फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे असले नेल आर्ट करणार्‍या मुली/बायका घरी स्वयंपाक कसा करतात?? खरंच मनापासून प्रामाणिकपणे विचारत आहे. पायांचं आर्ट टिकवणं ठीक आहे. पण मी कित्येकदा मॅनि-पॅडि करुन येते, आणि दुसर्‍या दिवशी नखांवर लहान टवके उडालेले दिसतात. ते घाण वाटतं मग सरळ रिमुव्हर घेऊन काढून टाकते. Happy
तसंही मी कणीक इ. प्रकार मळावे लागतात म्हणून नेल कलर पण नाही लावत नियमितणे. मला पोटात तो रंग जाईल ही भीती वाटतेच पण ते टिकवता पण येत नाही. जरा काकूबाई विचार वाटू शकेल पण स्वच्छ कापलेली नखे आणि क्रीम लावून मऊसूत झालेले हात किती छान दिसतात.

धनश्री, कधी तरी जेल मॅनिक्युअर करुन बघ. एकदा केलं की त्याकडे दोनेक आठवडे बघावं लागत नाही. नेलपेंटही जात नाही.

धनश्री, कधी तरी जेल मॅनिक्युअर करुन बघ. एकदा केलं की त्याकडे दोनेक आठवडे बघावं लागत नाही. नेलपेंटही जात नाही.
<<
सायो +१.
नेलप्नेट नाहीच जात शिवाय अगदी बसवलेले स्वॉरोस्की क्रिस्टल सुध्दा कणीक मळली तरी जात नाहीत Proud
अगदीच उकरून काढले तर जातात पण ग्लु इतका स्ट्रॉङ असतो कि कधी कधी प्रोफेशनल्स ना सुध्दा क्रिस्टल काढून टाकायला मेहनत घ्यावी लागते.
शूंपी
निळाई अवडली :).

जेल मॅनि. ह्म्म नवीन टर्म कळली. Happy या बीबीचा खूप फायदा होतोय हा. Happy
मी नेहमी नाही करू शकणार पण आता ट्रीपला जाताना, एखाद्या स्पेशल पार्टीसाठी नक्कीच करेन.

शूम्पी, सुंदर दिसतंय.

मला बांध्यानुसार कपडे कसे निवडावे, कोणते चांगले दिसतात याबद्द्ल माहिती हवीय.
ढोबळ व्याख्येनुसार, पेपरमधल्या फॅशन लेखांवरून काही बेसिक रुल समजले पण भारतीय फॅशन साठी अशा काही टिप्स आहेत का??
उदा बघा:
-जाडी कमी दिसण्यासाठी काळा रंग, उभ्या लायनींचे पॅटर्न्स.
-फार लुकडे असाल तर थोडं बटबटीत डिझाईन.

-पेअर, अ‍ॅपल, अवर्-ग्लास शेप बांधा असेल तर कशी साडी नेसली तर जास्त छान दिसते?
-दागिन्यांच्या बाबत काय सल्ला द्याल?

जेल मॅनि मी दोन तीनदा केलंय. मला त्या नखांचा कंटाळा आला पण नेलपेंट काही जायचं नाव घेईना. पार्टीकरता नक्की ट्राय कर कारण हल्ली बर्‍याच जणींचं तेच केलेलं असतं.

कृपया मला जेल मॅनिक्यूअर बद्दल जास्तीची माहिती द्या. उदा. कसं करतात इ. आज पहिल्यांदाच ऐकली ही टर्म.

दक्षिणा, जेल मॅनिकरता नेहमीप्रमाणेच मॅनिक्युअर करुन घेतात. मग त्यावर बेस कोट लावून जेल पॉलिश लावतात. टॉप कोट लावून हात लेड लाईट असलेल्या उपकरणात घालून ठेवतात ज्याने हे पॉलिश आपल्या नखांवर सेट होतं. हे जेल मॅनिक्युअर दोन आठवड्यांपेक्षाही जास्त टिकतं. चिप वगैरे होत नाही.

हे कीट आहे इथे.

http://www.drugstore.com/products/prod.asp?pid=387226&catid=293261&aid=3...

धनश्री मला पण तुझासारखीच नेल पेन्ट पोटात जायची काळजी असते...पण सायो म्हणते त्या प्रमाणे करायला हरकत नाही....

