Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला आवडले दोन्ही एपिसोड मधले
मला आवडले दोन्ही एपिसोड मधले राधाचे सीन्स आणि मुक्ताचा अभिनय!
राधाच्या कॅरॅक्टरशी अजिबात विसंगत नाही वाटले मला कुठलेच सीन्स, डॉयलॉग्ज .. उलट राधा-घना कपल मधे कायम राधा जास्तं समंजस, हुषार, स्पष्ट बोलणारी असल्याने तीच पहिल्यांदा प्रेम व्यक्त करणार, खरं बोलायची हिंमत करणार हे मला तरी आपेक्षित च होते म्हणून मला तिचा 'राधा' अॅटिट्युड कुठे मिसिंग नाही वाटला.
तडका फडकी मुलगी बदलत गेली हे ती स्वतः च कबुल करते घनाशी आणि त्याच्या आईशी बोलताना.
स्वप्नील ला खूप काही डॉयलॉग्ज नसून त्याचा अभिनय खूप आवडला , एकदम खरा सीन चालुये समोर असं वाटलं राधा-घनाला पहाताना:).
बाकी घनाचं अमेरिकेला जायचं प्रकरण त्या बाल मैत्रीणीच्या कारणामुळे अजुनच फनी होत चाल्लय
सॉरी कुहु फॅन्स,
पण मी काही आधी स्पृहाला कुठल्या इतर रोल्स अम्धे नाही पाहिलं त्यामुळे अजिबातच अपिल होत नाही ती.
तिचं कॅरॅक्टर भातात खडा आल्या सारख इरिटेट करतं ! .. त्यात दोष डिरेक्टर चा , डॉयलॉग्ज चा किंवा त्या अॅक्ट्रेस च्या स्क्रीन प्रेझेन्स चा माहित नाही पण इतकं इरिटेटिंग कॅरॅक्टर फार दिवसांनी दिसलं टी.व्ही वर ( या आधी ती सारेगमप मधली आस्मा महंमद रफी अशी जायची डोक्यात.)
जाउदे, पण आपलीमराठीच्या कृपेने तिचे सीन्स पुढे ढकलता येतात :).
मुक्ता आणि इला भाटे यांचा
मुक्ता आणि इला भाटे यांचा आजचा प्रसंग अगदी टचिंग होता.
कैच्याकै...राधा अगदी मनस्वीपणे अंधाराबद्दल बोलत होती ते सपशेलपणे कांकूंच्या डोक्यावरून गेल्याचे जाणवत होते. आणि नंतर त्यांचा काहीतरी वेगळाच चॅनल लागला. अंधारात दार लावण्याची भीती वाटते वगैरे...
आणि आता त्या आज्जी व्हायची स्वप्ने बघतायता...अरे त्या राजवाडेंना कुणीतरी सांगा भाबडेपणा आणि मंदबुद्धीपणा यात खूप फरक असतो. ती राधा सगळ्यांपासून दूर जाण्याच्या कल्पनेने हमसून हमसून रडतीये तरी या मंद बाईला कळत नाही का...
बाळाची चाहूल लागल्यावर ती लाजेल का अशी रडेल....
आणि त्या घनाचे लॉजिक तर अफलातूनच आहे...
काय तर म्हणे तीला वचन दिलेय. इथे घरच्यांच्या लाडाने बिघडलाय तर किमान तिकडे जाऊन सगळी कामे करावी लागतील, थोडा सुधारेल असे म्हणून तीने सांगितले असणार. तर हा बाब्या तेवढेच धरून बसलाय, म्हणे यू डीजर्व अमेरिका...
च्यायला असे स्टँडबाय मोड मध्ये लॅपटॉप फॉर्मॅट करण्यांना अमेरिका डिजर्व असेल तर मग बाकीच्यांनी कुठे जायचे.
आणि कहर म्हणजे तीचे लग्न होऊन ती गेली लंडनना..याला जा म्हणली अमरिकेला...
याला ना शेंडा ना बुडखा...
केवळ आणि केवळ राधाच्या एक्प्रेशन्ससाठी हा सगळा अत्याचार सहन करावा लागतो.
>>>च्यायला असे स्टँडबाय मोड
>>>च्यायला असे स्टँडबाय मोड मध्ये लॅपटॉप फॉर्मॅट करण्यांना अमेरिका डिजर्व असेल तर मग बाकीच्यांनी कुठे जायच>>>
आता लोकांची हद्द आहे. लोकांना खरच वाटलं का की तो स्टँडबाय मोड मध्ये लॅपटॉप फॉर्मॅट करत होता?
