निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर
अनिल. जो_एस........ फार सुंदर
अनिल. जो_एस........ फार सुंदर आलेत फोटो.
जिप्सी, गुलाबी केळफूल फार गोड दिस्तंय! राणी बागेत गस्टाव्हिया नावाचं फूल फुलतं या दिवसात. मागे नि ग वरच्याच एका भागात राणीबागेतल्या फुलांबद्दल, वृक्षांबद्दल चर्चा झाली होती तेव्हा कुणी तरी, एका व्यक्तीने तिथल्या फुलांची साईट केली होते त्याचा रेफरन्स दिला होता. ते आत्ता अचानक आठवलं तुझ्या केळ्फुलाच्या फोटोवरून. जमल्यास ती गस्टाव्हियाची फुलं दिसली तर इथे फोटो डकव ना.
अरे किती धावतोय धागा.
अरे किती धावतोय धागा.
सगळ्यांचे फोटो अप्रतिम आहेत.
जवळ जवळ तिन वर्षे झाली मी ह्याचा कंद लावून वाट पहात होते फुल यायची. ह्या वर्षी आले आणि खुप आनंद झाला.
अमॅझॉन लिली ना? सुंदर..
अमॅझॉन लिली ना? सुंदर..
राणी बागेत गस्टाव्हिया नावाचं
राणी बागेत गस्टाव्हिया नावाचं फूल फुलतं या दिवसात. मागे नि ग वरच्याच एका भागात राणीबागेतल्या फुलांबद्दल, वृक्षांबद्दल चर्चा झाली होती तेव्हा कुणी तरी, एका व्यक्तीने तिथल्या फुलांची साईट केली होते त्याचा रेफरन्स दिला होता. ते आत्ता अचानक आठवलं तुझ्या केळ्फुलाच्या फोटोवरून. जमल्यास ती गस्टाव्हियाची फुलं दिसली तर इथे फोटो डकव ना.>>>>>>शांकली, ती लिंक मीच दिली होती. बॉटनिस्ट शुभदा निखारगे यांचे फोटोज आहेत फ्लिकरवर. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्यासोबतच कुलाब्याच्या सागर उपवनला जाऊन आलो.
हि गस्टाव्हिया फुलाची लिंक
http://www.flickr.com/photos/shubhada_nikharge/5633442705/in/set-7215762...
आणि हे मी राणीबागेत काढलेले काही फोटोज्
सुप्रभात लोक्स कापराचे
सुप्रभात लोक्स
कापराचे (कापूर) पान आणि त्यावरची अळी
वाळा (खस)चा तुरा
मुरूडशेंग
कवठ
जागुच्या फुलाने अगदी
जागुच्या फुलाने अगदी डॅफोडिलची आठवण करुन दिली. ही अॅमेझोन लिलि आहे काय??
बरं, महत्वाची गोष्ट ही की मुलीचा फोटो पाहताच मुलाच्या आईने 'जेवणावळी नंतर घाला, पण आधी हीच मुलगी आत्तच्या आत्ता आणा' असा हट्ट धरलाय. पण मी मात्र काळजीत पडलेय. कट्टर मार्जारकन्या म्हणजे सैपाकघरात डल्ला मारणे तिचा जन्मसिद्ध हक्क असणार. म्हणजे दुध चोरुन पिणार. आमचा एस असा नाही हो..... दुधाकडे तो ढुंकुनही पाहात नाही, दिवसभरात सैपाकघरात पडून राहिल पण ओट्याबर उडी मारुन्दुघाच्या टोपात तोंड घालायची कल्पनाही त्याच्या डोक्यात येत नाहि.. मग ह्या बयेचे आणि त्याचे जमणार कसे?? म्हणजे त्याचे जमेल एकवेळ पण आमचे जमणार कसे....
ऐशु एसची मनधरणी करतेय की एकदाचे हो म्हण, वंशाला दिवा नाही मिळाला तर छोट्या छोट्या पांढ-या शुभ्र पणत्या आम्ही आनंदाने स्विकारु.... पण एकदाचे हो म्हण..
नव-यामुलाचा फोटो लवकरच टाकण्यात येईल.. आणि हो, आजचाच फोटो टाकण्यात येईल. बिलुचा आजचा फोटो नाहीये काय? की बालपणाचे गोंडस फोटो टाकुन घोडनवरीला खपवायचा बेत आहे???
आमच्या एसला सगळ्याच गोष्टींची भिती वाटते. त्यामुळॅ लग्नात नवरी, करवल्या आणि व-हाडी मिरवताहेत आणि नवरा नवरीच्या खुर्ची खाली लपलाय असे दृष्य दिसेल.
सगळ्यात महत्वाचे म्हणाजे आमचा एस इजिप्शिअन ब्रॉन्झ माऊ हे हो.. उच्च कुलिन.. त्यामुळे आम्ही हुंडा अगदी दाबुन घेणारोत.. मुलीच्या घरच्यानी योग्य ती तयारी ठेवावी...
http://en.wikipedia.org/wiki/Egyptian_Mau
गस्टाव्हिया, अॅमेझोन लिलि,
गस्टाव्हिया, अॅमेझोन लिलि, कापूर (त्यावरील रंगीत अळी), कवठ वगैरे सर्व फोटो मस्तच...
