निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर
फोटो छानच आहेत ( पण
फोटो छानच आहेत ( पण फोटोग्राफरचे श्रेय जास्त आहे कारण जागा छोटी वाटतेय ) कलेक्शन पण छान दिसतेय.
पडवळाच्या फुलाचा म्हणून जो फोटो टाकलाय तो रानपडवळाच्या फुलाचा वाटतोय. गुलाबी केळी पण मस्त दिसताहेत.
जो-एस मला तो सोनटक्का हवा
जो-एस मला तो सोनटक्का हवा आहे. मी गेले २-३ वर्षे त्याच्या शोधात आहे. आमच्या नर्सरीवाल्यांना पण सांगितले आणायला पण तेही नाही आणत. तुम्ही कुठे राहता?
गौरी छान आहे नर्सरी.
नि.ग. चा १३ वा भाग रात्री पर्यंत टाकते. जिप्सी तुला जर एखादा कोलाज देता आला तर पटकन मेल कर.
नि.ग. चा १३ वा भाग रात्री
नि.ग. चा १३ वा भाग रात्री पर्यंत टाकते. जिप्सी तुला जर एखादा कोलाज देता आला तर पटकन मेल कर.>>>>>>>>>निगच्या येणार्या १३ व्या भागाबद्दल सर्वांचे अभिनंदन! (मी निशाचर नाही)
@ स्वाती आंबोळे, सावता
@ स्वाती आंबोळे, सावता माळ्यांची ती ओळ 'लसूण मिरीं कोथिंबीर,अवघा झाला माझा हरी' अशी आहे. मिरची हे नाव सुद्धा मिरीशेंग पासून आलेले आहे. गोवा, कोंकण कारवार भागात मिरशेंगो, मिरशँगो, मिरश्यांगो असेच म्हणतात. इंग्लिश मध्येही मूळ पेपर्सच. नंतर रेड पेपर्स किंवा चिली पेपर्स ब्लॅक पेपर्स पासून वेगळे दाखवण्याकरता.
@हीरा, धन्यवाद. माझ्या
@हीरा, धन्यवाद.
माझ्या वाचनात तुम्ही म्हणता ती व्हर्जन आलेली नाही, पण तुमच्या पोस्ट्स सहसा अभ्यासपूर्ण असतात. त्यामुळे तसेही असू शकेल.
नि. ग. च्या पुढच्या भागास
नि. ग. च्या पुढच्या भागास शुभेच्छा
अरे वा! १००० पोस्ट झाल्या पण
अरे वा! १००० पोस्ट झाल्या पण आणि १२ भाग ! सर्वांचे अभिनंदन!
हीरा, मिरसांग म्हणजे मिरची.
हीरा, मिरसांग म्हणजे मिरची. कोकणी भाषेत मिरचीला मिरसांग म्हणतात, मिरीला नव्हे.
तसेच स्वातीने दिलेला आहे तसाच अभंग माझ्याकडील पुस्तकांत आणि इतरत्रही काही ठिकाणी सापडला. तुम्ही दिल्याप्रमाणे वाचण्यात आलेले नाही.
शैलजा, मिरची म्हणजेच मिरसांग
शैलजा, मिरची म्हणजेच मिरसांग आणि मिरसांग हे नाव मिरी या शब्दावरूनच आले आहे.असे प्रतिसादात म्हटले आहे. मिरी हे बीस्वरूपात वापरले जात असे/जाते, पण मिरची ही मिर्यासारखी तिखट वस्तू शेंगेसारखी दिसे म्हणून ती मिरसांग/मिरशँग. इंग्लिशमध्ये रेड पेपर्स. म्हणजे लाल मिरी.
तिखटपणासाठी फार पूर्वी मिरीच वापरत असत हे आज खरे वाटणार नाही. त्यामुळे सावतामाळ्यांनी लिहिलेला शब्द मिरचीच असणार असे सगळे धरून चालतात. अगदी नवसंकलकही.
दिनेश दा,काजू बद्दलकितीतरी
दिनेश दा,काजू बद्दलकितीतरी माहिती कळली, फारच इंटरेस्टिंग आहे,त्यात गौरी च्या छान छान फोटोंनी अजून भर पडली.