त्याने हा डॉयलॉग त्या प्रसंगात फक्त वेळ मारुन नेण्या करता मारला होता हे सरळ होतं. रोजच्या जीवनात पण आपण कधी कधी अश्या वेळेस अश्या टाईपची काहीतरी उत्तरं देतोच असं मला वाटतं...
आणि त्या घनाचे लॉजिक तर
आणि त्या घनाचे लॉजिक तर अफलातूनच आहे...
काय तर म्हणे तीला वचन दिलेय. इथे घरच्यांच्या लाडाने बिघडलाय तर किमान तिकडे जाऊन सगळी कामे करावी लागतील, थोडा सुधारेल असे म्हणून तीने सांगितले असणार तर हा बाब्या तेवढेच धरून बसलाय, म्हणे यू डीजर्व अमेरिका...
<< आशुचँप,
अगदी बरोब्बर
इला भाटे लॉजिक खरच अजबच आहे.. राधाचय उदास असण्याचा संबंध यांनी नातवंडाचे वेध शी जोडून टाकला खरच निदान या सिरियल मधे नाही हे आपेक्षित
कुहु सारखी कोणी मुली असु
कुहु सारखी कोणी मुली असु शकतात का आजच्या काळात? इतक्या बावळट?
लग्न ठरले म्हणून कैच्यकै तो र्पसंग , राधाचे भाव पण .. बाए बस कर. व इथे येवून साडी निवड. असे होते.
अरे कोणीतरी त्या अबीर-घना ला
अरे कोणीतरी त्या अबीर-घना ला सांगारे की पोरींच असल करीयरबद्द्लच बोलण जास्त मनावर घ्यायच नसत म्हणुन ! irrespective कोणी पोरगी बोलो अगर न बोलो पोरांना चांगल करियर करावच लागत.
बाकी मुक्ताने सुंदर अभिनय केलाय. गेल्या दोन भागांमधुन मुक्ताने, पुर्वीच्या राधामधला स्पष्ट आणि प्रामाणिक पणा आणि बदललेल्या राधामधला हळवेपणा सुरेख अधोरेखीत केलाय. घनाला प्रेमाची कबुली देताना कुठेही लाऊडपणा, चिकटूपणा, हताशपणा न दाखवता अधोरेखित केलेला स्पष्टपणा मुक्ताने छान रंगवलाय.
मी ही मालिका स्वप्निल-राजवाडेंमुळे बघायला सुरुवात केली होती पण आता मुक्तामुळे बघतोय. स्वप्निलसुद्धा सहज अभिनय करतो पण मुक्ता त्याच्यापेक्षा सरस वाटते. तरीही त्या दोघांमधली केमीस्ट्री सुरेख आहे. मुक्ता आधी मला ऊद्धट, प्राउडीश, अतिशहाणि वाटायची त्यामुळे तीच काम कधी सिरीयसली बघीतल न्हवत पण या मालिकेमुळे सतत तीचा अभिनय बघुन माझी मत साफ बदललीयत आता तीचा अभिनय (की मुक्ता? ) फार आवडतात बुवा
सगळ्यात बेक्कार म्हणजे, मी
सगळ्यात बेक्कार म्हणजे, मी एका मुलीला वचन दिलेय... छ्य्य!!
डोंगर पोखरून उंदीर काढावा तसे कारण दिले घनाने.
जीव गेला तरी अमेरीकेला जाणार तर का? वचन दिलेय.
कधी कधी सिरियल जरा बरी वाटत असताना इतके फुसके बार का मध्येच घुसवतात.. मजाच जाते.
>>>>बाळाची चाहूल लागल्यावर ती
>>>>बाळाची चाहूल लागल्यावर ती लाजेल का अशी रडेल....<<<<<
घना हा राधाशी बेजबाबदारपणे वागतो, भांडतो, अपमान करतो अशीच त्याच्या आईची धारणा आहे.
त्यांच्यात काहीतरी बिनसलं तर नाहीये असं तिला वाटत असतंच अधून मधून
त्यामुळे बाळाची चाहूल लागूनही भविष्यातल्या अंधारामुळे राधा रडू शकतेच ना ....
घना त्या प्रभातला बावळट बोलत
घना त्या प्रभातला बावळट बोलत होता, पण आता तर घनाच महामुर्ख वाटतोय. प्रभातला वचन मोडायला लावताना खुप मोठे मोठे फंडे सोडले होते त्याने.....स्वतःमात्र त्या कसल्या बालीश वचनासाठी अमेरीकेची नाटक करतोय.....घनाच कॅरॅक्टर आता पार गंडलय राव. या नवीन झेंगाटामुळे मालिका पुढे बोअर झाली नाही म्हणजे मिळवली.
