फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मो की मी, रेन्ज कशी असते?>>>

राम मारुती रोड खुशबु मधे कुतीज मधे साधारण सिंपल असल्या तरी आजकाल ६००-८०० पर्यंत जातच.... ड्रेसेस मात्र हव्या त्या रेंज पर्यंत आहेत. म्हणजे १००० पासुन ते ५००० पर्यंत.... ती खुप चांगला माल आणते आणि गेली २०-२२ वर्ष करते आहे... मी मागे गेले होते तेंव्हा ती नव्हती... तिचा टेलर पण चांगला आहे. तिच्या कडे लखनवी गाउन्स पण असतात.

लुईसवाडीतल्या निम्मी कडे पण गाउन्स, साड्या, ड्रेस मटेरीअल, तयार कुर्तीज, सगळं असतं. तिचं दुकान सकाळी १० ते १ आणि संध्याकाळी ५ ते ८ असं उघडं असतं . तिला आधी फोन केलात तरी ती माहिती देइल... वयस्कर आहे. पण प्रेमळ आहे फार...

लखनवी ची रेंज ८०० पासुन सुरु असते....जितकी बारीक डिझाईन तितकी किंमत जास्त....>>>

बरोबर आहे... मी सिंपल ६०० ते ८०० म्हंटलं..... लखनवी बारीक जितकं घ्याल तेवढं महाग. निम्मीज बुटिक वाली सिंपल ड्रेसेस पण ठेवते साधारण ६०० पासुन ... जे साधारण डिझाइनचे असतात, अगदी भरलेले नसतात.. पण कापड खुप छान असतं... मी दोन तीन घेतले होते... साधारण भरलेले असतात... पण खुप मस्त टिकले.... पादडवायला बरे पडतात...

मोकिमी>>>>>>>. नक्किच मी जाइन तिथे.......मी फक्त लखनवीच वापरते पण मी जिथुन घेते ना डोंबिवलीत ती बाइ फार महाग विकते हल्ली.....कधी कधी ते कपडे खराब असतात म्हणुन चेंज करुन बघेन दुकन आता.......

खरय दक्षे.... परत त्यांनी पण वेगवेगळी डिझाइन्स नेहेमीच ट्राय केलेली आहेत.... मुख्य म्हणजे त्या प्रकाराचा एलिगंट लुक मला महत्वाचा वाटतो...

आता अनारकली ड्रेसेस आले आहेत......तशा मधे जर लखनवी अनारकली आले तर किति सुंदर दिसतील ना???

लखनवी अनारकली >> नाईस आयडीया अनिश्का.
ड्रेस मध्ये लखनवी, गाड्यांमध्ये यामाहा आणि होंडा सिटी यांचा एलिगन्स कधीच कमी होणार नाही. Happy

ड्रेस मध्ये लखनवी, गाड्यांमध्ये यामाहा आणि होंडा सिटी यांचा एलिगन्स कधीच कमी होणार नाही>>>>>>>> वेल सेड ...:)

होंडा सिटी+१

खुप कंफर्टेबल गाडी... फक्त खुप खाली आहे. मुख्यत्वे पाण्याने भरलेल्या रस्त्या वर.... इव्हन मोठ्ठ्या स्पीड ब्रेकर वर सुध्दा खाली लागते....( गेल्या २ वर्षांचा स्वानुभव !!!!)

बोरीवली, मिरारोड मध्ये चांगला/चांगली लेडिज टेलर कोणाला माहीत आहे का? ड्रेस व ब्लाऊज शिवणारा/री...

हो आहे...पण आता डिझायनर साड्या म्हणजे प्लेन जॉरजेट आणि त्याला हेवी बॉर्डर कॉन्ट्रास कलर मधे असे चालु आहेत......मी अत्ताच २ घेतल्या.......सफेद इटालियन क्रेप विथ ब्लॅक पोल्का डॉट्स आणि ग्रीन कलर ची ६ इन्च बॉर्डर....आणी दुसरी राणी कलर साडी विथ ब्लॅक अँड गोल्डन बॉर्डर......एलिगन्ट लूक येतो..... वर ब्लाउज शिमर गोल्डन किवा सिल्वर जस साडी मधे थ्रेड वर्क असेल तस...आणी हाय हिल्स.....गळ्यात काही न घालता फक्त हेवी कानातले घातले कुन्दन कींवा मोती चे तरी छान ....

ठाण्यात ए.के. जोशी शाळेसमोरच्या रस्त्यावर, सत्यमच्या जवळ, छोटस दुकान आहे लखनवी कुर्ती आणि टॉप्स्च.
रेट्स रीजनेबल आहेत.

पण या साड्यान्चे पल्लु सोडायचे असतात आणि जर पिनअप करायचे असतील तर बॉर्डर फक्त घेउन टायअप करायचेhot_pink_pista.jpg

भारतात असताना टीवी चॅनलवर .. ( सोनी??कलर्स??.. Sad आठवत नाही!!) 'सुरक्षेत्र' हा कार्यक्रम पाहिला. त्यात अँकर चं काम करणारी आयेशा टाकिया , लहंगा कम साडी असलं काहीतरी घालायची.. खूपच आकर्षक वाटली ती स्टाईल. त्या स्टाईल काही नांव आहे का? टेलर कडे शिवून घ्यावी लागते कि रेडीमेड मिळते?? लहंगा शिमर मधे मरमेड स्टाईल मधे होता. फिटिंग चा असल्याने असल्या साड्या रेडीमेड मिळत नसाव्यात बहुतेक..

वर्षू>>>>>>>>> ते प्रॉपर डिझायनर कडुन शिवुन घेतल तर छान नाहीतर गावठी दिसत... माझा लग्नात एका बाईंनी घातली होती....सुपरर्फ्लॉप.....

थँक्स अनिश्का.. साड्यांचे फोटो टाकतेस का? म्हणजे कल्पना येइल जरा. मैत्रिणीचे लग्न आहे लवकरच. त्याच्या साठी खरेदी करायची होती. मी ह्या दोन साड्या पाहिल्या ....
http://www.yourdesignerwear.com/lavish-lehenga-style-saree-with-blouse-p...

http://www.yourdesignerwear.com/electrifying-butterfly-style-saree-p-162...

मैत्रिणीने एंगेजमेंट ला अशीच साडी घातली होती. या साड्यांची किंमत भारतात पण इतकीच आहे का?

आई गं देवा.. अण तो टेलर ही कुशल असावा लागेल ना.. जौ दे.. नेक्स्ट टैम बनाऊंगी..
तेंव्हा फ्याशन असो नसो Proud

सही धागा आहे यार ....मज्जा येतेय Happy
हे सगळं वाचूनच इतकं फ्रेश वाटतंय ना की बस....... Happy

Rani-Mukherjee-Designer-Saree.jpg

मला त्यातुन अस पोट दिसतं ना ते नाही आवडत Sad
म्हणुन या साड्या घालायची तुफान इच्छा असुनही मी घालत नाही

Pages