मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
बित्तु, तुझा वरचा फोटो
बित्तु, तुझा वरचा फोटो फेसबूकावर "महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती"च्या वॉलवर झळकतोय रे. तुझ्या नावाशिवाय.
http://www.facebook.com/maharashtrachidurgsampatti?ref=stream
गोगलगायीच्या फोटो वरून गाय हा
गोगलगायीच्या फोटो वरून गाय हा क्लू कसा काय बुवा?
धन्स जिप्सी! अरे खूप ठिकाणी
धन्स जिप्सी!
अरे खूप ठिकाणी आहे तो. कुठे कुठे पळणार?
निंबे, जास्त टेंशन घेऊ नकोस
निंबे, जास्त टेंशन घेऊ नकोस
शेवटची दोन अक्षरं घेतलीय.
मस्त चाललंय इथे बित्तू, लगे
मस्त चाललंय इथे
बित्तू, लगे रहो
दागिन्याचा फोटो टाकायला
दागिन्याचा फोटो टाकायला बायकांना इतका वेळ?;-)
पहिली ३ घेतली असतील तस गुगल
पहिली ३ घेतली असतील तस गुगल ००० आले असते !
दिनेशदा
दिनेशदा
दागिना (निसर्गदत्त) क्लू:
दागिना (निसर्गदत्त)
क्लू: पिसे
मस्त फोटो माधव पिसे क्लू
मस्त फोटो माधव
पिसे
क्लू तलाव
(No subject)
लेक नैवाशा पुढचा क्लू - नदी
लेक नैवाशा
पुढचा क्लू - नदी
दिनेशदा कुठला क्लू घेतला
दिनेशदा कुठला क्लू घेतला आहात?
बाद
बाद
नदी क्लू पैलतीर
नदी
क्लू पैलतीर
बित्तू, पेन्टिंग्ज पण करतोस?
बित्तू, पेन्टिंग्ज पण करतोस? वॉव्व!
पैलतीर क्लू : प्रतिबिंब
पैलतीर
क्लू : प्रतिबिंब
वैनी, डिजिटल आहे ते...ब्रशनी
वैनी, डिजिटल आहे ते...ब्रशनी केलेले पेंटिंग नाही
प्रतिबिंब क्लू : बाकडे
प्रतिबिंब
क्लू : बाकडे
प्रतिबिंब सूर्याचे क्लू
प्रतिबिंब सूर्याचे
क्लू सूर्य
मी बाद...बाकडे क्ण्टिण्यू
मी बाद...बाकडे क्ण्टिण्यू
बाकडे आहे, पण फोटो रिपीट होईल
बाकडे आहे, पण फोटो रिपीट होईल ..मघाशीच टाकला आहे
निंबीचा फोटु पैला... फुडचा
निंबीचा फोटु पैला...
फुडचा क्लू बाकडे
टाका ना. ह्या वेळेला क्लू
टाका ना. ह्या वेळेला क्लू दुसरा द्या.
बित्तू मगाचचे बाकडे आणि त्या
बित्तू मगाचचे बाकडे आणि त्या खालची ती हिरवळ मस्तच होती. सांगायचे राहूनच गेले होते.
दिसतेय ना बाकडे ? पुढचा क्लू
दिसतेय ना बाकडे ?
पुढचा क्लू - प्रेमिक
बाकडे क्लू हिरवळ
बाकडे
क्लू हिरवळ
दिनेशदा क्लू लिवा की वो
दिनेशदा क्लू लिवा की वो
सुटलेत सगळे. फार धमाल
सुटलेत सगळे. फार धमाल चाल्लीये की. इतक्या पटापट फोटु रिसाइझ करून टाकणं झेपणारं नाही. मी प्रेक्षकमोडात.
धन्यवाद माधव अरे....दोन
धन्यवाद माधव
अरे....दोन बाकडे...संयोजक ठरवा कोणता क्ल्यू ते?
Pages