खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का?
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!
फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!
Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरक्षेत्र संपला ना बहुतेक?
सुरक्षेत्र संपला ना बहुतेक?
जिमी चू बघून उपयोग काय? कर्ज
जिमी चू बघून उपयोग काय? कर्ज घ्यावं लागेल एक जिमी चू घ्यायला!
(No subject)
अनिश्का १३:३० च्या पोस्टमधली
अनिश्का १३:३० च्या पोस्टमधली इयर्रिंग आहे तुझ्याकडे? कुठुन घेतलीस? मला हवीये तशी.
वर्षु, माझ्या मते फक्त
वर्षु, माझ्या मते फक्त पेटीकोट शिवुन घ्यावा लागत असेल. साडी नुसती त्या पेटीकोटला गुंडाळावी लागत असेल.
माझ्याकडे आहे एक लेहेंगा साडी पण ती घागर्या सारखी आहे, मरमेड स्टाइल नाही. ती फक्त पेटीकोट ला गुंडाळावी लागते. पण तिचा पदर मात्र मी नेहेमी मारवाडी स्टाइलनेच घेते, उलटा. आता असाही ट्राय करुन बघेल.
निधप...
निधप...
जिमी चू बघून उपयोग काय? कर्ज
जिमी चू बघून उपयोग काय? कर्ज घ्यावं लागेल एक जिमी चू घ्यायला!>> +१. मी तेच लिहीणार होते. जिमी चू... हाय
इथे स्टीव मॅडन पण महाग वाटतो.
मोराची???? आधी ती मला शोधावी
मोराची???? आधी ती मला शोधावी लागेल....तु राह्तेस कुठे???? मी तुला नेक्स्ट वीक मधे सांगते....
>> जिमी चू बघून उपयोग काय?
>> जिमी चू बघून उपयोग काय? कर्ज घ्यावं लागेल एक जिमी चू घ्यायला!

अगदीच
मला गिफ्ट मिळाली आहे तस्ली स्टिचड साडी. पिन्क आणि रस्ट ऑरेन्ज. अजून ट्राय नाही केली. काही मॅटरच नाहीये त्याला असे वाटतेय. ओढणीएवढी वाटते.
अरे पुरूषांसाठी काही फॅशन
अरे पुरूषांसाठी काही फॅशन ट्रेन्ड्स आहेत की नाही? काही दिवसांपुर्वी सुट्स आणि ब्लेझर बघत होतो, बहुतेक सगळ्या दुकानात सिन्गल ब्रेस्टेड, टु बटन , नॉच लेपल ब्लेझर होते म्हण्जे तोच सध्याचा ट्रेन्ड असेल
आमच्या यु.एस.ए. ( उल्हासनगर)
आमच्या यु.एस.ए. ( उल्हासनगर) ला मिळतात ना ड्युप्लीकेट जिमी चू... ५०० ते १००० रुपयात. ....
रच्याकने मी तेंव्हा एका सिल्क मील मधे उल्हासनगर ला ऑडिट ला जायचे, तिकडे काय वाट्टेल त्या ब्रँडचे शर्ट ( आर्थात डुप्लीकेट) बनवुन मिळायचे. तसेच हव्या त्या ब्रँड च्या चपला, पर्सेस... काय नी काय.... अनेक बडे सिनेमातले डिझायनर तिकडे चक्कर टाकतातच... त्यांच्या हाय प्रोफाईल क्लायंट ना दाखवायची रेंज वेगळी असते, पण ज्या ह्या उथळ श्रीमंत बायका असतात ज्यांना वाटते की हा ब्रँड घातला की आपली सोसायटी मधे इज्जत वाढेल, अशां साठी मग हे डिझायनर हा इंडियन यु.एस.ए चा माल इतक्या बेमालुम पणे बनवुन घेतात, की आपल्याला समजत पण नाही...... बरं त्यांच्या क्लायेंट ह्या येवढ्या श्रीमंत असतात की परत तीच वस्तु वापरायची वेळ फार कमी येते....
मोकिमी, तू लूईसवाडीतलं बुटिक
मोकिमी, तू लूईसवाडीतलं बुटिक म्हणते आहेस तिच्याकडे कॉटनच्या रेडीमेड कुर्ती असतात का? तसंच, त्या खुशबूकडे आणि ए.के.जोशीसमोरचा लखनवीवाला, दोघांकडेही लखनवी कुर्तीच्या साधारण काय किंमती आहेत?
मोकिमी, तू लूईसवाडीतलं बुटिक
मोकिमी, तू लूईसवाडीतलं बुटिक म्हणते आहेस तिच्याकडे कॉटनच्या रेडीमेड कुर्ती असतात का? तसंच, त्या खुशबूकडे आणि ए.के.जोशीसमोरचा लखनवीवाला, दोघांकडेही लखनवी कुर्तीच्या साधारण काय किंमती आहेत?>>>>
मंजुडी
लुईसवाडी वाली कडे कॉटन आणि शीफॉन दोन्ही असतात पण स्टॉक अत्ता लिमिटेड असेल. साधारण ४५० पासुन ते ७०० पर्यंत असतात. खुशबु कडे ७०० पासुन असतात. आणि ए.के. जोशी समोर ( खरं तर सत्यम जवळ पुर्वी तो रेनबो टेलर होता त्या लायनीत साधारण ५०० ते १००० पर्यंत असतात). पण माझं त्या सत्यम शेजारच्याशी फारसं पटत नाही. म्हणुन मी बर्याच दिवसात गेले नाही तिकडे....
ओके, थँक्यू! आणि तू
ओके, थँक्यू!
आणि तू पाचपाखाडीतलं एक बुटिक मागे रोहनला सांगितलं होतंस, त्याचं नाव विसरले मी.
