निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लक्ष्मीनारायणाच्या फोटोचे माहित नाही पण आम्हाला कोणीतरी "जिप्स्याच्या जिप्सिणीचा फोटो" धाडलेला एवढे आठवतेय..... Wink

अगं कायतरी काय...... मी कधी म्हटले त्याने धाडले म्हणुन.. कोणीतरी मला धाडले.. आणि मी ते पाहिले, आता त्यावर जिप्स्यिण लिहिलेले होते म्हणुन मला कळले नाहीतर कळलेही नसते.......... Wink मी आपले निष्पापपणे फोटो पाहिले असते. Wink

तसेही त्याचे कुठे लक्ष आहे आपल्याकडे आता???? त्याला काट्यातही गुलाब दिसताहेत सध्या...

साधना | 14 June, 2013 - 12:17

लक्ष्मीनारायणाच्या फोटोचे माहित नाही पण आम्हाला कोणीतरी "जिप्स्याच्या जिप्सिणीचा फोटो" धाडलेला एवढे आठवतेय..... डोळा मारा

जागू | 14 June, 2013 - 12:25

साधने तू आता मात्र जिप्स्याचा विश्वास घात करत आहेस. बघ जिप्स्या मी नाही केला हाहा>>>>>>>>>>>>आम्हाला नाही पाठवला ना? Angry

>तुम्ही सगळे जर असंच चिडवणार तर मी डिसेंबरपर्यत या धाग्यावर एकही फोटो/पोस्ट टाकणार नाही. :धमकी देणारा बाहुला:फिदीफिदी स्मित>>>>>>>>>>>>>>>जिप्स्या, तसाही आता तुला कुठे वेळ असणार आहे इथे यायला? . उगीच आपल आमच कारण सांगू नको. सरळ सरळ सांग ना. Wink
आणि :फिदीफिदी स्मित : ही स्मायली टा़कण्याऐवजी : इश्य : ही तरी स्मायली टाकायची होतीस. दिनेशदांना, तुला लाजलेला पहायच आहे. किमात स्मायली बघून त्यांनी कल्पनेत(मुलगी नाही :फिदी:) तरी तुला बघीतल असत. Happy

शोभे, तुला थेट लग्नाला बोलवणार आहे गं..>>>>>>>>>>>मला पण आधी ' तिचा ' फोटो बघायचाय. :हट्ट करणारी बाहुली:

जिप्स्या रागाऊ नकोस रे, सगळे आपला म्हणून स्वातंत्र्य घेताहेत.
खुप दिवसांनी या निगच्या पानावर असा एक निगकर सगळ्यांच्या तावडीत सापडला आहे...!
Lol

काल ( अटेंबरो साहेबांचीच, आणखी कुणाची ) फ्रोझन प्लॅनेट बघताना, एका शॉटमधे खास जाणवले. ज्यावेळी पेंग्विन बाबा, आपल्या पायावर अंडे तोलत, कडाक्याच्या थंडीत उबवतात त्यावेळी त्यांच्या पोटावरची पिसे झडलेली असतात. त्याशिवाय त्यांच्या पोटाची उब अंड्याला मिळणारच नाही.
आणि ती कडाक्याची थंडी संपल्यावर ज्यावेळी पेंग्विन आई परत येते, त्यावेळी तिच्या ताब्यात ते पिल्लू देताना, बाबांना फार यातना होतात. फार सुंदर टिपलेय ते सगळे.

होय दा, मस्त टिपलंय ते सारं. एवढंच काय, श्री. चितमपल्लींनी एका ठिकाणी तर असा उल्लेख केलाय की, घरट्यात अंडं उबवत बसलेल्या पक्ष्याकडून त्याच्या जोडीदाराची टर्न आली की अगदी जड अंत:करणाने चार्ज दिला जातो. आणि चार्ज घेणारा जोडीदारही अगदी, आपल्यावर आता एका फार मोठ्या ठेव्याची जबाबदारी आहे अशा भावनेनं अंडी उबवायला बसतो. ही गोष्ट त्यांना विशेषत्वाने पाणलावा, नाकेर, टिळेवाला अशा पाण्यात वास करणार्‍या पक्ष्यांबद्दल जाणवली.

जिप्स्या रागाऊ नकोस रे, सगळे आपला म्हणून स्वातंत्र्य घेताहेत.
खुप दिवसांनी या निगच्या पानावर असा एक निगकर सगळ्यांच्या तावडीत सापडला आहे...!>>>>+१००००...

किती छळताहेत बिचार्‍याला!!...........

<<<या धाग्यावर मी काहिच वाचत/बघत नाही.>>>जिप्सी, हे मात्र फार छान हं! सगळ्या पोस्ट वाचून घ्यायच्या आणि मग वर म्हणायचं "मी काही वाचतच नाही." Wink

जिप्सी मनात म्हणतोय, कि ही लोकं ईथे एवढी छळतात तर प्रत्यक्ष भेटल्यावर काय करतील? त्यापेक्षा नि.ग. गटग ला जुलैमधे जायलाच नको. ........:अओ:

गरीब बिचार्‍या जिप्स्याला
सगळे लागले चिडवायला

जिप्स्याला मग जिप्सीण बोले
का रे तुला हासू आले

काय सांगू बाई तुला
सगळे कसे छळती मला

फोटो सुंदर टाकतो जर
सग्ळे वाहवा करतात तर

जर्रा तुझी चाहूल लागता
सग्ळे माझी जाम खेचता

"जाऊ आपण ट्रेकला
पावसात मस्त भटकायला
फोटो काढू छान छान
जिप्सी हसून हलवे मान"

जोडी उडाली भुर्रदिशी
गप्पा राहिल्या नेटवरती ....

