निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर
(No subject)
वाँव सहीच
वाँव सहीच
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् |
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ||१९|| श्री भगवत गीता अ. १२ ||
आघवाची आकाशस्थिति| जेवीं वायूसि नित्य वसती| तेवीं जगचि विश्रांती- | स्थान जया ||२१२||
हें विश्वचि माझें घर| ऐसी मती जयाची स्थिर| किंबहुना चराचर| आपण जाहला ||२१३||
ज्ञानेश्वरी ही मुळातच अतिशय गोड, साजिरी, अलवार..... त्यातच अशा काही वैशिष्ट्यपूर्ण ओव्या आल्या आहेत की त्या वाचताना हा महापुरुष कुठल्या उंचीवर होता याची आपण सर्वसामान्यांना काही बाही कल्पना यावी....
आता हेच पहा ना - मूळ गीतेत "अनिकेत" असा शब्द आला आहे - म्हणजे ज्याला घर नाही तो असा सरळ अर्थ असताना माऊलींनी मात्र "हे विश्वचि माझे घर" म्हणून जी कमाल केली आहे त्याला तोडच नाहीये .....
खरा भक्त कसा असतो तर असा - चर आणि अचर मीच होऊन राहिलो आहे असा ज्याचा बोध आहे तो.
या भक्ताला भोवतालच्या जगताचा कधीही व्याप होत नाही - उलट त्याला अवघे विश्व हेच विश्रांती स्थान बनून जाते......
आपली सर्वसाधारण लोकांची मन:स्थिती लक्षात घेता हा भक्त माऊलींनी कुठल्या उंचीवर नेऊन ठेवलाय हे सहज ध्यानी यावे.
निसर्ग, त्यातील प्राणीमात्र हे कायमच आहे त्या परिस्थितीशी मिळते जुळते घेतात - त्याबद्दल कधीही रोष व्यक्त करीत नाहीत, त्याला दूषणे देत रहात नाहीत - भले त्यांचे मरण जवळ आले तरीही....... माणूसच असा करंटा की कायम त्याला प्रॉब्लेम्सच दिसत असतात, तो स्वतः ते निर्माण करतो व पुढे त्याकरता दु:खीही होत रहातो.....
चितमपल्ली का अशाच कोणी पक्ष्यांना योगी म्हटलंय - आजच्या क्षणात ते जगतात, काही साठवून ठेवत नाहीत, निसर्गनियमानुसार वागतात, त्यात पिल्लांचे संगोपन वगैरे सर्व आलेच. - ही पिल्ले आपल्या म्हातारपणी आपल्याला सांभाळतील असा काही भाव नसतो. पुढे जेव्हा मृत्यू येतो तेव्हा विनातक्रार स्वीकारतात...
शशांक, मस्तच. खुप आवडलं
शशांक, मस्तच. खुप आवडलं
जाई गोरेगाव पश्चीमेला एम जी
जाई गोरेगाव पश्चीमेला एम जी रोड वर आणि ए स व्ही रोड वर ओशिवरा च्या दिशेने जाताना गणपती मंदीराच्या अलीकडे अशा दोन ठीकाणी चेक करू शकतेस. जाइ ची वेल नाजूक असते त्या मुळे शक्यतो पावसात लाव.
जागु मला हवा गावठी
जागु मला हवा गावठी गुलाब्...मी येते तुझ्याकडे...अस मी गेले तीन वर्ष म्हणते आहे
आम्च्य इकडच्या नर्सरीत बघते मिळतो का
सुप्रभात. व्वा! शशांकजी
सुप्रभात.
व्वा! शशांकजी मस्तच.
हा आहे माझ्याकडचा गावठी
हा आहे माझ्याकडचा गावठी गुलाब.
शशांक.. वाह!! इथल्या फुलांचे
शशांक.. वाह!!
इथल्या फुलांचे फोटो काढीन लौकरच!!!बाहेर जाताना नेहमी कॅमेरा जवळ ठेवीन आतापास्न.. पटकन काढता येतील फुला,झाडांचे फोटो..
इथे मोठमोठाल्या बागा , शहरभर जागोजागी केलेल्या आहेत. बागेत मोठाले डेरेदार वृक्ष , फुलझाडं, खुल्या हवेत व्यायाम करण्याचे महत्व जाणून पब्लिककरता व्यायामाची विविध साधने ठेवलेली आहेत कायम स्वरूपात. बहुतेक बागांमधे नि:शुल्क प्रवेश आहे. तरीसुद्धा झाडं,लॉन्स,इक्विपमेंट्स अतिशय टापटीप आणी स्वच्छ आहेत. काहीच तुटकं फुटकं, खुरटलेलं, अस्वच्छ असं काहीही दिसून येत नाही.