च्यायला असे स्टँडबाय मोड
च्यायला असे स्टँडबाय मोड मध्ये लॅपटॉप फॉर्मॅट करण्यांना अमेरिका डिजर्व असेल तर मग बाकीच्यांनी कुठे जायचे.
आशूचँप, दर्द आहे हो .
'ती' मैत्रिण खरेच वर गेलीय की
'ती' मैत्रिण खरेच वर गेलीय की फक्त लंडनला गेलीय\?? मला हल्ली बघायला मिळत नाहीय मालिका, फ्क्त शेवटची १० मिनिटे मिळताहेत त्यामुळे माहित नाही.
जर ती खरेच वर गेलीय तर मग घनाने प्रभातला त्याच्या वर गेलेल्या गुरूंबद्दल जे सांगितलेले ते स्वतःलाही परत एकदा सांगावे.
आणि रच्याकने, अमेरिकेला एवढे काय सोने लागलेय की समबडी डिजर्व्स इट वगैरे वगैरे डायलाग असावेत??? बालपणीचा मित्र जो पुढे काय करणार हेही माहित नाही तो थेट डिजर्व्स अमेरिका???
जर खरेच बालपणीच ती गेली असेल तर बरे आहे, मोठी झाल्यावर घनाला घरात बिछान्यात लोळुन मोबाईल गेम्स खेळत वेळ काढताना पाहिले असते तर तिने 'यु डिसर्व कानाखाली सणसणीत जाळ' हेच उद्गार वर जाताना काढले असते.
>>च्यायला असे स्टँडबाय मोड
>>च्यायला असे स्टँडबाय मोड मध्ये लॅपटॉप फॉर्मॅट करण्यांना अमेरिका डिजर्व असेल तर मग बाकीच्यांनी कुठे जायचे.
<घनाचे लॉजिक तर अफलातूनच
<घनाचे लॉजिक तर अफलातूनच आहे...काय तर म्हणे तीला वचन दिलेय>
खरे कारण काहीतरी वेगळेच असावे. घनाचे त्या बालमैत्रिणीवर प्रेम होते. पण तिचे लग्न दुसर्याशीच झाले. घनाला आपले प्रेम व्यक्तही करता आले नव्हते. (राधाच्या तोंडचा संवाद.) म्हणजे तो प्रेमातही अपयशी. एकंदरीत सर्व आघाड्यांवर लुझर. पण हे स्वीकारायची तयारी नाही. म्हणून खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असा अॅटिट्युड. 'मी आयुष्यात जे काही एकदाच आणि एकदाचं करेन ते भव्यदिव्यच असेल. पण माझी परिस्थिती , भोवतालचे लोक मला ते करूच देत नाहीत, आणि दुसरं काही आलतूफालतू करणं मला मंजूर नाही' अशी टेप लावणार्या आणि प्रत्यक्षात काहीच न करणार्या माणसांबद्दलचा एक लेख (मानसशास्त्र/वर्तनशैलीच्या संदर्भात) वाचल्याचं आठवतं. घना ही अशीच एक केस असावा.
किंवा त्या बालमैत्रिणीने मला NRI नवराच हवा असे सांगून घनाला नकार दिला असावा; त्यामुळे घनाने लग्न न करणे आणि अमेरिकेला जाणेच असे पण घेतले असावेत.
झीवरच्या मालिकांमध्ये नायक हा न-नायक दाखवायची पद्धत पडलेली दिसते.
कुहू प्रभातचे लग्न मोडण्याचे
कुहू प्रभातचे लग्न मोडण्याचे नाटक घनाकडून प्रेमविषयक संवाद वदविण्यासाठीच होते.>>>>>पण तसे असेल तर प्रभातसकट कुहूपण प्लान चा भाग असावी लागेल.
बाकी मला ते राधाने घनोबाच्या विनवण्या वगैरे करणं बिलकुल आवडलं नै. त्यात त्याने कित्ती हलगर्जीपणाने तिला फरफटत खुर्चीत बसवलं आणि म्हणाला की '' तुझ्यासाठी सिच्युएशन बदलली असली तरी माझा फोकस क्लीअर आहे. हे सगळं असंच होतं, आहे आणि असंच संपणार!''
