार्र्र्र्र्र्र्र आवडतो.......
उजू, मस्तच आहेत सगळी
उजू, मस्तच आहेत सगळी फुलं!
निगचा पंधरावा भाग काढायची वेळ झाली!
येळेकर, कार्ल्याच्या वेलाला केवढी मोठी कुंडी लागेल? माझी जांभळी आबोली गेली आहे नवं काय लावावं याचा विचार चाललाय.
मानुषी,दिनेशदा, छान फोटो आणि
मानुषी,दिनेशदा,
छान फोटो आणि गप्पा !
हि पण मला जंगलातच दिसली. घोसाळीच असतील ना ? ( नाही खाल्ली मी अजून )
दिनेशदा,
घोसाळे तर अगदी देशी वाटली, अगदी इकडच्या सारखी.. फक्त खालच्या मातीवरुन प्रदेश मात्र वेगळा वाटतो.
(जा.जा...दिनेशदांचा हा फोटो बघुन, मी गुगलवर सहज घोसाळे बद्दल (मराठीत) माहिती सर्च करायलो गेलो तर तिथे "दिनेश घोसाळे" अस नाव देखील दिसलं... :हाहा:)
आमचं हे छोटसं खरबुज,कुंडीत वाढलेलं.
ही गुलाबाच्या झाडाची नविन शाखा...
बहावा... अहाअहा..
बहावा... अहाअहा..
अनिल.........तुझ्या गुलाबाची
अनिल.........तुझ्या गुलाबाची नवीन शाखा जरा वेगळ्या अँगलने बघ. एक ड्रॅगन किंवा असाच सायन्स फिक्शनमधे दाखवतात तसा प्राणी त्याचा डोळा आणि त्याने एक लाल रंगाची आग ओकणारी जीभ बाहेर काढली आहे भक्ष्य गिळंकृत करायला...............असं कुणाला दिसलं का?
आणि हो अस्संच छोटु खरबूज माझ्याही एक कुंडीत आलं होतं. हे पिकल्यावर प्रचंड गोड निघतं बरं! खाऊन बघ.
१००० व्या पोस्ट बद्दल
१००० व्या पोस्ट बद्दल सर्वांचे अभिनंदन! +१
मानुषी, बहावा सुंदरच. अजुनही फुललेला आहे... फार छान.
अनिल, ही गुलाबाच्या झाडाची नविन शाखा... >>> फोटो दिसत नाही. त्यामुळे मानुषी म्हणते तसं "तुझ्या गुलाबाची नवीन शाखा जरा वेगळ्या अँगलने बघ. एक ड्रॅगन किंवा असाच सायन्स फिक्शनमधे दाखवतात तसा प्राणी त्याचा डोळा आणि त्याने एक लाल रंगाची आग ओकणारी जीभ बाहेर काढली आहे भक्ष्य गिळंकृत करायला...............असं कुणाला दिसलं का?" >>>> दिसत नाही.
मला दिसतोय ड्रॅगन... अगदी
मला दिसतोय ड्रॅगन... अगदी व्यवस्थित.... टुक्टुक!!!!
मानुषी. इथे हे चिटुकलं खरबूज मिळतं... अत्ती ग्वाड आणी करकरीत (क्रिस्प) असतं.. हे चक्क तुझ्या बागेत?? वॉव!!!
नाही गं वर्षू..ते तुमचं
नाही गं वर्षू..ते तुमचं चायनीज खरबूज वेगळं. माझ्या बागेतलं कुंडीत आपोआप आलेलं आणि वाढ न झालेलं म्हणून छोटं. पण मी ते पिकू दिलं आणि कापलं तर मस्त ग्वाडच.
मधु म. नीट बघ. वर्षूला दिसलाय ड्रॅगन.
सुप्रभात..
सुप्रभात..
काल एका गडावर हा एक वेगळाच
काल एका गडावर हा एक वेगळाच जीव दिसला.
वा काय छान छान फुले पाने
वा काय छान छान फुले पाने टाकलीत तुम्ही लोकांनी. मन प्रफुल्लीत झालय
महाजनांच्या विदेशी वृक्ष पुस्तकात आहे या फुलांचे नाव.>> दा, पुर्ण नाव काय आहे लेखकाचे?
