फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ई ई ई नं ३ म्हण्जे लहान मुलांचीच की गं..
प ण आज्काल त्यन्च्यहि छान मिळयला लग्ल्या आहेत म्हणुन बरंय Happy

अर्पणा, सेम पिंच ! माझंही असंच आहे.
आणि साईझ च्या नसलेल्या छान छान चपला/सँडल्स बघून काय वाटतं ते ज्याचं त्यालाच माहित !

आजकाल त्या लाल, हिरव्या, जांभळ्या,पिवळ्या, केशरी रंगाच्या जिन्स आल्यात त्या पाहिल्या का कोणी? Uhoh
लाल जरा तरी बर्‍या पण बाकिच्या कसल्या भयानक दिसतात
माझ्या एका कलीगने भडक हिरवी (पानाच्या रंगाची) जिन्स घेतली आहे
त्यावर कोणत्या कलरचा टॉप सुट होईल?
मला तरी पांढरा आणि काला एवढचं सुचलं

रंगीत जीन्स आधी पण होत्या असं अचानक आठवलं. पंधरासोळा वर्षांपूर्वी माझी एक मस्टर्ड रंगाची जीन्स होती आणि माझ्या एका ओळखीच्या मुलीची लालगुलाबीच्या मधल्याच एका शेडची होती. अर्थात वरती लिहिलेले गोविंदा कलर्स नव्हते मिळत हां...

ह्हो...जवळजवळ लहान मुलांच्याच Sad शूज ( जे घातल्यावर पावलं दिसत नाहीत ) जरातरी अ‍ॅडजेस्ट करता येतात पण पावलांचा भाग दिसणार्‍या चप्पल जराजरी मोठ्या दिसल्या तरी चोरीच्या घातल्यात असं वाटतं ...

शमा..खरंच, फॅशन कसली करतोय आपण..जी मिळेल ती गोड मानणं इतकच Happy

<<<< लाल, हिरव्या, जांभळ्या,पिवळ्या, केशरी रंगाच्या जिन्स आल्यात

इकडे ( युरोपात )त्यांचा सध्या ट्रेंड आहे . टॉप छान मॅच केल्यास फार मस्त दिसतात Happy

साइझ ३ कॅटवॉक, मेट्रो, सॅनोरिटा मध्ये नक्की मिळते पोरींनो, काकवांनो Wink दु:खी कशाला होताय? गुगल करुन बघा एकदा..

बाप्यांच्या सेक्शनमधल्या ढब्ब्या ढोल्या चपला घ्याव्या लागण्यापेक्षा लहान पोरींच्या चपला घ्यायला लागणं बरंय Happy

माझ्याकडे लाल, चिंतामणी, पिवळी, पांढरी, शेवाळी, बॉटल ग्रीन अशा रंगाच्या जीन्स आहेत...:) नेहमी घालते

लांबीला आणि रूंदीला लहान पावलं असणार्‍यांना काय दु:ख्ख आणि हेवा असतो हे शब्दांत सांगणं फार अवघड आहे Happy

हो त्या कलरफुल जीन्स मस्त दिस्तात. अर्थात हिरवा म्हन्जे गोविन्दा येतोय डोळ्यासमोर.
पण लाल, ऑरेन्ज, पीकॉक ब्लु छान दिस्तात की.
>> योग्य शूज, अ‍ॅक्सेसरीज, आर्म कॅण्डी सगळेच
Lol हो नायतर सगळे मॅचिंग आणि बाजूला ध्यान.

खुप छान धागा आहे..
नेलपेंट , चपला बाबतीत अगदि मी पन ज्यास्त color नाही try करत.
इथल्या पोस्ट वाचुन बर्याच idea मिळाल्या आणि पुन्यातल्या शॉपिन्गची माहिती पन.

धन्यवाद सगळ्याना!!