इथे मोठमोठाल्या बागा , शहरभर
इथे मोठमोठाल्या बागा , शहरभर जागोजागी केलेल्या आहेत. बागेत मोठाले डेरेदार वृक्ष , फुलझाडं, खुल्या हवेत व्यायाम करण्याचे महत्व जाणून पब्लिककरता व्यायामाची विविध साधने ठेवलेली आहेत कायम स्वरूपात. बहुतेक बागांमधे नि:शुल्क प्रवेश आहे. तरीसुद्धा झाडं,लॉन्स,इक्विपमेंट्स अतिशय टापटीप आणी स्वच्छ आहेत. काहीच तुटकं फुटकं, खुरटलेलं, अस्वच्छ असं काहीही दिसून येत नाही. >>>> वर्षू - त्या बागांचे फोटो टाकच इथे, पण ती व्यवस्थित असलेली व्यायामाची साधने व सर्व टापटीप पहायला मी जास्त उत्सुक आहे - या सर्वांचे मोठमोठे बॅनर्स करुन भारतात सर्वत्र झळकवण्याची गरज आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या असतानाही जर चीन हे करु शकत असेल तर मग भारत का मागे रहातोय - या सार्वजनिक स्वच्छता व टापटीपीत ?????
एकूण मानसिकता बदलायची गरज आहे
एकूण मानसिकता बदलायची गरज आहे आपल्याला..
आजतागायत पब्लिक प्रॉपर्टी ला कुणाचीच ना समजून रस्तावरचे दिवे फोडण्यात, झुडपांना झोडपण्यात्,पाण्याचे पाईप्,नळ चोरण्यात, सार्वजनिक बागांमधे घाण करण्यात, बीचेज वर, घराबाहेर कचरा करण्यात आणी इतर अश्या अनेकानेक गोष्टी करण्यातच अभिमान वाटत असेल तर अश्या जनतेचं काय करावं...
शशांक, प्रसन्न वाटले
शशांक, प्रसन्न वाटले वाचून.
०००
सध्या सकाळी मी ऑफिससाठी तयार होऊन बाहेर पडलो, कि एका पक्ष्याचा खास आवाज ऐकू येतो
उक उकूकूक कू -- कूट रु असे ओरडणे असते. हे मी भारतातही ऐकलेय. पुस्तकात असे कळले कि नर आणि मादी,
दोघे मिळून असे आवाज काढतात. कूट रु हि मादीची भर. पण याचे टायमिंग एवढे परफेक्ट असते कि एकच पक्षी
ओरडतोय असे वाटते. आवाज बर्यापैकी मोठा असतो, आणि कोलाहलातही नीट ऐकू येतो. आधी मला हे माकडाचे ओरडणे वाटायचे.
पण नावाबाबत मात्र मला शंका आहे. पुस्तकात त्याचे नाव सिमिस्टर बॅबलर असे वाचले. बॅबलर नावाचे दोन पक्षी आहेत. आपल्या सातबायांना पण बॅबलरच म्हणतात. हा पक्षी असा आवाज काढताना मी कधी प्रत्यक्ष बघितला नाही. आवाजाच्या रोखाने शोधूनही कधी दिसला नाही.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=4hSvpn4JmkI
तू नळीवर सदर्न आफ्रिकाचे पक्षी त्यांच्या आवाज आणी नावासकट इथे पाहा..
दिनेश दाने लिहिल्याप्रमाणे आवाज काढणारा पक्षीही दिस्तोय नाव वेगळंच आहे मात्र..
रीमा थँक्स बघते मुंबैत झाड
रीमा थँक्स
बघते
मुंबैत झाड लावायची म्हणजे हजार कटकटी
एकतर जागा कमी
माझ्याकडे तर पाणी गळत बिल्डीग रंग खराब होते म्हणून नकारच दिला होता
तरीपण विनंती करुन परवानगी मिळवलीय
वर्षू मस्त आहे ती क्लीप. पण
वर्षू मस्त आहे ती क्लीप. पण हा पक्षी नेहमी लपूनच गातो
सुसंध्याकाळ वैशाली, शांकली
सुसंध्याकाळ
वैशाली, शांकली :स्म्ति:
जिप्सि फारच सुंदर फोटो आहेत.
शशांक मी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली आहे. रोज फक्त एखाद पानच वाचते. चांगल वाटत वाचताना.
वर्षू, दिनेशदा तुमच्याकडचे फोटो लवकरच पहायला मिळतील आम्हाला.
जागु हा धनेश आहे का? मागच्या
जागु हा धनेश आहे का?
मागच्या आठवड्यात याची जोडी आमच्या ईथे आली होती. त्याआधी कधी दिसली नव्हती आणि नंतरही कधी दिसली नाही.
हो आस हा धनेश आहे. आमच्याइथे
हो आस हा धनेश आहे. आमच्याइथे रोज येतात. जोडीही आहे आणि पिल्लेही. हल्ली पिल्ले दिसत नाहीत जोडी दिसते.