महाजनांच्या विदेशी वृक्ष
महाजनांच्या विदेशी वृक्ष पुस्तकात आहे या फुलांचे नाव.>> दा, पुर्ण नाव काय आहे लेखकाचे? >>>>>
हे ते पुस्तक व त्याचे लेखक - १८] देशी वृक्ष - डॉ. श्री. द. महाजन
सुप्रभात. दिनेशदा, मानुषी,
सुप्रभात.
दिनेशदा, मानुषी, शोभा, अनिल, वर्षू, सहेली सुंदर फोटो आहेत.
मलाही त्या गुलाबाच्या खोडात जिभ बाहेर काढलेला प्राणी दिसत आहे.
आज रात्री किंवा उद्या निगचा १५ वा भाग काढू. तोपर्यंत इथे चालू राहुद्या.
आत्ता मलासुद्धा तो ड्रॅगन
आत्ता मलासुद्धा तो ड्रॅगन दिसला. ऑफिसचे इंटरनेट जास्त पॉवरफुल आहे.
काल एका गडावर हा एक वेगळाच जीव दिसला.>>>> हा एक नाकतोड्याचा प्रकार आहे. गेल्यावर्षी सिटी वॉकच्या वेळेस पाहीला होता. नाव ही लिहून ठेवले आहे पण घरी.....
नाव ही लिहून ठेवले आहे पण
नाव ही लिहून ठेवले आहे पण घरी.....>>>>>> मग टाक ना ते नाव घरी बघून.
मानुषी, तस मलाही जवळपास तसच
मानुषी,
तस मलाही जवळपास तसच दिसलं म्हणुन क्लिक केलं, मला ते नाजुक चिंचेच्या कोवळ्या पानासारखं देखील वाटलं...
वर्षु,
या ड्रॅगनला तसं आम्ही भीत नाही बरं का ..!
निसर्गाचे गोड गोड रुप बघत
निसर्गाचे गोड गोड रुप बघत असतानाच तिकडे उत्तराखंडमधे निसर्गाने दाखवलेले रौद्र रुपही दिसत आहे. आपण कितीही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी तो अनाकलनीयच राहणार आणि मनात आणलं तर एका फटक्यात आपल्याला त्याच्या भीषण सामर्थ्याची जाणीव करुन देत राहणार हे पुन्हा एकदा मनावर ठसलं.
जसं त्याच्या सुंदर लीलांसमोर कौतुकाने झुकायला होतं तसंच त्याच्या या विनाशक सामर्थ्यापुढे आदरयुक्त भीतीने झुकावंसं वाटलं...
पिशी अबोली, काल घरच्या फोनवरच
पिशी अबोली,
काल घरच्या फोनवरच हे मला कळले. खुप अस्वस्थ वाटतेय.
जे झाले ते भोलानाथाच्या मर्जीने असे म्हणत, ते हे सत्य स्वीकारतीलही. निदान त्यांची श्रद्धा अढळ राहो, अशी प्रार्थना करु या.
जे झाले ते भोलानाथाच्या
जे झाले ते भोलानाथाच्या मर्जीने असे म्हणत, ते हे सत्य स्वीकारतीलही. निदान त्यांची श्रद्धा अढळ राहो, अशी प्रार्थना करु या.>>>>>>>>>>>>..खरं आहे दिनेशदा, किती रौद्र रूप धारण केल ना निसर्गाने? देवदर्शनासाठी गेलेले लोक काही बचावले , काही बेपत्ता आहेत, तर काही गेलेच.
अजून हजारोंनी लोकं तिथे अडकलेत आणि आता परत अतिवृष्टीचा इशारा दिलाय. मला एक कळत नाही. एका हेलिकॉप्टरमध्ये, ५/६ जण मावतात म्हणून लोकांना सुरक्षित जागी हलवायला वेळ लागतो म्हणतात. पण सगळ्या मंत्री-खासदार, उद्योगपती यांची हेलिकॉप्टर का घेत नाही अशा वेळी? माणसाचा जीव महत्वाचा की ह्यांच हेलिकॉप्टर प्रेम?
हेलिकॉप्टरच्या मर्यादा
हेलिकॉप्टरच्या मर्यादा असतातच. वाईट हवामानात ते उतरवताही येत नाही. आपले लष्करच याप्रसंगात मदत करु शकते. तात्पुरते पूल, रस्ते वगैरे बांधायचे त्यांनाच माहीत असते.
आज तरी थांबलाय का पाऊस ?
Pages