सगळ्यांना मनापासून धन्स .....
(No subject)
समस्त मार्जार गटाच्या
समस्त मार्जार गटाच्या पालकांनो होउन जाउद्या दणका
लग्नातील सोहोळयाचे फोटो पाठवा बरे.
आमचा एस इजिप्शिअन ब्रॉन्झ माऊ
आमचा एस इजिप्शिअन ब्रॉन्झ माऊ हे हो.. उच्च कुलिन.. >>> साधना, फोटोवरुन चांगलेच लक्षात येतंय हो - व्हेरी व्हेरी स्मार्ट अँड अॅरिस्टोक्रॅट आल्सो....
मुलीला मिश्या... दिनेश दा
मुलीला मिश्या...
दिनेश दा मला मुख्य पाहुणी बनवल्या बद्दल धन्यवाद... आता वर वधू च्या पंगतीतले उत्तम मासे मलाही वाढण्यात येतील.. ना जागु?????
वर वधूनी खाऊन काही उरले तर
वर वधूनी खाऊन काही उरले तर आपल्याला मिळणार...... एस इतका मासेभक्त आहे की जोपर्यत त्याचे पोट टम्म भरुन तो तिथेच कोसळत नाही तोवर तो खायचे थांबवतच नाही... मासे खाऊन झाल्यावर त्याला बघायचे, नेहमीचा सुडौल बांधा मधेच फुगल्यासारखा दिसतो.
सर्वच प्रतिसाद मुलीला
सर्वच प्रतिसाद
मुलीला मिश्या...
दिनेशदा, कामांची वाटणी छानच.
ऐशु एसची मनधरणी करतेय की एकदाचे हो म्हण, वंशाला दिवा नाही मिळाला तर छोट्या छोट्या पांढ-या शुभ्र पणत्या आम्ही आनंदाने स्विकारु.... पण एकदाचे हो म्हण..
नव-यामुलाचा फोटो लवकरच टाकण्यात येईल.. आणि हो, आजचाच फोटो टाकण्यात येईल. बिलुचा आजचा फोटो नाहीये काय? की बालपणाचे गोंडस फोटो टाकुन घोडनवरीला खपवायचा बेत आहे??? स्मित
आमच्या एसला सगळ्याच गोष्टींची भिती वाटते. त्यामुळॅ लग्नात नवरी, करवल्या आणि व-हाडी मिरवताहेत आणि नवरा नवरीच्या खुर्ची खाली लपलाय असे दृष्य दिसेल. स्मित>>>>>>>>>>>>>>साधने,
जागू, जिप्स्या, फोटो मस्तच.
जागू, जिप्स्या, फोटो मस्तच.
धंन्यवाद मित्रांनो जिप्सी
धंन्यवाद मित्रांनो
जिप्सी फुलं, आळी आणि पुढचे फोटो भारीच आहेत. मस्त
दापोलीला गेलो होतो तिथे हे भेटले ...
जो_एस, छान फोटो.
जो_एस, छान फोटो.
जमलं तर ! लवकरचा मुहुर्त धरा
जमलं तर ! लवकरचा मुहुर्त धरा !
(मुलगा घोरतो आणि मुलीला मिशा आहेत, या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे )
जिप्स्या, ते गस्टाव्हीयाचे झाड अजून आहे का तिथे. असायलाच हवे. त्याच्याच बाजूला कमानीवर एक केशरी फुलांची वेल आहे. तूला दिसली का कधी ?
कवठाचे फूल खुप छान असते. त्याचे शास्त्रीय नाव फुलावरुनच पडलेय. तूझ्या गावाला खुप असतील झाडे.
माझ्या बघण्यात नेवासा, नरसोबाची वाडी, इंदूर, बडोदा इथे खुप आहेत. कोकणात मात्र नाहीत.
हुंड्यात १०० उंदीर द्या,
हुंड्यात १०० उंदीर द्या, म्हणजे झालं !
साधना माझ्याकडे पण असेच मांजर
साधना माझ्याकडे पण असेच मांजर आहे
जिप्स्या, ते गस्टाव्हीयाचे
जिप्स्या, ते गस्टाव्हीयाचे झाड अजून आहे का तिथे. असायलाच हवे. त्याच्याच बाजूला कमानीवर एक केशरी फुलांची वेल आहे. तूला दिसली का कधी ?>>>>हो दिनेशदा, अजुनही आहे ते झाड. त्या कमानीवरची फुले पाहिलीत. उद्या फोटो टाकतो.
जागुताई ,जो_एस,प्रचि छान आहेत
जागुताई ,जो_एस,प्रचि छान आहेत
जिप्सि प्रचि खासच त्या मुरूडशेंगा लहान मुलांच्या औषधात वापरतात ना.
कापुराच्या झाडापासुन कापुर कसा मिळवतात
हा वाळाच आहे का ?