काळजीवाहू, मस्त झालेय. Happy
धनश्री I agree. cream & clean ही policy मला पण आवडते. मी एकदाच पार्लरमधे मॅनी केलेलं. पण त्या बयेनं सांगितलं की आम्ही polish लावत नाही Sad
शूम्पी blue rocks! मस्त दिस्तेय.
हे जेल मॅनी पुण्यात कुठे करून मिळेल?

जेम मॅनि?? मस्त आयडिया आहे... नक्की करणार. ते लोक जेल मॅनी करतानाच नेल आर्ट करुन देतात का? माहिती काढली पाहिजे...

मस्त माहिती...

मिळतात करून जेल नेल्स आणि नेल आर्ट देशात .
पुण्यात को. गा. पार्क, कल्याणी नगर ठिकाणी आहेत पण मी फक्त नव सह्याद्रीला ट्राय केलीयेत , सोलकढी रेस्टॉरन्ट जवळ आहे एक नेल सलोन, नाव आठवत नाही!
मी तिथे केली होती अ‍ॅक्रिलिक नेल एक्स्टेन्शन्स , केली छान पण मी वर लिहिलय तस इथे व्हिएतनामी लोक ज्या सफाइने करतात तशी सफाइ जस्णवली नाही , वेळ पण तिप्पट घेतला!

दिपांजली,
सोलकढीच्या जवळ म्हणजे फॅब्रिकानाच्या वर का? एक बैठं घर आहे बघ, अगदी सोलकढीच्या समोर नाही थोडं डायगोनली ऑपोझिट. नेल बिट्स का कायतरी नाव आहे. किती वेळ घेतला होता तिप्पट म्हणजे? आणि चार्जेस किती घेतले? हात पाय दोन्ही केलं होतंस का? सगळ्याचे चार्जेस सांग. (थोडी कल्पना येईल) कधी केलेलस ते पण सांग.. म्हणजे मध्ये किती वेळ गेला ते ही कळेल.

दक्षिणा,
नाव अजिबातच अठवत नाहीये सलोन चं .. असेल बहुदा डायगोनली ऑपोझिट !
मी २००७ मधे केली होती नेल्स, फक्त हाताची नेल एक्स्टेन्शन, १५०० घेतले होते.
पण ते जेल मॅनिक्युअर नाही, नेल एक्टेन्शन्स , (म्हणजे आहेत त्या नखां वर अ‍ॅक्रिलिक नेल्स लावून, अ‍ॅक्रिलिक पावडर-जेल लावऊन एकजीव करतात.. कधीतरी करायला चांगली दिसतात आणि भरपूर टिकतात)मी स्पेशल फंक्शन म्हणून केली होती.
ऑलमोस्ट अडीच तास घेतले तिनी Sad

माधवी,खूप छान धागा! रोज इथे येउन बघितलेच पाहिजे.
मोकीमी,ठाण्यातली बुटिकची सगळी माहिती साठवून ठेवली. धन्स!

दिपांजली हम्म! अडिच तास इज टू मच, अ‍ॅन्ड इव्हन द प्राईज. आणि फक्त हातासाठी तेव्हा १५०० म्हणजे आता निदान २००० तरी चार्ज करेलच.

माझ्या मैत्रिणीच्या जुन्या घराशेजारी एक पार्लर होतं. छोटंच.. ती बाई फक्त ६०/- रू चार्ज करायची आणि हाताला नेल पॉलिश लावून द्यायची आणि त्यावर डिझाईन सुद्धा काढून द्यायची. मोस्टली आपल्या नेहमीच्या नेलपेंटवर बहुतेक ती फ्रेंच मॅनिक्यूअरचा व्हाईट बेस असतो त्याने डिझाईन करायची. (पहिल्यावर तसंच वाटायचं) छान दिसायचं, माझी मैत्रिण नेहमी घ्यायची करून. स्वस्तात मस्त..

पुण्यात कॉटनचे कुडते, विशेष प्रिंट्स नसलेले, खादी पॅटर्नचे स्वस्तात कुठे मिळतील?
मला जरा टिपिकल समाजवादी फॅशनचे (?) आऊट्फिट्स करायला जाम आवडतं!
आणि कर्वेनगर भागात ब्लाऊजेस छान शिवून देणारं माहित्येय का कोणी? म्हणजे जरा ट्रेन्डी पण न बिघडवता! पैसे किंचित जास्त गेले तरी हरकत नाही!