जागु,कट्टी फू..किती गोड...
खूप्प सुरेख आहे सोनटक्का..,जो!!
हो? कुठे वाचायला मिळेल ही
हो? कुठे वाचायला मिळेल ही माहिती हीरा? रोचक वाटते. माहितीचा मूळ स्रोत देता का?
माहितीचा मूळ स्रोत म्हणजे
माहितीचा मूळ स्रोत म्हणजे प्रदीर्घकालाचे वाचन. सहसा विकीच्या लिंक्स देऊन विधाने करण्याची माझी पद्धत नाही. कारण भारत आणि महाराष्ट्राविषयीची प्रचंड माहिती ठिकठिकाणच्या ग्रंथालयातल्या ग्रंथांत, पोथ्यांत धूळ खात पडलेली आहे. ती अद्याप विकीवर स्टँडर्डाइझ होऊन यायची आहे. पण ज्यांनी हे ग्रंथ वाचण्याची तसदी घेतली त्यांनी आपापल्या लेखनात त्याचे संदर्भ दिलेले आहेत. आणि हे लेखन सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक,आध्यात्मिक,प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या प्रकारचे आहे. ह्यातले थोडेफार वाचल्यावर प्रत्येकाची काही मते बनतात तशी माझीही बनलेली आहेत आणि तीच मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. तरीही चिली पेपर्स वरची एक लिंक देत आहे. तीतही एका शास्त्रज्ञाने भिन्न मत मांडलेले आहेच. भिन्न मते ही असायचीच, त्याबाबतीत आग्रह नाही
http://en.wikipedia.org/wiki/Chili_pepper
सुप्रभात. हे घ्या आणखी काजू.
सुप्रभात.
हे घ्या आणखी काजू.
माहितीचा मूळ स्रोत म्हणजे
माहितीचा मूळ स्रोत म्हणजे प्रदीर्घकालाचे वाचन >> मस्तच की! पुस्तकांची नावे सांगा ना मग. ते तर विकी लिंकांपेक्षा उत्तम. आगाऊ धन्यवाद!
निसर्गाच्या गप्पा (भाग -
निसर्गाच्या गप्पा (भाग - १३)
http://www.maayboli.com/node/41996 ईथे सुरु झाला आहे.
रच्याकने शोभा काजुचे प्रचि सुंदर आहेत, गावची आठवण आली गावाक जाऊक व्हया
@ शैलजा, काय काय वाचले आहे ते
@ शैलजा, काय काय वाचले आहे ते व्यनि .मध्ये लिहीन थोड्या दिवसांत. एक तर हा नि.ग-१२ धागा आता बंद होईल. दुसरे म्हणजे मी अमुक अमुक किंवा इतके इतके वाचलेय हे जाहीर सांगणे योग्य नाही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यातले फारच थोडे वाचन 'खास निसर्गाविषयीची पुस्तके' या स्वरूपाचे आहे. त्यामुळे नि.ग. ची जागा अडवण्यात अर्थ नाही. धन्यवाद.
हीरा, एका पुस्तकाचं नाव
हीरा, एका पुस्तकाचं नाव सांगायला इतके आढेवेढे?
>> मी अमुक अमुक किंवा इतके इतके वाचलेय हे जाहीर सांगणे योग्य नाही
का बुवा? वाचन ही इतकी लज्जास्पद बाब आहे का?
नसेल संदर्भ सापडत तर सांगा की तसं. कोणी शिक्षा करणार नाही.