तू पाचपाखाडीतलं एक बुटिक मागे
तू पाचपाखाडीतलं एक बुटिक मागे रोहनला सांगितलं होतंस, त्याचं नाव विसरले मी.>>>>
ते एम.ओ.डी. च्या शेजारचं "इन्फिनीटी" त्याची डिझायनर मालकीण रुची ९८२१९३२१२७. तिच्या कडे हटके माल मिळेल.... जरा महाग पण एकदम हटके... एस्पेशली ओढण्या.... वेगळ्याच असतात.... तिच्या कडे जुलै त जायचं तिकडे सेल असतो. एरवी १५०० ला मिळणारा सुट १००० मिळतो.....
ओह्...ते दुकान होय. ती
ओह्...ते दुकान होय. ती डिस्प्लेला का असे कपडे लावते मग? दुकानात शिरावंसं पण वाटत नाही. आता एकदा दुकानाच्या आत जाऊन बघून येईन नक्की. थँक्यू गं!
अगं ती फार आळशी आहे... आणि
अगं ती फार आळशी आहे... आणि मध्यंतरी तिचा पायाचा प्रॉब्लेम पण झाला होता. खुप काम असतं तिच्या कडे. सतत सगळे कामातच असतात... बहुतेक ठाण्यातल्या पंजाबीणी ( आणि पंजाबीणीं सारखी फिगर असणार्या माझ्या सारख्या मराठी) तिच्याच कडे ड्रेस शिवतात... तीने शिवलेली सलवार अप्रतिम असते.....
मी तिला नेहेमी म्हणते की बाई दुकानाचा अँबीयन्स बदल....
आणि पंजाबीणीं सारखी फिगर
आणि पंजाबीणीं सारखी फिगर असणार्या माझ्या सारख्या मराठी>>> मी बी
दुसरी एक बया आहे पाच
दुसरी एक बया आहे पाच पाखाडीला... तुला माहित असेल मंजु... माँजीनीज च्या समोर "मालविका" ... ती पण चांगली डिझायनर आहे... पण तेच ते रंग असतात... कधी तरीच काहीतरी चांगलं सापडतं.... पण तिच्या कडे तु मिक्स & मॅच करु शकतेस.... तिला ते पटत नाही.. म्हणजे आपण केलेलं काँबो.... पण आपण दडपुन करत रहायचं... शेवटी बया तयार होते....
हम्म्... एकदा शिरले होते
हम्म्... एकदा शिरले होते तिच्याकडे, पण काही पटलं नाही
मला हल्लीच रा.रोडवर एक सह्ही टेलर मिळालाय, 'कला क्रिएशन्स'. चांगलाच महाग आहे, पण ड्रेस अगदी 'वॉव्व!' शिवलेत, एका कुर्तीवर तर क्लासिक वर्क केलंय. आता अजून एक कुर्ती टाकली आहे त्याच्याकडे भरतकाम+शिलाईसाठी.
बापरे! ५०० चा ओलांडला
बापरे! ५०० चा ओलांडला की!
फारच जिव्हाळ्याचा विषय आहे आपल्या
हम्म्... एकदा शिरले होते
हम्म्... एकदा शिरले होते तिच्याकडे, पण काही पटलं नाही>>>
हो माझं पण झालं आहे ... अनेकदा फालतु प्रकार असतात....
हा कला क्रिएशन्स कुठे आहे नक्की?
'कला क्रिएशन'च वर्क क्लास
'कला क्रिएशन'च वर्क क्लास आहे! 'नियती'च पण वर्क छान असत. आणि शिलाई 'कला क्रिएशन' पेक्शा कमी आहे.
मोकीमी, खुशबुच्या समोर
मोकीमी, खुशबुच्या समोर तळ्याकडे जायच्या रस्त्यावर, कूल कँपच्या बरोब्बर समोर आहे कला क्रिएशन्स.
@ भुलभुलैया, नियती रा.रोडवरच आहे ना? अंधुकसं आठवतंय.
पाटिल>>>> सध्या ब्लेझर
पाटिल>>>> सध्या ब्लेझर नाही.....इंडोवेस्टर्न वेअर चालु आहे.......म्हणजे टॉप इन्डिअन एथ्निक आणि खाली इंडोवेस्टर्न (मांडी ला लूझ आणि खाली अॅन्क्लेट ला टाइट) पॅन्ट किंवा वर ब्लेझर (विथ कॉलर विदाउट कॉलर) आणि खाली इंडोवेस्टर्न पॅन्ट..... तुम्ही पायात मोजडी किंवा स्लीक पॉइंटेड बूट्स घालु शकता....मस्त दिसते......कलर्स पण छान आहेत त्यात मरून, ग्रीन , टर्क्वाइज ब्लु...
@ मंजुडी घंटाळी रोड, श्रद्धा
@ मंजुडी
घंटाळी रोड, श्रद्धा वडेवाल्यांची बिल्डिन्ग
बर, हा फोटो हेअर स्टाइल
बर, हा फोटो हेअर स्टाइल जमणर्या मुलीं साठी :), माझ्या इमॅजिनेशन पलिकडचं,आहे हे ..

चांगलं दिसणारं पोनी टेल पण मोजक्या वेळा बांधलय आयुष्यात.. कायम केस मोकळे, ते विंचरता येतात हे पुष्कळ , तेंव्हा एक्स्पर्ट मुलींनी पहा आणि करा कोणावर तरी प्रयोग
फारच कॉम्प्लीकेटेड आहे हे!
फारच कॉम्प्लीकेटेड आहे हे!
दिपांजलि छान
दिपांजलि छान
भारी दिसतीय हेअर स्टाइल..
भारी दिसतीय हेअर स्टाइल..
Pages