कर्वेनगर च माहित नाही.. पण जरा लांब सिंहगड रोड चालत असेल तर सांग.. हिंगण्यात एक सौभाग्य टेलर्स म्हणुन आहे तिची सून मस्त ब्लाउअज शिवते.. फिटिंग, पॅटर्न सगळेच मस्त करते..

बोरीवली, मिरारोड, ठाणे मध्ये चांगला/चांगली लेडिज टेलर कोणाला माहीत आहे का? ड्रेस व ब्लाऊज शिवणारा/री...
म्हणजे जरा ट्रेन्डी पण न बिघडवता, फिटींग व्यवस्थित ! पैसे किंचित जास्त गेले तरी हरकत नाही!>> +१

भानुप्रिया,
वेस्टसाईड ला तुम्हाला हवे तसे टॉप्स आले आहेत.६० % डिस्काउंट ही आहे.काकडे मॉल- ई-स्क्वेअर जवळ.

भानुप्रिया, खादीच्या कुडत्यांबद्दल अनुमोदन. बरोबर जनपथ चा झोला आणि कोलॅप्स. चष्मा आहेच.
मला हा लुक फार आवड्तो. कानात मस्त टेराकोटा इअर रिंग्ज. इंक ब्लू कलरचा कुरता, व्हाइट चुरीदार आणि ओढणी, आणि राजस्थानि सिरॅमिक्स चे निळे पांढरे कानातले. लै झ्याक. करून बघ एकदा.

भानुप्रिया, कोथरुड स्टँडासमोर 'कोकण एक्सप्रेस'च्या गल्लीत 'तनूज अँड टान्झ' आहे. ती शिवते चांगले ट्रेंडी ब्लाउज. पण पहिल्या ब्लाउजला तिला रेफरन्ससाठी आधीचा ब्लाउज द्यावा लागतो.

म्रुनिश, माशा, अमामी आणि श्रद्धा, सगळयांना धन्नो!!!
तनुज अँड टान्झ वलीने मैत्रिणीचे ब्लाऊजेझ खूप काही छान नव्हते शिवले! त्यामुळे जरा धाकधूक आहे!
आणि मज्जा म्हणजे, एक ट्रायल साठी दिलेला नेहमी छन शिवतात, पण नेमका समारंभाचा बिघडवतात गो!
मला लग्नासाठी शिवायचेयत..त्यामुळे रिस्क नाही घ्यायची..माझी अत्ताची टेलर खरंतर छान आहे, पण तिच्या टेलर मास्तरला बहुधा वेडाचा झटका आलाय! माझे सगळे ब्लाऊझेस ४-४ इंच मोठे शिवलेत! Sad
(वाढत्या मापाची आहे खरी मी, पण म्हणून १५ दिवसांत ४ इंच नही वाढत, खर्रंच!)
आणि मामी, कॉम्बो एक्दुम झ्याक बर्र का! करून बघेन!

म्रुनिश, पण जरा लांब सिंहगड रोड चालत असेल तर सांग.. हिंगण्यात एक सौभाग्य टेलर्स म्हणुन आहे तिची सून मस्त ब्लाउअज शिवते.. फिटिंग, पॅटर्न सगळेच मस्त करते..>>>>>> हिचा नक्की पत्ता सांग ना..आणि साधारण पैसे किती घेते ते ही!

सिंहगड रोडला रांका सोडले की डावीकडे ३ री गल्ली.. त्या गल्लीत आत गेले की ज्ञानगंगा शाळेच्या नंतर थोडेसे पुढे रस्त्यावरच आहे..पैसे फॅशन प्रमाणे घेते..पण जरीच्या साडीच्या अस्तरवाल्या ब्लाउज ला साधारण २५० - ३०० च्या आसपास घेते.. फॅशन प्रमाणे वाढतील.. आणि जाताना जमले तर साडीही घेउन जा.. म्हणजे ती साडीच्या डिझाईन प्रमाणे त्याला सुट होणारी फॅशन करते..उद्या परवा जमले तर नंबर टाकते..पहिला मात्र साधा ब्लाउज टाक

शीतल बानावळकर कडे जा. कर्वेनगर आणि बाजीराव रोडला अश्या दोन जागा आहेत.
ती स्वतः असते कर्वेनगरच्या दुकानात. ती असेल तेव्हाच द्यायचे. बाजीराव रोडच्या दुकानात तिचा भाऊ असतो. जुन्या गिर्‍हाइकांचे काम बरोबर करतो. नव्यांचे घोळ घालतो.

Pages