खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का?
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!
फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!
Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डाय बद्दल मला एक माहिती हवी
डाय बद्दल मला एक माहिती हवी होती..समजा एखाद्या कपड्याला २ र्या कपड्याचा रंग लागला असेल तर त्यावर ३ र्याच एखाद्या रंगाचा डाय बसतो ना?
माझ्या निळ्या टॉप ला मरून रंग लागलाय ..मी त्याला काळ्या किंवा नेव्ही ब्लु कलरचा डाय करुन घ्यायच्या विचारात आहे..तसे होउ शकेल ना?
खूप ढ प्रश्न वाटेल पण आधी कधी केले नाहिये म्हणुन खात्री करुन घ्यायची आहे
हो होते. पण हे बाहेरच टाका
हो होते. पण हे बाहेरच टाका करायला.
नीधप , या गोष्टींशी कधीच
नीधप , या गोष्टींशी कधीच संबंध न आल्यामुळे मला काहीच माहित नव्हते.
माझा समज होता की तयार कलर्स आणून पाणी / तत्सम जे काही असेल त्यातून कपडा बुचकळून काढणे व सु़कविणे. तुमच्यामुळे तो समज तर दूर झालाच पण डाईंग प्रक्रिया ही कळाली.
नीधप... ते बाटिकचे रंग पण
नीधप...
ते बाटिकचे रंग पण असेच असतात ना.... बाटिक प्रकरण एकदा पाहिलं होतं... ( माझी मावशी टेक्सटाईल डिझायनर आहे) मी लहान होते.... काय खटाटोप होतो तो..... ते मेण, ते रंग... त्यांचा तो वेगळाच वास.... पण बनल्यावर फार सुरेख दिसतं.... त्या मुळे ओरीजनल बाटिक कितीही महाग असलं तरी वर्थ वाटतं.....
अय्यो.. नाही नाही.. डाय पावडर
अय्यो.. नाही नाही..
डाय पावडर असते. ती उकळायची योग्य प्रमाणात. आपल्याला हव्या त्या रंगासाठी मिक्सिंग करावे लागते मग सुती कपड्या तुकड्यावर ट्रायल्स घ्यायच्या. त्याप्रमाणे पावडरींचे कॉम्बो, प्रमाण बदलायचे. ते योग्य झाले की मग त्या उकळलेल्या पाण्यात कपडा घालायचा त्यात. तो फिरायला इनफ जागा हवी भांड्यात. नाहीतर काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त लागतो डाय. मी कधी कधी घरच्या वॉशिंग मशिनच्या ड्रममधे उकळलेला डाय आणि पाणी ओतते. १० मिनिटे फिरवते. जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित डाय लागतो. आणि मग जास्तीचा डाय घालवून टाकणे कपड्यावरून हे ही सोयीचे होते.
ते बाटिक प्रकरण आम्ही एकदा
ते बाटिक प्रकरण आम्ही एकदा घरी करून पाहिले होते. हातरुमालांवर व्हेजिटेबल डाय वापरून प्रयोग केला होता. रुमालाला वेगवेगळ्या पद्धतीने दोरा गुंडाळून डाय करायचे, मग सुकल्यावर दोरा काढून रुमाल उलगडला की जादू झाल्यागत बाटिक प्रिंट तयार झालेले असायचे. मस्त वाटलं होतं करताना
हे बाफच्या विषयाशी सुसंगत नाही, पण उगाच विषय निघाला म्हणून लिहिलं.
बाटीकचे आणि इतर कुठलेही डाय
बाटीकचे आणि इतर कुठलेही डाय सेमच असतात. फक्त मेण हे एक अॅडिशनल प्रकरण आहे बाटीकमधे. मेणाने डाय रेझिस्ट होतो वेगवेगळ्या प्रमाणात आणि डिझाइन तयार होते. जसे बांधणी मधे घट्ट बांधलेला दोरा डाय आत झिरपण्यास आडकाठी करतो.
मंजू त्याला बांधणी
मंजू त्याला बांधणी म्हणतात.
बाटीक म्हणजे मेणाने करतात.
हो! बरोबर... जेणू काम तेणू
हो! बरोबर... जेणू काम तेणू थाय
बांधणीची एक जपानी चुलतबहिण
बांधणीची एक जपानी चुलतबहिण आहे ज्यात दोरा बांधण्याऐवजी दोर्याने शिवतात वेगवेगळ्या घड्यांवर. अप्रतिम दिसतं.
शिबोरी म्हणतात तिला.
आणि बाटीकचा एक सोपा भाऊ आहे. गुट्टा रेझिस्ट. याचे हॉबी किटस आता मॉल्समधल्या हॉबी लॉबीच्या दुकानात मिळतात.
सरफेस टेक्निक्स शिकताना मी गुट्टा रेझिस्टने सिल्कवर एक मोठ्ठे नटराजाचे चित्र आणि एक मोठ्ठे वारली चित्र केले होते.
धन्स ग नीधप..डाय या विषयाची
धन्स ग नीधप..डाय या विषयाची बरीच माहिती कळली आज.. मला ही शमा सारखेच रंगाच्या बादलीत कपडा बुचकळणे असे वाटत होते
मी वाचनमात्र. (अशा सगळ्या
मी वाचनमात्र.
(अशा सगळ्या फॅशनी - स्वतः करण्यासाठी - आवड निर्माण होणारी एखादी लस मिळते का ?? असेल तर माझा पयला नंबर)
बघायला फार आवडतं पण.>> मीपण!
