निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या शुभेच्छा !!
खूप छान वाटतंय (१० दिवसांच्या ब्रेक नंतर) या सगळ्या गप्पा,सुंदर फोटो बघून.
सगळे फोटो मस्तच..
Happy

शेणखत काय व लुईची शी काय - दोन्ही एकच - फक्त खतात रुपांतर होण्यासाठी जरा मातीत मिसळले गेले पाहिजे म्हणजे झालं.. कुठल्याही प्राण्याची विष्ठा ही मातीत कुजून जे होते ते शेणखतच..
शशांकजी,
छान माहिती आणि विश्लेषण !

ग्रामीण भागात जी गावाजवळ शेतं असतात (गांवदरी) तिथे फारशी खते न घालता,सहजपणे खुप दर्जेदार पिके येतात, ते वर्षानुवर्षे पडणार्‍या या 'सोन'खतांमुळेच..अलिकडच्या काळात मात्र हि परिस्थिती बदलली आहे

मानुषी,
अर्ध्या-एक गुंठ्यात,कुंड्यामध्ये देखील पुरेशी माती ,खत,पाणी देऊन मेथी,काकडी,दोडका,कोथींबीर मिरची,गवार यासारख्या,इतर भाज्या आपण घेऊ शकतो..

मानुषी, मला मुंबई ग्राहक पंचायतीमध्ये मिळली कंपोस्ट खताची बास्केट. तुम्हाला हवा असेल तर त्यांचा दूरध्वनी क्रमांक देईन. पण अगदी सोपी रचना आहे त्याची. चारी बाजूनी आणि वरूनही हवा खेळती राहील अशी बास्केट घेऊन त्याला अगदी बारीक जाळी बसवायची. झाली कंपोस्ट बास्केट तयार.

सुसंध्याकाळ.

मानुषी शशांक म्हणतात ते बरोबर आहे. अग शेणखत तर वापरतातच. मेंढपाळ जेंव्हा मेंढ्या घेउन चरण्यासाठी गावोगाव फिरवतात तेंव्हा मळे-शेतीवाले खतासाठी खास ह्या मेंढ्यांना एक दिवस आपल्या शेतात ठेउन घेतात. त्यामुळे त्यांच्या लेंड्या म्हणजे विष्ठा पडते. व जमिनीत चांगले खत तयार मिळते. आणि भाजीपाला नेहमीच आपण स्वच्छ धुवुन घेतोच. आणि तरी जर तुला मनातून प्रत्यक्ष पाहील्यामुळे अस्वस्थ वाटत असेल तर पालेभाज्या प्लॅस्टीकच्या मोठ्या टबांमध्ये लावून ते टब उंचावर ठेव. फळभाज्या व वेलींना खालीच लाव.

तु भेंडी, गवार, कारली, टोमॅटो, मिरची, वांगी ह्या नेहमी येणार्‍या भाज्या लावू शकतेस. घोसाळी, शिराळी पण चांगली होतात.

भोकर..

माधव, बाजारात स्टेरॅमील (किंवा स्टेरामील) नावाचं खत मिळतं. त्यात हाडांचा चुरा आणि आणखीन पण काही काही असतं ते एक एक मूठ एका कुंडीला दर पंधरा दिवसांनी दिलं की झालं. पण एक अडचण अशी आहे की ह्याचं पोतं विकत घ्यावं लागतं. आणि ४/५ कुंड्यांना हे पोतं खूप दिवस (वर्षं) जाईल. पण ह्याचा खूप चांगला इफेक्ट मिळतो. हे खत आणि शेणखत असं दिलं की मग इतर काही घालायला नको.

जागू, ही पण शेवंती सुंदर! कस्ली रससशीत आहे!

डॉ., भोकराचा फोटो मस्त! मुंबईत आली वाटतं बाजारात. यांचं लोणचं लागतं छान, पण फार चिकट असतात ही.

जागू शेवंती सुरेख..अगं आहेत तरी किती प्रकार शेवंतीचे तुझ्याकडे? आणि अजून किती फुलं फुलवलियेस? ग्रेट आहेस.. Happy

वसंत ऋतूची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे असं वाटतंय नै! गेले ८-१० दिवस वेगवेगळे पक्षी पहाटे पहाटे किलबिलाट करू लागलेत. शिवाय अनेक वृक्षांना नविन पालवी यायला सुरुवात झालीये; तर काही फुलांनी डवरून गेलीयेत. यंदा सगळीकडेच फ्लॉवरिंग लवकर झालंय असं वाटतंय. मुंबई, उरण किंवा नगरला काय प्रगती आहे?

सौरभ, तुमचा रायझिंग स्टार एकदम सुंदर आहे. काय कॅची कलर आहे!! सुंदर! Happy

भोकर नेरुळम्धे २/३ आहेत प॑ण फळ आता दिसलं नाही.हा फोटो नेटाळून चिकटवला. भोकर जात्याच चिकट त्यामुळे लगेच चिकटला. Biggrin

सौरभ लाल गुलाब एकदम मस्त !! परवानगी न घेता माझ्या डेस्कटॉप वर बॅकग्राउंड म्हणून टाकण्यात आला आहे. Happy

@ शांकली ताई
धन्यवाद.

@ श्रीकांत जी
हाहा
हा फोटो छोटा वाटत असेल तर मोठ्या साईझमधला पाठवू का ?