एका पुस्तकातून मते बनत
एका पुस्तकातून मते बनत नाहीत.शिवाय वाचन हे कोणास लज्जास्पद नाही, तसे कोणी मिरवावे असेही नाही. तात्पुरत्या म्हणजे नि.ग.च्या संदर्भासाठी तीन चार शब्दकोश, व्युत्पत्तीकोश चाळले,(खरी तशी जरूर नव्हती) मोल्स्वर्थ मध्ये मिरची हा शब्द नाही. अॅन फेल्डहाउस-शंगो. तुळ्पुळेमध्येही नाही. कृ.पां.कुलकर्णीमध्ये मिरची/मिरी एकाच अर्थाने,एकाच टिपेमध्ये दिले आहे. जुन्या ऐतिहासिक वाङ्मयात,ज्ञानेश्वरी,दासबोध मध्ये मिरचीचा उल्लेख नाही.(ज्ञानेश्वरीमध्ये मिरीचा आहे.).दासबोधामध्ये बचनागासारख्या वनस्पतीचा उल्लेख आहे. त्या त्या काळचे संदर्भ मिळवताना त्या काळातली पुस्तके वाचावी लागतात, ती केवल वनस्पतीशास्त्राची नसतात. इथे यादी न देण्याचे कारण ती भली मोठी होईल शिवाय नि.ग. हे असल्या याद्यांचे आणि मी किती वाचलेय ते दाखवण्याचे स्थान नाही. आणि पुन्हा एकदा,: -एखाद्या काळच्या समाजाविषयी लिहिताना एकच पुस्तक कधीही आधारभूत होऊ शकत नाही-.
आता थोडी नावे लिहिणे भाग पडले आहे. धार्मिक ज्ञानेश्वरी,गुरुचरित्र, दासबोध,गाथा, गीता, संतचरित्रे,सुंदरकांड, ल.रा.पांगारकर, ज.र.आजगावकर आणि आणखी कित्येक
सांस्कृतिक महादेवशास्त्री जोशींचे सर्व खंड ,सानेगुरुजी,विनोबा (समग्र), वामनदुभाषी, आत्रे(गावगाडा) सातवळेकर,चित्रावशास्त्री,चिन्तामणरव वैद्य:,भागवत,संपूर्ण रामायण, महाभारत,त्यावरची अनेक पुस्तके विशेषतः इरावतीबाई(समग्र) दुर्गाबाई(बहुतेक सर्व)
तात्विक, ऐतिहासिक नरहर कुरुंदकर,पु.ग.सहस्रबुद्धे, पु.य देशपांडे, स. ह..देशपांडे,विश्वनाथ खैरे,बारलिंगे,फडकुले राचिं ढेरे(समग्र)अनेक चरित्रे, आत्मचरित्रे(पथिक,दिवस असे होते,कर्हेचे पाणी,जीवनसेतू,टिळक चरित्र, अरुण टिकेकरांचे खूपसे लिखाण, श्रीपाद जोशी यांचे लिखाण( या दोघांच्या लेखनात विपुल संदर्भ सापडतात) अ.का.प्रियोळकर,कोसंबी,सरदेसाई, शेजवलकर,म.वा.धोंड,स्मृतीचित्रे, काशीबाई कानेटकर,ताराबाई शिंदे रमाबाई रानडे कितीतरी स्त्रियांची आत्मचरित्रे (स्नेहप्रभा,आनंदीबाई विजापुरे आशालता सावे, हंसा वाडकर,लीला चिटणीस, रास(सुमा करंदीकर) रागिणी पुंडलिक, मल्लिका अमरशेख आणि अर्थातच कितीतरी
ललित: मुंबईविषयी बहुतेक सर्व लिखाण (फाटक,गाडगीळ,माडगावकर,शारदा द्विवेदी,ठाणे गॅझेटीअर्,मुंबई गॅझेटीअर, पुन्हा अरूण टिकेकर आदि) कथा कविता कादंबर्या पेंडसे,समग्र, गोनी समग्र,दळवी समग्र, मर्ढेकर गौरी,सानिया, मेघना, नीरजा,प्रज्ञा, इंदिरा,शांताबाई शेळके,बहुतेक दलित-विद्रोही साहित्य(हेही संदर्भांनी भरलेले) आनंद यादव, शंकर पाटील,खरात, सोनकांबळे,नामदेवढसाळ, सुर्वे दया पवार, इ. रणजित देसाई, विश्वास पाटील, अलीकडचे बांदेकर, इंगळे-उंत्रादकर, बारोमास पुस्तक, बोकील, श्रीपाद दाभोलकर यांचे