खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का?
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!
फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!
Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त दिसतेय ही स्टाईल.
मस्त दिसतेय ही स्टाईल. फ्रेंचप्लेटचाच एक प्रकार आहे. पण घालणार्याची बोटं कुशल आणि घालून घेणारीचे केस मऊसुत सरळ हवेत.
दिसतेय हेअरस्टाईल मस्तच एकदम,
दिसतेय हेअरस्टाईल मस्तच एकदम, पण लई पेशन्स पाहिजेत बुवा घालायला.
माझी बहिण उलटी फ्रेंच प्लेट स्वता:ची स्वत: घालायची.
धन्य _/\_
अप्रतीम
अप्रतीम
काय मस्त केशरचना पण केस
काय मस्त केशरचना
पण केस सुळ्सुळीत हवे त्यासाठी ,,,किंवा करुन घ्यावे लागतील
नमस्कार, मला माझ्या बहिणीच्या
नमस्कार, मला माझ्या बहिणीच्या लग्नात रिसेप्शन साठी डिझायनर साडी/ शरारा घ्यायचा आहे. मुंबई मधली दुकाने सुचवा प्लिज. विलेपारले/दादर जवळ. डिझान्स साठी एखादी वेबसाईट आहे का?
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=8nV2TQcVaVs
हि लिंक छान आहे.
दीपांजली, ती हेअर स्टाईल जाम
दीपांजली, ती हेअर स्टाईल जाम आवडली. कौशल्य आणि उत्तम केस हवे.
पार्ल्याला अल्फाच्या लेनमधे
पार्ल्याला अल्फाच्या लेनमधे ऐश्वर्या डिझाइन स्टुडिओ आहे. डिस्प्ले तरी मस्त असतो त्यांचा. त्याच लेनमधे अजून पण दोन तीन दुकाने आहेत. किमती वगैरेंची कल्पना नाही.
सुरभि, तुला वेळ देता येणार असेल तर मी तुला मंगलदासला जाऊन ये असं सुचवेन. होलसेलच्या रेटमधे गोष्टी मिळू शकतील आणि भरपूर दुकाने असल्याने व्हरायटीही चिक्कार.
वॉव.. अतिशय कल्पक
वॉव.. अतिशय कल्पक हेअरस्टाईल.. फारच किचकट असेल पण..
केस सरळ -स्मुथ एक वेळ फ्लॅट
केस सरळ -स्मुथ एक वेळ फ्लॅट आयर्न ने करता येतील पण या स्टाइल ची मेन रिक्वायरमेन्ट लेयर कट नसलेले (एका लेव्हल ला कट केलेले) सरळ केस असावी.
सुरभी >> दादर स्टेशन च्या
सुरभी >> दादर स्टेशन च्या बाहेर इस्ट ला प्रामाणिक म्हणुन शॉप आहे......ट्राय कर..
हल्ली फिश टेल ब्रिड ( वेणी )
हल्ली फिश टेल ब्रिड ( वेणी ) पण करतात काही मुली आणि सेलिब्रिटी...पण मला काही ती जमली नाही.....दिसते छान....कशी पण वेडी वाकडी घातली तरी चालते.....फंकी लूक देते....
अजुन काही टो नेल आर्ट. नेल
अजुन काही टो नेल आर्ट.
नेल अर्टिस्ट अॅक्रिलिक फिनिशिंग आणि चांगल्या क्वालिटीचे कलर्स -स्ट्रॉग ग्लु वापरतात, देशी लाइफ स्टाइल मधेही टिकतात..अगदीच करकरून उकरली तर गोष्ट वेगळी अर्थात !
फ्री हॅन्ड आर्ट बरोबर एअर ब्रश्ड नेल् टॅर्टु पण असतात.
एका टी.व्ही शो मधे मुलीच्या रिंग फिंगर नेल वर होणार्या नवर्याची ग्राफिक इमेज चिकटवली होती :).
