निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
दिनेशदा कधी ठरवताय बेत?
दिनेशदा कधी ठरवताय बेत? अनिलच्या गावाला म्हणजे मला नक्की सांगा ना कुठे जायच ते. मी आता सोमवारपासुन ऑफिस जॉइन करतेय. बघते जमत का ते कळवते.
वरती काही अवांतर गप्पा झाल्या आहेत तिथे काही फोटो टाकते.
मी जरा डीटेलमधेच लिहितो. मी
मी जरा डीटेलमधेच लिहितो.
मी शुक्रवारी साधारण संध्याकाळी ६/७ वाजेस्तो पुण्यात पोहोचेन. मुंबईहून काहीजण कोंडुस्करच्या मुंबई - कोल्हापूर बसने पुण्यात येतील. ही बस पुण्यात उशीराच पोहोचते. तोपर्यंत पुण्यातल्या लोकांशी मी गप्पा मारत बसेन.
पुण्याहून जॉईन होणारे त्याच बसमधे चढतील. म्हणजे आपला प्रवास एकत्र होईल.
कोल्हापूरात ही बस सकाळी ६.३० ला पोहोचते. अंघोळ वगैरे आटपून,(कोल्हापूरला तशी सोय आहेच. ) अनिलच्या गावी जाऊ. दुपारनंतर परत कोल्हापुरला. मग रंकाळा वगैरे फिरू. रात्री कोल्हापूरला मुक्काम.
प्रवास खुप असला तरी एक रात्र पुर्ण आराम आहेच, त्यामूळे त्रास नाही व्हायचा.
रविवारी सकाळी लवकर निघून अंबोलीला जाऊ. दिवसभर तिथे फिरू. मग संध्याकाळी सावंतवाडीहून पुणे किंवा मुंबई गाडी पकडू. सोमवारी सकाळी आपापल्या मुक्कामी परत. तिकिटे वगैरे सगळी आधीच बूक करुन ठेवू.
कोल्हापूरला किती माणसे जमतात त्यावर गाडी वगैरे करायची का ते ठरवू. शिवाय कुणाला थेट अंबोलीलाच यायचे असले ( दोन दिवसाची सवड नसेल ) तरी जमण्यासारखे आहे. तारीख मात्र नंतर कळवतो.
जागू, वरचा बेत वाचून
जागू, वरचा बेत वाचून सांग.
आणि आपल्या आपल्यात काही अवांतर नाही.
आठवतेय तेव्हापासून मी ७ जूनची
आठवतेय तेव्हापासून मी ७ जूनची वाट बघत असे. मुंबईत तरी बहुतांशी पाऊस तारीख पाळत असे.--------खरच आजच पाउस पडला!
रविवारी सकाळी लवकर निघून
रविवारी सकाळी लवकर निघून अंबोलीला जाऊअतिशय चांगला सिझन आहे.खूप खूप मजा करा.धबधबे मस्त वहात असणार!
एका ट्रिपच्यावेळी अंबोलीच्या हॉटलच्या खिडक्यातून धुके खोलीभर पसरत होते. रस्त्यावरून चालता २ फुटांवरचा माणूस दिसत नव्हता. दुपारी सावंतवाडीला निघायचे होते,तर हॉटेल्वाल्याने थांबवून सांगितले आत्ता
वेंगुर्ल्यावरून पापलेटं येताहेत.अरे बापरे काय चव होती! असो ! तुम्हां सर्वांना शुभेच्छा!
ठिक आहे जमल तर सांगते. ही
ठिक आहे जमल तर सांगते.
ही कोणती फुले आहेत? जकरांदाची आहेत की वेगळी
झाडाच्या पानांवरुन आणि
झाडाच्या पानांवरुन आणि फुलांच्या रंगावरुन तर जाकरंडच वाटत आहे!
दिनेशदा छानच बेत आहे. आम्ही
दिनेशदा छानच बेत आहे.
आम्ही पण कोल्हापुर -आंबोली गेलो होतो. महालक्ष्मी देऊळ बघणार असालच. रंकाळा तलाव, शाहु महाराजांचा राजवाडा पण पाहीला
आंबोली इथे कावळे शेत ,
आंबोली इथे कावळे शेत , गणपतीचे स्वयंभु मंदिर पण पाहण्या सारखे आहे.