हुंड्यात १०० उंदीर द्या, म्हणजे झालं ! >>>
साधनाताईंना हुंडा भारी पडणार बहुतेक
मांजर पुराण आणि त्याचे
मांजर पुराण आणि त्याचे प्रतिसाद भन्नाट
साधना आम्हाला आमंत्रण दे हो लग्नाच. मी मांडवासाठी सुक्या माशांची टोपली आणि लग्नासाठी ओल्या माशांची टोपली घेउन येते. शिवाय केळवणही करावच लागेलच.
बघा, जागूने मनावर घेतलंच..
बघा, जागूने मनावर घेतलंच.. चौघड्यासाठी लुई नगरकर बरोबर डॅनी उरणकर पण येतीला का ?
नितीन, वाळ्याची शंका असेल तर ते गवत उपटून बघ. मूळांना सुगंध असेलच. कापराच्या पानांपासून उर्ध्वपातन पद्धतीने कापूर करतात असे वाचले होते. मुरुडशेंग बाळाच्या पोटात मुरडा झाला तर देतात.
वा सर्व फोटो मस्तच! साधना
वा सर्व फोटो मस्तच!
साधना एसच्या विवाहासंबंधातलं हे लिखाण एकत्रित ठेव. नंतर वाचताना मजा येईल.
आणि हो पुढच्या विवाहात या नोट्स उपयोगाला येतील .
जिप्सी.......कापराच्या पानावरची अळी काय सुंदर कलरफुल आहे!
ही मुरूड शेंग मी बाळघुटीत वापरली आहे. जर बाळाला पोटात मुरडा येत असेल तर मुरुड शेंगेचे २ वळसे जास्त घ्यायचे!
अग्गोबाई.........वर(ब्राइडग्रूम) अगदी टॉल डार्क हॅन्डसम आणि पिशीची बिलू(वधू) अगदी गोरी भुरकी!
छान हो! म्हणतात ना......"सावळा वर बरा गौर वधूला, रुक्मिणी गोरटी कृष्ण काळा!"
मग ....पिशी आणि साधना............ करा बैठक!
मी येईन बरं बैठकीला( दोन लग्नांचे अनुभव आहेत गाठीला!)
दिनेशदा..........लुई नगरकरांचं काही खरं नाही. मांडवात काय हैदोस घालतील..............................!
एस अगदी हँडसम हं!! काय
एस अगदी हँडसम हं!! काय रुबाबात बसलाय! (साधना मार्जार वंश वाढवायला तयार आहे हे वाचून मला ४४० चे ४४० धक्के बसले! बहुधा लेकहट्टापुढे काही चाललेलं दिसत नाही! हे मी स्वगत म्हटलंय हं...) पुढची पोस्ट तिच्यासाठी आहे.....
एस आणि बिलूचं लग्न अगदी गाजतंय .................सगळ्याच पोस्ट्स मस्त!! आत्तापासूनच वरातीचे फटाके फुटायला सुरुवात झाली म्हणायची!!
जिप्सी, धन्स रे.... आणि सगळे फोटोज सुंदर. ती अळी काय गोड (!) (?) दिसतिये ना !!
जागू लिली सुंदरच गं... काय सुरेख आकार आणि रंग आहे!! (माझ्यासाठी एखादा कांदा वाळवून ठेवशील?)
ससे अगदी गोंडस आहेत....
अहो विहिणबाई, नाहियेत फोटो
अहो विहिणबाई, नाहियेत फोटो बिलूचे आत्ताचे..घरी गेले की पाठवेन नक्की..मुलगा बाकी राजबिंडा हो अगदी..
बिलू मासे आवडीने खाते शेजारी जाऊन.. बिलूची आई पक्की शाकाहारी आहे पण..
मानुषीताई, तुम्ही माझ्या बाजूने या..मला एकाही लग्नाचा अनुभव नाही.. :p
<<<हुंड्यात १०० उंदीर द्या,
<<<हुंड्यात १०० उंदीर द्या, म्हणजे झालं !>>>
माळ्यावर चढायला हवं आता..
या फुलाचं नाव काय? दिवाळीच्या
या फुलाचं नाव काय? दिवाळीच्या सुमारास आमच्या माडाच्या मुळात रान माजलं होतं..
साधनाताईंना हुंडा भारी पडणार
साधनाताईंना हुंडा भारी पडणार बहुतेक
आम्ही वराकडचे वरचढ लोक आहोत हो.. आणि १०० उंदीर पाठवुन काय होणारे? बिर्याणि करुनच पाठवावी लागेल. आमचा एस कच्चे मांस खात नाही. पहिले वहिले कबुतर मारले तेही त्याला खाता आले नाही, बिचारे एसने पकडलेय हे कळताच हार्टफेलने मेले.
शोभना.. काय करणार गं...बालहट्ट भारी असतात....
इथे लग्नाची तयारी चाललीय आणि एस मात्र आता तुझे लग्न आहे हे कानावर पडताच चावायला धावतोय, काय करावे बरे? नव-यामुलाला राजी करायला एखादी होंडा सिटी मागावी काय मुलीवाल्यांकडुन??????
चाहूल.......वसंताची पळस
चाहूल.......वसंताची
पळस पांगारा
शाल्मली (काटेसावर)
पळस
Pages