पण माझं याहून वर्स्ट आहे. बाळंतपणानंतर फिगरचा dome झालाय

त्यामुळे लूझ पंजाबी सूट सोडून काहीच घालता येत नाही. हापीसातल्या बाकीच्या चवळीच्या शेंगा मस्त वेगवेगळे पॅटर्न्स ट्राय करतात तेव्हा आपली बारीक फिगर कल्पून सुस्कारे सोडायचे
फिगर होईल तेव्हा होईल बारीक... पण अशा जाड्या फिगरसाठी इतर काही ऑप्शन्स असतात का?
फिगर होईल तेव्हा होईल
फिगर होईल तेव्हा होईल बारीक... पण अशा जाड्या फिगरसाठी इतर काही ऑप्शन्स असतात का? >>>
असतात ना ... मस्त ट्राउजर्स आणि त्या वर ३/४ स्लीव्ह्ज चे फॉर्मल शर्टस एकदम मस्त दिसतात. किंवा ट्राउजर्स वर फॉर्मल कुर्तीज ऑफिस मधे एकदम चालुन जातात. नाहीतर सिल्क टॉप्स पण आहेत की. मस्त रहायचं....उगाच फॅशन करायला जायचं नाही. शुक्रवारी / शनीवारी जिन्स आणि त्या वर एखादा छान प्रिंट चा टॉप....
काहीही घट्ट घालायचं नाही त्याच प्रमाणे काहीही उगाचच लुज ही घालायचं नाही....
( स्वानुभव)
उलट जितकं लूज घालू तितकं
उलट जितकं लूज घालू तितकं जास्ती जाडं दिसायला होतं, असं मला वाटतं, तुमचं काय मत?
दक्षिणा सेम पिंच.. हाच प्रश्न
दक्षिणा सेम पिंच.. हाच प्रश्न माझाही आहे
मी खुप जाड नाही पण हेल्दी कॅटेगरीत आहे.. सध्या थोडे फिटींगचे ड्रेसेस वापरतेय पण खुप टाईट पण नाही
चनस दे टाळी. म्हणलं आता
चनस दे टाळी. म्हणलं आता सगळ्या चाल करून येतात की काय माझ्या अंगावर. असो, अजून एक, लो वेस्ट जिन्स घातली की पोट गरगरीत असलं तरिही ते आटोपशिर दिसतं. मिडल वेस्ट किंवा हाय वेस्ट जिन्स घातली की पोटाचे २ टायर दिसतात.
St. Lauren heels..मस्त!
St. Lauren heels..मस्त!

हे घालून, आधाराशिवाय मी उभी
हे घालून, आधाराशिवाय मी उभी राहू शकले ५ मिनिटं तरी खूप झालं
मस्त शूज डीजे, आमच्याकडे
मस्त शूज डीजे,
आमच्याकडे मागे झिपर असलेले कॅटवॉकचे आहेत पण हील २ इंच !
नी मला चालतात हे
नी
मला चालतात हे
आधाराशिवाय मी उभी राहू शकले ५
आधाराशिवाय मी उभी राहू शकले ५ मिनिटं तरी खूप झालं + १००००
वर्षु तुला हे चालतात की
वर्षु तुला हे चालतात की 'चालवतात'?
चालवतात वेरी कंफर्टेबली..
चालवतात वेरी कंफर्टेबली.. चांगला असतो बॅलंस या अश्या सँडल्स ला
वर्षूताई.. यू आर ग्रेसफुलनेस
वर्षूताई.. यू आर ग्रेसफुलनेस पर्सॊनिफाइड.. सो तुला चालणारच...
माझ्यासारख्या बदकवर्गीय व्यक्तींचं काय पण
एक प्रामाणिक शंका विचारतोय.
एक प्रामाणिक शंका विचारतोय. असे हाय हिल्स घालुन थोडं जरी चाललं तरी घोट्याच्या जॉइन्ट दुखत नाही का?
मला कल्पना नाही. मी अश्या
मला कल्पना नाही. मी अश्या हिल्समधे कधी पाय सरकवायचा विचारही केला नाही अजून.
दीड इंचाच्या आत असतील हिल्स तर नाही दुखत घोटे. पावलं दुखू शकतात.
St. Lauren heels >> मस्त
St. Lauren heels >> मस्त आहेत.
मी पण मागे झिप असणारे आत्ताच घेतले पण ते फ्लॅट आहेत.
घोट्याच्या जॉइन्ट दुखत नाही
घोट्याच्या जॉइन्ट दुखत नाही का?
>>>
घोट्याचा जॉइन्ट नाही दुखत पण नीधपने सांगितल्याप्रमाणे पावलं दुखतात. पण तेही खुप चाललं वगैरे तर.
तसही असे हील्स घालुन चालणे वगैरे अपेक्षित नसतं
हल्ली ट्राऊजरची नवीन फॅशन
हल्ली ट्राऊजरची नवीन फॅशन निघाली आहे. उंची घोट्याच्या वरपर्यंत असते. तिला काय म्हणतात?
मला नाही आवडली फारशी. पण मुली फॉर्मल वेअर म्हणुन घालतात ऑफिसमध्ये.
दक्षिणा माझं पोटु नीट आहे पण
दक्षिणा
माझं पोटु नीट आहे पण थाईझ आहेत.. मला भारतातली जीन्स अजिबात सुट होत नाही
उसगावचे जीन्स एकदम पर्फेक्ट ..
Pages