वॉव......सहीच आहे....पण ते
वॉव......सहीच आहे....पण ते नेल आर्ट भांडी घासताना जाइल की ग....
हे सगळं मी पुढच्या जन्मासाठी
हे सगळं मी पुढच्या जन्मासाठी राखून ठेवते
निधप.....पुढच्या
निधप.....पुढच्या जन्मासाठी?????? का???
नेल आर्ट कितीही सुंदर वगैरे
नेल आर्ट कितीही सुंदर वगैरे दिसत असलं तरी या जन्मात तरी ते करून घेणं आणि मग टिकवणं वगैरेची उठाठेव मला झेपणार नाही...
पुढच्या जन्मी सुंदर, मॉडेल, श्रीमंत असं काय काय जमवायचा विचार आहे. तेव्हाच हे ही जमेल....
फिश टेल ब्रीड म्हणजे थोडक्यात
फिश टेल ब्रीड म्हणजे थोडक्यात पाच पेडी वेणी.. फक्त एकाच बाजुला घालायची. आम्ही घालायचो लहानपणी फक्त व्यवस्थित असायची अशी अस्ताव्यस्त नाही.
हे सगळ इतकं सुंदर दिसतय.
हे सगळ इतकं सुंदर दिसतय.
मला पुढचा जन्म काय , हे सगळ कळायला पुढचे सात जन्म घ्यावे लागतील तरच फॅशनमधल कायतरी कळु शकेल कदाचित
पण इथले काही जण खरच ग्रेट ग्रेट आहेत. लैच कौतुक त्यांच.
दिपांजली... फार मस्त फोटोज...
दिपांजली...
फार मस्त फोटोज... मला खुप आवडेल हे करायला.... ठाण्यात कुठे करुन मिळतं का? किंवा पवईला....? पायाच्या नखांना मस्त डीसेंट करुन घ्यायचं.... एकदम मस्त दिसेल...
म. +१००००००
म. +१००००००
अरे वा धारा. माझ्यासारखे
अरे वा धारा. माझ्यासारखे कोणीतरी आहे हे वाचुन लैच हायसं का काय ते वाटलं बघ.
वाह दीपांजली फार मस्त आहेत ते
वाह दीपांजली फार मस्त आहेत ते नेल आर्ट्स. तू टाकलेले आणि प्रिया७ या आयडीने दिलेल्या लिंक्स बघून पहिल्यांदा नेल आर्टचा प्रयत्न केला. फारच बेसिक. आणि नेल्स पण अजून शेपिंग स्टेजमधे आहेत. बरेच गृमिन्ग करावे लागणार. पण थँक्स तुम्हाला दोघींना.
एरवी मला नख रंगवायला आवडत
एरवी मला नख रंगवायला आवडत नाहीत .. पण हे पाहुन वॉव वाटतय
अरे हे सगळ किती ढिन्चाक केल आहे म्स्त.... मी माझ्या भावाच्या लग्नात नक्की अस काहीतरी ट्राय करेन...
दीपांजली मस्तच आहे नेलआर्ट.
दीपांजली मस्तच आहे नेलआर्ट. हे मी ट्राय केलेले नेलआर्ट
काळजीवाहू.. मस्तच
काळजीवाहू.. मस्तच
धन्स, दक्षिणा, पहिल्यांदाच
धन्स, दक्षिणा, पहिल्यांदाच केलय हे , इतक सफाइदार नाहीये ते
ठाण्यात कुठे करुन मिळतं
ठाण्यात कुठे करुन मिळतं का?<<<<<< मो ़ की मी, ठाण्यात नौपाड्याला ब्राम्हण सोसायटीत बेलीटा नावाचे पार्लर आहे. तिथे करतात.
म्हण्जे नौपाडा पोस्टाच्या
म्हण्जे नौपाडा पोस्टाच्या गल्लीत?
हो, हितवर्धीनी सभेच्या समोर.
हो, हितवर्धीनी सभेच्या समोर.
Pages