त्या ढेरपोट्या अन पळपुट्या घनाला उलट राधानेच खडसवायचं की '' ए मला जे वाटलं ते निदान मी प्रामाणिकपणे सांगितलं तरी! तू तर जे फील होतय ते स्पष्ट बोलूसुद्धा शकत नाहीयेस.'' काय गरजे घनाला अमेरीकेत नको जाऊ म्हणायची. अशा एकहेकडी अन आळशी बाबाच्या प्रेमात झुरत बसण्यापेक्षा तिने करारीपणे त्याला जा म्हणावं सरळ अन अबीरच असं नै पण तिला सुयोग्य असा मुलगा निवडून सेटल व्हावं. बसेल बोंबलत मग तो घनोबा!
अर्थात मला काल स्वजो राधाशी जे वागला त्याचा एवढा राग आला मीन्स स्वजोने अभिनय उत्तम वठवला!!
कुहू मात्र मला डोक्याबिक्यात जात नै हं...गोडे ती! हो क्की नै रे भुंग्या??????
स्वजोने काल राधाने
स्वजोने काल राधाने सांगितल्याप्रमाणे ह्रदयावर हात ठेऊन खरच तसं केलं अस्तं तर उत्तर निगेटीव्ह आलं असतं म्हणून पुन्हा एकदा परिस्थितीपासून पळून गेला घना....उत्तर न देताच!
पण तसे असेल तर प्रभातसकट
पण तसे असेल तर प्रभातसकट कुहूपण प्लान चा भाग असावी लागेल.>>> अगं हा प्लान माईआज्जींचा नाही, राजवाडेआजोबांचा गं!
ए मला जे वाटलं ते निदान मी
ए मला जे वाटलं ते निदान मी प्रामाणिकपणे सांगितलं तरी! तू तर जे फील होतय ते स्पष्ट बोलूसुद्धा शकत नाहीयेस. >> सध्या दोन गोष्टी वाटतायत त्याला. त्यातले जे जास्त महत्वाचे वाटतय ते त्याने स्पष्टपणे बोलून दाखवलेच की.
कालच मी हाकारूच्या लॉजीकल हाताळणीचे गोडवे गायले होते तर लगेचच त्यांनी त्यावर पोतेरे फिरवले वर बादलीभर पाणी ओतले. घनाच्या अमेरीका वेडाचे प्रकरण असेही नीट पचत नव्हते मला. काल त्याने जे कारण दिले ते मात्र निव्वळ हास्यास्पद होते. एवढीच जर त्या मैत्रिणीच्या शब्दाची काळजी होती तर आत्तापर्यंत थांबलासच का? GRE वगैरे देऊन आधीच का नाही निघून गेलास? आणि तशीही कोण लागून गेली ती मुलगी? तिला जर त्याचे प्रेमच नाही कळले तर घनाने तरी तिला एवढा भाव का द्यायचा?
आता आजचा भाग कहर असणार आहे. आता यापुढे कोणा मुलीला रडताना बघितले तर मला सॉलीड हसायला येणार आहे - देवकीबाईंची कारणमिमांसा आठवून
राजवाडे सावरा हो वेळीच. पाउस पडतोय, रस्ते निसरडे झालेत. मालिका नीट हाका. ताबा सुटला तर समोर केकता वॅली आहेच, गडगडायला.
नीधप + १, कुहू ची acting
नीधप + १, कुहू ची acting आणि तिचे बोलणे खरोखर नैसर्गिक आणि गोड वाटते . तिचे आणि घनाचे भावा बहिणीचे प्रेम छान दाखवले आहे. ती प्रत्यक्षात अशीच असेल असे वाटते.
तिला कविता सुचतात त्या खरोखरच बोलतानाच सुचल्या आहेत असे वाटते. उगाचच fashionable outfits वगरे तिला न देता तिच्या character प्रमाणेच तिचा ड्रेस कोड आहे. तिच्या स्वभावाला साजेसे सिम्पल पंजाबी सूट्स विथ दुपट्टा. perfect वाटते.
प्रभात ने दिलेल्या कारणाला
प्रभात ने दिलेल्या कारणाला फुटकळ,फालतू, इल्लॉजिकल म्हणणार्या घनाने, दिलेले कारण (अमेरिकेला जाण्यासाठीचे) तरी कितपत लॉजिकल वाटले?
कहर म्हणजे तीचे लग्न होऊन ती
कहर म्हणजे तीचे लग्न होऊन ती गेली लंडनना..याला जा म्हणली अमरिकेला...
याला ना शेंडा ना बुडखा... > अगदी अगदी !
काल मुक्ताच्या, "म्हणजे तू
काल मुक्ताच्या, "म्हणजे तू इथेही तुझं प्रेम व्यक्त करू शकला नाहीस" आणि "आई, मी बदलले हे माझं चुकलं नाही ना?" ह्या दोन संवादांसाठी मनुस्विनीला १०० मार्क!
