निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पक्षी कोणते आहेत आहे का माहिती कुणाला?
दिनेशदा तुम्ही म्हणता ती फळं काही लक्षात येत नाहीत. नेप्तीची झाडं माहिती आहेत.
केर सांगरी>>>>>>>>> नगरला काही ठराविक किराणा दुकानात ही केर सांगरीची भाजी मिळते. मारवाडी मैत्रिणींकडून कळलं की काही पाला, कंद आणि फळभाज्या सुकवलेल्या म्हणजे केर सांगरी.
ही भाजी रात्री भिजत घालून दुसर्‍या दिवशी करतात. चविष्ट पण अती तेल असते.
राजस्थानातल्या भौगोलिक परिस्थितीनुसार सीझनल गोष्टी वाळवून वर्षभराची बेगमी!
काल टोमॅटो, दोडका, घोसाळी, दुधी आणि कारली ....बीया आणून, मस्त आळी करून जमिनीतच लावली. याच बीया वर गच्चीतल्या कुंडयातही लावणार आहे. बघू काय आधी उगवते.
शशांक वाचतोयस ना (:स्मितः)!

काल टोमॅटो, दोडका, घोसाळी, दुधी आणि कारली ....बीया आणून, मस्त आळी करून जमिनीतच लावली. याच बीया वर गच्चीतल्या कुंडयातही लावणार आहे. बघू काय आधी उगवते.
शशांक वाचतोयस ना (:स्मितः)! >>>> लुई म्हाराजांचे नत्रखत प्रोक्षण नंतर पाण्याने थोडे डायलूट करत रहा म्हणजे झालं ..... Wink Happy

लुई म्हाराजांचे नत्रखत प्रोक्षण नंतर पाण्याने थोडे डायलूट करत रहा म्हणजे झालं ...>>>>>
व्हय म्हाराजा!..

मनापासून धन्यवाद शोभा१२४ - या बातमीसाठी -
"सर्पदंश झालेल्या माकडीसाठी दुसऱ्या एका माकडाने तातडीने वनौषधी आणली; अन्‌ त्या उपचाराने माकडी बरी होऊन टणा टणा उड्या मारत जंगलात पसारही झाली."
हे सगळं प्रत्यक्ष पाहिलेल्यांपैकी कोणीतरी ती वनस्पती उचलून कोणा वनस्पतीशास्त्रज्ञाला दाखवायला हवी होती - म्हणजे ती वनस्पती कुठली हे कळले असते व आपल्यालाही (माणसाला) त्याचा उपयोग होऊ शकतो का हे समजायला पुढे काही संशोधन करता आले असते...

चितमपल्लींच्या एका पुस्तकात असाच एक प्रसंग वर्णन केला आहे - एक इंग्रज साहेब (टी एम गँबल) एका मुंगूस व नागाची लढाई पहात असतो - सर्पदंशाने घायाळ झाल्यावर मुंगूस एका झुडूपात शिरते - त्याचा कंद उकरुन खाते व उन्हात जाऊन काही काळ बसून रहाते - जरा वेळाने ते बरे होऊन निघून जाते - तो साहेब स्वतः वनस्पती शास्त्रज्ञ होता त्याने त्या वनस्पतीचे नाव ठेवले - "सर्पगंधा" ...

शोभा Lol

शशांक सध्या आमच्याकडे मुंगसांनी बिळ केले आहे. त्यामुळे हल्ली बरेच दिवस साप दिसत नाहीत.

आज सकाळी सात वाजताच सागर उपवन (कुलाबा) येथे जाऊन आलो. सोनसावर भन्नाट फुललीय Happy सावकाश फोटो टाकेन. त्यानंतर राणीबागेत जाऊन आलो Happy कॅन्डल फ्लॉवरचे काही मस्त फोटो मिळाले Happy नंतर प्रदर्शनात जाऊन आलो. नेहमीप्रमाणे छान आहे. Happy आता रात्री मायबोलीकरांसोबत "नांदूर माधमेश्वर" Happy
सोमवारी फोटो डकवेन. Happy

अजुन एक माहिती मिळाली पवईच्या बागेत रूद्राक्षाचे झाड आहे आणि गेल्या आठवड्यात त्याला कळ्या आलेल्या. सोमवारी जाऊन पाहणार Happy

जागूssssssतोंडाला पाणी सुटलं ना!!

शोभा, मस्त लिंक दिलीस!

जिप्सी, तुझ्या फोटोंच्या प्रतिक्षेत आहोत हं आम्ही सगळे....

मी देत असलेला फोटो कुठल्या पानांचा आहे ओळखा बरं...

mp 029.jpg

हा अजून एक..

mp 030.jpg

माझा बराच बॅकलॉग आहे. पण मला आता पुन्हा पहिल्यापासूनचे भाग वाचायचे आहेत. मोठ्ठंच प्रोजेक्ट होणारे ते. Happy

ती चिंच धड हिरवी नाही, अन ना ही अजून गाभूळलेली... मधल्या स्टेजलाही मस्त लागते. Wink

हिरवी कच्ची चिंच खायला मज्जा येई. खिशात चिंचा अन मीठ एकत्र भरत असू आम्ही. एक 'अमून्या' नामक प्रकार होता खानदेशात. हुरड्याच्या दाण्याच्या साईझची हिरवी-लाल आंबटगोड फळे. खूप थोडा गर अन चावून खाता येईलशी बी आत. करवंदाच्या जाळी सारखी जाळी असे अमुन्यांची. शाळेच्या दाराबाहेर बसलेल्या आजीकडे अमुन्या, चिंचा, पाकातली बोरं, करवंदं, गटागटच्या किंवा लिमलेटच्या गोळ्या (२० पैशाला २०) अन काय अन काय असे. पण खिशात १० पैशाच्या अमुन्या किंवा चिंचा भरून वर घासभर मीठ घालणे अन "खिसा हलवून" आतल्या ऐवजाला ते मीठ लागले की 'पोस्ट मधली सुटी' तासांना थोडा थोडा खाऊ चघळणे अन शेजार्‍या पाजार्‍यांशी शेअर करणे हा मोट्ठा आनंद आठवतोय लहानपणचा..