जाई, कुंड्यांच्या खाली छोटी
जाई, कुंड्यांच्या खाली छोटी प्लॅस्टिकची ताटली ठेवली की पाणी भिंतीवर किंवा खाली गळणार नाही. आणि जास्त फुलं यायला हवी असली तर पाणी रोज घालायचं पण प्रमाण एका कुंडीला एक पाणीप्यायचं भांडं घालायचं. म्हणजे आपोआपच खालच्या ताटलीतही पाणी कमी साठेल किंवा साठणारच नाही. बाल्कनी छोटी असेल तर जिरेनियम, डेझी, ऑफीस टाईम अशी रोपं लावायची. म्हणजे त्यांना एकतर सतत फुलं असतात आणि मेंटेनन्स कमी असतो. महिन्यातून एकदा आपला मिसळण्याच्या डब्यातला चमचा आसतो ना तो एक चमचा भरेल इतकं सुफला आणि युरिया समप्रमाणात (अर्धा अर्धा चमचा) खत घालायचं की झालं. खत घातल्यानंतर लगेच पाणी द्यायचं. खताचं हे प्रमाण दोन कुड्यांना मिळून एक चमचा असं बरंका! आणि कुंडी छोटी, आपली हँगिंग बास्केट असते त्या साईझला हे पाणी आणि खताचं प्रमाण...
शांकली चांगली माहिती खताचे
शांकली चांगली माहिती
खताचे प्रमाण फार काळजी पुर्वक बघावे लागते, माझ्या हातून घरातल्या ७-८ कुंड्यांमधे मी युरीया पाण्यात मिक्स करून दिला होता प्रमाण जास्तच झाले ३ दिवसात सगळी झाडे कोमेजून गेली
शोभाकडचा गावठी गुलाब मी
शोभाकडचा गावठी गुलाब मी माझ्याकडे लावायचा म्हटलं तर मला काय काय करावं लागेल? कसा लावायचा?
बरेच दिवसांनी आले. दिनेशदा,
बरेच दिवसांनी आले.
दिनेशदा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!
सगळ्यांचे फोटो छान. जागू, धनेश मस्तच आला आहे. गेल्यावर्षी याच दिवसात ऑफिसच्या आवारात दिसला होता. काल एक लहान घुबड पाहिले ऑफिसच्या आवारातच, सकाळी ११ वाजता. आवारात फुललेला पळस आता पार सुकु लागला आहे. फुललेला असताना छान केशरी सडा पडलेला असायचा.
जागु मस्त ग..... खाली
जागु मस्त ग.....
खाली प्लॅस्टिकच्या ताटल्या ठेवायची कल्पना चांगली आहे पण पावसाळ्यात काळजी घ्या, आमच्याकडे म्युनिसिपालिटीचे लोक येतात पावसाळ्यात चेक करायला. आणि ताटल्या असतील तर काढायला लावतात. डासाचे ब्रिडींग सेंटर...
शांकली, मागच्या पानावर
शांकली, मागच्या पानावर गोविंदीच्या फुलांचा फोटो आहे ना, तसेच फुल मला वाटते वाघाटीचे पण असते.
खुपदा जंगलात दिसते.
०००
आता या महिन्यात भायखळ्याला, फुले, फळे, भाज्या यांचे प्रदर्शन भरणार असेल. तारखांवर लक्ष ठेवा.
शांकली चांगली माहिती
शांकली चांगली माहिती धन्स
खताबद्दलच चांगल सांगितलस
मधु, तो पळसाचा सडा गोळा करुन
मधु, तो पळसाचा सडा गोळा करुन ठेवायला हवा होता. रंगपंचमीसाठी छान रंग करता येतो त्याचा.
आणि हो शुभेच्छांसाठी आभार.
गुलाबांच्या रोपांसाठी शेणखत
गुलाबांच्या रोपांसाठी शेणखत चांगल.
येस्स दिनेशदा, वाघाटी,
येस्स दिनेशदा, वाघाटी, पाचुंदा, गोविंदी हे सगळे एकाच फॅमिलीतले आहेत. कॅपॅरॅसी फॅमिलीतले!
स_सा, युरिया घालताना खरंच खूप काळजी घ्यावी लागते. म्हणूनच अगदी छोट्टूस्सा चमचा घालायचा.
कुंडीत पाणी माफकच घातलं की खाली ताटलीत साठत नाही...:स्मित:
हो गं शांकली पण पावसाळ्यात
हो गं शांकली पण पावसाळ्यात पाणी साठतं ना त्याच्यात. आणि आमच्याकडे डास भरपुर आहेत.
सुसंध्याकाळ. मोहोर सगळ्या
सुसंध्याकाळ.
मोहोर सगळ्या आंब्यांवर आता झळकू लागला आहे.
Pages