जिप्सी - एन्जॉय रेन, डोन्ट वेस्ट टाईम ... Wink Happy नंतर मग आहेच दुपटी -बाटल्या सांभाळणं ....

मस्त कविता आहे..

नंतर मग आहेच दुपटी -बाटल्या सांभाळणं

एवढ्यातच कशाला त्याला परिणामांची भिती दाखवताय Wink घाबरेल ना तो अशाने...... Happy

घाबरेल ना तो अशाने...... >>>> असा कसा घाबरेल तो - आमच्यासारखाच धीर/वीर (?) पुरुष आहे ना तो ......

लग्न झाल्यावर घाबरायला लागेल ते वेगळं (म्हणजे आपलं नेहेमीप्रमाणेच ...) Wink Happy

जिप्सीसारख्याच सर्व यंगस्टरसाठी मी केव्हाच एक कविताही लिहून ठेवलीये - अर्थातच पावसाळा पेशल ...

जादू पावसाची....

जादू वळिव सरींची .... मातीत अत्तर सांडायची

जादू काळ्या ढगांची.... मनमोर फुलून यायची

जादू थेंबाथेंबांची.... दोन मने जुळायची

जादू लखलख वीजेची... घट्ट मिठीत मिटायची

जादू फास्ट राइडची.... बिलगत भुर्रS जायची

जादू खोडकर वाऱ्याची... रेशीमबटा उडवायची

जादू ओल्या ओठांची... ओठांनीच टिपायची

जादू साथीत भिजायची... पंख नसता उडायची

जादू चिंब क्षणांची.... मनात जपून ठेवायची

दिनेशदा, शांकली, मस्त माहिती. धन्यवाद! कमाल आहे ना पक्षी-प्राण्यांची कशी बुद्धी दिलेय देवाने. Happy

हो ना गरीब बिच्चारा जिप्सी. अरेरे>>>>>>>>>>>जिप्स्या आणि बिच्चारा? Uhoh जिप्स्या Light 1 घेच.

या धाग्यावर मी काहिच वाचत/बघत नाही.>>>>>>>हो आता इथे वाचायला वेळ असतोच कुठे? सतत फोन पण एंगेज असतो. Lol

शशांकजी जिप्स्यासाठी केलेली मस्त कविता. Happy
जादू पावसाची....>>>>>>...सुंदर Happy

सुप्रभात.

वा शशांकजी दोन्ही कविता मस्त.

लग्न झाल्यावर घाबरायला लागेल ते वेगळं (म्हणजे आपलं नेहेमीप्रमाणेच ...)

आता शांकलीला फोन करुन विचारतेच.

दुध बाटल्यांची त्याने आधीच सवय केलेय बहीणीच्या मुलावर. Lol

व्वा! जागू, मस्त फूल आहे. Happy

आता शांकलीला फोन करुन विचारतेच.>>>>>>>>>>>>>>हो हो. मी पण करतेच फोन. Happy

दुध बाटल्यांची त्याने आधीच सवय केलेय बहीणीच्या मुलावर. >>>>>>>>>>>बघ कित्ती हुशार आहे आणि म्हणे बिच्चारा. Lol

मला कोणी सांगेल का हे फ़ळ कसलं आहे ते? त्या दिवशी त्या काकांनी ती भाजी(घोळू/लाल मेथी) दिली होती ना? तेव्हाच त्यांनी हे फ़ळ दिलं होते. पण आम्ही घरात नव्हतो. आणि ज्यांनी ते फ़ळ घेतल त्यांच लक्ष गॅसवरच्या मॅगीत होतं. त्यामुळे ते कसल फळं काय उपयोग काहीच कळल नाही. Uhoh
१. DSCN6228.jpg

२.DSCN6229.jpg

त्यांच लक्ष गॅसवरच्या मॅगीत होतं. (कोण गं ते शोभा? :फिदी:) अगं हे फळ किनू का? उघडून खाऊन बघ ना.

आज संध्याकाळी क्लबाच्या गेटात एक क्यूट आणि अद्भुत दृश्य पाहिले पण कॅमेरा नसल्याने फोटो नाही काढता आले.
एक काळी, चणीने अगदी छोटीशी कुत्री(क्लबचीच पाळलेली) छान पहुडली होती. आणि तिच्या कुशीत एक मांजर(जि़ंजर कॅट) मस्त गुरगुटून झोपलेलं. आम्ही पहातच राहिलो. तर तेवढ्यात ते मांजर उठलं आणि त्या कुत्रीशी इतकं लाडात आलं अगदी स्वता:च्या आईशी लाडात यावं तसंच! अंगाला अंग घासत होतं. चाटतही होतं. लाडालाडात पर्रपर्र, गुर्म्यांव इ.इ. आवाज करत होतं!
तर गेटात बसणार्‍या वॉचमनांनी सांगितलं......... ही कुत्री या मांजराला दूध पाजते! आणि इतर कुत्र्यांपासून या मांजराचं रक्षण करते.
हे दृश्य मला अद्भुत वाटण्याचं कारण .......आमचे लुई महाराज या समस्त मार्जार जातीला जन्मजात साता जन्माचे वैरी मानतात. दोन मैलांवर मांजर दिसली तर हे ओरडून जीव काढून ठेवतात.

आअख्खि मुम्बै वाहुन जातात इतका पाउस पद्तो
पडातोय
आअप्पापले अपडेत्स द्या मंडळि

Mobile typing impossible in devnagari can't press back key

काल पासून ... रात्रभर ... आतापर्यंत ... फक्त पाऊस!
आणि हे पावसाच्या स्वागतासाठी आलेलं फूल Happy
lily_flower.jpg

Pages