फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण या साड्यांचे बॉर्डर्स खुपच हेवी असतात....नॉरमल पिनअप केल तर पदर कसातरी बेंगरुळ पणे खाली येतो.....नाहीतर पदर सोडुन द्यायचा... थोडा शॉर्ट काढायचा म्हणजे लोळत नाही खाली

EF0911EDIFAS0032._peacock-design-kundan-stone-earrings.jpg

1_0.jpeg

वॉव ब्यूटीफुल इअरिंग्स..
अनिश्का, तूच त्या लेहंगा कम सारी चे फोटू टाक पाहू.. तुला मिळतायेत फोटू पटापटा

थांब

लेहेंगा स्टाईल साड्यांची प्रचंड फॅशन आहे... पण मला तो पैश्याचा अपव्यय वाटतो कारण अशा साड्या आपण जवळच्या नाते वाईकां शीवाय इतर लग्नात नाही नेसु शकत. खुपच सोशल व्यक्ती असेल तर ठीक नाही तर मग तो वेस्ट वाटतो. त्या पेक्षा इटालियन क्रेप वर भारतिय एम्ब्रॉयडरी किंवा जरदोसी खुप मस्त दिसतं. मी हल्लीच एक साडी घेतली भावाच्या लग्नात... किमती ६००० पुढे... खाली दाखवली आहे तशी माझी जांभळ्या रंगात आहे....

saree.jpg

lehenga-sarees-250x250.jpg

लहेंगा सरीच म्हणतात का या प्रकाराला??
मरमेड कट चा पेटीकोट शिमर मटिरिअल मधे. वर साडी लेस ची विथ बॉर्डर.. पण साडी म्हणजे नुसता साडीचा पल्लू असतो बहुतेक.. आणी प्रॉपर सारी ब्लाऊज

आजकाल प्री स्टिच्ज्ड (pre- stitched) साड्या मिळतात. मला तो प्रकार काही आवडला नाही. कधी तरी घालायला ठिक आहे. पण एकदम सुपर शेप मध्ये बॉडी असेल तर बरे नाहीतर अजागळ दिसेल ते प्रकरण असे माझे मत आहे.
ह्या अश्या,
Pre-Stitched-Sarees-682x1024.jpg

किंवा ह्या अश्या,
prestiched-2.jpg

माधवी>>>>>>>> हे कानातले इमिटेशन ज्वेलरी शॉप मधे मिळतात.....५००रु च्या पुढे...घेउनच टाक

ठाण्याला हस्तकला, शगुन, कलामंदिर ( ह्याच्या कडे तसर मधे ५० रंग आहेत आणि ३० ते ४० डिझाइनचे प्रकार आहेत आपण हवं ते काँबो निवडायचं... साधारण ८००० पासुन ही रेंज आहे... आपल्याला हवा तेवढा चॉइस मिळतो. तोच प्रकार क्रेप मधे बसत असेल तरी तो बनवुन देतो. साधारण १० दिवसात नवी साडी देतो) इकडे अशा प्रकारच्या साड्या मिळतात....

मी ५-६ वर्षां पुर्वी व्हायोलेट कलर तसर वर मोत्याचं काम करुन घेतलं होतं कला मंदिर कडुन... ती साडी माझ्या नातेवाईकात फार फेमस आहे...

अशा साड्या एकदा घातल्या जातात मग पडुन राहतात...... मगाशी मी ज्या साड्या सांगत होते तशा वपरल्या तरी जतात....

वर्षु तै ही लिंक बघ

,d.dGI&fp=6a807cf0a57fded&biw=1280&bih=709

झंपी, मी मागे दिलेल्या लिंक अशाच साड्यांच्या आहेत. खरचं अजागळ दिसेल? मी सिरियसली विचार करतेय तशी साडी घेण्याचा Sad

हां समथिंग लाईक धिस.. धन्यु मोकिमी..

पण इतकी भरजरी ब्रायडल असेल..
आपल्याला प्लेन चालेल लाईट गोल्ड मधे हल्की एम्ब्रॉयडरी.. Happy

ईरकली साड्या पण कधीतरी छान वाटतात पण मला कडक साड्या नेसाय्ला प्रॉबलेम होतो.....कठिण वाटते

पेरु,
मी ह्या अर्थाने म्हटले कारण फिगर चांगली असेल तर ठिक. मी गेल्या वर्षी भारतात गेले होते एका लग्नाला, जी ती आंटी अशीच साडी नेसून आलेली.
त्यात पंजाबी लग्न होते.. त्यांच्या फिगर विषयी .. Happy
हे मोठे पोट(पांढरे पांढरे पोट, त्यावर चमकी लावलेली... आता का विचारु नका. कारण साडी पारदर्शक होती),
मागून फ्लॉवरपॉट त्यामुळे मलाच कळेना की साड्यात घुसल्या कश्या.. मग कळले त्या खास शिवून घेतल्यात.

बाकी, ज्याची त्याची आवड हो. मला उगाच त्यांची चिंता वाटली...

पेरू.. हां अशी साडी!!!
शिवूनच मिळत असेल मापाची...

भारतात कुणी .' सुरक्षेत्र' हा कार्यक्रम पाहात असाल तर आयेशा टाकिया ला बघा.. पहिल्यांदाच इतकी सुंदर दिसत आहे. प्रायोजकांनी तिच्या ड्रेसेस वर खूपच मेहनत घेतलेली आहे..

धन्यवाद झंपी. पण माझी फिगर अजिबात सुपरशेप नाहीये आणि अगदी पंजाबी आंटींसारखी सुध्दा नाहिये. पण आता तशी साडी घेताना नक्की विचार करणार.

पेरु, तुम्ही एकदा रेडीमेड ट्राय तर करून पहा ना, दुकानात असतात बर्‍यापैकी साईजच्या.

Bride-shoe-collection-by-stylespk-gaillop-gerdagll_large_1.jpg

Pages