निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू..:स्मित:
बाळ बटाटा! Lol

मानुषी, मी पण कुंडीतच लावलेत बटाटे! आणि ती रोपं, सेम तू टाकलेल्या फोटोंमधल्यांसारखीच दिसताहेत.

दोन्ही डगरीवर पाय ठेवून बसतो. मग तोल जाईल नाहीतर काय !>>>>>>

पक्ष्याच्या ह्या स्टाईलला 'फतकल स्टाईल' म्हणता येइल>>>>>> Lol

मानुषी, तुझा ज्यूसचा आणि अनिल, तुमच्या चिंचांचा फोटो बघून तोंडाला पाणीच सुटलं.

इब्लीस, श्री.चितमपल्लींच्या पुस्तकांमधे कामुन्या/येरुण्या असा फळांचा उल्लेख आहे. त्यांचं वर्णन तुम्ही केलेल्या वर्णनाशी जुळणारं आहे. कदाचित टणटणीची फळंसुद्धा असू शकतील ती (चितमपल्लींनी म्हटलेली). कारण तिची पण जाळीच होते खूप वाढली की. आणि ही फळं मस्त लागतात.

टणटणीवरून आठवलं; मागे एकदा श्री.वाटवेसरांचं एक लेक्चर ऐकण्याचा योग आला होता. त्यांनी सांगितलं, की लहानपणी मित्रांबरोबर घाणेरीची (टणटणीची) फुलं काढून त्यांचा देठ तोंडात धरून त्यातला मध शोषून घ्यायचा उद्योग चालू असताना त्यांच्या असं लक्षात आलं; की सगळ्या फुलांमधे हा मध नाहीये, तर काही फुलं रिकामी(!) आहेत. म्हणजे वनस्पती परागीकरणासाठी, कीटकांनी जास्तीत जास्त फुलांवर भेट देऊन, त्यांतले पराग दुसर्‍या फुलांवर वाहून न्यायला पाहिजे असतील, तर सगळ्या फुलांमधे मधुरस ठेवून चालणार नाही. कीटकांनी त्यासाठी प्रत्येक फुलात शोध घेतला पाहिजे! आणि ही युक्ती त्यांच्या लक्षात येऊ नाही म्हणून फुलांची रचना गोलाकार केली गेली. पहा त्या किती हुशार आहेत!! आणि माणसांना वाटतं वनस्पतींना काही कळत नाही..

हा विचार नंतर त्यांच्या प्रोफेसरशिपमधे एक नविनच प्रोजेक्ट म्हणून साकार झाला; त्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांनी शोध निबंध प्रसिद्ध केला.

असाच आणखी एक प्रोजेक्ट म्हणजे प्रयोगशाळेत मृद्गंध तयार करण्याचाही! त्या प्रोजेक्टमधे 'हे' (शशांक) सामील होते.

दिनेशदा मला वाटत फुल आली की खाली बटाटे लागतात. जितकी फुले तितके बटाटे. कारण आम्ही भुईमुगाच्या शेंगा लावल्या होत्या तेंव्ह्या हे पाहीले होते. मग झाड सुकत आले की शेंगा तयार झालेल्या असायच्या. बटाट्याच्या बाबतीतही तसेच असावे. माझ्याकडच्या बटाट्याला आता फुले येत आहेत.

जूस, चिंचा.. मस्त मस्त तोंपासु फोटो
दिनेश दा कडला पक्षी किती गमतीदार दिसतोय.. फतकल मारून बसलेला Lol
धुळवड खेळून झाल्यावर आंघोळ करूनही लावलेला रंग न धुतला गेल्यासारखा रंग आहे त्याचा.. Happy

इथे दरवर्षी नवीन वर्षानिमित्त भरणार्‍या फ्लॉवर मार्केट ला परवाच भेट दिली..

बाकीची टाकतेच ' स्प्लेंडिड क्वांग चौ' सीरीज च्या चौथ्या भागात.. Happy

शांकली......वाटवे सरांनी दिलेली माहिती इन्टरेस्टिन्ग!........आणि कोणत्या तरी नामांकित पर्फ्यूम कं.चा एक मृद् गंधाचाही पर्फ्यूम निघाला आहे. असं वाचनात आलं होतं.
वर्षू .........सॉरी काय? लिबर्टी काय? इतकं सुंदर लिहायचं, फोटो डकवायचे आणि वर सॉरी? काय राव?
दिनेशदा पक्षी खरंच वेगळाच आहे. आणि पोझही अगदी फतकलच!

नमस्कार. मला घराच्या बाल्कनीत फुलझाडे आणि भाजी लावायची आहे. फुलझाडांमधे गुलाब, झेंडू, एखादे पांढर्‍या फ़ुलाचे झाड आणि दुर्वा लावायचा प्लॅन आहे. सध्या मी फ़क्त तुळस लावली आहे. जरा सेट झाल्यावर फुलांची झाडं आणि मनी प्लॅन्ट, आणि नंतर जमतिल तशा भाज्या लावयचा विचार आहे माझा.
पण आधी कधीही बागकामाचा अनुभव नाहिये.. इतकी सगळी झाडे बाल्कनीत मेन्टेन करता येतील का? बाल्कनी साधारणपणे ७ X ११ आहे. आणि काळजी काय काय घ्यावी लागेल?

