निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू,
काय मस्त गुलाब आहेत ग!
ईथपर्यंत सुवास आला बघ त्यांचा.
बाराव्या भागाच्या सर्व निसर्गप्रेमींना शुभेच्छा.

जागू आता हा भाग पळवायचा, बरं का !

जाई, पावसाळ्यात जाईची जाडसर फांदी खोचली तर सहसा जगतेच. मग भराभर वाढतेही.

जाईचे रोप लावण्यासाठी पुरेशी मोठी फांदी घेऊन त्याची गाठ मारावी आणि जमिनीत गाठीचा भाग लावावा, त्यामुळे मुळ येण्यास जास्त जागा मिळते.

शशांक, इंगळहाळीकरांचे फ्लॉवर्स ओफ संह्याद्री मालिकेतले तिसरे पुस्तक येतेय. कदाचित आलेही असेल.
(मी जाहिरात बघितली होती.)

जागूकडे ! पण जागू उरणला असते.
पुर्वी वसईचा एक गुलाबच गावठी गुलाब म्हणून मुंबईला विकत असत. तो रंगाने फिक्कट आणि वासालाही जेमतेमच असे. खरा गावठी गुलाब गडद गुलाबी असतो आणि त्याचा घमघमाट सुटतो. एखाद्या नर्सरीवाल्याकडे असेल तर फुलाचा गंध घेतल्याशिवाय, घेऊ नये.

हो, हो.. तोच तो. माझ्या आजोळी आहे. शेताच्या बांधावर. अंबोलीजवळच्या चौकूरला पण शेताच्या बांधावरच दिसला होता. सातार्‍याला पण बघितला होता.

अर्रेच्च्या! १२ वा भाग आला पण?

खरंच दिनेश्दा, हा भाग पळायला पाहिजेच! ११ वा भाग खूप रेंगाळला होता नै?

जागू, गुलाब कस्ले सह्हीयेत!

आणि शोभा, खास जागूसाठी Wink प्राजक्ताच्या फुलांचा फोटो ना?...

शांकली, इंगळहाळीकरांचे आसमंत वाचले असेलच, त्याचाही पुढचा भाग आलाय. खुप छान आहे. ( बहुतेक लेख पुण्याच्या आसमंताबद्दलच आहेत. )

जानेवारीला सुरुवात झाली की,साधारणत: संक्रांतीच्या आधी पांढरी सावर फुलायला लागते. हिरव्यागार गोल कळ्या अंगभर मिरवून ही सावर, फुलते मात्र पांढर्‍या फुलांनी. आपल्या काटेसावरीची (शाल्मलीची) ही सख्खी बहीण म्हणायला हरकत नाही. हिचं खोड असतं हिरवंगार, आणि फांद्या,पानं,शेंगा मात्र काटेसावरीसारखीच असतात. पर्वती गावात-पर्वती टॉवर्स या बिल्डिंगशेजारी ही आहे. हिच्या फुलांचा हा फोटो.....

IMG_1716.jpg

तसंच गोविंदी ही पाचुंद्याची चुलत बहीणसुद्धा ह्याच दिवसांत फुलते. फुलताना शिरीषाच्या फुलांशी साधर्म्य सांगणारी ही फुलं दिवस मावळता रेन ट्रीच्या फुलांशी नातं जोडून मग कोमेजतात.....

IMG_1691.jpgIMG_1705.jpg

हा दुसरा फोटो मी त्यामानाने जरा लवकरच काढल्यामुळे 'तो' रेन ट्री सारखा रंग दिसत नाहीये..

नमस्कार, बर्‍याच दिवसांनी आलेय इथे.
एक नविन पुस्तक ( म्हणजे जुनेच, पण मी आत्ता वाचले ) लिस्ट मधे टाका. मस्त पुस्तक आहे.
एका रानवेड्याची गोष्ट - कृष्णमेघ कुंटे

दिनेशदा नक्कीच हा धागा चांगल्या चांगल्या माहीतीने जलद धावेल.

शांकली खुप छान फोटो. तुझे फोटो पाहून मनात कालवा कालव झाली. कारण १-२ वर्षे आधी मी अशी झाडे फुले पाहण्यासाठी स्पेशल घरातून निघायचे आणि फोटो काढून यायचे. आता राधा १ वर्षाची झाली की तिला आणि श्रावणीला घेउनच आम्ही असे फोटो काढण्यासाठी जाऊ.

होय गं जागू, नक्की जाल परत तुम्ही फुलं, झाडं, पक्षी बघायला.

आणि अगं बहुतेक फोटो ना माझ्या ऑफीसच्या किंवा जाण्यायेण्याच्या रस्त्यावरचे असतात. गेले ३ महिने माझी बदली नव्यापेठेतल्या ब्रँचला झालीये, त्या रस्त्यावर आहेत बरीच वेगळी मंडळी! आता काही दिवसांत इतरही फुलतील...त्यांचेही फोटो इथे देईन.

Pages