शकुन, तुम्ही दिलेली लिंक वाचली. फारच अद्भूत आणि मस्त माहिती आहे. लिंक बद्दल खूप खूप धन्यवाद. मी सेव्ह करून ठेवलिये इतकी आवडली माहिती. (अर्थात, अशी कितीही रंजक माहिती मिळाली तरी मूळचा भित्रा स्वभाव काही बदलत नाही ना! त्यामुळे नाकतोडे महाशयांशी प्रत्यक्षात काही दोस्ती होऊ शकणार नाही!!)

डॉ. Lol

शांकली उरणलाही आता झाडांना नविन पालवी फुटायला लागली आहे. पक्षांच म्हणशील तर ती नेहमीच आमच्याकडे सकाळी किलबिल करत असतात.

सौरभ फुल आणि तुझी फोटोग्राफी दोन्ही सुंदर.

सौरभ फुल आणि तुझी फोटोग्राफी दोन्ही सुंदर. >>>>> खरंय अग्दी - काय सुपर्ब फोटो काढतो रे तू सौरभ......

भोकर नेरुळम्धे २/३ आहेत प॑ण फळ आता दिसलं नाही.हा फोटो नेटाळून चिकटवला. भोकर जात्याच चिकट त्यामुळे लगेच चिकटला. >>>>> डॉक, मी लहानपणी भोकर खाल्लेलं आहे - चांगलंच चिकटलोळ असतं - पण गोडंही .....

माधव - फुलं येण्यासाठी माझ्यामते जरा पाणी कमी करावे - पाणी कमी केल्यावर पानांकडे जाणारा जीवनरस फुलं, फळं यांचे पोषण करतो - अर्थात हे ट्रायल-एरर पद्धतीने करणे - पाने पाण्याअभावी थोडी झुकली/सुकली की मग थोडेसे पाणी द्यायचे असे करुन पहा.....

सौरभ फार सुंदर फोटो काढतोस हं! मस्त!
अनिल..........जागुले...............धन्यवाद! कालच सुरू केली आहे प्रोसेस.
शांकली आमच्याकडेही कडुलिंबावर सकाळी सनबर्ड, साळुंख्या, कोकीळा, ग्रे टिट, २ प्रकारचे बुलबुल, कधी हळद्या, वेडा राघू, आपले कावळे चिमण्या तर रोजचेच!
सकाळी मस्त किलबिल चालू असते. संध्याकाळी खूप पाखरं थव्यांनी आकाशात फिरत असतात. जवळपास शेजारीच काही पिंपळ आणि मोठे वृक्ष आहेत. त्याच्यावर फाययनली झोपत असावेत.
पिशी........सापाची जात नाही गं माहिती.

हं................आणि शशांक एकदा त्या अनंताला लुई महाराज अभिषेक करताहेत म्हटल्यावर त्याच्याकडे दुर्लक्षच झालं. पाणी घातलं असतं तर जगलं असतं.

व्वा!! भोकरं मी पण खाल्लीयेत लहानपणी.
कच्च्या भोकरांचं लोणचं ही करतात म्हणे!!

सौरभ...काय सुंदर कलर आहे गुलाबाचा!!! Happy
१४ फेब्रु.ची पुर्वतयारी का??? Wink

शांकली आमच्याकडेही कडुलिंबावर सकाळी सनबर्ड, साळुंख्या, कोकीळा, ग्रे टिट, २ प्रकारचे बुलबुल, कधी हळद्या, वेडा राघू, आपले कावळे चिमण्या तर रोजचेच! >>> काय सुदैवी आहेस मानुषी तू ..... शहरात फक्त कावळे व कबुतरांवरच समाधान मानावे लागते...
माझ्या ऑफिसच्या आसपासही प्रचंड मोठे वृक्ष, वेली, हिरवळी असल्याने तर्‍हेतर्‍हेचे पक्षी पहायला मिळतात - तसेच वेगवेगळ्या ऋतूंमधील झाडे, वेली यांचे नेत्रसुखद बदल पहायला मिळतात. आत्ताच समोर बॅडमिंटन फ्लॉवरच्या झाडावर आधी फुले व मग त्याला लागलेल्या कोवळ्या हिरव्या शेंगा पहायला मिळताहेत ... फोटो टाकीनच यथावकाश ....

आणि हो एवढ्यात भारद्वाजाचा नुस्ता आवाज येतो पहायला गेलं तर दिसत नाही.
असा घुमल्यासारखा एकाक्षरी आवाज काढतो.

Parkia biglandulosa म्हणजेच बॅडमिंटन बॉल ट्री .... (सर्व फोटो आंतरजालावरुन साभार...)

Parkia biglandulosa.jpgimages.jpgimages1.jpg

सर्व ताई मानुषी, जागू, चिमुरी, आर्या, दिपु
धन्यवाद Happy

@ शशांक जी
धन्यवाद Happy

@ आर्या ताई
जुनाच फोटो आहे हो. Lol

काल आम्हाला रजा होती, तेवढ्यात भरपूर गप्पा झाल्यात.

बोनमील, फिशमील वगैरे चिकनफिड मधे पण वापरतात. मी टाटा ऑईल मिल मधे होतो, त्यावेळी ते यायचे.
तो ट्रक आला कि वासावरुनच कळायचे.

शशांक चेंडूफळ पुण्यात बघितल्याचे आठवतेय. एरवी गुलमोहोरासारखेच दिसते ते झाड.

जोपर्यंत मुंबईत गुजराथी / पंजाबी लोक आहेत तोपर्यंत भोकराला अभय आहे. त्यांना अथाणु आणि आचार साठी ती लागतातच. त्याचे सरबत पण करतात.

Pages