शेतीविषयक लेख, गिरीश प्रभुणे, विनय हर्डीकर,स्त्रीमुक्तीविषयक लिखाण, अनुवादित साहित्य (बंकिमचंद्र, शरदबाबू,रवीन्द्रनाथ, भैरप्पा, मानसी, तस्लीमा, मंटो, अमृता प्रीतम्,किचन पोएम्स्(धीरुबेन), कुंदनिका कापडिया, काका कालेलकर, वरेरकर, पुशि रेगे, मेपु रेगे, विजया राजाध्यक्ष,रत्नाकर मासिकाचे जुने अंक, हंसमोहिनी चे जुने अंक, विद्याधर पुंडलीक, गोखले, गाडगीळ, भावे. व्यंकटेशमाडगूळकर (हे पुन्हा संदर्भबहुल), ग.दि. एकोणिसाव्या शतकातील उत्तरार्धातील साहित्य, विसाव्या शतकाचे सुरुवातीचे साहित्य, नासीफडके, खांडेकर,आपटे, कवठेकर,वि.वा्हडप, नाथमाधव, वि.भि. कोलते यांचे महानुभावसाहित्यावरील लेखन,गत्र्यं माडखोलकर, गडकरी,तांबे, बोरकर,खाडिलकर,बेडेकर, हरीभाऊ मोटे, शंगो. तुळपुळे, दोन्ही महायुद्धांचे इतिहास व त्यावरील भाष्ये, अनेक प्रवासवर्णने,समीक्षा, संगीतसमीक्षा,चित्रपट इतिहास, विज्ञानैतिहास,किर्लोसकर,गंधर्व कंपन्यांचे इतिहास रोझेस इन डेसेंबर,हिमालयन ब्लंडर,आणि अनेक भारतीय इंग्लिश पुस्तके, नेहरू,गांधी,सावरकर,नागगोरे,एसेम जोशी,डांगे, गोविंद तळवलकर, यदि फडके............अनेक इंग्लिश लेखक,.. या सर्वांमध्ये निसर्गाचे आणि तत्कालीन परिस्थितीचे उल्लेख ठायी ठायी सापडतात. या सर्वांनी व इतर अनेकांनी माझे संदर्भ समृद्ध केले आहेत. शिवाय वर नि.ग.च्या यादीत समाविष्ट असलेली बहुतेक पुस्तके.
असो हा विषय खूपच भरकटला. या विषयावर आता लिहिणे नको. व्यक्तिगत तर नकोच नको. माझ्यापुरता हा विषय मी संपवीत आहे. नि.ग. च्या वाचकांनी या सक्तीच्या व नाखुषीच्या अवांतराबद्दल माफ करावे.
ऑनलाइन मोल्सवर्थमधे मिरची हा
ऑनलाइन मोल्सवर्थमधे मिरची हा शब्द आहे.
>> Molesworth, J. T. (James Thomas). A dictionary, Marathi and English. 2d ed., rev. and enl. Bombay: Printed for government at the Bombay Education Society's press, 1857
असा उल्लेख आहे वेबसाइटवर.
तसंच सावता माळ्यांच्या अभंगाचा तुम्ही उल्लेख केलेला पाठभेद कुठे वाचता येईल असा प्रश्न होता, ज्याचं उत्तर तुम्ही दिलंच नाहीत.
असो.
तुमचा मुद्दा तरीही लक्षात आला. धन्यवाद.
हीरा, मुद्दा लक्षात आला.
हीरा, मुद्दा लक्षात आला. वरचा वाचनाचा आवाका बरा आहे. ह्यातली बरीचशी पुस्तके मीही वाचली आहेत हे नम्रपणे नमूद करु इच्छिते,( आणि बर्याच मायबोलीकरांनी ही व ह्याहून अधिकही पुस्तके वाचली असतील ह्याबद्दल मला अजिबात शंका नाही, मायबोलीकर खरोखर अतिशय व्यासंगी आहेत ). पण त्यातून
१. सावता माळ्याचा तुम्ही म्हणता तसा अभंग पाहिलेला नाही
२. मिरी म्हणजे मिरसांग वा मिरीपासून पुढे ह्या व्युत्पत्ती आल्या असाही उल्लेख नाही
३. शिवाजीमहाराजांना मिरची/ काजू माहित नव्हते हाही उल्लेख पाहिलेला नाही.