पन्हा़ळा गडावर फिरताना दिसलेली फुले.
काय नाव या फुलाचे ?
Dineshda pavsali vari
Dineshda pavsali vari tharatey mhanaje. Good. Welcome.
Bagha bagha gypsy kahihi type karat naahite ;-).
baaki to lambaa niga gtg cha plan mast, majja Kara loks. Mala naahi(ch) jamanr :-(.
pudhchya gtg la yayacha prayatna karen
Btw jypsya tuza ikade aad
Btw jypsya tuza ikade aad tikade vihir zale asel na
Cooking tehi 50 lokanche tyat puranpoli zalech tar mag. Dineshda aho tyala niga var yayala bandi ghatli jail mag
होय जागू, प्रिया म्हणतेय
होय जागू, प्रिया म्हणतेय तसंच, पानांच्या आणि फुलांच्या रचनेवरून तरी तो झकारांदा वाटतोय.
पूनम, ते रान-तूर असणार.
आंबोलीला येण्यासाठी मला
आंबोलीला येण्यासाठी मला विचारु नका, सरळ येऊनच धडका.. येवा घर आपलाच आसा.....
अवनीची लग्नाची तारिख असणार ७ जुन, हो ना गं??
आंबोली इथे कावळे शेत , गणपतीचे स्वयंभु मंदिर पण पाहण्या सारखे आहे
गणपतीचे स्वयंभु मंदिर कुठे आहे?? हायला, मी सोडुन इतरांनाच आंबोलीचा जास्त माहिती आहे.
अरे वा दिनेशदा, जागू पुण्यात
अरे वा दिनेशदा, जागू पुण्यात येताहेत? मागे तीनदा हुकले, या वेळेस नक्की भेटायचय. शांकली, तू सांग बरं का मला नक्की झालं की. मी इथे कमी येते ना म्हणून ( तसंही जागूने माझं बारसं कुठे ठरवल्य जागू दिवे घे बाई )
शप्पथ, साधना तू अंबोलीला असतेस हे माहितीच नव्हतं. दोनदा आलेय मी अंबोलीला...
दिनेशदा, गटग प्लॅन मस्तच.
दिनेशदा, गटग प्लॅन मस्तच.
हायला, मी सोडुन इतरांनाच आंबोलीचा जास्त माहिती आहे.>>>>>>>>बघ बघ साधने. आम्ही तुझ्या जीवावर येण्याच ठरवतोय आणि तुला तिकडची माहितीच नाही.
अरे वा दिनेशदा, जागू पुण्यात
अरे वा दिनेशदा, जागू पुण्यात येताहेत? मागे तीनदा हुकले, या वेळेस नक्की भेटायचय.>>>>>...अवले, नुसतं भेटायच नाही. आमच्या बरोबर ट्रीपला पण यायच आहे.
शोभा, तू पण चाललीयेस?
शोभा, तू पण चाललीयेस?
दिनेशदा, पुढचा शुक्रवार
दिनेशदा, पुढचा शुक्रवार म्हणजे १४,१५,१६ की काय?
शोभा, तू पण
शोभा, तू पण चाललीयेस?>>>>>>>>>>>.हो.आणि तू पण येणार आहेस.
अरेच्चा. निग गटग! कधी? कुठे?
अरेच्चा. निग गटग! कधी? कुठे? शोभे बोल्ली नाहीस ते!
मी पण येइन मग लेकाला घेउन!
दिनेशदा, पुढचा शुक्रवार
दिनेशदा, पुढचा शुक्रवार म्हणजे १४,१५,१६ की काय?>>>>>>>>>>
तारीख मात्र नंतर कळवतो.>>>>>>>>>>>>
अग, दिनेशदानी तारीख अजून कुठे सांगितलेय. तुला काय दूर दृष्टी प्राप्त झाली का?
अरेच्चा. निग गटग! कधी? कुठे?
अरेच्चा. निग गटग! कधी? कुठे? शोभे बोल्ली नाहीस ते!
मी पण येइन मग लेकाला घेउन!>>>>>>>>>>.गधडे, हे बघ.
दिनेशदा | 7 June, 2013 - 17:52
मी जरा डीटेलमधेच लिहितो.