आणि कालच इथे 'लहानपणची मैत्रिण- हा नवीन टर्न असणार' हा अंदाज व्यक्त केल्याबद्दल भुंगा आणि स्वप्नाला १० मार्क. शिवाय ज्ञानेशला 'अमेरिकेला जायचं वेगळंच काहीतरी कारण असेल' ह्या अंदाजाबद्दलही १० मार्क!
१०च, कारण काल लगेचच हे सीन्स आले, म्हणजे हे मायबोली वाचून आलेले नाहीत. आधीच शूट झाले होते. केवळ अंदाज बरोबर आला म्हणून बक्षिस!
स्वप्ना, भुंगा, ज्ञानेश- केवळ गंमतीत लिहीले आहे. तुम्हीही दिवे घेऊनच वाचा ही विनंती. आवडले नसेल, तर संपादित करेन.
इलाकाकूंना मात्र नातवंडाची चाहूल लागली असेल तर आवरा हां!
इलाकाकूंना मात्र नातवंडाची
इलाकाकूंना मात्र नातवंडाची चाहूल लागली असेल तर आवरा हां! <<< +१००
आशुचँप >>> + १०० मोठी
आशुचँप >>> + १००
मोठी झाल्यावर घनाला घरात बिछान्यात लोळुन मोबाईल गेम्स खेळत वेळ काढताना पाहिले असते तर तिने 'यु डिसर्व कानाखाली सणसणीत जाळ' हेच उद्गार वर जाताना काढले असते. >>> + १००
इलाकाकूंना मात्र नातवंडाची चाहूल लागली असेल तर आवरा हां! >>> + १००
भुंग्या...........आम्हाला
भुंग्या...........आम्हाला कुहु साठी मुलगा आहे....................कुहुचा मुलगा नाही दाखवायचा आहे.......अजुन वेळ आहे त्यासाठी.........तो पर्यंत धीर धर
कित्ती वाचायचं राहिलंय
कित्ती वाचायचं राहिलंय इथे......... दोन दिवस नेट गंडल्यामुळे प्रचंsssssssssड उपासमार झालेय माझी
इलाकाकूंना मात्र नातवंडाची चाहूल लागली असेल तर आवरा हां!>>>>>>>>>>
अरे त्या घना ला दोन कानफाडात
अरे त्या घना ला दोन कानफाडात मारा रे.......... लायकी नसताना इतकी चांगली मुलगी बायको झाली आहे....वर ती प्रेम सुध्दा करु लागली आहे.......भरीसभर ती मुलगी स्वतःहुन प्रेमाची कबुली देत आहे.......
.
.
तरी हा माठ.. ठोंब्या.. निर्लज्ज.. बिनअकलेचा..बिनडोक..जाड्या.. ( अजुन शब्द आठवल्यावर टाकेन) असा का मुर्ख वागतोय
उदयन +१......अशा चांगल्या
उदयन +१......अशा चांगल्या मुली सहजासहजी मिळत नैत म्हणावं
उदयन, टोकूरिका, त्या घनाला
उदयन, टोकूरिका,
त्या घनाला राधापेक्षा अमेरिका सुंदर वाटतेय ना पण, तिच्या प्रेमात पडलाय तो, फार्फार फोकस्ड आहे तो, शिवाय एक प्रेमभंग वाला, आपण नाही समजून घेतलं तर कोण समजून घेणार बिचार्याला... होईल त्याला उपरती...
उदयन +१......अशा चांगल्या
उदयन +१......अशा चांगल्या मुली सहजासहजी मिळत नैत म्हणावं
>>>>>>>>>>>>>>
टोकूला शंभर मोदक...
आता उदयनला सांग बरं, चांगल्या मुली कश्या मिळतात....... ही डिसर्व्स वन
मला वाटतंय की "मुंबई पुणे
मला वाटतंय की "मुंबई पुणे मुंबई" चा शेवट रेल्वे स्टेशनवर होता..... तसा या मालिकेचा शेवट एअरपोर्टवरच्या सीनने होणार..........
पुन्हा जाहिरातबाजीला चान्स. आजपर्यंत मराठी मालिकेत एअरपोर्टवरचे सीन्स कधीच आलेले नाहीत
एअरपोर्टवरच घनाला उपरती होणार......... आणि त्याआधी घनाची ती मैत्रीण (जर जिवंत असेल तर) अचानक अवतरून घनाला उपदेशामृत पाजेल....
मन्वा नाईकला बोलवा त्याची मैत्रीण म्हणून नाहीतर उर्मिला कानेटकर
Pages