कदाचित माझ्या नजरेतून हे उल्लेख सुटले असण्याचीही शक्यता आहे, नाकारीतही नाही, पण एकूणात तुमचा मुद्दा लक्षात आला, म्हणजे खरं तर मूळ मुद्दे बाजूलाच राहिले, तुम्ही एकाचंही उत्तर दिलं नाहीत, पण असो. तेह्वा आता धागा बंद झाला तरी चालेल. धन्यवाद.
काहीतरी ठोस वाचायला मिळेल असे मला वाटले होते.
हीरा, छान माहिती. तुमचे
हीरा, छान माहिती. तुमचे प्रतिसाद नेहमीच अभ्यासपूर्ण असतात.
नि.ग. च्या वाचकांनी या सक्तीच्या व नाखुषीच्या अवांतराबद्दल माफ करावे.>>>>अवांतर बिलकुल नाही आहे. अजुन माहिती येऊ द्या. वाचायला आवडेल.
कारण भारत आणि महाराष्ट्राविषयीची प्रचंड माहिती ठिकठिकाणच्या ग्रंथालयातल्या ग्रंथांत, पोथ्यांत धूळ खात पडलेली आहे. ती अद्याप विकीवर स्टँडर्डाइझ होऊन यायची आहे.>>>>>+१
मिर्चीवरील मतं वाचली. पण
मिर्चीवरील मतं वाचली.
पण अजूनही इथे कोणी पिंपळी (किंवा लाँग पेपर) बद्दल लिहिले नाही. (अर्थात मी गेले दोन पानंच वाचले आहेत.) मिर्ची ऐवजी भारतात पिंपळी जी देखील तिखट असते, ती वापरात होती. त्यामुळे असे भारतात तिखटाचा थोडा वेगळा प्रकार आधीपासूनच होता. पुराव्यासाठी आर्युवेदा मध्ये पिंपळी बद्दल बरीच टिप्पणी आहे.
काळी मिरी आणि पिंपळी http://en.wikipedia.org/wiki/List_of_Indian_spices इथे दोन्ही वेगवेगळ्या दिसतील.
केदार, पिंपळीबद्दल चर्चा
केदार,
पिंपळीबद्दल चर्चा निगच्या १३ व्या भागात चालू आहे.
http://www.maayboli.com/node/41996
केदार, भारतात तिखटपणासाठी
केदार, भारतात तिखटपणासाठी आले(सुंठ) आणि मिरी वापरले जात असे. मायबोलीवरच्याच अन्नं वै प्राणा: या मालिकेत मानसोल्लासाच्या प्रकरणात मिरचीचा उल्लेख नाही. मात्र सुंठ आणि मिरेपूड स्वादासाठी वरून घेत, असा उल्लेख आहे.
आता मिरची या शब्दाचा शोध घेता घेता एकदोन मजेशीर बाबी आढळल्या. एका कोशात चित्रासह आणि एका कोशात फक्त माहिती अशा स्वरूपात गजपिंपळी चा उल्लेख आढळला. गजपिंपळी म्हणजे मिर्याची शेंग (घोस) असे चक्क फोटोसकट त्यात दिले आहे. मिरची शब्दाचाच शोध घ्यायचा असल्यामुळे ह्या नोंदीकडे फारसे लक्ष दिले नाही आणि लिहून घेतले नाही. आता पुन्हा ग्रंथालयात जाऊन धूळभरल्या संदर्भपुस्तकांची पुन्हा उलथापालथ करणे आले. पण विकीमध्ये मात्र गजपिंपळी(गजपिप्पली) या नावाखाली वेगळे झुडूप दिले आहे. आणि ते प्रातिनिधिक असावे. अर्थात प्रादेशिक नावे वेगवेगळी असतात त्यामुळे आपला शोध भलत्याच दिशेला जातो. चाकवताच्या बाबतीतही असेच झाले. चाकवत शब्द टाईप केला असता टाकळा आणि/किंवा तराट्/तरवटाची माहिती आढळली. नंतर केनोपोडिअम अल्बम एल या नावाखाली चाकवत आढळला पण त्यातही याला बटुआ, बथुआ असेही म्हणतात हेही दिले आहे. वास्तविक हा बटुआ मराठीत चंदनबटवा होतो आणि तो किंचित वेगळा असतो. विकीवरची माहिती व्यवस्थित संदर्भ लावून वापरायला हवी हे खरे.
Pages