फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्शु......>>>>>>>> कलानिकेतन तर बेस्ट आहे.......पण फॅब मधे ड्रेस पेक्षा अ‍ॅक्सेसरीज छान असतात....

यशस्विनी >>>>>>>>>>>> मॅट फिनिश सावळ्या कलर वर छान दिसतात....

यशस्विनी>>>>>>> तुझी ती मैत्रिण जी आर्टिफिशियल दागिने बनवते ती मुंबई मधे राहते का???? तस असेल तर मला तिच्या कडुन दागिने घ्याय्ला आवडतील

लखनवी कुर्तीज स्वस्त आणि मस्त मुंबई मधे कुठे भेटतात कोणाला माहित आहे का??? लखनवी स्वस्त नाहीत पण तरी कुठे मिळत असलेच तर प्लिज मला कळवा....

लखनवी कुर्तीज स्वस्त आणि मस्त मुंबई मधे कुठे भेटतात कोणाला माहित आहे का? <<<
त्यांना(कुर्तीज) फोन करून विचार कुठे भेटायला येतात का म्हणून Wink

लखनवी कुर्तीज स्वस्त आणि मस्त मुंबई मधे कुठे भेटतात कोणाला माहित आहे का??? लखनवी स्वस्त नाहीत पण तरी कुठे मिळत असलेच तर प्लिज मला कळवा....>>>>

ठाण्यात हवं असेल तर माझी पंजाबी आंटी आहे एक. तिचं दूकान आमच्याच एरीयात आहे. टाइम पास म्हणुन फस्ट क्लास ड्रेसेस शिवते / विकते... तिच्या कडे कायम लखनवी कुर्ती / साड्या/ सुट्स मिळतात मस्त असतात. साधारण मार्च मधे नवा स्टॉक येतो.

दुसरी आंटी राम मारुती रोड वर आहे. घंटाळी रोडला जायच्या टर्न वर. (पुर्वी जिथे आय.सी.आय.सी.आय. बँक होती तिथे) तिच्या कडे तर अप्रतिम माल मिळतो.... ती पण माझी फेवरेट....

मुंबईत हवे असेल तर क्रॉफर्ड मार्केट ला ए. टु झेड कडे जाताना दोन लखनवी कपड्यांची दुकाने आहेत.... त्यांचं कलेकशन तर मस्तच....

दादरला रानडे रोड वर दिसिल्व्हा ग्राउंडच्या जवळ पुर्वी एक होतं... आता माहित नाही ( दादर-परळ सोडुन १० वर्ष झाली)

लखनवी कपडे हा अती जिव्हाळ्याचा विषय आहे... प्रत्येक प्रदर्शनात पन लखवन्वी मिळतच... सध्या पु.ल. देशपांडे सभागृह रविंद्र नाट्य मंदिर इकडे सेल चालु आहे. नक्कीच लखनवी मिळेल....

लखनवी कुर्तीज स्वस्त आणि मस्त मुंबई मधे कुठे भेटतात कोणाला माहित आहे का??? लखनवी स्वस्त नाहीत पण तरी कुठे मिळत असलेच तर प्लिज मला कळवा....>>>>>>>

पार्ल्याला , पार्ले बुक डेपोच्या बाजूला 'लखनवी'म्हणून छोटसं दूकान आहे .
त्याकडे बरेचदा collection छान असतं , महाग असलं तरीही.

अनिश्का.. सांताक्रूझ वेस्ट मधे मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या फ्रेंडशिप स्टोअर च्या जवळ(त्याच रस्त्यावर) काही दुकाने आहेत. सागर कलेक्शन आहे नाव बहुतेक.. किंवा त्याच मार्केट मधे लहान लहान गल्ल्यांमधे काही छान दुकाने आहेत लखनवी करता .. १२०० रु. पासून सुरु होणारी रेंज सुंदर कॉटन मधे आहे..
पार्ल्याच्या मार्केट ची माहिती नी कडून कळेल.. बहुतेक..

स्वस्ति>>> पार्ले लांब पडेल ग......पण मी ट्राय करेन......
निधप>>>> इतक तर चालत यार......तुला मला काय बोलयच होत ते कळ्ळ न?? मग बास..........टेन्शन नई लेनेका........:)

ओह.. अनिश्का.. मुंबईत कुठे मिळतात विचार्लंस ना... हीही...
बरं आता डोंबिवली-ठाणे म्हणालीस नाहीतर तुला अख्ख्या मुंबई कुलाबा ते बोरिवली पर्यन्त ची दुकाने सांगण्याचा विचार करत होते Proud

नी>>>>>>>>>> Biggrin Biggrin Biggrin
वर्षु>>>>>>>>>>>>>>>> सॉरी मला लक्षात नाही आलं.......

ब्लॅक आनि ग्रे कलरच नेल आर्ट प्रचंड आवडल... कसल किलिंग दिसतय
रीये मला पण त्या कलरच्या जीन्स आवडतात.. मी सुदधा पिंक किंवा स्काय ब्लु कलर मधे घेणार आहे Happy
कलानिकेतन तर बेस्ट आहे>>>>>>>>>>>> पण ते प्रचंड महागड आहे.. त्यापेक्षा व्हरायटी मधे लक्ष्मी रोड बरा

कसला मस्त धागा आहे हा! जामच आवडला मला. बादवे, तो कुर्डू प्रकार बहुधा मी शमा देशपांडेच्या कानात पाहीला आहे ( कलर्स चॅनेल वर - मधुबाला एक इश्क... मालिकेमधे ).

रिया, बिन्धास्त ब्राईट कलर्स लाव नखांना. मी पण सावळी आहे आणि माझ्याकडे हिरवा, काळा, कोबाल्ट ब्लू, काळपट मरून इ.इ. नेलकलर्स आहेत जे अगदी छान दिसतात. पण हे सगळे मॅट आहेत, शाईनी नाहीत.

दुसरी आंटी राम मारुती रोड वर आहे. घंटाळी रोडला जायच्या टर्न वर. (पुर्वी जिथे आय.सी.आय.सी.आय. बँक होती तिथे) तिच्या कडे तर अप्रतिम माल मिळतो.... ती पण माझी फेवरेट....<<<<<< खूशबू का? की. बाजूला मराठ्यान्च्य्य शेजारी आहे ते?

अगं मी लिहिलय ना ठाण्याला राम मारुती रोड वर ... एकदम छान दुकान आहे... नाव अत्ता आठवत नाहिये ( काय ती स्मरण शक्ती!! २५ वर्ष तिकडे राहुन नाव न आठवायचा पराक्रम!!!)

राम मारुती रोड वरुन सरळ चालत जायचं... न्यु इंग्लीश स्कुल च्या पुढे ... जिथे पेशवाई दुकान आहे टेंपटेशन्स आइस क्रीम पार्लर आहे, त्याच्या दोन इमारती सोडुन एकदम कॉर्नर वर हे दुकान आहे. एकदम मस्त... छान कलेक्शन..... तिकडे तुला खुप व्हरायटी मिळेल... वर "लखनवी, चिकन" असे लिहिलेले आहे....

मोकामि तुमच्या एरियातल्या आंटीचा पत्ता नीट सांगाल का?>>>

निम्मीज बुटिक, राजदर्शन बिल्डिंग, लुइस वाडी, ठाणे फोन नं.... ९३२३१२८८६६ मीसेस. मल्होत्रा.

Pages