मी शुक्रवारी साधारण संध्याकाळी ६/७ वाजेस्तो पुण्यात पोहोचेन. मुंबईहून काहीजण कोंडुस्करच्या मुंबई - कोल्हापूर बसने पुण्यात येतील. ही बस पुण्यात उशीराच पोहोचते. तोपर्यंत पुण्यातल्या लोकांशी मी गप्पा मारत बसेन.
पुण्याहून जॉईन होणारे त्याच बसमधे चढतील. म्हणजे आपला प्रवास एकत्र होईल.
कोल्हापूरात ही बस सकाळी ६.३० ला पोहोचते. अंघोळ वगैरे आटपून,(कोल्हापूरला तशी सोय आहेच. ) अनिलच्या गावी जाऊ. दुपारनंतर परत कोल्हापुरला. मग रंकाळा वगैरे फिरू. रात्री कोल्हापूरला मुक्काम.
प्रवास खुप असला तरी एक रात्र पुर्ण आराम आहेच, त्यामूळे त्रास नाही व्हायचा.
रविवारी सकाळी लवकर निघून अंबोलीला जाऊ. दिवसभर तिथे फिरू. मग संध्याकाळी सावंतवाडीहून पुणे किंवा मुंबई गाडी पकडू. सोमवारी सकाळी आपापल्या मुक्कामी परत. तिकिटे वगैरे सगळी आधीच बूक करुन ठेवू.
आजच लिहीलय ना?
आणि किती ती घाई. पडशील ना धावता धावता.
अगं ए!! आजची ७ तारीख आहे का?
अगं ए!! आजची ७ तारीख आहे का?
अग म्हणजे मी आजच वाचल ना?
अग म्हणजे मी आजच वाचल ना?
पुढच्या महिन्यातच असेल
पुढच्या महिन्यातच असेल ते.
साधना, सो स्वीट ऑफ यू.. तू आणि ऐशू हव्याच आहात. पंकजला पण बोलावू.
ज्यांना जमेल त्यांनी तिथे तिथे यायचे. मायबोलीवर सध्या येत नसलेल्या लोकांना पण आमंत्रण देतोच.
जागू, झकरांदाच आहे तो.
पुढच्या महिन्यातच असेल
पुढच्या महिन्यातच असेल ते.>>>>>>>>>>>व्वा! पावसाळ्यात भटकंती. आणि सोबत नि.ग.गप्पांचे भिष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य....................... मग काय मज्जाच.
अरे, पुढच्या महिन्यात मलापण
अरे, पुढच्या महिन्यात मलापण जमेल.
साधना, अंदाज चुकला तुझा ७
साधना,
अंदाज चुकला तुझा ७ जून ही माझ्या लग्नाची तारीख पण नाही आणि वाढ्दिवस पण नाही.
पण त्या दोन्ही तारखांपेक्षा जरा जास्तच आवडती !
दिनेशदांनी बरोबर ओळखले...... दीर्घ प्रतीक्षेनंतर येणार्या पावसाच्या आगमनाचा शुभदिन....कवीमंडळींनी त्याला
प्रियकराची उपमा उगाच नाही दिलीय....उस दिन मेरे दिलमें खरंच कुछ कुछ होता है !
उस दिन मेरे दिलमें खरंच कुछ
उस दिन मेरे दिलमें खरंच कुछ कुछ होता है !
मग काल तुझी इच्छापुर्ती झाली असेल. ब-याच वर्षांनी काल त्याने ७ जुनला हजेरी लावली.
शप्पथ, साधना तू अंबोलीला असतेस हे माहितीच नव्हतं. दोनदा आलेय मी अंबोलीला...
अगं त्यात काय, पुढच्या वेळेस कळव म्हंजे झालं. आंबोलीला माझं घर आहे, पण मी मात्र वनवासात आहे नव्या मुंबईत. वनवास कधी खतम होणार आणि मी कायमची कधी आंबोलीला जाणार माहित नाही.
पुढच्या महिन्यात दिनेशदा
पुढच्या महिन्यात दिनेशदा येताहेत का? लेकीला सुट्टी असल्याने आम्ही जाग्यावर असलो तर भेटू.
Pages