एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही.. मला वाटतं उद्याच असेल शेवटचा भाग.. अजुन "उल्की"चं व्हायचं आहे नं.. आज आजीने सुचवलं तसं. उद्या बहुतेक उल्की-अंगद एकत्र येतील.
बाय्दवे, आजीचा कुठला प्लॅन झाला सक्सेस्फुल???? अबीर वाला तर प्लान तर टांय टांय फिस्स्स झाला होता नं...?

ए अमेरिकेत कोणी तरी निरोप द्या रे की घना येत नाहीये तिकडे
घना येणार हे समजल्याने एकेकाला वेड लागतय तिकडे
गोळ्या घालत सुटलेत लोकांना

येस्स्स्स उद्या शेवटचा भाग Happy
बाय्दवे, आजीचा कुठला प्लॅन झाला सक्सेस्फुल???? अबीर वाला तर प्लान तर टांय टांय फिस्स्स झाला होता नं...?
>>
+१११११११११११

राधा आणि घनाच्या आईमधला संवाद फार आवडला. घनाच्या काकांचे पांचरटपणा करणे वगळता शेवट चांगला केलेला वाटला. विशेषतः गेले महीनाभर ज्या पद्धतीने ताणत होते त्या मानाने तरी.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया दाखवण हा नवीन पायंडा घातलेला दिसतोय झी-मराठीने या मालिकेच्या निमित्ताने.
वर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवर लिहिल्याप्रमाणे टिंगल करण्याएवढ्यातरी त्या वाईट नाही वाटल्या मला. उलट सगळ्या प्रतिक्रिया मला सामान्य मराठी प्रेक्षकवर्गाने मनापासुन दिलेल्या वाटल्या. आजकालच्या धकाधाकीच्या आणि टेन्शनने भरलेल्या दिनक्रमात जर या मालिकेने लोकांना विरंगुळा दिला असेल तर बरच आहे की. असो..मालिका संपली का शनिवारी शेवटचा एपिसोड आहे?

आणि लग्नानंतर त्या अंगद-आत्या मध्ये भांडण झाल तर त्याचा राग बॉस घनावर काढुन ऑफिसमध्ये लेटनाईट कामसुद्धा करायला लावेल किंवा परत पॅकेज डिमोट तरी करेल Happy

ज्ञाना नॉर्मल बोलला म्हणालेल ना कोणी तरी?
कुठे काय नॉर्मल होतं त्यात Uhoh
मला तुम्हाला थँक्स म्हणायचय
तुम्ही वेगळे झाला असतात तर मला बघवलं नसतं Uhoh
छी! काही तरी छान डायलॉग तरी टाकायचे आणि तो नॉर्मल झालेला तरी दाखवायचा

तुम्ही वेगळे झाला असतात तर मला बघवलं नसतं >> अगं रिया, निर्णय होईपर्यंत घनाचा चेहरा कसा मक्ख होता ते पाहिलस ना आणि ती राधा चेहरा पाडून रडवेली होऊन फिरत होती...म्हणून ज्ञाना तसे बोलला असेल.

सोनाली पण त्याचं वय काय त्याचे डायलॉग्स काय
हे वाक्य कुहूनी म्हणलं असतं तरी तिच्या कॅरेटरला सुट झालं असत ते

मला तर वाटले होते...सगळं कळल्यावर कूहू आणि देवकीसासूची प्रचंड रडारड सुरु होईल पण नशीब १-२ भागातच सगळे आटोपले.

>>>>कालच्या भागात आजीने स्वेटर काढला एकदाचा>>>>
आजी म्हणजे सलमान खान आहेत मालिकेतल्या ... Wink Proud

रडारडी पण...
आज कुहू प्रभुटला, उल्का आत्या अंगद/विनय आपटे (नाव विसरले मी), अमानविय जोडी, वैगेरे लग्न उरकणार का?
फक्त माउलीवर अन्याय झाला या सिरियलीत... त्यालाच कोणी मिळालं नाही

आजच्या भागात माईज्जी जुन्या जावयाला फोन करून "आपलं नाटक यशस्वी" झाल्याचं सांगतात तेंव्हा रात्र असते आणि विनोदकाका मात्र उजेड असलेल्या ठिकाणाहून बोलत असतो (अमेरिकेत गेला काय?). >>>

उल्काशी लग्न करायचे म्हणून अंगदने विनोदला अमेरिकेला पाठवले Happy

काल 'आम्हाला क्षमा करा, आम्ही चुकलो, पुन्हा असं करणार नाही' इ.इ. संवाद सरा आणि चमु घना-राधाच्या तोंडून प्रेक्षकांसाठी म्हणताहेत असा मी समज करून घेतला.

ह्म्म्म...... मला मालिकेपेक्षा हा धागा आता ओस पडणार याचे वाईट वाटते. सराची पुढची मालिका आली म्हणजे पहिल्या भागाच्याही आधी धागा काढायला पाहिजे. मालिका नंतर नेहमीसारखी गंडणार पण आपला धागा मात्र द्रौपदीच्या साडीसारखा न संपता अखंड चालत तर अधेमधे धावत राहणार....

बाकी काल काय झाले यावर नो कमेंट. आता जे संपतेय त्याबद्दल अजुन वाईट काय बोलणार. तरीही घनाचे 'माझ्या एक वर्ष जुन्या झालेल्या लग्नाची पहिली रात्र आहे, मला जाऊद्यारे' हे ऐकुन एक द्यावीशी वाटत होती.

Pages