बस पकडायला पळणे, भाजीला थांबणे असेल तर घालू नये.
<<
LOL त्या साठी नाहीतच पार्टी वेअर हील्स :).
एवढच काय, पार्टीला /कल्ब मधे जाताना सुध्दा जर चालावं लागत असेल ( उदा.लास व्हेगास ला वगैरे भरपूर फिरून नंतर क्लब मधे जायचं असेल तर ) चालताना कंफर्टेबल फ्लॅट्स आणि जस्ट क्लब मधे/पार्टीत एंट्री मारताना हाय हील्स प्रकार करतानाही लाज वाटून घेउ नये.
पर्स फक्त मोठी बाळगावी हील्स जपून ठेवता येइल इतकी मोठी , या हील्स चे इतर उपयोग सांगायची गरज नाही.. .. एखाद्याच्या टाळक्यात हाणायला उत्तम उपाय.

मल्टि कलर ट्राउझर्स पण खूप छान दिसतात, चांगल्या अ‍ॅक्सेसरीज सिलेक्ट करता आल्या पाहिजेत आणि अर्थातच इझीली वावरता आलं पाहिजे..totally depends how you carry it !

d1.jpgdr01.jpg

रिया,लाल व पिस्ता कलरच्या जिन्स माझी मुलगी घालते.लाल घेताना मला धस्स झालं होतं पण तिने घातल्यावर छान वाटली.
नीधप,पिस्ता कलरच्या जिन्सवर पण टॉपचे रंग सुचवशील का?

दिपांजली मस्तच कॉम्बो आहेत.
माझ्याही मैत्रिणीने तिच्या वाढदिवसाला हिरवी जिन्स घेतली. आणि त्यावर पांढरा ट्रान्स्परन्ट टॉप ज्यावर हिरवे आणि काळे गोळे आहेत. चांगलं दिसतं कॉम्बिनेशन. असे कपडे पाहून बाप रे! हिरवी जिन्स? Uhoh असं होतं पण कधी कधी काही कपडे/रंग पहायला बरे वाटले नाहित तरी अंगावर चांगले दिसतात. मी जस्ट कॅज्यूअल मध्ये एक लेगिन पाहिली त्याचं मटेरियल एकदम सॉफ्ट वेगळंच आहे. आणि रंग एकदम लाल भडक.. Uhoh म्हणलं घेऊया.. घेऊन टाकली. पांढर्‍या लाँग कुर्तीवर अप्रतिम दिसते.. रंगसंगती चांगली दिसते असं खूप जणांनी सांगितलं.

multiple colors of jeanes_0_0.jpg

'बस पकडायला पळणे, भाजीला थांबणे असेल तर घालू नये',.. दक्षु.. Rofl
नी.. मॅचिंग आर्मकँडी .......... हीहीहीहीही.................
दीपांजली सुपर्ब काँबोज.. त्यापैकी पहिला ( वेल जवळपास ) माझ्याजवळ ही आहे.. ती बेज पँट सोडून..

कलरफुल जीन्स मला खूप आवडतात.. पण काँट्रास्ट कलरच्या टॉप बरोबर..
पूर्वी मी ही वरदा सारखं या कलर्सना गोविंदा कलर्स म्हणत असे.. ( पण स्वतः वापरायला सुरु केल्यापास्न नाही म्हणत Wink )

इथे फॅब फॅन्स आहेत का? मी अगदी अ‍ॅन्टी फॅब आहे. फॅन्सचा फीडबॅक काय आहे? का आवडतं? कपडे कितपत टिकतात?>>>>>>>>>>>>>>>>> फॅब मधे कॉटन चे कुर्ते चान्ग्ले असतात.. पण काही लो क्वालिटी असतात...काही चान्गले असतात..सिल्क मधे छान ऑप्शन आहेत...पण ते सुरु होतात १५०० रुपयां पासुन.... मागे मी सिल्क मधे १८०० रु. ची कुर्ती, ९०० रु चा चुडीदार आणि ५०० रु ची ओढणी घेतलि...कुर्ती चांगली आहे पण दर वेळेला ड्राय क्लीन करावी लागते...आणी चुडिदार तर खालुन लगेच विरुन गेला.....९०० रु. पाण्यात.. ते दुकान वाले सांगतात की ' आपने घरमे धोया होगा' , ' ठिकसे युज नही किया होगा'..... आता फक्त नावासाठी फॅब इंडिया उरलय....पण तरीही कधी तरी मी जाते तिथे.......

Pages