जिप्स्या लवकर फोटो टाक. ती सोनसावर कधी एकदा प्रत्यक्ष पाहीन असे झाले आहे. ह्या वर्षीही नाही जमणार. पुढच्या वर्षी बघेन.>>>>जागू, हे घे फोटोज Happy

सुप्रभात,
जागु,वर्षु,जिप्सी
सगळे फोटो छान आलेत !

(जिप्सी कडुन मला फोटोग्राफी शिकण्याची संधी कधी मिळेल याची वाट बघतोय )..
Happy

सोनसावर........... आह्हा...किती ब्राईट्ट्,सुरेख ,सोनेरी रंगाची फुलं आहेत.. नावाला साजेलशी
मस्त रे जिप्स्या.. Happy

मानुषीचे पक्षी : Rosy Pastor / Rosy Starling / गुलाबी मुनिया.

माद्यांना आकर्षित करण्यासाठी नर पक्षी खूप खातात, त्याचा परिणाम म्हणून मिलनाच्या काळात त्यांचा रंग गुलाबी होतो. Non-breeding सिझनमधे dull - brownish रंगाचे असतात. बी.एन.एच.एस. च्या डॉ.केतकी या गुलाबी रंगाला "wedding gown" म्हणतात.

मधु - मकरंद - ते पक्षी Rosy Pastor / Rosy Starling आहेत ही माहिती बरोबर आहे पण मुनिया प्रकारातील नाहीत, मुनिया वेगळे असतात.

http://natuecocityfarming.blogspot.in/

घरी, छोट्या जागेत फुल पान लावणार्‍यांसाठी

काल महाबळेश्वरला जाउन आले..छान सुंदर होतच्..पण वाईट पण फार वाटल..

वाई पूणे पुर्ण रस्ता एकदम शहरी वाटत होता. कितीतरी बांधकाम चालु होत. मुंबई कशी पसरत पार दुरवर गेलीय. तस पुण पण अक्राळविक्राळ पसरतय..:-(

महाबळेशवर मध्ये मुळ अस स्ट्रॉबेरीच वाण अगदी दुर्मिळ आहे....

जिप्सी,

पवईच कारंज आहे रोडाज च्या कोपर्‍यावरच तिथे केळी सारख झाड आहे (कदाचीत केळिचच असेल). त्याला मस्त फुल आणि फळ येत आहे. जाउन बघ..मला गाडितुन दिसल

शशांक, "The Book of Indian birds" Salim Ali, यात याचे लोकल नाव gulabi myna, tilyar, lal myna, ....असे दिले आहे. मला स्वतःला जास्त माहीत नाही. ३१.०१.२०१० ला उरणला डॉ.केतकींबरोबर एक दिवसाचे पक्षी निरिक्षण केले होते, तेव्हा दिसले होते. त्यात त्यांनी सांगितलेली माहीती.

gulabi myna, हे बरोबरच आहे - याचा उच्चार मैना आहे, "मुनिया" नाही. कृपया तुझी आधीची पोस्ट पहा -
(मानुषीचे पक्षी : Rosy Pastor / Rosy Starling / गुलाबी मुनिया) म्हणजे हे लक्षात येईल. मुनिया हे गुगलून पहा म्हणजे मैना व मुनियातील फरक लक्षात येईल. कृ गै न Wink Happy

मला सांगा ही कसली फुले आहेत? यात जांभळा, पिवळा असे रंग होते अशी माहिती मिळाली. फोटो नीट आलेला नाही. कारण चाल्त्या बसमध्ये काढलाय. Uhoh
DSCN5055.jpg

जिप्सी, सोनसावर छानच.
पिवळा टॅबेबुया पण असाच झळाळत्या रंगाचा असतो. कोल्हापूरला महावीर उद्यानात, बेळगावात बरीच झाडे आहेत.
.. वर्षू,, सगळ्यात जास्त आवडला तो चौथा भाग Happy

जागू, शेंगदाण्याप्रमाणेच बटाट्याच्याही खोडाचे भाग जमिनीत शिरतात आणि मग त्यांना बटाटे लागतात.

हा आमच्या विदुषकाचा, जरा बरा फोटो !

Happy
दिनेशदा, विदुषक मस्तच Happy

पवईच कारंज आहे रोडाज च्या कोपर्‍यावरच तिथे केळी सारख झाड आहे (कदाचीत केळिचच असेल). >>>>बघतो जाऊन आज Wink Happy

हि फुले कोणती? पाने साधारण आपल्या सप्तपर्णीसारखी वाटत होती. झाडाची उंची साधारण ८-१० फूट असेल.

पाने

फ्लॉवर मार्केट मधे दिसलेली काही रेअर फळं, फुलं
ही पिवळी फळं आहेत ,' solanum mammosum' च्या झाडाची. बटाटे, टोमॅटो फॅमिलीतले हे झाड आहे. या झाडाचा प्रत्येक भाग विषारी असला तरी चायनीज नववर्षात हे झाड घरी आणणे शुभ समजले जाते. या फळाला पाच टोकं असतात ज्यांना चायनीज लोकं पाच बोटं म्हणतात. जशी एका हाताची पाच बोटे वेगवेगळी असून एकत्र असतात ,तशी पाच पिढ्या घरात एकत्र ,सुखासमाधानाने नांदाव्यात हा संदेश हे झाड देत असते.

हे पिचर प्लांट. हे ही विषारीच असतं. पण चीनी समजुतीप्रमाणे घरी हे प्लांट ठेवल्यास हे प्लांट, गुड लक आणी वैभव आपल्याकडे आकर्षित करून घेऊन या पिचर मधे साठवून ठेवतात.

Pages