चिंचेच्या आठवणी भरपूर. फोटोबद्दल धन्यवाद!

शांकली तो बटाटा आहे ना ?

जिप्स्या लवकर फोटो टाक. ती सोनसावर कधी एकदा प्रत्यक्ष पाहीन असे झाले आहे. ह्या वर्षीही नाही जमणार. पुढच्या वर्षी बघेन.

अनिल तो.पा.सु.

शांकली तो बटाटा आहे ना ? >>>>> काय झटकन ओळखलेस जागू - तुला सर्व फळभाज्या, पालेभाज्या पाना-फुला-फळांसकट माहिती असणारच.........

सुप्रभात मंडळी
चिंचा , कैर्‍या............ मस्त आहेत फोटो!

काल एक खरबूज(मस्कमेलन) आणलं पण खायला किंचित कच्चट वाटलं. म्हणून ज्यूस काढला. मस्त टेस्टी!

DSCN1694.JPG

बटाटे कधी येतील? >>>> जागू, दिनेशदा, अनिल - सांगा बरं लवकर, लवकर....

चिंचा भारीएत आणि मानुषी तुझ्याकडचा खरबूज ज्यूसही तों पा सू .....

बटाटे कधी येतील? ><< कुंडित असल्यामुळे दिड ते दोन महिन्यात, तसेच कुंडीत असल्यामुळे त्याचा आकार फारसा मोठा होत नाही पण दम आलू साठी वापरता येईल

बटाट्याचं झाड! मस्तच. मागे एकदा मी इथलंच वाचून बटाटा लावला होता एका कुंडीत. मस्त झाड वाढलं होतं . साधारण तीन साडेतीन महिन्यानी लेकाला जवळ थांबवून `बटाट्याचं पीक' काढायला सुरूवात केली. अगदी सुरूवातीला एक बाळ बटाटा मिळाला. आम्ही दोघं खूश! पण नंतर अक्खी कुंडी उपसली तरी फक्त मुळंच ! एकूण मिळून तो एकच बाळबटाटा मिळाला होता. Lol

हे पक्षी कोणते आहेत आहे का माहिती कुणाला?>> मानुषी, माझ्या अंदाजाने ते रोझी पास्टर्स (Rosy Pastor) आहेत. हे मायग्रेटरी पक्षी असतात. इराण वरुन येतात. ही माहिती आणि फोटो पहा.

https://www.google.co.in/search?q=rosy+pastor+bird&hl=en&client=firefox-...

http://www.indianaturewatch.net/displayimage.php?id=321023

http://badakerecrao.blogspot.in/2010/02/rosy-pastor.html

तुमच्या फोटो मधले पक्षी हेच आहेत का ते सांगाल का?

स_सा, रावी .......................चला म्हणजे आता बाळबटाट्याची वाट बघायला हरकत नाही.
हं...........थॅन्क्स स्वाती! २ दिवसच आले हे. नंतर नाही आले. म्हणजे त्यांच्या माय्ग्रेशन्च्या प्रवासातला एक स्टॉप होता की काय आमचा कडूलिंब!
आणि त्यांच्या पाठीवर पाहिलंस का? आपण कुर्त्यावर योक करून त्यालाच खाली काजबटनपट्टी करतो
तसं काहीसा पट्टा आहे.

<<अजुन एक माहिती मिळाली पवईच्या बागेत रूद्राक्षाचे झाड आहे आणि गेल्या आठवड्यात त्याला कळ्या आलेल्या. सोमवारी जाऊन पाहणार<<
जिप्सी, मागे एक लोकप्रभा अंक संपुर्ण रुद्राक्षावर होता. त्यात होतं की ठाण्यात रुद्राक्षाचं झाड आहे.
अशी दुर्लभ वृक्षांचं टीश्यु कल्चर करुन जतन आणि प्रपोगेशन करायला हवं खर तर. Sad

मानुषी, मी स्वतः नेपतीची बरीच झाडे नगरात बघितली आहेत. नलिनीच्या घराजवळ आहेतच शिवाय लोणीचे कॉलेज आहे त्या रस्त्यावर पण आहेत.. फोटो असणार इथेच..

वरती सगळे तोंडाला पाणी आणणारे प्रकार दिसताहेत Happy

मी वर्णन केलेला पक्षी हा ! ( हाही फोटो नीट नाही कारण अपुरा प्रकाश !)

त्याची बसायची तर्‍हा बघा. मधल्या फांदीवर नीट बसण्याऐवजी असा दोन्ही डगरीवर पाय ठेवून बसतो. मग तोल जाईल नाहीतर काय !

बटाट्याला पांढरी किंवा निळसर ( जातीप्रमाणे) फुले येतात. वांगी / मिरची सारखीच दिसतात पण गुच्छात येतात. फुले आल्यावरच काढणी करत असावेत. केनयात बटाट्यावे अमाप पिक येते. तिथे शेते आहेत. फुलावरची शेते खुप छान दिसतात.

Pages